मराठी भाषा जग/वाढवण्याचा सोप्पा उपाय....

प्यारे१'s picture
प्यारे१ in विशेष
1 Mar 2011 - 11:14 am
मराठी दिन

नमस्कार मंडळी....!

मराठी दिन 'साजरा' झाला. काही प्रश्न डोक्यात आणि उत्तरे सापडेनात.
मराठी ही अभिव्यक्तीची भाषा म्हणून आपण वापरतो. विचारांची देवाण घेवाण करण्याचे माध्यम. मराठी हीच मुख्य भाषा असण्याचे मराठी माणसापोटी जन्मलो हे एक मुख्य कारण. त्याहून मुख्य म्हणजे मराठी वातावरणात वाढलो. (सांगली, दादर, पुणे येथील बरेच अमराठी शुद्ध मराठी बोलताना पाहिलेत) अपवादात्मक अगदीच काही लोक आवड, प्रेम यापोटी मराठी अंगिकारतात. यामध्ये आपले कर्तृत्व काय? आपण 'लाभले आम्हास 'भाग्य' म्हणत खुश. नो डाऊट 'भाग्य' आहेच पण श्रीमंताघरी जन्मलेला दुर्भागी मुलगा अशी तर आमची स्थिती नाही ना???

बर्‍याचदा मला असे वाटते की, मराठी भाषा मेली, मराठी भाषा हरवली असे करण्यात, ओरडण्यात प्रेम कमी आणि राजकारण त्याबरोबरच अर्थकारण जास्त आहे. मराठी भाषा जिवंत ठेवण्याचा, वाढवण्याचा सोप्पा उपाय म्हणजे मराठी माणसाला असलेल्या न्यूनगंडातून त्याला बाहेर काढणे हा आहे.मराठी माणूस असेल, किंबहुना तो सुस्थित, कर्तृत्ववान, उद्योगशील असेल तर आणि तरच कुणाला तरी अनुकरणीय होईल आणि मराठी भाषेला किंमत मिळेल. उगाच मराठीला, पर्यायाने मला किंमत द्या म्हणून कोण किंमत देईल? इग्रजांनी कधी सांगितले तुम्हाला ' वी वेअर सो लकी टू बी बॉर्न्ड ब्रिटीश' म्हणून? जपानी आपले मिचमिचे डोळे मिच्कावत वाकुल्या दाखवताना दिसतातच की. जपानी शिकणं हा अ‍ॅसेट मानला जातो ना? जपान्यांचे कोणते साहित्य वाचण्यासाठी आपण जपानी शिकतो? जपानी उद्योग जगभर पसरले आहेत त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी आपण हे करतो. इंग्लिश ही तर जागतिक भाषा झाली आहे. का झाली ती जागतिक याचा विचार करणे गरजेचे आहे. ब्रिटीशांचे कर्तृत्व मोठे हे नाकारुन चालणार नाही. ' कर्तृत्ववान मराठी सरदार' होळकर मप्र तील इंदौरला होते म्हणून तिथे मराठी बोलली जाते ना?

'लुंगी हटाव, पुंगी बजाव' ला चाळीस हून अधिक वर्षे गेली. आज 'लुंगी ऐवजी भैया' ह्या शब्दाव्यतिरिक्त घोषणा तीच. काही लोकांनी सातत्याने मराठी लोकांना ते असुरक्षित असल्याची भीती घातली आणि त्याहून जास्त स्वतःच्या फायद्यासाठी आपण मराठीच्या झेंड्याखालीच एक राहू ही भावना निर्माण केली. उद्देश चांगलाच पण जागतिकीकरणाच्या रेट्यात आपण कूप मंडूक बनून राहू याचा विचार झाला नाही. बाकीच्यांनी जातीच्या, विद्वेषाच्या भावनांना फुंकर घालून तेच केले. मग बसलोय ओरडत. बाकी लोक पुढे जातात म्हणून.

मुळात हीच शक्ति एक होऊन जर काही क्रियाशील कार्य करेल तर मराठी माणसाच्या प्रगतीचे एखादे पाऊल टाकले जाईल. मराठी माणूस पुढे गेला की आपोआप मराठी ला राजाश्रय मिळेल आणि मराठीचा उत्कर्ष होईल.

मोडेन पण वाकणार नाही असे आपण म्हणतो. पण कुठे वाकायचे आणि कुठे ताठपणा घ्यायचा हे नको कळायला?
मिपा सारख्या मराठी संस्थळावर लिहिताना पूर्ण जाणीव तर आहेच त्याउप्परही मराठी वर प्रेम देखील तितकेच आहे. म्हणूनच थोडासाच कडू काढा (बरेच लिहिता येउ शकते पण म्हणून जास्त डोस नको...).....

प्रतिक्रिया

लोकहो, विचार पटले नाहीत की काय???

की काही चूक वाटतंय?

परदेशात, परप्रांतात असताना आपण स्वभाषेशी जास्त जोडले जातो हा स्वानुभव आहे. पण महाराष्ट्रात राहणार्‍या आपल्या मराठी लोकांबद्द्ल अथवा त्यांच्या चुकांबद्द्ल त्रयस्थ नजरेने बघून आपण जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतो.

अधिक माहितीसाठी: मी महाराष्ट्रातच आहे.

पैसा's picture

2 Mar 2011 - 10:00 am | पैसा

तुमच्या लेखात आहे ते पटण्यासारखंच आहे, म्हणून कोणी वाद घालत बसले नाहीत!