तुझ्या विना इथे प्रभू रे , सांग काय जगणे आहे..?

ज्ञानराम's picture
ज्ञानराम in कलादालन
4 Feb 2011 - 3:25 pm

मम अंतरीचे तरंग , तूच जाणसी बापा ,
मुक्या भावनांचे शब्द , तूच मांडसी बापा

मी अर्पीले स्वतःला , अन माझीच फूले झाली
चरणी लागता तुझीया , मी मोक्षात रे नहाली

मी रीक्त झाहले जगती , सांडून वैभव सारे
अन घातले ओटित माझ्या , तू विश्वाचे सूख सारे

मोह मायेने घातला विऴखा , तू अलगद मो़कळे केले
तोडून मोहाचे जाळे , सारे मार्ग मोकळे केले.

काहीच न दिले तुजला, झाले संसाराचे पसारे
अन तू झेलले एकट्याने , माझ्यावरील निखारे

किती गर्द दाटले नभ, तू साथ दिलीस तेव्हा
दिलास मायेचा उबारा , भितीने भिजले जेव्हा

काय वर्णू तुझा महीमा , आज शब्द तोकडे पडले
देह झाला हा पुण्याचा , तुझे वेड मजसी जडले..

मी शोधत होते देव , मंदिरात रे धडपडले ,,
अंतरी दिलास बोध , क्षणभरात दर्शन घडले

एक विनवणी करते देवा , जाऊ नकोस तू कुठे रे..
जर जाशील दूर मज पासून , मला घेऊन जा तू तीथे रे..

जीथे फक्त तुझाच वास , अन समाधानाचा प्रत्येक श्वास ,
जीथे खावया मीळेल मजला, तुझ्या हातचा प्रत्येक घास.

तु सांग फक्त आता, शिदोरी घेऊन निघणे आहे,
तुझ्या विना इथे प्रभू रे , सांग काय जगणे आहे..?

तुझ्या विना इथे प्रभू रे , सांग काय जगणे आहे..?
तुझ्या विना इथे प्रभू रे , सांग काय जगणे आहे...?.

कविता

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

4 Feb 2011 - 6:21 pm | नरेशकुमार

..............................मी मोक्षात रे नहाली

मोक्ष मिळविन्यासाअठि जे धडपडतात त्यांच्यासाठि एक ताजी बातमी,

मोक्ष मिळाला कि सगळे संपले असे होत नाही.
मो़क्ष कालावधी हा 311,040,000,000,000 वर्षांसाठिच असतो, तो पर्यन्तच वैकुंठात राहायचे असते,
मोक्ष संपल्यावर पुन्हा इथेच. धरतिवर.

तुझ्या विना इथे प्रभू रे , सांग काय जगणे आहे...?.

त्यामुळे अनंत काळ जगनेच जगने आहे.

Therefore, "those Sanyaasis who are fully convinced of the existence of God by the knowledge of the Vedic Mantraas relation to Him and live godly lives, whose intellects are pure by virtue of the renunciation of all worldly enjoyments who are perfect yogis with thorough control over their senses and minds, enjoy immortality and resume the concatenation of births and deaths after a paraant cycle* (i.e., when the period of salvation expires)." MUNDAK UPANISHAD 2:6

*Paraant cycle = 311,040,000,000,000, years.

विजुभाऊ's picture

4 Feb 2011 - 7:24 pm | विजुभाऊ

प्रांजळ कविता आहे...छान
अवांतरःविना आणि प्रभू हे दोन शब्द इथे एकत्र आल्यामुळे मास्तरांची आथवण झाली

मला वाटले विनायक प्रभूंवर कविता केलिये काय.

प्रदीप's picture

4 Feb 2011 - 8:57 pm | प्रदीप

तसे असेलही. क्रिप्टीक काय ते एकटेच लिहीतात काय?

योगप्रभू's picture

4 Feb 2011 - 9:12 pm | योगप्रभू

अरे माझीपण आठवण ठेवा रे :)

प्रत्येक शब्द न शब्द मस्त आहे , अर्थ ही खुप छान ..

मम अंतरीचे तरंग , तूच जाणसी बापा ,
मुक्या भावनांचे शब्द , तूच मांडसी बापा

सुरुवात ही खुप मस्त होती.

कविता मानापासुन आवडली ..

असेच लिहित रहा .. वाचत आहे