मी आज प्रथमच लेखन करत आहे तरी काही चुक्ले तर माफ करा.
मी काही दिवसांपुरवी पंतप्रधानांना एक पत्र लिहिले होते.
पत्र टेंभली गावातिल सुविधांबद्द्ल होते.
अधिक माहिती खालिल दुव्यावर मिळु शकेल.
http://www.loksatta.com/lokprabha/20101126/cover.htm
पत्र जसेच्च्या तसे देत आहे.
Dear Sir,
I am Nikhil Surendra Hadke from Pune. Pursuing MBA from CMRD college Pune.
First of all congrtulations for starting a revolutionary UID Project.
Sir, but the start is very disappointing.
Tembhali Village where you had started the project by giving cards to the villagers.
The developments made in that village was on temporary basis.
The roads made at that time for your visit are now in very bad condition.
The street lights are illuminating day-night but very people have light in their homes.
Ration cards are given to citizens on very urgent basis just for your visit, temporary
ration shop is also raised temporarily.
All was like setting up an event for a day and fragile.
All the facilities were provided were just for your visit and nothing works now.
Officers have stopped in the middle of work and it doesn't even looking into it.
Please see the link which will show you the exact status of the village
http://www.loksatta.com/lokprabha/20101126/cover.htm
Please sir look into this issue.
We have great expectations from you.
--
With Best Regards
Nikhil Hadke.
9921369893
हे मी त्यांच्या manmohan@sansad.nic.in ह्या विरोपा वर पाठवले होते
अपेक्शेप्रमाणे ह्या पत्राचे अजुन तरि काहि उत्तर आलेले नाही.
तरि आपण ह्या संदर्भात काही करु शकतो का?
प्रतिक्रिया
23 Nov 2010 - 6:58 pm | यकु
मी पण असंच एक पत्र पंतप्रधानांना पाठवलं होतं.
अजूनपर्यंत काहीच उत्तर नाही हो.
मला फार काळजी वाटतेय - पंतप्रधानांची.
(हलकेच घ्या. तुम च्या पुढील लिखाणासाठी शुभेच्छा )
CONFIDENTIAL
(Non-serious)
Date: 27 July 2010
My dear Prime Minister of India,
I am writing you this bewildering letter, but just hold on – and don’t get upset about it; because I know you have done that whole your life – getting upset & doing nothing! So I am writing you this letter not because you are the Prime Minister of this big country; but because an upset Prime Minister – which cost a lot to you first & then the country & thereafter the whole world at large.
Why you are upset is not a question to be explained – a Caption of sinking ship has to get upset. And coalmen (now a days you call them Members of Parliament) who have to fuel this ship are not at all interested to fuel the ship – but they try hard to throw you out from your chair! It’s a joke for you. You know very well, ship is going to sink at any time and nobody except you can handle it. But other fellows have some sort of excessive confidence within themselves so they feel they should throw you out!
You may get surprised that from where this boy came to know whole this secret, but aware, everybody in the country know it. Passengers in a sinking ship can easily figure out what a tragedy the Caption is facing! That’s why whole the newspapers, TV Channels go on hammering your delicate brain without stop & they suggest you what you should do. But I tell you they themselves are very upset. You know too. So you never hear them seriously.
What point I am making here writing you this confidential letter is, you just come to my city on official tour because here is raining beautifully & we will enjoy the rains & I will tell you the other part of secret while we enjoy hot coffee in some restaurant.
Don’t be hurry – nobody should know you are visiting me; otherwise whole the parliament will come behind you & I am warning you I don’t have a single penny to pay their coffee bill. I am keeping them unaware of this letter & if they read this they will not be in position to figure out what it is & some of them are already illiterate!
If you don’t come & ship suffers any rigorous losses furthermore, don’t blame that citizens in India never cared for you – I am caring for you.
Yours Faithful,
Sd/-
Yashwant Kulkarni
CC: All Indians including NRI’s
23 Nov 2010 - 7:00 pm | छोटा डॉन
एखाद्या राज्याच्या अखत्यारीत येणार्या एखाद्या जिल्ह्यामधील एका विशिष्ठ तालुक्यात असणार्या असंख्य खेड्यांपैकी एका खेड्याच्या समस्यांकडे एक 'पंतप्रधान' कसा काय लक्ष घालणार ?
समजा विशिष्ठ कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचा सदर गावात दौरा झाला असेल तरी त्या गावच्या सोईसुविधा आणि विकास ह्यांची जबाबदारी ही स्थानिक प्रकाशनाची आहे.
अर्थात ह्या देशाचे सुत्रधार म्हणुन मी 'पंतप्रधानां'चा अधिकार आणि हक्क नाकारत नाही पण त्यांना अशा 'स्पेसिफिक' समस्यांकडे लक्ष द्यायला कितपत वेळ असेल ह्याबद्दल साशंक आहे.
त्यापेक्षा आपण स्थानिक प्रशासन म्हणजे ग्रामसेवक, बीडीओ, तहसीलदार, तालुक्याचा सीईओ, कलेक्टर आणि समकक्ष मंडळी, जिल्ह्याचा पालकमंत्री, त्या त्या खात्याचे मंत्री आणि सचिव आणि शेवटी मुख्यमंत्री ह्या क्रमाचा विचार का नाही करत ?
मला वाटते हाच सुयोग्य मार्ग राहिल.
मिडियाला हाताशी धरुन किंवा वरुन प्रेशर आणुन 'सर्वांगीण प्रगती' कायमच होत नसते.
असो, हे माझे वैयक्तिक मत आहे.
बाकी इतर जाणकार मंडळी योग्य ते भाष्य करतील :)
- छोटा डॉन
23 Nov 2010 - 7:12 pm | सुनील
सहमत.
तुम्ही सुरुवातीलाच थेट पंतप्रधानांना लिहून उत्तराची अपेक्षा करणे चूकच वाटते.
23 Nov 2010 - 7:31 pm | विकास
असे पत्र लिहीलेत हे नक्कीच स्पृहणीय आहे. मात्र वर छोटा डॉन आणि सुनील यांनी म्हणल्याप्रमाणे हे काम प्रत्यक्षपणे पंतप्रधानांच्या अखत्यारीतले नाही. त्यासाठी जिल्हाधिकारी वगैरे हा एक भाग झाला पण दुसरा भाग हा तुमच्या क्षेत्रातील खासदार, आमदार आणि स्थानीक नगर सेवक. त्यांना असे अवश्य पत्र पाठवावेत आणि जमल्यास ते स्थानिक वृत्तपत्रात छापून आणावेत.
शुभेच्छा!
23 Nov 2010 - 7:10 pm | वेताळ
कि पंतप्रधान कार्यालयात खुप मोठी कचरापेटी असावी.
23 Nov 2010 - 7:18 pm | छोटा डॉन
>>कि पंतप्रधान कार्यालयात खुप मोठी कचरापेटी असावी.
:) असेच म्हणतो.
जोक्स अपार्ट, पण पंतप्रधानांना अशा पत्रांकडे लक्ष द्यायला खरोखर वेळ नसावा, इनफॅक्ट आपणच त्यांना अशी पत्रे पाठवु नयेत असे मनापासुन वाटते.
काम करुन घ्यायचे तर डायरेक्ट संबंधीत किंवा त्याच्या वरच्या माण्साला पकडा ना, उगाच पंतप्रधान कार्यालय आणि तिथल्या कर्मचारी वर्गाला ला लोड कशाला ?
त्यांनी जरी लक्ष द्यायचे म्हटले तरी ते डायरेक्ट वरुन 'आदेश' देउ शकत नाहीत.
त्यांनाही एक पद्धत आहेच की, त्या त्या पातळीनुसार ( हैरार्की ) आदेश वरपासुन खालीपर्यंत येणार.
म्हणजे या कामासाठी उगाच जास्त मनुष्यबळ गुंतले की नाही ?
शिवाय इतर प्रेशर आहेच.
म्हणुन आपणच सामान्य नागरिकांनी अशा समस्यांसाठी थेट एवढ्या वरच्या पातळीवर जाऊ नये असे वाटते.
तेच उगाच 'राष्ट्रपतीं'ना वगैरे पत्रे लिहणार्यांचे.
आपल्या इथे किमान त्यांना उपलब्ध असलेले 'अधिकार' तरी तपासुन पहा राव, उगाच काउ उठले सुटले पत्रापत्री करताय ?
त्यांनी व्यवस्थित काम करावे ह्यासाठी आपणच त्यांच्यावरचा अनावश्य्क लोड कमी केला पाहिजे.
ह्यामुळे उगाच अनावश्य्क राबणारे 'मनुष्यबळ आणि साधने' दुसर्या कामासाठी वापरता येऊ शकतील.
असो, तुर्तास एवढेच ;)
- ( प्रवक्ता )छोटा डॉन
24 Nov 2010 - 1:15 pm | गांधीवादी
>>पण पंतप्रधानांना अशा पत्रांकडे लक्ष द्यायला खरोखर वेळ नसावा
बरोबर आहे,
असे इकडे व्यस्त असले तर कसा काय वेळ मिळेल, नाही ?
23 Nov 2010 - 7:26 pm | मदनबाण
पात्र साहेब आपण प्रयत्न करत रहा...
अवांतर :--- इथे सुब्रम्हण्यम स्वामी पत्र पाठवुन पाठवुन थकले...तिथे. असो.
अतिअवांतर :--- काळे काकांचा धागा ( पक्षी :--- विषय ) हायजॅक झाला की काय असे क्षणभर वाटले... ;)
23 Nov 2010 - 7:46 pm | वेताळ
खरतर पत्र राहुलजीना लिहायला हवे होते. पत्र वाचुन ताबडतोब ते तुमच्या गावी आले असते.एक रात्र तुमच्या गावी राहुन व तुमच्या घरी जेवुन सर्व बाबींची जातीनिशी माहिती घेवुन राणीसाहेबाना दिली असती.त्यानी मनमोहनांचे कान टोचले असते.असो परत अशी चुक करु नका.
23 Nov 2010 - 7:47 pm | वेताळ
खरतर पत्र राहुलजीना लिहायला हवे होते. पत्र वाचुन ताबडतोब ते तुमच्या गावी आले असते.एक रात्र तुमच्या गावी राहुन व तुमच्या घरी जेवुन सर्व बाबींची जातीनिशी माहिती घेवुन राणीसाहेबाना दिली असती.त्यानी मनमोहनांचे कान टोचले असते.असो परत अशी चुक करु नका.
23 Nov 2010 - 9:34 pm | शाहरुख
मधे कलामांच्या सेक्रेटरीचे पुस्तक वाचले होते..त्यात त्यांनी कलामांना अशी बरीच पत्रं यायची आणि ते प्रत्येकाची दखल घ्यायचे असे लिहिले आहे.काही त्याबद्दलचे किस्से दिले आहेत...एक लक्षात आहे.एका लहान मुलीने (घरच्यांनी मुलीच्या नावाने पत्र पाठवायची शक्यता नाकारत नाहीय मी) तिच्या घराजवळच्या बागेतला झोपाळा बरेच दिवस तुटलेला असल्याबद्दल कळवले होते.कलामांनी जिल्हाधिकार्याला का असेच कुणाला तरी याबद्दल कळवायला लावून झोपाळा दुरुस्त करायला लावला होता...अर्थात सेक्रेटरीने अशा त्यांच्या वागण्याबद्दल पुस्तकात विरोध दर्शवला आहे.
24 Nov 2010 - 6:03 am | गांधीवादी
माननीय पंतप्रधानांना पत्र वगेरे पाठवून काहीही फायदा नाही. त्यांच्या पत्रपेटीची चावी त्यांच्याच कडे असेल का नाही, हे सांगता येत नाही.
पत्र 'राजपुत्रांना' पाठवावे, त्यांच्याकडून काहीतरी होण्याची धूसर आशा तरी आहे.
24 Nov 2010 - 10:47 am | बद्दु
सर्वप्रथम तुम्ही केलेल्या या प्रयत्नाबद्दल तुमचे अभिनंदन.
मला वाटते की तुम्ही निवडलेला मार्ग बरोबर आहे फक्त त्या पत्राचा बाज थोडा चुकला आहे. माफ करा, पण तुम्ही मिपाचे सदस्य आहात आणि मिपाकराने केलेल्या कुठल्याही ( समाजसेवा/देशहितपर्/वगैरे..वगैरे) कार्याचा मी आदर करतो त्यामुळे तुम्हाला सुचनावजा संदेश की संदेशवजा सुचना की दोन्ही करण्याचा हा अव्यापारेषु व्यापार करतो आहे. असो.
तर,
देशाच्या पंतप्रधानाकडुन तुमच्या जश्या अपेक्षा आहेत तश्याच किंबहुना त्यापेक्षा जास्त अपेक्षा पंतप्रधानांच्या तुमच्याकडुन आहेत. त्यामुळे एखादी समस्या मांडतांना त्या समस्येचा पूर्ण अभ्यास करुन, ती समस्या सोडविण्यामागे त्यातील तुमचा प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष सहभाग, तुम्ही ( व्यक्तिगत्/एखाद्या संस्थेतर्फे) केलेले प्रयत्न आणि तुमच्या पातळीवर न सुटलेल्या पण ज्याचे निराकरण अत्यावश्यक आहे अश्या समस्या व त्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडुन तुम्हाला हवी असणारी नेमकी मदत, तसेच तुम्ही या सर्व समस्येचा पाठ्पुरावा कसे करणार? या सर्व बाबींचा व्यवस्थीत उल्लेख करुन त्यातुन तुमची ही समस्या प्रत्यक्ष सोडविण्यामागे असणारी तळमळ व्यक्त करणारी भाषा ( शक्यतो हिंदी) वापरुन पत्र लिहा.
तुम्हाला फक्त माहिती पुरवायची असेल तर तसे स्पष्ट करा, उगाच थातुरमातुर/ मोघम लिहुन तुम्ही तुमचा वेळ वाया घालवित आहात असे मला (तुमचे पत्र वाचुन)वाटते ( स्पष्ट बोलतो म्हणुन परत एकदा माफ करा).
असो,
तुमच्या आणि इतरांच्या जागरुकतेमुळे अश्या बर्याच गोष्टी उघडकीस येतात हे ही तितकेच खरे आणि म्हणुन तुमचे प्रयत्न प्रशंसनीय आहे .
24 Nov 2010 - 3:46 pm | गांधीवादी
बिहार मधील निवडणुकीचा निकाल पाहता आता पंतप्रधानांना 'घरीच बसा' असे पत्र पाठविण्याचा विचार करीत आहे.
24 Nov 2010 - 5:09 pm | अवलिया
थेट पंतप्रधानांना कोणत्याही विषयावर पत्र लिहिणार्यांना "पात्र" असे संबोधन वापरावे काय?
24 Nov 2010 - 5:13 pm | परिकथेतील राजकुमार
खरेतर तुम्ही असे काहितरी केले पाहिजेत की पंतप्रधान स्वतः तुम्हाला पत्र लिहितील. अशी कर्तबगारी हवी.