ब्रिटन प्रवास... माहिती

संजय अभ्यंकर's picture
संजय अभ्यंकर in काथ्याकूट
5 May 2008 - 11:12 am
गाभा: 

मित्रहो,

जून महिन्यात कंपनी तर्फे ब्रिटन मधे प्रवासाचे घाटत आहे.
अनुभविं कडून मार्गदर्शनाच्या अपेक्षेने लिहित आहे.
कृपया पुढिल माहीती हवी आहे:

१) मुंबई - लंडन प्रवास..
BA, VA, AI किंवा Jet Airways?

कोणता प्रवास ज्यास्त सुखकर आहे?

२) लंडन (हीथ्रो) ते लिस्टरः

विमान कि ट्रेन?

कोणता प्रवास स्वस्त?

३) लिस्टर मध्ये हॉटेलांचे दर काय आहेत?
सर्वसाधारण परंतु स्वच्छ हॉटेल अपेक्षित आहे.

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

5 May 2008 - 8:24 pm | चतुरंग

संजय, मी स्वतः BA आणि AI प्रवास केलेला आहे. मला दोन्ही चांगले वाटले.

१ - AI बरोबर तुम्हाला खाण्यापिण्याची चंगळ असते कारण एकदम भारतीय खाना व्हेज्/नॉनव्हेज दिला जातो. त्यांच्या एकूण सोयींबद्दल काही लोक तक्रारी करतात की उर्मट आणि आळशी सेवा आहे.
(पण मला व्यक्तिशः तसा अनुभव आलेला नाही. आपण जसे वागतो तसाच बर्‍याच वेळा परतून येणारा प्रतिसाद असतो हे माझे मत.) मला मिळालेली सेवा सौजन्यपूर्ण होती. फ्लाईट्स उशिरा सुटणे ही मात्र ह्यांची तक्रार बर्‍याच वेळा असते. त्यामुळे कमी वेळात जास्त गोष्टी बसवलेल्या असतील तर जरा चौकशी करुनच जावे.

BA बरोबरही खानपान सेवा चांगली असते. व्हेज असाल तर आधी 'एशियन व्हेजिटेरियन' असे बुकिंग करुन ठेवा नाहीतर घासफूस खायची वेळ येते! :)
AI च्या तुलनेत ह्यांची सेवा क्वचित अधिक कर्ट (कोरडेपणाने) वागणारी वाटली पण तसा त्रास काही नसतो. एकूण सर्व ठीक.

(एक सावधगिरीची सूचना - हीथ्रोवर टर्मिनल ४ वर सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे जातात येतात. मे-जून दरम्यान ते टर्मिनल ५ उघडणार आहेत. त्यांनी गेल्या महिन्यात त्या टर्मिनलची चाचणी घेतली ती पूर्ण फसली आणि ३०,००० प्रवासी वेडेवाकडे अडकून बसले त्यामुळे बरीच गोची झाली. तुम्ही जाईपर्यंत बहुधा सर्व सुरळित असेल पण तरीही कल्पना देऊन ठेवतो.)

२ - लंडन - मेडनहेड असा प्रवास टॅक्सीतून केलाय. चांगला वाटला. पाकिस्तानी ड्रायवर होता. नीट पोचवलेन. पैसेही योग्यच आकारलेन.
विमानतळावरुन ट्रेनचा अनुभव नाही. पण लंडनमध्ये इतर सर्व ठिकाणी ट्रेन व बससेवा अतिशय छान, वेगवान आणि सुटसुटीत वाटली.

३ - हॉटेलांचा अनुभव नाही कारण आस्मादिकांची पथारी मित्रवर्यांच्या घरी होती :))

तुमच्या प्रवासाला शुभेच्छा!

(अवांतर - 'लंडनआय' बघायला वॉटर्लू स्टेशनवरुन जाणार असलात तर तिथल्या बर्गरकिंगमधला व्हेज बर्गर जरुर खाऊन बघा! मी तसा बर्गरचा अजिबात चाहता वगैरे नाही पण हा एवढा अप्रतिम होता की मी दुसर्‍या दिवशी मुद्दाम तिथे जाऊन खाल्ला!!)

चतुरंग

संजय अभ्यंकर's picture

5 May 2008 - 9:39 pm | संजय अभ्यंकर

चतुरंगजी आणि केशवसुमारजी (ह्यानी व्य. नि. पाठवला), आपले आभार!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

मैत्र's picture

6 May 2008 - 10:23 pm | मैत्र

जेट ची विमाने अतिशय उत्तम आहेत.. बोइंग ७७७ आहेत... अनेक आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या लोकांच्या मताप्रमाणे सुद्धा जेट लंडन सर्वोत्तम आहे.. माझ्या सहकार्‍यांचे AI, BA, VA चे अनुभव ही चांगले आहेत.. पण तरीही जेट डोळे झाकून तिकीट घ्या.. कदाचित थोडे महाग मात्र असेल एअर इंडिया पेक्षा... लिस्टर प्रवासाबद्द्ल नक्की माहिती नाही.. www.transportdirect.info, www.nationalrail.co.uk या स्थळांवर वेळा, तिकीट दर सर्व माहिती मिळेल...
अधिक माहिती साठी व्य. नि. करा...

संजय अभ्यंकर's picture

11 May 2008 - 11:43 pm | संजय अभ्यंकर

मैत्रजी! आभार!
प्रतिक्रिया उशीरा दिली त्याबद्दल क्षमस्वः

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/