शिखर त्यांनी गाठलेले -

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
8 Dec 2010 - 4:54 pm

शिखर त्यांनी गाठलेले, पायथा धुंडाळतो
चालती तो-यात सारे मीच का ठेचाळतो |१|

देव दगडांतील येथे पुजुन का कंटाळतो
माणसांतिल देव तेथे पूजणे ना टाळतो |२|

शोभती जरि आज कपडे भरजरी अंगावरी
कालच्या सद-यावरीचे ठिगळ का कुरवाळतो |३|

फाटकी लेऊन वसने गरिब अब्रू झाकतो
अब्रु उघड्यावर थिरकते मंच ना ओशाळतो |४|

चोर अपराधीच येथे उजळ माथे मिरवती
वेदना इतरां न होते तीच का कवटाळतो |५|

बीज ते साधेपणाचे काल कोणी पेरले
रोप भाऊबंदकीचे आजला सांभाळतो |६|

कवितागझल

प्रतिक्रिया

गणेशा's picture

8 Dec 2010 - 5:04 pm | गणेशा

छान .. आवडली कविता ...

प्रकाश१११'s picture

8 Dec 2010 - 6:13 pm | प्रकाश१११

शिखर त्यांनी गाठलेले, पायथा धुंडाळतो
चालती तो-यात सारे मीच का ठेचाळतो |
कशाला ठेचाळणार तुम्ही .हिम्मत धरा
एवढे छान लिहिता .जरूर शिखर गाठणार शुभेच्छा !! .