Skip to main content

बीन सॅलेड

बीन सॅलेड

Published on बुधवार, 14/05/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
ही पा. क्रु. तुम्ही वाचलीच आहे आधी मी इथे फक्त नंतर सापडावी म्हणून टाकतेय बीन सॅलेड १०-१५ फरसबीच्या शेंगा २ चमचे डिजॉन मस्टर्ड (मोहोरी पेस्ट + मध) हे तयार पण मिळतं वास खूप छान येतो ह्याने १/२ कप इ व्ही ओ ओ (एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल बेस्ट) १/४ कप रेड व्हिनेगर १ कॅन साधारण (२००-२५० ग्रॅ. असेल ) राजमा (उकडलेला) तेवढेच छोले (उकडलेले) पिंटो बिन्स, ब्लॅक बिन्स, वाटाणे अशा हव्या त्या बिन्स सगळ्या उकडून त्यात टॉमेटो, किंचित साखर, मीठ, कांदा, कोथंबीर, मिरपूड, थोडी कैरी सगळं मिक्स करा आणि खा....मस्त लंच होतो.. चु. भु. द्या. घ्या.

याद्या 7008
प्रतिक्रिया 15

मस्त आहे कृती मी डिजॉन मस्टर्ड ऐवजी हॉट सॉस(पेपर सॉस) वापरते. तो फ्लेवर पण ट्राय करून बघ. बाकी हे चवीला छानच लागेल. चकली http://chakali.blogspot.com

ट्राय करुन पाहीन...हो गं रोज कॅलरी न वाढवणारं काय मिळेल ते शोधत असते....म्हणून हे उद्योग

वरदा,तुझं बीन्स सॅलड आवडलं ग..करून पाहतेच. अवांतर-रोज कॅलरी न वाढवणारं काय मिळेल ते शोधत असते....म्हणून हे उद्योग म्हणून तर म्हटलं,करून पाहतेच..

वरदा, आता ईस्ट कोस्ट स्पेशल कट्ट्याला हा मेनू कर.. नक्की. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ही पाकृ वाचल्याचे आठवत आहे.... आपला, (कोशिंबिरप्रेमी) तात्या.

मी काल स्वातीच्या संडे स्पेशल सॅलेड मधे दिली होती. ती म्हणाली नंतर शोधायला सोप्पी जाईल वेगळी टाक म्हणून इथे टाकली...

वरदा एकदम कॅलरीजवर लक्ष ठेवलेली छान पाककृती सा॑गितलीस. करून पहातेच.

तुला सगळे बीन्स मिळतील शॉप राईट मधे..पण ते कॅन मधले बिन्स आणलेस ना तर चक्क चाळणीत टाकून धुवुन घे कारण ते जरा चिकट असतात...

व्हाईट व्हिनेगर आणि रेड व्हिनेगर च्या चवीत काही फरक आहे का?

In reply to by युगंधरा

व्हाईट व्हिनेगर आणि रेड व्हिनेगर च्या चवीत काही फरक आहे का? चव घेऊन तुम्हीच आम्हाला सांगा.

पण व्हाईट व्हिनेगार सुद्धा छान लागतं सगळ्या सॅलेड मधे..त्याच्या टेस्ट मधे कींचित आंबटपणा असतो तो रेड व्हीनेगार मधे नसतो. ह्या सॅलेड मधे कैरी, टॉमेटो असल्याने आंबट चवीची गरज नाही लागत म्हणून रेड घालत असतील... जनरली चायनीज मधे वगैरे व्हाईट टाकतात...साधं सॅलेड किंवा सब्ज बनवायचे असतील तर सुधा तेच छान लागतं.. बाकी एक्सपर्ट सांगतीलच कुठलंही व्हीनेगार हाताला लागेल ते टाकून पहायचं हे मला बापडीला माहित..सायन्सची विद्यार्थिनी ..त्यामुळे काहीही दिसलं तरी 'आपण प्रयोग करुन पाहु' हेच चालु असतं.......

..त्यामुळे काहीही दिसलं तरी 'आपण प्रयोग करुन पाहु' हेच चालु असतं....... हे महत्त्वाचे. स्वयंपाकघर ही एक 'प्रयोगशाळा'च असते.

स्वयंपाकघर ही एक 'प्रयोगशाळा'च असते.
सुंदर वाक्य.

मस्त वाटलं हो मी ह्यावर अगदी १०१% विश्वास ठेवते. फक्त त्यामुळे नवर्‍याचा गिनिपीग बनवते इतकच...:))