ती जुनी डायरीच सापडत नाहिये आज मला
बघितली आहे का कुणी?
इथेच तर ठेवली होती मी..
खिडकी जवळ,
रायटिंग टेबल वर काल रात्री
निजण्या पुर्वी...
काल रात्र खूपच हवा होती
अन खिडकी राहिली होती उघडी
खोली तर गार पडली होतीच
अन मला अशी काय झोप होती लागली...
कुणास ठाउक काय घडले रात्री
न कळले मज काही
किती पानं फड्फडली असतील वार्यानं
वाचले गेले असेल सर्व काही...
माहीत नाही काय काय हरवले आहे
त्या डायरी सोबत...
जुने पत्ते होते काही.. आणि काही नावं
विसरु नये कधीच.. त्या साठी लिहिलेली..
आत्ता आठ्वत नाहीत नीट.. कुठ्ली...
फोन नंबरर्स पण होते त्यात काही
अधे मधे लिहिलेले....
डायल झाले नव्हते सगळे
पण तरिही जपले होते मी त्या डायरीत
अन काही पानांवर मी
अचानक स्फुरलेल्या कविता ही लिहिल्या होत्या
कुणास कळु नये मन माझे, ह्या भितीनं
दोन-चार ओळी लिहुन सोडलेल्या
तिनं दिलेले ते मोरपीसही...
देवा!!!!
आता सर्वच हारव्ल्या सारखे वाटत आहे
खरं तर फक्त डायरीच हारवली आहे
जुळतील नवीन पत्ते, अन फोन नंबर्सही,
मात्र
जुळतील का त्या ओळी पुन्हा?
अन, तिनं स्पर्शलेले ते मोरपीसही - ??
प्रतिक्रिया
28 Feb 2011 - 8:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जुळतील नवीन पत्ते, अन फोन नंबर्सही,
मात्र
जुळतील का त्या ओळी पुन्हा?
अन, तिनं स्पर्शलेला तो मोरपिसही - ??
मस्त...!
-दिलीप बिरुटे
28 Feb 2011 - 9:32 am | प्रीत-मोहर
मस्तच!!!!
28 Feb 2011 - 11:47 am | मिसळलेला काव्यप्रेमी
खुपच सुंदर...
28 Feb 2011 - 11:50 am | नगरीनिरंजन
तो मोरपिस? की ते मोरपीस?
28 Feb 2011 - 12:18 pm | निनाव
न.नि:
दुरुस्ती केली आहे. निदर्शनास आण्ल्या बद्दल आभारी आहे.
डॉक, प्रीत्.म., प्.राजा:
सर्वांचे आभार.
- निनाव.
28 Feb 2011 - 2:49 pm | विकाल
तिनं स्पर्शलेला ते मोरपीसही... इथे 'स्पर्शलेले' करा...!
बाकी उत्तम!
28 Feb 2011 - 4:58 pm | माझीही शॅम्पेन
खूप छान ,
हरवाल्यानंतरच कळातात काही खर्या मॉल्यवान वस्तू !
1 Mar 2011 - 8:03 pm | गणेशा
कदाचीत त्या अर्धवट ओळीच पुढील अर्ध्या आयुष्याच्या प्रतिक असतील ...
निसटलेल्या मोरपिसाचे रंग हळुच नजरेतून डोकावतील