बुलबुलचे नर्सिंग होम आणि माहेरपण

जागु's picture
जागु in जनातलं, मनातलं
6 Dec 2010 - 9:54 pm

आम्ही नवीन घरात राहायला येऊन पाच वर्ष झाली. ह्या घरात आलो तेव्हा आम्ही घराच्या सजावटीसाठी विविध वस्तू घेतल्या. जसे सोफा, बेड, फ्रेम्स, टिव्ही ट्रॉली, लॅम्स, झुंबर. त्यातील माझ्या आवडीचे म्हणजे झुंबर. थोडा वेगळा आणि आकर्षक म्हणून मला आणि माझ्या मिस्टरांना बाउल्सच्या आकाराचा झुंबर आवडला. ह्यात रिंग्ज मध्ये खोलगट काचेचे डिझाइन्स वाले बाउल्स बसवलेले आहेत. अगदी आवडीने आम्ही ते झुंबर लावल. कोणी पाहुणे येणार असतील किंवा घरात एखादा कार्यक्रम असेल तर आवर्जून आम्ही ह्या झुंबराची लाइट चालू करायचो. सगळ्यांना हया झुंबराच आकर्षण वाटायच. जेवढ सुंदर आहे तेवढच हे झुंबर नाजुक पण आहे. हे साफ करताना कसरतच करावी लागते. उंच स्टूलवर चढून ह्यातील बाउल्स अलगद काढून धुऊन पुसून ठेवावे लागतात. धुतल्यावर अजून आकर्षक दिसतात.

पण गेल्या तीन-चार वर्षांपासून एक बुलबुल आमच्या ह्या घरावर मालकी हक्क दाखवत असल्याने आम्हाला ह्या झुंबराचा वापर कमी करायला मिळतो. आमच्या आजुबाजुच्या परिसरात भरपूर झाडे आहेत. त्या झाडांवर ढोलीपण केलेल्या आहेत पक्षांनी.

ह्या ढोलींत फक्त मैना पक्षांचे अस्तित्व दिसते. ह्याचे कारण कदाचित परिसरात फिरणारे साप असतील. हे साप ढोलीत जाऊन पण पक्षांची अंडी खातात. त्यामुळे ह्या ढोलींवर फक्त मैना पक्षांनी आपला हक्क गाजवतात. हे मैना पक्षी सापा पासून नेहमी सावध असतात आपल्या ढोलीतील पिल्ले किंवा अंडी सापाने खाउ नयेत म्हणून. साप दिसले की त्यांना टोचायला त्यांच्या मागे कर्कश्य आवाज करत पाठलाग करतात. त्यांच्या सोबतीला एखादा कावळाही असतो कर्कश्य आवाज करत. ह्या मैना पक्ष्यांचा आणि कावळ्यांचा एकत्र कर्कश्य आवाज आला आणि बाहेर जाऊन बघितले की हमखास तिथून साप जाताना दिसतो. पण बुलबुल पक्षी हे घाबरट असतात. ते कधी असे सापाच्या मागे धावताना दिसत नाहीत. उलट जराशी जरी कसली चाहूल लागली की पळून जाताना दिसतात. त्यामुळे कदाचित ह्या बुलबुल पक्षाने आमच्या हॉलमधील झुंबर आपले माहेरघर किंवा सुरक्षित नर्सिंग होम म्हणून मानले असेल. कदाचित तिला ह्या घरट्यात राहताना शिश महालात राहिल्यासारखंही वाटत असेल असही मला वाटत असत.

वर्षातून दोन ते तीन वेळा ह्या बुलबुलची डिलिव्हरी आमच्या झुंबरात होते. आता ही एकच बुलबुल आहे की परंपरेनुसार तिची पिल्ले मोठी होऊन आमच्या झुंबरात आपली डिलिव्हरी करून घेतात हे संशोधन करणे कठीण आहे. कारण सगळेच बुलबुल सारखे दिसतात. त्यांचा डोळ्यांखालील आणि शेपटा खालील लाल भडक रंग त्यांच्या सौंदर्यात भर पाडतो.

इतर दिवशी हे बुलबुल आमच्या चिकू पेरूच्या झाडावर हिंडताना दिसतात. वायरवर कधी कधी झोके घेताना पण दिसतात. पण त्यातील बुलबुलला आपल्या आईपणाची चाहूल लागली की तिचे पाय आमच्या झुंबराकडे वळतात. मग ही बुलबुत आपल्या छोट्याश्या चोचीत गवताच्या काड्या, पान, कापूस घेऊन येताना दिसते. आम्ही झुंबर साफ करायला घ्यायच्या आत तिचे घरटे ती तयार करते. जर कधी अर्धवट घरटे आम्ही काढून टाकले तरी ती तिची जिद्द सोडत नाही. ती आपले कार्य चालूच ठेवते. झुंबरातील गवत काढून आम्ही मोठी माणसं थकतो. पण त्या इवल्याश्या चोचीत आपल घरटं साकारण्याच स्वप्न पाहात असलेली बुलबुल हार मानत नाही. अखेर ती आपल छोटस घरट तयार करते आणि त्यात अंडी घालते.

एकदा का हिने अंडी घातली की हा झुंबर आमचा राहत नाही. फक्त पोटापाण्याची सोय करण्यापुरती ही बुलबुल बाहेर जाते. बाकी दिवस रात्र ती आपल्या झुंबराच्या घरट्यात राहते. त्या काळातही ती आपल्या चोचीत काही ना काही आणत असते. कदाचित आपली दिवस रात्रीची शिदोरी जमा करत असेल किंवा डिलिव्हरीनंतरची पूर्वतयारी करत असेल. आता ही बुलबुल आमच्याकडे डिलिव्हरीला आल्याने आम्हालाही तिची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे आम्हाला काही छोट्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. हे बुलबुल घरात बसले की आम्हाला झुंबराच्या बाजूला असलेले दोन्ही पंखे लावता येत नाहीत, नाहीतर ही बुलबुल अचानक कधीतरी बाहेर जायला निघते आणि पंख्याला धडक मारून आपल्या पंखांना इजा करून घेते.

कधी कधी शिटही लादीवर टाकून जाते. तेव्हा मात्र खूप राग येतो तिचा आणि कधी एकदाची डिलिव्हरी करून जाते अस होत.

एकदा का हिने अंडी घातली की दीड महिना तरी आम्हाला झुंबराचे दिवे लावता येत नाहीत. मग तेव्हा कोणतेही समारंभ असूदे. घराला टाळ लावून जाताना हिच्यासाठी स्लायडींग उघडी ठेवावी लागते म्हणजे ती बाहेर जाऊन आपले पोट भरून यावी म्हणून. जर आम्हाला माहीत असते की ही काय खाते, हिला कसले डोहाळे लागले आहेत तर कदाचित तेही तिला आणून दिल असत म्हणजे तिला तेही कष्ट नसते पडले. आम्ही कोणी बोलत नाही हाकलवत नाही म्हणून हिचा संचार आमच्या घरभर चालू असतो. खूप लाडावली जाते ह्या दिवसांत ती.

जवळ जवळ एक महिना होत आला की आनंदाची कुजबुज झुंबराखाली ऐकण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक होतो. मग अचानक एक दिवस झुंबराखाली पिल्लांची चुचू सुरू होते. मग टेबल, खुर्च्या, स्टूलवर चढून आम्ही झुंबरात डोकावू लागतो. पण बाउल खोलगट असल्याने ही पिल्ले दिसत नाहीत. जेव्हा माता बुलबुल तिच्या पिल्लांना आपल्या चोचीने त्यांच्या चोचीत भरवत असते तेव्हा फक्त पिल्लांची चोच दिसते. अगदी घोडा स्टूल घेऊन कॅमेऱ्याने फोटो काढून ह्या पक्षांना झुंबराच्या बाउल मध्ये पाहता येत.

बघत असताना अगदी जवळ गेलो तरी आई झालेली बुलबुल आमच्या अंगावर येत नाही. कारण तिने आमच्यावर माहेरच्या माणसांसारखा विश्वास ठेवलेला असतो. तिच्या कडे बघताना अस वाटत की ती आम्हाला आनंदात सहभागी करून घेत आहे.

साधारण दहा दिवस झाले की अचानक कधीतरी ही पिल्ले खाली उतरलेली दिसतात. ही पडली की काय अशी भीतीही तेव्हा मनात येते. पण भरारी मारण्याचे हे त्यांचे पाहिले पाऊल असते.

पिलेही अगदी आमच्याघरात बिनधास्त फिरत असतात. ह्यावेळेस तर माझ्या मुलीच्या दप्तरावर बसुन शाळेत जाण्याचा हट्ट करत होता.

पण माता बुलबुल अजुन तुम्ही लहान आहात समजाउन आपल्या बाळांना बाहेरच्या जगाची दिशा दाखवते. आणि बाळांना दिशा दाखवता दाखवता ती पण आमच्या घरची दिशा विसरते.

ती आणि पिल्ले येण्याची आम्ही थोडे दिवस वाट बघतो. पण ती कदाचित आपल्या बाळांना स्वावलंबी बनवण्यासाठी गर्क असेल. ती येण्याची बंद होते त्या दिवसांत आम्हाला चुकल्या चुकल्या सारखं वाटत. सवयीने कधी कधी आम्ही गरम होत असेल तरी फॅन लावत नाही. सण असेल तरी झुंबर लावत नाही. मग हळू हळू ती आता येतच नाही हे लक्षात येत. मग आम्ही झुंबर साफ करायला घेतो. झुंबर साफ करताना तिने विणलेले घरटे ती आमच्या उपयोगी पडेल म्हणून कदाचित आम्हाला ठेवून जात असेल. पण आम्हाला वाटत की बाहेर एखाद्या झाडावर हे घरटं ठेवलं तर ही बुलबुल किंवा तिची पिल्ल परत त्या घरट्यात येऊन बसतील. म्हणून आम्ही ते घरटं घराच्या बाहेर एखाद्या झाडावर ठेवतो. पण नंतर त्यात ती बुलबुल किंवा तिची बाळ फिरकतही नाहीत. मग अचानक काही महिन्यांनी बुलबुल परत आपले बाळंतपण करण्यासाठी तिच्या माहेरी म्हणजे आमच्या झुंबरावर येते.

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

6 Dec 2010 - 10:00 pm | नगरीनिरंजन

:-) छान वाटले वाचून!

की निर्लज्ज पक्षी आहे हा ? बाकी लेखन ओके ओके !!
मला हे घरात घाण करणारे पक्षी बिल्कुल खपत नाहीत.

अवांतर : हे पक्षी रात्री-अपरात्री अचानक कलकलाट सुरु करतात का हो ?

-(प्रायव्हसी प्रेमी) टारझन

प्राजु's picture

6 Dec 2010 - 10:08 pm | प्राजु

जागु, अगं मस्त लिहिलं आहेस!!
किती सुंदर आले आहेत सगळे फोटो! खूप छान.

आई म्हणते, की ज्यांच्या घरी प्राणी/पक्षी येतात ती वास्तू आणि त्या वास्तूतली माणसे अतिशय मायाळू असतात. :)

प्रियाली's picture

6 Dec 2010 - 10:11 pm | प्रियाली

मस्त! लेख खूप आवडला. :) तुम्ही आणि तुमचे कुटुंब महान आहात. मी नसते पक्ष्यांना माझ्या घरात राहू दिले आणि त्यांच्यासाठी पंखे-दिवे लावायचे नाहीत इतका त्यागही नसता जमला.:(

तसा,

गेल्यावर्षी एका सशीणीने (सशाची मादी) एक पिल्लू आमच्या बॅकयार्डात पायर्‍यांखाली जन्माला घातले. नंतर दोघांनी थंडीच्या दिवसांत ४-५ महिने मस्त झोप काढली. थंडीच्या दिवसांनंतर हे पिल्लू बाहेर पडले तेव्हा छोटेसे होते. पहिले काही दिवस आई सोबत होती. नंतर पिल्लाला टाकून निघून गेली. हे पिल्लू आमच्या बॅकयार्डात मुक्त संचार करत असे. कधीतरी मी कोथिंबीर, गाजराचे तुकडे टाकत असे. ते आम्ही आसपास नसताना गट्टम करून जाई. सशाची जात भित्री. त्यामुळे ते आमच्या वार्‍याला उभे राहत नसे पण नंतर बहुधा त्याची भीती थोडी कमी झाली. माझी लेक त्याच्या बरोबर अंगणात पकडापकडी खेळत असे. म्हणजे, ती मागे गेली की हे पळणार आणि थोड्या अंतरावर जाऊन थांबणार. तिची चाहूल घेत. ती जवळ गेली की पुन्हा थोडेसे अंतर धावून बसणार.

त्यानंतर, आमच्या बॅकयार्डात पक्ष्याचा थवा आला की हे त्यांच्या अंगावर धावून जाई. ससे असे करतात हे मी कधी पाहिलेच नव्हते आणि तो प्रकार इतका मजेशीर दिसे कारण हे महाशय पक्ष्यांवर धावून गेले की पक्ष्यांचा थवा भर्रकन उडत असे आणि त्या हालचालीने यांचे शौर्य संपत असे आणि पिल्लू जिवाच्या आकांताने धावत पुन्हा पायरीकडे.

पिल्लू नंतर मोठे झाले. जुलै-ऑगस्टच्या महिन्यात बॅकयार्डात फारसे दिसायचे नाही. म्हटले गेले, पळाले पण पुन्हा सप्टेंबरच्या शेवटी दिसू लागले. आता हे तेच पिल्लू की नवा ससा ते माहित नाही पण बहुधा ते पायरीखाली जाऊन झोपले असावे असा अंदाज आहे. स्प्रिंग सुरु झाला की कळेलच.

सुहास..'s picture

6 Dec 2010 - 10:13 pm | सुहास..

__/\__

निशब्द ...

नशिबवान आहे ग जागु ताई.
लहान असताना चिमण्या आमच्या घरात घर्टी करायच्या. पण मग एक दोनदा चुकुन चालु पंख्याचे फटके बसुन जयबंदी झाल्या तेव्हा पासुन त्यांनी घर सोडल.

सध्या कबुतरं उच्छाद मंडतायत.
मेल रविवारी दुपारी दोन घटका पडाव म्हटल तर यांचा चावटपणा ऐन रंगात आलेला असतो ;)

मेल रविवारी दुपारी दोन घटका पडाव म्हटल तर यांचा चावटपणा ऐन रंगात आलेला असतो

भावना उचंबळुन येतात का रे मग गणपु ? बाकी जसे फॅशन टिव्ही वर बंदी आणली तशी ह्या पक्षांवर बंदी आणावी असे मी भारताच्या परराष्ट्र धोरण मंत्र्यांना काळे काकांकरवी सुचवु इच्छितो. ह्यामुळे घरातल्या बालचमुवर विपरीत परिणाम होत आहेत जे आपल्या आणि अमेरिकेच्या हितसंबंधांना हानिकारक आहे , पर्यायाने चिनच्या फेवर मधे आहे.

सुंदर लिहीलंय. प्रियालीताई म्हणते ते माझ्याही बाबतीत खरंय, त्यामुळे तुमचं अधिकच कौतुक वाटलं! :-)

रेवती's picture

6 Dec 2010 - 11:15 pm | रेवती

छान फोटो आणि रंगवून सांगितलेली बाळंतपण-ए-झुंबर दास्ताँ आवडली.;)
आमच्या मुलाला बर्‍याच अ‍ॅलर्जीज् असल्याने कुत्रा मांजर पाळता येत नाहीत म्हणून कासव नाहीतर साप तरी पाळूयात काय म्हणून सध्या भुणभूण लावलिये. पण हे सगळं आपल्या आवडीनिवडीवर अवलंबून तरी आहे. तुमच्याकडून तर ही पक्षीण सक्तीचे माहेरपण करून जाते आहे. जागुतैला पक्षिमित्र संघटनेतर्फे पुरस्कार मिळावा असे वाटते.

नगरीनिरंजन, प्राजु, प्रियाली, सुहास, गणपा, रेसेपी खुप खुप धन्यवाद.
प्रियाली सशाबद्दल वाचुन छान वाटल. ससे भरपुर पिल्ल घालतात अस ऐकलय.

सेरेपी's picture

7 Dec 2010 - 12:25 am | सेरेपी

तै... रेसेपी नाही...सेरेपी! भलताच अर्थ होतो हो :D

सेरेपी = कट्यार (अ‍ॅकॉर्डिंग टू जी.ए.)

रेवती साप पाळणार ?
आमच्या घराच्या भोवताली दिसतात कधी कधी. पाहिजे तर घेउन जा.
आणि तुमच्याकडून पुरस्कार पावला. खुप खुप धन्यवाद.

कासव नाहीतर साप तरी पाळूयात काय म्हणून सध्या भुणभूण लावलिये. >>>

ही " पाऊसवेडी " कुठाय ?

कानडाऊ योगेशु's picture

7 Dec 2010 - 12:08 am | कानडाऊ योगेशु

वाचुन छान वाटले.

निसर्गाचा आशीर्वाद लाभला आहे तुम्हाला.

माझ्याही घरातील एका खिडकीत कबुतर दांपत्यांने संसार थाटला आहे.

मला कन्यारत्न झाले त्यानंतर थोड्या दिवसांनी त्यांनाही पिलु झाले. आणि त्यांची गुटर्गु वाढली.

माझी कन्या पाळण्यातुनच त्यांच्या त्या गुटर्गुला जोरजोरात ओरडुन उत्तरे देत असते.

रोज सकाळी सकाळी त्यांच्या ह्या जुगल्बंदीनेच मला जाग येत असे.

सुनील's picture

7 Dec 2010 - 12:20 am | सुनील

छान लिहिलय!

लहानपणी आमच्या घरात चिमण्या येत आणि गोदरेजच्या कपाटाच्या आरशावर चोचीने टोचे मारीत. एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला जाण्यापूर्वी सगळी खिडक्या दारे बंद केली तेव्हा एक चिमणी घरातच अडकल्याचे लक्षात आले नाही. दोन-तीन आठवड्यानंतर परत येऊन पाहिले तर, बिचारी मरून पडली होती!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Dec 2010 - 2:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

जागुताई, तुझी गोष्ट आणि प्रतिसादही आवडले.

शुचि's picture

7 Dec 2010 - 5:13 am | शुचि

छान लेख

जागु ताई तुमच्या सार्‍यांच्या सोशिक पणाचे कौतुक वाटले. एकदा दोनदा ठिक आहे पण वारंवार?
मी एका पावसळ्यात एका चिमणीला आमच्या हंड्यात बुडता बुडता वाचवल होत त्याची आठवण झाली. तिथुन पुढे कधिही अंगणात मी बसले की अगदी जवळ येउन बसणारी ती तिच असायची , कारण तिला वाचवायच्या, गरम करायच्या उचापतीत मी तिचा एक पंजा दुखवला होता. तो दिसायचा. प्राणी, पक्षी एक वेगळाच हक्क अन माया दाखवतात! तुमच्या माहेरवाशिणीला शुभेच्छा!

गांधीवादी's picture

7 Dec 2010 - 9:17 am | गांधीवादी

>>बाळांना दिशा दाखवता दाखवता ती पण आमच्या घरची दिशा विसरते...............मग अचानक काही महिन्यांनी बुलबुल परत आपले बाळंतपण करण्यासाठी तिच्या माहेरी म्हणजे आमच्या झुंबरावर येते.
मनात विविध भावनाचे काहूर माजले. माहेरी लाडात वाढलेल्या लेकी, सासरी येऊन कितीही सुखात लोळत असल्या तरी त्यांची माहेरची ओढ काही संपत नाही.

माननीय जागु, मूक प्राण्यांसाठी आपल्या मनातच नव्हते तर आपल्या घरात देखील स्थान आहे हे बघून गहिवरून आले.

मदनबाण's picture

7 Dec 2010 - 9:23 am | मदनबाण

जागु ताय फार सुंदर लिहले आहेस... :)

जागु
सकाळ सकाळ चान्गलाच अलारम दिलात.

sneharani's picture

7 Dec 2010 - 10:17 am | sneharani

मस्त लिहलयं!
:)

टारझन नाही हो रात्री नाही त्यांचा कलकलाट येत. आणि कलकलाट म्हणण्यापेक्षा त्यांचा आवाज गोड शिट्टी सारखा असतो.

सेरेपी माफ करा हो. पण रेसेपी टाकायची सवय झाल्याने मी रेसेपीच वाचल.

योगेश तुमच्या मुलीला लळा लागेल आता त्यांचा. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

सुनील, वाचुन कसतरीच वाटल.

आदीती, शुची, मदनबाण, अन्जन, स्नेहाराणी धन्यवाद.

अपर्णा आहो जाहो नको करु. तू म्हणतेस ते खरच आहे. ह्या पक्षांना खुप जाण असते. आपण त्यांना जरा सहानुभुती दाखवली तरी आपल्या मागेपुढे फिरतात.

गांधीवादी तुम्हाला गहिवरुन आले म्हणजे तुमच्याही मनात तितकेच मुक प्राण्यांसाठी स्थान आहे.

गांधीवादी's picture

7 Dec 2010 - 12:05 pm | गांधीवादी

अवांतर : लहानपणी माझी गट्टी एका शेळीशी होती. तिची कहाणी इथे मी लिहून ठेवलेली आहे. तिचे नाव होते हर्रू.

पियुशा's picture

7 Dec 2010 - 11:56 am | पियुशा

सगळे फोटो खूप छान. मस्त च !

अवलिया's picture

7 Dec 2010 - 12:14 pm | अवलिया

छान !!

कवितानागेश's picture

7 Dec 2010 - 1:53 pm | कवितानागेश

ही काय खाते, हिला कसले डोहाळे लागले आहेत तर कदाचित तेही तिला आणून दिल असत >>>
बुलबुलला बिस्किटे/गोड काहीही आवडते असे माझे निरिक्षण आहे. मी आईचा डोळा चुकवुन खिड्कीत मारी बिस्किटांचा चुरा ठेवते त्यांच्यासाठी.

जागु's picture

7 Dec 2010 - 1:58 pm | जागु

पियुशा, अवलिया धन्यवाद.

लिमाउटा मी तिला चोचीतुन किडे आणताना पाहिले आहे. फोटो ही घेत होते मी तिचा तसा पण तोपर्यंत ती दुसरीकडे उडायची.

मुलूखावेगळी's picture

7 Dec 2010 - 2:47 pm | मुलूखावेगळी

जागु ताई ,

छान लिहिलेस!!!!!!!
मला पक्षी प्राणी आवडत नाहीत.
कदाचित मी इतके सुन्दर झुम्बर त्याना वापरु पण नसते दिले.

श्रावण मोडक's picture

7 Dec 2010 - 3:16 pm | श्रावण मोडक

छान!

प्राजक्ता पवार's picture

7 Dec 2010 - 3:36 pm | प्राजक्ता पवार

छान वाटलं वाचुन .

मुलखावेगळी खरच तुम्ही मुलखावेगळ्या आहात. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

श्रावण, प्राजक्ता धन्यवाद.

लेखात संपादन करता येत नाही म्हणुन हे फोटो इथे लोड करतेय.

खिडकीतुन आत बाहेर करणारे बुलबुल

बुलबुल निघुन गेल्यावर झुंबर साफ करण्यासाठी काठलेल झुंबरच बाऊल त्यात हे घरट होत.