चाललंय काय हे????

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
18 Apr 2011 - 10:47 pm
गाभा: 

मायबाप महाराष्ट्र सरकारने एका "जल संपत्ती नियमन सुधारणा "नामक विधेयकावर रात्री १:२० मिनिटानी मतदान घेवून ते विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर करून घेतले आहे.
या विधेयकानुसार
पाणीवाटपाचा पिण्यासाठी त्यानन्तर शेतीसाठी आणि त्यानन्तर उद्योगांसाठी असा असलेला अग्रक्रम बदलून पिण्यासाठी उद्योगासाठी आणि सर्वात शेवटी शेतीसाठी असा करून घेतला आहे.
विधेयकातील इतर तरतूदीनुसार या विषयावर न्यायालयात जाता येणार नाही. तसेच न्यायालयात प्रलंबीत असलेली पाणीवाटपाची सस्र्व प्रकरणे रद्दबातल ठरवली जाणार आहेत.
हे विधेयक राष्ट्रवादी काँग्रेसचे जलसंपदामंत्री सुनीलतटकरी यांच्या कडून मांडण्यात आले
या विधेयकानुसार पाणीवाटपाचे अधीकार जलप्राधीकरणाकडून काढून घेवून मंत्रीमंडळाकडे दिले जातील. मंत्रीमंडळाकडून या अगोदर घेतलेल्या निर्णयांवर देखील न्यायालयात जाता येणार नाही
यामुळे पाणीवाटपात सुसुत्रता येईल असे कारण राष्ट्रवादीकडून देण्यात येत आहे
मात्र हा सरळसरळ शेतीसाठी असलेल्या पाण्यावर डल्ला मारला गेलेला आहे.
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात आले होते त्यावेळेस कोणीच यावर काही प्रतिक्रीया व्यक्त केली नव्हती.
या विधेयकाचा परीणाम विदर्भात जाणवणार आहे.
विधेयकावरील मतदानात कॉग्रेसचे काही आमदार सामील होते तरी देखील आता बाळासाहेब विखे पाटलांकडून या विधेयकाबाबत विरोध केला गेल्यानन्तर काही आमदारांनी या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.
आश्चर्य म्हणजे शेतकीमंत्र्यांचा या विधेयकाला विरोध आहे.
विदर्भातील सोफीया पॉवर कंपनीला या विधेयकाचा फायदा मिळणार आहे असा अंदाज आहे..मात्र या मुळे विदर्भातील शेतकर्‍याना मात्र तोटा होणार आहे. त्यांच्या वाट्याचे पाणी पॉवर कंपनीला देण्यात येईल
या विधेयकाबाबत काही गोष्टी संशयास्पद आहेत
१) हे विधेयक शुक्रवारी रात्री दीड वाजता का संमत झाले?
२) विधेयकातील तरतुदींसंदर्भात न्यायालयात दाद मागता येवू नये अशी तरतूद का करन्यात आली?
३) सर्वासामान्य नागरीकाना न्याय मागण्याची या द्वारे बंदी का केली असावी?
४) सरकार या द्वारे नक्की काय साधण्याचा प्रयत्न करीत आहे.
५) विरोधी पक्ष या बाबत नक्की काय भूमिका घेत आहे?
या विधेयकाबाबतीत अधीक माहिती
http://www.punemirror.in/article/2/201104182011041804290976714846cf8/Her...
http://www.downtoearth.org.in/node/1745

Maharashtra has passed a landmark legislation that gives priority to industry in allocation of water from the dams over agriculture.

The law also takes away rights of water allocation from Maharashtra Water Resources Regulatory Authority (MWRRA) and vests them in the hands of a committee of ministers chaired by the water resources minister

प्रतिक्रिया

सर्वसाक्षी's picture

18 Apr 2011 - 10:58 pm | सर्वसाक्षी

सरकार समाजाचा, महाराष्ट्राचा, देशाचा उद्धार करायला अहोरात्र झटतय आणि कुणाला किंमत नाही! त्यांनी रात्रीचा दिवस करुन कामे करायची आणि सकाळी उजाडल्यावर लोकांनी त्यावर टिका करायची हे बरे नाही. अहो वीज कंपनीचा फायदा म्हणजे शेतकर्‍याचा फायदा. त्याला दूरदर्शनवर शेतीचा सल्ला मिळेल, संगणकावर नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळेल.

अन्या दातार's picture

18 Apr 2011 - 11:04 pm | अन्या दातार

एका चांगल्या विषयाला हात घातला गेला आहे.
>> विदर्भातील सोफीया पॉवर कंपनीला या विधेयकाचा फायदा मिळणार आहे असा अंदाज आहे..मात्र या मुळे विदर्भातील शेतकर्‍याना मात्र तोटा होणार आहे. त्यांच्या वाट्याचे पाणी पॉवर कंपनीला देण्यात येईल

नवीन माहिती.
माझा अंदाज पुण्याजवळील कंस्ट्रक्शन कंपनी बाबत होता.

सरकार या द्वारे नक्की काय साधण्याचा प्रयत्न करीत आहे.
दडपशाही (लोकांनी निवडुन दिलेल्या गुंडांची)

विरोधी पक्ष या बाबत नक्की काय भूमिका घेत आहे?
शिवसेनेने "सध्यातरी" याला विरोध केला आहे.

पप्पुपेजर's picture

19 Apr 2011 - 8:37 am | पप्पुपेजर

>> विदर्भातील सोफीया पॉवर कंपनीला या विधेयकाचा फायदा मिळणार आहे असा अंदाज आहे.. <<
या बाबतीत पुष्कळ तर्क वितर्क आहेत पण हा पॉवर प्रोजेक्ट आवश्यक आहे .

सहज's picture

19 Apr 2011 - 9:21 am | सहज

शेतीचा भारतीय अर्थव्यवस्थेतील वाटा १४.६% आहे, उद्योग क्षेत्राचा २८% , बाकी बँकींग, फायनान्स, एनर्जी इ इ.

असे असताना प्राधान्यांचा क्रम पिण्यासाठी, उद्योग, शेती हवा की नको?

ओरड जनसंख्येमुळे आहे का? उद्योगात भारताची १/३ जनता व ग्रामीण भागात शेतीवर अवलंबून २/३ किंवा ४०% - ६०% म्हणून ?

शहरीकरणाबद्दल, शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या पाणी, वीज वापराबद्दल, देशाला आवश्यक वाढत्या उद्योगधंद्याकरता, नागरीकांच्या वाढत्या गरजांकरता (आठवा आजोबांकडे किती मोबाईल होते व आज माणशी किती मोबाईल आहेत) पाणी, वीज कोठून आणायची?

विकास's picture

19 Apr 2011 - 11:12 pm | विकास

शेतीचा भारतीय अर्थव्यवस्थेतील वाटा १४.६% आहे, उद्योग क्षेत्राचा २८% , बाकी बँकींग, फायनान्स, एनर्जी इ इ.

शेतीचा पोटव्यवस्थेतील वाटा किती आहे ह्याची उत्सुकता आहे. :-) म्हणजे किती टक्के लोकांना खायला लागते जे शेतीतून तयार होते? :?

अर्थात हे म्हणत असतानाच पाण्याचे व्यवस्थापन शेतकरी तसेच उद्योग आणि जनता देखील करत आहे का हा देखील (जास्त) महत्वाचा मुद्दा आहे असे वाटते.

थोडे वेगळे ऐकीव लॉजिक, पण काही अंशी पटलेले: निवडणूकी आधी बाळासाहेबांनी शेतकर्‍यांना मोफत वीज दिली जाईल असे म्हणले. तात्काळ सुशीलकुमारांनी ती देऊनच टाकली. परीणामी वीजेचे मुल्य गेले आणि वाटेलतशी वापरली गेली. फुकटची डिमांड वाढत आहे पण सप्लाय मात्र आहे तसाच. याने आधीच काळोखात असलेल्या महाराष्ट्रास अजूनच वीजकपातीची सवय करून घ्यावी लागली. कारण वीजेचे व्यवस्थापन बोंबलले... :(

आंसमा शख्स's picture

19 Apr 2011 - 10:01 am | आंसमा शख्स

जगायचे असेल तर शेती सोडा - इतकी सरकारी धमकी आहे.

शेतीचा भारतीय अर्थव्यवस्थेतील वाटा १४.६% आहे, उद्योग क्षेत्राचा २८% , बाकी बँकींग, फायनान्स, एनर्जी इ इ.
असे असताना प्राधान्यांचा क्रम पिण्यासाठी, उद्योग, शेती हवा की नको?

ही तुलना अनाठायी आहे फसवी आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतीचा वाटा पाहताना शेतमालाचे भा आणि औद्योगीक मालाचे भाव लक्षात घ्यायला हवे. एक किलो वजनाचा कोणताही शेतमाल ( उदा ::आंबा) आणि एक किलो वजनाचे औद्योईक उत्पादन ( उदा:कार्बन स्टीलचे बेअरिंग ) यांच्या किमतीत कित्येक पटीचे अंतर असेल . ही तुलना जशी अतर्क्य वाटते तितकीच भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतीच्या वाट्याची औद्योगीक उत्पन्नाच्या वाट्याशी केलेली तुलना अतर्क्य आहे.
पाण्याचे प्राधान्यक्रम हा जलसंधारण विभागाकडे असतो. या विधेयका नुस्सार या प्राधान्य क्रमात बदल करन्याचे अधीकार संबन्धीत मंत्रीगटाकडे असेल त्याच प्रमाणे मंत्रीगटाने( समितीने) घेतलेल्या निर्णयाबाबत कोर्टात दाद मागता येणार नाही असाही एक मुद्दा विधेयकात आहे.
विदर्भात सावकारी दुश्काळ यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत असताना शेतीला योग्य पद्धतीने पाणी पुरवठा कसा होईल याकडे लक्ष न देता तेथील औष्णीक वीज प्रकल्पाला शेतीसाठी राखीव ठेवलेले पाणे देणे हा कोणता न्याय होईल. सरकार शेतकर्‍याना पाणी देण्यात अपयशी ठरत आहे.
दुसरा मुद्दा म्हणजे सोफीया कंपनीला पाणी देण्याबाबत एका जनयाचिकेवरेल खटला हायकोर्टात चालु आहे. समजा हे विधेयक मंजूर झाले आणि हायकोर्टाने त्या याचिकेसंदर्भात काहिही निर्णय दिला तरी तो निर्णय या विधेयकामुळे रद्दबातल ठरतो.
सरकारने परिस्थिती पाहून पाणी धोरण बदलले तर हरकत नाही पण त्याविरुद्ध दाद मागण्यालाच कायदा करून बंदी घालावी या बद्दल आक्षेप आहे.
ज्या पद्धतीने सरकार औद्योगीक प्रकल्पांसाठी जमीन संपादन करीत आहे त्याला आक्षेप आहे.
लवासा प्रकल्प हा तर धरणाच्या शेजारीच वसवलेला आहे. त्यालाही या निर्णयाचा फायदाच होणार आहे.
भारताच्य प्रगतीसाठी उद्योग हवेतच, वीजप्रकल्प देखील हवेत पण त्यासाठीचे विधेयक शुक्रवारी रात्री संमत करून घेण्याची घाई का?
पॉवर प्रोजेक्ट हे हवे आहेतच . पण त्यासाठी जनतेचा बळी देवून त्यांना देशोधडीला लावून हे प्रोजेक्ट्स करण्यापेक्षा हे न होता कसे करता येईल याची धोरणे आखावीत.
अवाम्तरः वीज वचवण्यासाथी लोडशेडिंग करताना लहान गावांतील नळ पाणी योजना कोरड्या पडतात. पण मुम्बई सारख्या शहरांमध्ये दिवसरात्र जहिरातींचे बोर्ड्स लखलखत असतात. टीव्ही मालीका रात्रभर चालू असतात. सरकारला जर उत्पन्नच हवे असेल तर आयपीएल सारख्या खाजगी मनोरंजनउद्योगाला करमाफी कशासाठे देतात. वर्ल्डकप मॅचेसच्या उत्पन्नावरवर ४५ कोटींची करमाफी दिली पण त्याच आयसीसी ने वर्ल्ड कप ट्रॉफी एक्साईज करभरून देशात आणण्यातकुचराई केली

विजुभाऊंशी १००% सहमत. कोर्टात दाद न मागता येण्याचा मुद्दा खरच भयावह आहे!

सुधीर१३७'s picture

19 Apr 2011 - 10:01 pm | सुधीर१३७

>>>>>>>>>>> दुसरा मुद्दा म्हणजे सोफीया कंपनीला पाणी देण्याबाबत एका जनयाचिकेवरेल खटला हायकोर्टात चालु आहे. समजा हे विधेयक मंजूर झाले आणि हायकोर्टाने त्या याचिकेसंदर्भात काहिही निर्णय दिला तरी तो निर्णय या विधेयकामुळे रद्दबातल ठरतो.
सरकारने परिस्थिती पाहून पाणी धोरण बदलले तर हरकत नाही पण त्याविरुद्ध दाद मागण्यालाच कायदा करून बंदी घालावी या बद्दल आक्षेप आहे. >>>>>>>>>>>>>>>

........................... हे आक्षेप कोर्ट योग्य जागी मारेल याची खात्री बाळगा, कारण अशी तरतूद घटनाविरोधी असल्याने रद्दबातल होऊ शकते. तसेच त्यामुळे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक अधिकारात कोणतीही बाधा येत नाही व अशा निर्णयावर घटनेच्या कलम २२६ प्रमाणे उच्च न्यायालयात दाद मागता येते. तेव्हा त्याची चिंता नसावी.

बाकी सहमत.

किसन शिंदे's picture

19 Apr 2011 - 10:43 am | किसन शिंदे

आत्ताच मटामध्ये वाचलेल्या बातमीनुसार या पाणीवाटप विधेयकाचा फेरविचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

विजुभाऊ's picture

19 Apr 2011 - 2:05 pm | विजुभाऊ

या विषयाला लोकसत्तेचा अग्रलेख
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=150...

आता पर्यंत जमिनी चोरल्या, आता पाणी चोरतायेत....

सुधीर१३७'s picture

19 Apr 2011 - 10:02 pm | सुधीर१३७

चोर चोर्‍या नाही करणार तर काय करणार???????.......................... :wink:

अन्या दातार's picture

19 Apr 2011 - 10:58 pm | अन्या दातार

>>हे आक्षेप कोर्ट योग्य जागी मारेल याची खात्री बाळगा

तसे घडले तर खरंच आनंद वाटेल.

>>तरतूद घटनाविरोधी असल्याने रद्दबातल होऊ शकते.
होऊ शकते / होते / करावी लागते? यापैकी नक्की काय होते?

किसनराव, आजवर कित्येक आश्वासने दिली गेल्या आहेत. यावर अंमलबजावणी होईलच हे कशावरुन? आणि मुख्यमंत्रांची प्रॉडक्टीव्हिटी किती भारी आहे हे यातून दिसून येतेय.

सुधीर१३७'s picture

20 Apr 2011 - 12:37 pm | सुधीर१३७

>>>>>>> >>तरतूद घटनाविरोधी असल्याने रद्दबातल होऊ शकते.
होऊ शकते / होते / करावी लागते? यापैकी नक्की काय होते? >>>>>>>>>

....

..................... सदर कायद्यामुळे प्रत्यक्षात बाधित झालेल्या व्यक्ति अगर संस्थेने सदर तरतूद घटनाविरोधी असल्याने रद्दबातल ठरविण्याची मागणी याचिका करून करावी लागते. सध्या सार्वजनिक हितासाठी देखील याचिका करता येते (Public Interest Litigation). अशा याचिकेवर संबंधितांचे म्हणणे ऐकून उच्च अथवा सर्वोच्च न्यायालय त्यावर निर्णय देते.
जर सदर निर्णयाविरुद्ध न्यायालयात जाण्याचा रस्ता बंद केला असेल तरीही अशी तरतूद ही भारतीय राज्यघटनेप्रमाणे उच्च व सर्वोच्च न्यायालयातील याचिकांना लागू होत नाही कारण तो घटनेने दिलेला अधिकार आहे व तो योग्य घटना दुरुस्तीने रद्द करावा लागेल व अशी घटनादुरुस्तीदेखील घटनाविरोधी ठरविली जाऊ शकते. अधिक माहितीसाठी व्य. नि. ची सुविधा वापरावी.

पानी आकाशातून पडतं. त्यावर सगळ्यांचा हक्क. म्हणून जनतेच्या मतानुसारच पान्याचं वाटप व्हायाला हवं. कारखानदारांना हवं तर ते पान्याचं आपल्या फॅक्टरीत उत्पादन करतील. उद्या हे लोक सुर्यप्रकाश आणि वारा पन ताब्यात घेतील आणि कारखांदारांना विकूण टाकतील.
नारायन सुर्वे म्हनालेच होते ”त्यांनी सुर्य बाजारात आनला”

विनायक बेलापुरे's picture

20 Apr 2011 - 3:01 am | विनायक बेलापुरे

यात सरकारची जाम हुशारी दिसते.
यापुढे पाणी फुकट अथवा सवलतीच्या दरात अथवा औद्योगिक दरात ही मिळणे मुश्कील होउन जाणार आहे.
कारण याचाच अर्थ पाणी आता लिलाव पद्धतीने उपलब्ध होणार आहे. जो जास्तीची बोली लावेल किंवा "इतर काही बंदोबस्त" करेल त्याला पाणी मिळेल. कोणा साठी किती पाणी सोडायचे हे जे काम कॅनॉल वरचा पाटकरी करत असे ते काम आता मंत्रालयातून होणार आहे.

ही धोक्याची घंटा आहे सर्वांसाठी. पाण्यासाठीची लढाइ आता अंगणातून दरवाज्यात आली आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

20 Apr 2011 - 12:18 pm | अविनाशकुलकर्णी

पाणी माफियांचे राज्य येणार....

विजुभाऊ's picture

3 Dec 2019 - 12:19 pm | विजुभाऊ

असेच आठवले म्हणून धागा वर आणलाय.
त्यावेळेस त्यानीही काही निर्णय रात्रीच घेतले आहेत.