महत्वाची सूचना - आर्थिक व्यवहार आणि मिसळपाव.

Primary tabs

नीलकांत's picture
नीलकांत in घोषणा
25 Feb 2011 - 12:31 pm

नमस्कार,

मिसळपाव.कॉम हे संकेतस्थळ कुठल्याही प्रकारे कुणालाही वैयक्तीक निरोपाद्वारे मिसळपाववर किंवा अन्य कुठल्याही संकेतस्थळावर पैशाची किंवा अन्य मदतीची मागणी करत नाही.

मिसळपाव.कॉम हे संकेतस्थळ केवळ मराठीसाठी योगदान करण्याच्या इच्छेतून चालवले जाते. यातून मिळणारा आनंद हाच एकमेव परतावा आम्ही मानतो. या व्यतिरीक्त अन्य कुठल्याही प्रकारचे व्यवहार मिसळपाव.कॉम करीत नाही.

लोकांनी मिसळपाववर यावे आणि मराठीतून व्यक्त व्हावे. शक्य होईल तसे मराठीत लिहावे हीच केवळ अपेक्षा आहे. मिसळपाव.कॉम तर्फे होणारी घोषणा ही मिसळपाव.कॉम वर जाहीर होत असते. त्यामुळे कुणी वैयक्तीक निरोपातून किंवा अन्य संकेतस्थळावर असा काही व्यवहार करीत असेल आणि त्याचा कुठलाही संदर्भ मिसळपाव.कॉमशी संबंधीत असेल असे वाटत असेल तर कृपया या घोषणेचा संदर्भ घ्यावा. मिसळपाव.कॉम अश्या कुठल्याही प्रकारात गुंतलेले नाही.

मिसळपाव.कॉम चालवायला नीलकांत समर्थ आहे. एवढेच नव्हे तर मिसळपाव.कॉम सोबत पुस्तकविश्व तसेच अन्य मराठी प्रकल्पसुध्दा अत्यंत चांगल्या स्थितीत चाललेले आहेत.

आज अशी सूचना देण्याचे कारण असे की असे काही आर्थीक आवाहनाचे प्रकार अन्यत्र चाललेले आहेत असे कळते. त्याचा काही संबंध गतकाळात मिसळपावशी आला होता. तेव्हा सुध्दा अशी स्पष्ट भूमीका घेतली होती. आणि आज सुध्दा मिसळपाव.कॉम तर्फे हे स्पष्ट करण्यात येत आहे.

मिसळपाववर येऊन येथे आपली ऊर्जा सकारात्मक कामात लाऊन त्याद्वारे मराठीत उत्तोमत्तम साहित्य निर्मीती. मराठीच्या संदर्भात काही प्रकल्पांत सहभाग आणि जगभरातील मराठी लोकांशी मैत्री असे सर्व मिसळपावकरांनी करावे हीच माफक अपेक्षा मिसळपाव.कॉमच्या व्यवस्थापनाची आहे. अन्य काही नाही.

मिसळपाव.कॉम संबंधीत कुठल्याही शंकेसाठी नीलकांत यांच्याशी संपर्क साधावा. संपर्कासाठी ईमेल - neelkant.akl@जीमेल.कॉम

धन्यवाद.

- नीलकांत ( सरपंच = मालक :- मिसळपाव.कॉम )