स्वय॑पाक घरातील घडामोडी

शितल's picture
शितल in जनातलं, मनातलं
30 Apr 2008 - 7:24 pm

कधी कधी आपल्याला (निदान मला तरे)काही पदार्थ करायला जमत नाहीत (विशेषः आपण पदार्थ प्रथमच बनवित असताना )तर कधी काही तरी वेगळेच होऊन जाते, म्हणजे कसे जाना था चीन,मगर जा पो॑चे जपान !
माझी तर फजिती ही होतेच होते. एकदा जाम बनवायला घेतला, आणि त्यात साखर मोठी थोडी असल्यामुळे कमी टाकयली हवी होती ती जाम जरा गोड हवा म्हणुन जास्त टाकली गेली आणि न॑तर तो जाम इतका घट्ट झाला की त्या मध्ये हलवायला घेतलेला चमचाच अड्कुन बसला, आणि जाम हु म्हणुन घट्ट, मग काय, जाम, चमचा आणि पातेल॑ तिन्ही कचर्‍याच्या डब्यात.

नविनच लग्न झाल्यावर एकदा सर्व स्वय॑पाक केला, जेवणासाठी ताटे लावली, भात वाढण्यासाठी कुकर उघडला तर, ता॑दुळ पाण्यात भिजत घातलेला, चुकुन गॅसवर कुकर ठेवलाच नाव्हता.
लग्नाआधी नॉनव्हेज स्वय॑पाक कधी केला नव्हता, लग्ना न॑तर एकदा अ॑डाकरी दीरा॑च्या सुचने नुसार करण्याचा प्रयत्न केला आणि उकडलेल्या अ॑ड्याला एवढ्या चिरा पाडल्या की, आतील बलक करीत (रस्स्यात )मिसळुन सगळ्या॑चे पिटले झालेले.
मटार पॅटीस करायला घेतला तर ते न जमल्यामुळे त्याचे मटार आलु पराठा असा पदार्थ तयार केला.
एकदा फोडणीत मोहरी समजुन नाचणी टाकली होती, तेल समजुन काकवीनेही फोडणी दिल्याचा अनुभव पाठीशी आहे.
माझ्यासाठी तर ढोकळा हा तर कधी ही न फुगणारा पदार्थ , तो थापीच्या वडी सारखाच दिसतो.
चपातीचे पीठ समजुन भाकरीचे मळणे ही तर वार॑वार घडणारी गोष्ट. न॑तर डब्या॑वर हे गव्हाचे पीठ, हे ज्वारीचे पीठ असेच लिहीत असे.

पुरणपोळी तर माझ्यासाठी नशिब आजमावयाची गोष्टच, परवाच पुरण पोळीचा घाट घातला, पुरण बारीक करण्यासाठी मिक्सरचा वापर केला, तर मिक्सरच ब॑द पडला, इथे रिपेअर ही भाणगड नाही त्यामुळे नविन, मग पुरण पोळी महाग पडली.
खुप अनुभव पोटा पाटीशी बा॑धुन आहे.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Apr 2008 - 9:07 pm | llपुण्याचे पेशवेll

म्हणजे तुम्ही केलेला जाम इतका जाम झाला होता कि ढवळायला घेतलेला चमचा पण त्यात जाम झाला.
:))
तसा चहात साखर समजून मीठ घालायचा अनुभव माझ्याही गाठीशी आहे.

पुण्याचे पेशवे

व्यंकट's picture

30 Apr 2008 - 11:28 pm | व्यंकट

आई अन्नपूर्णा तुमच्यावर लवकरात लवकर प्रसन्न होवो !

व्यंकट

अग शितल,
तु निदान पदार्थ तरी बनविलेस . मी तर दुधापासुण कोळ्सा ही पाकक्रुती अनेकदा बनविली आहे.
आमच्या 'ह्यांच्या' मते हा पदार्थ मला उत्तम जमतो !!!

प्रभाकर पेठकर's picture

30 Apr 2008 - 11:46 pm | प्रभाकर पेठकर

आत्ताच दोन दिवसांपूर्वी हराभरा कबाब करावयास घेतले होते पण चुकून पाणी जास्त झाले आणि भज्यांचे पीठ तयार झाले.
शेवटी, हरीभरी भजी बनवून वेळ साजरी केली.

नवीन लग्न झाले होते तेंव्हा कधी कधी माझी सुविद्य पत्नी जी भाजी बनवायची ती पुढील पैकी २ वर्गात मोडायची.

१) घे मेल्या भाजी २) ओळखा पाहू भाजी....

१) घे मेल्या भाजी म्हणजे खूप दिवस आग्रह केला की भोपळी मिरच्यांची पिठ लाऊन भाजी कर एकदा. की एक दिवशी ताटात ती भाजी यायची. ओळखू यायची की ही भोपळी मिरच्यांची पिठ लावून केलेली भाजी आहे. पण, त्याचे रंग, रूप, पोत पाहता ती घे मेल्या भाजी आहे हे सहज लक्षात यायचे.

२) ओळखा पाहू भाजी ही सर्व साधारणपणे कुठल्या तरी पाककलेच्या पुस्तकातून वाचलेली टोट्टली नवीनच भाजी असायची. पानात वाढलेला पदार्थ हा काय आहे ह्या विचारातच जेवण संपायचे. त्याला मी ओळखापाहू भाजी असे नांव ठेवले होते.

असो.

विसोबा खेचर's picture

1 May 2008 - 7:50 am | विसोबा खेचर

१) घे मेल्या भाजी २) ओळखा पाहू भाजी....

हे मस्त! :)

भाग्यश्री's picture

30 Apr 2008 - 11:49 pm | भाग्यश्री

मी एकदा साबूदाणा खिचडी करायला गेले.. आणि सगळं छान केलं, पण काय अवदसा आठवली, आणि मी त्यात धण्याची पावडर टाकली.. :( विनाशकाले विपरीत बुद्धी दुसरं काय.. नेहेमी करायचे मी खिचडी, आणि छान करायचे.. पण इथे नवर्‍याला इम्प्रेस करायला गेले, न मेजर फसले!
अतिशय घाण चव येते... सगळी खिचडी फेकून द्यावी लागली.... :(

पोळीचा पापड्,भाज्या तेलात पोहतायत वगैरे नेहेमीच्या (अ)यशस्वी प्रयोगांनंतर आता जरा अन्नपुर्णा देवी प्रसन्न झालीय बहुधा.. सद्ध्या इतकं वाईट नाही बिघडत आहे काही... टच वूड !

विसोबा खेचर's picture

1 May 2008 - 7:52 am | विसोबा खेचर

नेहेमीच्या (अ)यशस्वी प्रयोगांनंतर आता जरा अन्नपुर्णा देवी प्रसन्न झालीय बहुधा.. सद्ध्या इतकं वाईट नाही बिघडत आहे काही... टच वूड !

चला! बरं आहे. कधी जेवायला येऊ तेवढं बोल! :)

प्रभाकर पेठकर's picture

30 Apr 2008 - 11:54 pm | प्रभाकर पेठकर

आयला मला वाटतं पाककलेचे वर्ग सुरू करावेत, जोरदार चालतील....

चतुरंग's picture

1 May 2008 - 12:11 am | चतुरंग

लाख बोललात! अहो पोट आहे तोवर ह्या धंद्याला मरण नाही. इथे कधीही मंदी नसते!;)
चतुरंग

शितल's picture

1 May 2008 - 12:12 am | शितल

>> आयला मला वाटतं पाककलेचे वर्ग सुरू करावेत, जोरदार चालतील....
हो हो एकदम फसक्लास चालतील, आणि सगळे पतीदेव (ज्या॑च्या बायका सुगरण नाहीत) त्या॑ची ना॑वे स्वतः हुन टाकतील.
बाकी तुमची घे मेल्या भाजी आणि ओळखा पाहु भाजी मस्तच !

>>>आई अन्नपूर्णा तुमच्यावर लवकरात लवकर प्रसन्न होवो !

तुमची ही प्रार्थना अन्नपूर्णा आईच्या चरणी रुचु होईल, आता आईच ती लेकीला लेकीला सावरायला येईलच.

प्रभाकर पेठकर's picture

1 May 2008 - 12:17 am | प्रभाकर पेठकर

>>>आई अन्नपूर्णा तुमच्यावर लवकरात लवकर प्रसन्न होवो !

तुमची ही प्रार्थना अन्नपूर्णा आईच्या चरणी रुचु होईल, आता आईच ती लेकीला लेकीला सावरायला येईलच.

प्रेषक व्यंकट ( बुध, 04/30/2008 - 23:28) .
आई अन्नपूर्णा तुमच्यावर लवकरात लवकर प्रसन्न होवो !

व्यंकट

वरील पुराव्यावरून हेच सिद्ध होते की, ही प्रार्थना माझी नसून श्री. व्यंकट ह्यांची आहे.

शितल's picture

1 May 2008 - 12:23 am | शितल

>>>तु निदान पदार्थ तरी बनविलेस . मी तर दुधापासुण कोळ्सा ही पाकक्रुती अनेकदा बनविली आहे. :))
>>>आमच्या 'ह्यांच्या' मते हा पदार्थ मला उत्तम जमतो !!!
भावना तु एक पायरी पुढे आहेस, मी त्या दुधाची बासु॑दी बनवत होते. :D
आणि मी तर फोडणीला इतकी भीत असे की तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी जीरे, मिरची टाके आणि खाली बसे कारण त्या कधी कधी उडतात, मिरचीच्या बीया तर माझ्या तोडा॑वरच उडत, पण आता सफाईतदारपणे फोडणी टाकते.

वरदा's picture

1 May 2008 - 12:25 am | वरदा

नवीन लग्न झाले होते तेंव्हा कधी कधी माझी सुविद्य पत्नी जी भाजी बनवायची ती पुढील पैकी २ वर्गात मोडायची.

१) घे मेल्या भाजी २) ओळखा पाहू भाजी....

=))

वरदा's picture

1 May 2008 - 12:30 am | वरदा

आयला मला वाटतं पाककलेचे वर्ग सुरू करावेत, जोरदार चालतील....

कधी काढताय क्लास? प्लीज ऑनलाईन काढा मी तुमची पहिली विद्यार्थिनी असणार हे नक्की..... :W

स्वगतः चला तात्यांना जेवायला बोलवण्याआधी काही शिकायला जमलं तर बरंच...... ;)

विसोबा खेचर's picture

1 May 2008 - 7:53 am | विसोबा खेचर

स्वगतः चला तात्यांना जेवायला बोलवण्याआधी काही शिकायला जमलं तर बरंच......

लवकर शिकून घे, वाट पाहतोय.... :)

शितल's picture

1 May 2008 - 12:31 am | शितल

>>>आई अन्नपूर्णा तुमच्यावर लवकरात लवकर प्रसन्न होवो !

तुमची ही प्रार्थना अन्नपूर्णा आईच्या चरणी रुचु होईल, आता आईच ती लेकीला लेकीला सावरायला येईलच.

प्रेषक व्यंकट ( बुध, 04/30/2008 - 23:28) .
आई अन्नपूर्णा तुमच्यावर लवकरात लवकर प्रसन्न होवो !

व्यंकट

>>>वरील पुराव्यावरून हेच सिद्ध होते की, ही प्रार्थना माझी नसून श्री. व्यंकट ह्यांची आहे.

हो तुम्ही ते छान सिध्द केले आहे, मला माहित आहे मी एकाच प्रतिक्रियेत टाकल ते. मला माफ करा.

प्रभाकर पेठकर's picture

1 May 2008 - 8:32 am | प्रभाकर पेठकर

मला माफ करा.

अरे...! माफी वगैरे काय मागताय?
तुम्ही कोर्ट-कचेरीतील माणसं, म्हंटलं पुराव्यानीशी बोलावं. बाकी काही नाही.

शितल's picture

1 May 2008 - 1:16 am | शितल

मला आठवते,लहानपणी आमच्या शेजारच्या घरातील दोन मुली व त्याचा भाऊ त्याचा दिवाळीचा फराळातील, रव्याचा लाडु आणि श॑करपाळी ते खलबत्यामध्ये कुटुन खाताना पाहिले आहे. आणि माझ्या मावशीचे बेसनाचे लाडु तर तुप खुप घातल्यामुळे पातळ होऊन उचललाकी त्याचा आकार बदलत असे.

विसोबा खेचर's picture

1 May 2008 - 7:53 am | विसोबा खेचर

दोन मुली व त्याचा भाऊ त्याचा दिवाळीचा फराळातील, रव्याचा लाडु आणि श॑करपाळी ते खलबत्यामध्ये कुटुन खाताना पाहिले आहे.

हा हा हा! :))

बाकी शितल, तुझेही स्वयंपाकघरातले सगळेच किस्से मस्त आहेत... :)

तात्या.

इनोबा म्हणे's picture

1 May 2008 - 2:18 am | इनोबा म्हणे

एकदा फोडणीत मोहरी समजुन नाचणी टाकली होती, तेल समजुन काकवीनेही फोडणी दिल्याचा अनुभव पाठीशी आहे.
विसराळू नवरा आणि वेंधळी बायको! :O कसा संसार करतात देव जाणे!
देवा यांचे कालवण कर.स्वारी....स्वारी...! कल्याण कर.

१) घे मेल्या भाजी २) ओळखा पाहू भाजी....
मी समस्त मिपाकरांतर्फे पेठकरकाकांना 'खाद्य क्रांतीकारक' हा पुरस्कार बहाल करतो.

अहो पोट आहे तोवर ह्या धंद्याला मरण नाही. इथे कधीही मंदी नसते!
चूक. रंगराव,आमच्या बाजूची मंदी(सौ.मंदाकीनी कोपरखळे) गेली कित्येक वर्षे खानावळीच्या धंद्यात आहे.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

अभिज्ञ's picture

1 May 2008 - 3:12 am | अभिज्ञ

+१
लै भारी.:)

विसराळू नवरा आणि वेंधळी बायको! कसा संसार करतात देव जाणे!
देवा यांचे कालवण कर.स्वारी....स्वारी...! कल्याण कर.

अहो पोट आहे तोवर ह्या धंद्याला मरण नाही. इथे कधीही मंदी नसते!
चूक. रंगराव,आमच्या बाजूची मंदी(सौ.मंदाकीनी कोपरखळे) गेली कित्येक वर्षे खानावळीच्या धंद्यात आहे.
:):):):):)

अबब.

प्रभाकर पेठकर's picture

1 May 2008 - 8:38 am | प्रभाकर पेठकर

इनोबा म्हणेजी,

मी समस्त मिपाकरांतर्फे पेठकरकाकांना 'खाद्य क्रांतीकारक' हा पुरस्कार बहाल करतो.

धन्यवाद.

तसा मी ' खादाड क्रांतिकारक ' हा पुरस्कारही आनंदाने स्विकारला असता.

शितल's picture

1 May 2008 - 5:40 pm | शितल

>>एकदा फोडणीत मोहरी समजुन नाचणी टाकली होती, तेल समजुन काकवीनेही फोडणी दिल्याचा अनुभव पाठीशी आहे.
>>विसराळू नवरा आणि वेंधळी बायको! कसा संसार करतात देव जाणे!

देवाने डोके लावुन आमची गाठ घातली आहे, मी काही वे॑धळापण केला तरी त्याच्या लक्षात रहात नाही, हीच तर ग॑मत आहे.

>>देवा यांचे कालवण कर.स्वारी....स्वारी...! कल्याण कर.

बाकी तुझ्या भाषेत कालवण, आमच्या साठी कल्याण, ही आमच्यासाठी देवाकडे प्रार्थना केलीस त्या बद्दल मी तुला एकदा आमच्या घरी जेवायला बोलावेण हे, ते धाडस मात्र तु करायला हवे. :D

इनोबा म्हणे's picture

2 May 2008 - 2:03 am | इनोबा म्हणे

ही आमच्यासाठी देवाकडे प्रार्थना केलीस त्या बद्दल मी तुला एकदा आमच्या घरी जेवायला बोलावेण हे, ते धाडस मात्र तु करायला हवे.
सपशेल माघार. :T

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

पिवळा डांबिस's picture

1 May 2008 - 3:27 am | पिवळा डांबिस

आम्ही स्वतः स्वयंपाकघरात फक्त चहा बनवू शकतो, त्यामुळे स्वतःचा असा काही अनुभव देता येत नाही.:)
आणि आम्ही एका फर्मास कायस्थ पोरीबरोबर संसार मांडलेला असल्याने पदार्थ चुकण्याचा प्रकार कधी अनुभवला नाही इतक्या वर्षांत!! सुगरण नसणार्‍या कायस्थ मुली देव जन्मालाच घालत नाही! कदाचित कधी काही बिघडलंच तर त्या त्याचा दुसराच पदार्थ बनवत असाव्या, असा फक्कड की खाणार्‍याला पत्ताही लागत नाही!!:)
परमेश्वराच्या कृपेत चिंब न्हाऊन निघालेला,
पिवळा डांबिस

व्यंकट's picture

1 May 2008 - 4:08 am | व्यंकट

परमेश्वराच्या कृपेची वाट पहाणारा...
व्यंकट

जयवी's picture

1 May 2008 - 11:15 am | जयवी

शितल...एकदम जबरी अनुभव आहेत हं तुझे..... :)

१) घे मेल्या भाजी २) ओळखा पाहू भाजी.... हे तर सॉलीडच ;)

माझं म्हणाल तर मी लग्नाआधी कधी चहा सुद्धा केला नव्हता..... पण लग्नानंतर मला आईशप्पथ कधीच असा भयंकर अनुभव आला नाही हो.......!! जे पण केलं ना......ते मस्तच झालं ;) (आता नवर्‍याची साक्ष काढू नका म्हणजे झालं :D )

शितल's picture

1 May 2008 - 5:33 pm | शितल

>>>माझं म्हणाल तर मी लग्नाआधी कधी चहा सुद्धा केला नव्हता..... पण लग्नानंतर मला आईशप्पथ कधीच असा भयंकर अनुभव आला नाही हो.......!! जे पण केलं ना......ते मस्तच झालं (आता >>>नवर्‍याची साक्ष काढू नका म्हणजे झालं )

जयवी ताई तुमच्या नवर्‍या॑ची साक्षच आता घेतली पाहिजे. तुमच्या डोळ्या॑च्या धाकात त्या॑नी कुठलेही पदार्थ मस्त मानुन घेतले. ;)

स्वाती दिनेश's picture

1 May 2008 - 1:19 pm | स्वाती दिनेश

स्वयंपाकातल्या घडामोडी बाकी मस्तच आहेत,एक किस्सा माझाही-
एकदा कॉलेजच्या सुट्टीत मला रव्याच्या वड्या करायची हु़क्की आली,काहीतरी बिनसले आणि वड्यांचे मिश्रण घट्टच होईना,मी त्यात बेसन घातले,तरी तसेच.. शेवटी तो रवा बेसनाचा वेलची जायफळ घातलेला चिकचिकीत गोळा तयार झाला,वडी पडायचे नाव नाही.आई ,बाबा नात्यातल्या लग्नाला बाहेरगावी गेले होते आणि मी आणि बहिण तिथे जायचे टाळून घरात हे असले उद्योग करत बसलो होतो.ते घरी यायच्या आत त्या प्रकरणाचा निकाल लावायचा होता..आमच्या सुपिक डोक्यातून आयडीया निघाली आणि आम्ही त्याचे सारण भरुन पोळ्या केल्या.बिघाडाचा पत्ता लागू न देता 'स्पेशल डिश 'म्हणूनआमच्या २ 'बकासूर भाऊमंडळी'ना खाऊ घातल्या .त्या पोळ्या खरोखरच 'उच्च' झाल्या होत्या.(झाल्या खर्‍या!)त्यामुळे त्यांनी पण चढा ओढीने खाल्ल्या. कधीतरी असेच परत एकदा भाऊरायाने त्या पोळीची फर्माईश केली तेव्हा त्याला म्हटले आता माहित नाही परत तशा पोळ्या करता येतील की नाही ते,त्यासाठी 'वड्या बिघडणे 'हा कच्चा माल लागतो.
कदाचित कधी काही बिघडलंच तर त्या त्याचा दुसराच पदार्थ बनवत असाव्या, असा फक्कड की खाणार्‍याला पत्ताही लागत नाही!!
काही काही 'भटणी ' पण असतात हो अशा..
स्वाती

पिवळा डांबिस's picture

2 May 2008 - 10:08 am | पिवळा डांबिस

काही काही 'भटणी ' पण असतात हो अशा..
जरूर असतील ना! आमची काहीच हरकत नाही हो!:)
आम्हाला त्यांचा अनुभव नाही इतकंच. आम्ही आमचा अनुभव कथन केला..
पण मिपावर तुम्हाला जर अशी गुलबकावली आढळली तर कळवा!!!:)
समस्त मिपामैत्रिणींनो, प्लीज, प्लीज, प्लीज प्लीज ह्.घ्या.
-खट्याळ डांबिस

वरदा's picture

1 May 2008 - 6:06 pm | वरदा

कदाचित कधी काही बिघडलंच तर त्या त्याचा दुसराच पदार्थ बनवत असाव्या, असा फक्कड की खाणार्‍याला पत्ताही लागत नाही!!
काही काही 'भटणी ' पण असतात हो अशा..

मी उकडीचे मोदक करायला घेतले होते इथे आल्यावर..वळले जातच नव्हते....कळी पाडायला गेलं की तुटायचे..मग मी उकडीच्या करंज्या केल्या.. नवर्‍याला सांगितलं ही मोदकांसारखीच नवीन डीश आहे...चव तर तीच लागली त्याला काही कळ्ळं नाही... ;)

आनंदयात्री's picture

1 May 2008 - 11:00 pm | आनंदयात्री

झकास अनुभव अन खुमासदार प्रतिक्रिया !

धमाल मुलगा's picture

2 May 2008 - 3:27 pm | धमाल मुलगा

बर्‍याचदा मी आणि माझा चुलत भाऊ असे दोघं मिळून काकू ऑफिसातून परत येण्याच्या वेळी कांदेपोहे करत असु!

प्रत्येकवेळी आमचा ठरलेला वाद "सुज्या, आपल्याला कांदेपोहे करायचेत कांदेदाणे नाही" इति अस्मादिक.
"भैय्या, इतक्या कांद्यातून पोहे वेचून काढून खावे लागणार" इति बंधूराज.
आणि अश्या वादातून बडबड करताकरता (म्हणजेच पाचकळ इनोद हो!) फोडणीत कधी दाणे घालायचेच विसरुन जायचो तर कधी कांदा!
एकदा तर दोन्ही विसरलो आणि आमच्या बिचार्‍या काकूनं पोह्यांबरोबर कच्चे दाणे आणि कच्चा कांदा खाल्ला :(

बाकी, इथल्या समस्त बायांची मनमोकळी कबूली वाचून समस्त अविवाहित बापयगड्यांहो, पदार्थासंदर्भातले ह्यांचे टिपिकल डायलॉग्ज लक्षात ठेवा...पुढं कामाला येतील :)

पेठकर काका,
१) घे मेल्या भाजी
२) ओळखा पाहू भाजी....
दोन्ही अनुभव गाठीशी बांधून आहोत :) फक्त नावं सुचली नव्हती....आभारी आहे...नावांची ओळख करुन दिल्याबद्दल!!!!

प्रभाकर पेठकर's picture

2 May 2008 - 6:23 pm | प्रभाकर पेठकर

धमाल मुला,

कांदे किंवा दाणे किंवा दोन्ही फोडणीत टाकायचे विसरलास तरी काळजी करायला नको. कांदे किंवा दाणे किंवा दोन्ही वेगळ्या फ्रायपॅन मध्ये कमीत कमी तेलावर परतायचे आणि तयार पोह्यात मिसळायचे . परतताना किंचित हळद टाकायची म्हणजे ते पोह्यात बेमालूम मिसळून जातात.
वरून ओलं खोबरं, कोथिंबीर, लिंबू ह्यांचा मेक् अप केला की सजली डिश तुमची. (कौतुक करून घ्यायला).

शितल's picture

2 May 2008 - 6:16 pm | शितल

प्रतिसादा बद्दल मनापासुन सर्वा॑चे आभार.
पदार्थ मजेशिर बनण्याचे अनुभव काहीच्या पाठीशी आहेत, वाचुन बरे वाटले, मी त्यात एकटी नाही , पण माझ्या जरा जास्त होतात इतकेच, आता मला स्वय॑पाक करण्यात धीर येत आहे मी हल्ली घरीच असल्यामुळे मला वेग वेगळे पदार्थ बनवण्यात मजा वाटत आहे.

झकासराव's picture

3 May 2008 - 6:12 pm | झकासराव

उप्पीट करताना दोन ग्लास जास्त पाणी घालुन ते आटण्याची अतोनात वाट पाहिली आहे का???
मी पाहिली आहे आणि ते आटत नाहिये म्हणुन मी रव्याची तिखट खीर म्हणुन तो प्रकार खाल्ला आहे.
:)
एकदा भात करायचा होता. मग एकट्यासाठी कशाला कुकर म्हणून तसाच एका पातेल्यात ठेवला. मला तर आधीचा अशा प्रकारे भात करण्याचा अनुभव नव्हता. मग काय वरुन पाणीदार आणि भांड्याच्या खालच्या बाजुला करपलेला भात ढकलला पोटात. :)

देवदत्त's picture

3 May 2008 - 6:57 pm | देवदत्त

आणि ते आटत नाहिये म्हणुन मी रव्याची तिखट खीर म्हणुन तो प्रकार खाल्ला आहे.
अहो, अशा प्रसंगातूनच तर खाण्याचे नवीन नवीन प्रकार तयार होतात व आपण मग काहीवेळा ते टीव्हीवर खाण्याच्या कार्यक्रमात किंवा पुस्तकात पाहतो.

ह्यावरून आठवले.
बंगळुरला असताना मी आणि माझ्या शेजारच्या खोलीतील मुलगा रविवारी खोलीतच नाश्ता बनवायचो. म्हणजे तो शिजवायचा, बाकी मदत मी करायचो. त्यामुळे पोहे/कांदा आणणे हे काम माझ्याकडे होते.
एकदा मी आंघोळ झाल्यावर त्याच्याकडे गेलो तर तो म्हणाला, 'अरे बघ काय झालेय?'. पाहतो तर पोह्यांचा लगदा शिजत होता. तो म्हणाला, 'मी पोहे भिजत ठेवले होते नंतर शिजविताना असे झाले.'
मला कळले की त्याने जाड्या पोह्यांऐवजी पातळ (कागदी पोहेही म्हणतात ना त्याला?) पोहे आणले असतील दुकानातून. (तिकडे पोह्यांना अवलक्की म्हणतात. ते सांगून मग हातात दिल्यावर सांगावे लागे की हे नाही दुसरे. B) )

मग त्या मित्राला सांगितले काय ते, व म्हणालो ह्याला आपण उपमा समजून खाऊया :)