हाय पियुशा सदर लेख आमची दिवाळीतली आठवण नुकतीच दिवाळी झाली आहे म्हटले चला दिवाळीबद्दलच खरडू या थोडेसे ................
"आठवणीतली ढासू दिवाळी "
दिवाळीसण,रंगीबिरेंगी रांगोळ्या ,चांदण्यासारख्या टीम-टीमनारया
पणत्या, आकाशदिवे ,फुलांची तोरणे , नवीन कपडे गोड - चमचमीत फराळ,
सुवासिक फुले ,अत्तरे आणि अजून काय काय काय .......
पण लहानपणी आमचा विशेष इंटरेस्ट म्हणजे फक्त फटाके ,
फटाके आणि फटाके ...
लहानपणी दिवाळी म्हणजे आमचा सर्वांचा लाडका अति अति अतिप्रिय सण!
तशा आतापर्यंतच्या दिवाळ्या थोड्याफार आठवतात (वेगवेगळ्या कारणामुळे)
आता आम्ही मोठे (?)झालो पण क्रेझ आहे तशीच आहे ,
लहानपणी दिवाळी म्हणजे डोक्यात फिट केलेलं एकदम फटाके,नवीन कपडे आणि भरपूर फराळ ! बोले तो एकदम सॉलिड मज्जाच मज्जा !
आम्हाला नवीन कपडे नसले तरी चालतील पण फटाके पाहिजेत म्हणजे पाहिजेत काय क्रेझ होती आम्हाला फटक्यांची !
आम्हाला कॉलनीतल्या इतर मुलांपेक्षा जास्त फटाके मिळावेत म्हणून ८- १० दिवस आधी पासून आम्ही सर्वे शहाणी बाळ व्हायचो ,वडील संध्याकाळी आले कि त्यांना पाणी द्यायचे , धुतलेले हातपाय पुसायला टॉवेल द्यायचा( एरवी त्यांनी किती काम सांगितले तरी जाणूनबुजून दुर्लक्ष )
त्यांच्यासमोर मुद्दामून सुट्टीतला होमेवोर्क करायचा आईने काम सांगितले कि पटकन ऐकायचे , अर्थात हे buttering कशासाठी तुम्हाला कळले ना?
आधीपासून आमचे प्ल्यानींग सुरु फटाके कोणते कोणते हवे त्याचे , बिचारे आई बाबा आमचे, खरेदी, किराणा, कपडे इति.... ,यातून
फटाक्यासाठी काही पैसे बाजूला ठेवायचे पण त्यांच्या बजेट ची वाट नाही लावली अशी एकही दिवाळी गेली नाही आमची !
फटाक्यांच्या स्टालवर आम्हाला घेऊन जाने एक महादिव्या होते त्यांच्यासाठी!
आई,अण्णा आम्हाला लाडीगोडी लावून चकावण्याचा फार प्रयत्न करायचे पण आमची तिघांची वानरसेना स्कूटरवर त्यांच्या आधीच तयार होऊन स्वार झालेली असायची,
त्यांच्या मनात नेहमी एक भीती ,कारण पण तसेच, आमचा छोटू (छोटा भैया जेमतेम ५ वय ) आमच्यामध्ये सर्वात जास्त हट्टी!, त्याला आवडेल ते हवे म्हणजे हवेच ,no compromise नाही तर याचे धरणे आंदोलन तिथेच सुरु अण्णा..........sssssss आयटोम बॉम्ब .....
अण्णा समजावत " अरे राजा सोन्या तू लहान आहे ",आपण तुला सुरसुरी घेऊ ,फुलझडी घेऊ टिकल्यांची बंदूक घेऊ ? बॉम्ब नको बाबा डेंजर असतो तो
छोटू :- ( तीनदा -चारदा विचारणार)तुम्ही नाही घेणार का?
अण्णाssssssssssss itom bomb घ्या.... णा...
नाहीतर मी घरी नाही येत जां .....
नाही म्हणजे नाही येणार, मग रडण्या बरोबर हातपाय आपटणे
लोळणे ,चित्रविचित्र सुरात रडणे चालू झाले समजा , शेजारी उभे असलेले दचकायचे ,
मधमाशीचे पोळे जसे चिकटलेले तसे आम्हीपण अण्णांना
बिलगायचो अण्णा घ्या कि,घ्या कि, किती रडतोय बिचारा (आम्हाला पण आवडायचा आयटोम बॉम्ब ) म्हणून, टोचण लावायचो बिचारयांचा नाईलाज व्हायचा आमच्या ध्वनी प्रदुषणं पुढे
फटाके घरी आले की कोण आनंद व्हायचा आम्हाला , सर्वाना सारख्या वाटण्या करून द्यायचे अण्णा,आमचा छोट्या एकदम उस्ताद !
तो झोपल्यावर आम्ही त्याचे फटाके उडवू नये म्हणून कुठे - कुठे फटाके लपवून ठेवायचा , कधी जिन्याखाली तर कधी,कधी कपाटात,एकदा तर त्याने लोडच्या कवरमध्ये फटाके भरून ठेवले आईने बघितले, लोड असा असा कसा फुगलाय पहिले तर फटाके ,आईने रागवायचे तर तोच ओरडला आमच्यावर ,
आमच्या अण्णांना भीती वाटायची मुले लहान आहेत इजाबिजा नको ,म्हणून फटके उडवताना आमच्याबरोबरच उभे असायचे डोळ्यात तेल घालून हातभार लांब अगरबत्ती घेऊन ,अगरबत्ती जरी छोटूच्या हातात असली तरी फटाका लावल्यावर त्याला कडेवर घेऊन दूर पाळायची मोठी जबादारी अण्णांवर असायची ,
आई अण्णांना रागवायची काय हा नाद फटाक्यांचा ?
एवढे फटाके कशाला आणले तुम्ही? नसता खुराक डोक्याला? तुमची सुट्टी ४ दिवसांची, तुम्ही कंपनीत गेले की हे माझ्या डोक्याला नुसता ताप करुन ठेवतील ? मागच्या वर्षीचा गोंधळ विसरला काय? (मागच्या वर्षी आम्ही भर दुपारी मुद्दाम रॉकी(डोकेखाऊ आणि सतत आमचे गाऱ्हाणे करणारया शेजाऱ्यांचा कुत्रा ) समोर आयटम बोम्ब लावल्यामुले शेजारयांचा रॉकी घाबरून सुटून पळून गेला होता अणि त्याला शोधून घरी आणताना नाकी नऊ आले होते काकांच्या, वरतून आईची अणि काकुंची चांगलीच खडाजंगी झाली होती,( आणि आईने झाडूने झोडपले होते आम्हाला )
एकदा बाटलीत लावलेले रॉकेट बाटली पडल्यामुळे समोरच्या बंगल्यात घुसून त्यांची गादी जाळली होती आणि त्या बंगलेवाल्या आजोबांनी बाहेर येऊन मस्त शिव्या हासडल्या होत्या (रॉकेट वर नाव थोडीच होते आमचे) समस्त कॉलनी वासियांना, आम्ही निरागस बालके
त्यांच्या नाकासमोर उभे होतो त्यावेळी ,नंतर वातावरण शांत झाले तेव्हा मीच सांगितले आई ला रॉकेट आमचेच होते म्हणून आईचा चेहरा बघण्यासारखा होता ..............
तेव्हापासून आईने आमचा धसका घेतला होता
त्यामुऴे आईला पूर्ण विश्वास होता की
कि ह्याहि वर्षी आपली अनमोल रत्ने ((पप्पू किंवा छोटू )
काहीतरी पराक्रम करणार म्हणजे करणार!
अणि आईचा हा विश्वास छोटुने नाही तर मी एका दिवाळीला सार्थ करुन दाखविला त्याचे असे झाले की ,
मी (पियु)अणि पप्पू दुकानात रात्री काहीतरी
आणायला गेलो होतो तिथे रस्त्यावर एक नविन प्रकार पाहिला काही आमच्या वयाची मुले वाजवालेल्या फटक्यांची दारू एक कागदावर गोळा करत होते आम्हालाही कुतूहल वाटले काय करतात हे बघत थांबलो तिथेच , मुलानी अगरबत्ती पेटविली अणि त्यावार थोड़ी थोड़ी दारू टाकायला लागले अणि त्याच्या ठिणग्या उडू लागल्या सुर सूरी सारख्या , मी म्हटले अरे व़ा नविन आइडिया एकदम मस्त ,पप्पू लगेच म्हणाला
आपणपण करून बघू हि गम्मत बर का ,ठरले. उदया दुपारी सगऴे झोपल्यावर !
त्या दिवशी लक्ष्मी पूजन होते त्यामुले मनसोक्त फटाके उडविले सर्वानी ,
दुसरया दिवशी दारात फटक्यांचा बराच कचरा साचलेला होता सकाळी उठून आधी फटके गोळा केले वाजवलेले ,
आमची शोधमोहीम चालू असताना आई एकदा ओरडली काय चालले आहेरे तिकडे ? सगळे उद्योग करून झाले आता नवीन उद्योग काय? कचरा गोळा करताय का? चला आत!
दुपारी आमचे जेवण झाले ,आईचे काम चालू होते अण्णा पेपर वाचता वाचता झोपून गेले , वेळ सही होती मी आणि पप्पूने बऱ्यापैकी जमा केलेल्या फटक्यांची दारू काढली एका मोठ्या पेपरवर जमा केली आणि जिन्याखाली गेलो तिथे थोडासा अंधार असायचा मग पप्पूने अगरबत्ती पेटवून माझ्या हातात दिली मग आमचा खेळ सुरु झाला ,अगरबात्तीवर हळूहळू दारू सोडली तर फुल झडी सारख्या ठिणग्या उडू लागल्या आणि
जिन्याखाली थोडा अंधार असल्यामुळे अजून छान दिसायला लागल्या, आम्हाला फार गम्मत वाटली अरे वा वा मस्त ना रे पप्प्या!
पाच एक मिनटे झाली ,जसा काय आम्ही काहीतरी नवीन शोध लावलाय अशा अविर्भावात असताना अचानक ती अगरबत्ती माझ्या हातातून जमा केलेल्या दारूवर पडली आणि दारूने पेट घेतला फुस्स ssफुस्स ssफुस्स ssआवाज !
मोठा जाळ झाला मला तर मिनिटभर काही कळलेच नाही मी डोळे गच्च झाकले होते डोळे उघड्ल्यावर डोळ्यासमोर नुसते पिवळे छोटे छोटे सूर्य दिसत होते आमचा पप्पू केव्हाच गायब झाला होता ,मी म्हटले घाबरला लेकाचा!
दोन मिनिटांनी हाताला काहीतरी चुनचुन ,आग होत असल्यासारखे जाणवले बघितले तर हात कोपरापर्यंत भाजला होता भयानक काळा झाला होता आता मात्र माझी बोबडी वळाली माझी रडू येत होते, हात जळाला तर जळाला, पण या पराक्रमाबद्दल किती मोठे बक्षीस मिळणार होते आई आणि अण्णाकडून, हा विचार करूनच जीव अजून घाबरा झाला होता
काय करू सुचेना, वाटत होते जोरजोरात बोम्बलावे ,आग -आग झाली हाताची , काही करायला मार्ग नाही रडले तर अण्णा मारतील (पुन्हा ढाई किलोचा हात नकोरे बाबा )
पाच एक मिनिट झाली, तेवढ्यात आमचा पप्पू हातात पाण्याचा मग घेऊन आला, मला म्हणाला यामध्ये हात बुडव,(आमचा पप्पू एवढा हुशार! कसा काय बुवा ?असा प्रश्न पडला मला )
मी लगेच हात बुडवला जरा बर वाटले ,त्याच्याकडे पहिले त्याला कुठे इजा झाली नव्हती ,पण लेकाचा माराच्या भीतीने आधी दिवानखाली जाऊन लपला होता, पण बिचारा तो तरी काय करणार घाबरला होता तो ,मी पण घाबरले होते रडत होते... पप्पूला राहवले नाही फटके बसले तर बसले, आईकडे गेला, तिला हळूच बोलावून आणले अण्णा जागे होऊ नये म्हणून दक्षता ,कारण आईचा मार म्हणजे दोन चार फटके ब......स्स.
(अण्णाचा मार म्हणजे मारच निदान पाच सहा जन
तरी आलेच पाहिजे आमचे तांडव ऐकून सोडवायला )असो....
आईने बघितले हाताकडे प्रचंड घाबरली दोन चार फटके बसतील म्हणून मी पुन्हा गच्च डोळे मिटले पण झाले वेगळेच ,तिने लगेच मला पकडले ,पायात चप्पल घातली आणि लगेच मला दवाखण्यात घेऊन आली पेशंट ची भरपूर गर्दी होती आईने विनंती केली सगळ्यांना, मुलगी रडते आहे, आणि माझी अवस्था पाहून मला लगेच आत जाऊ दिले
फमिली डॉक्टर होते माझा हात पाहून त्यांनी आईला काय झाले विचारले
माझा केविलवाणा आणि रडवेला चेहरा पाहून तिचे डोळे ओले झाले होते
सांगताना ,"अगं पियू बेटा रडू नको बघू डॉक्टर मला समजावत होते ",हात कसा भाजला विचारात होते, माझ्या तोंडातून शब्द निघत नव्हता मी नुसती रडत(बोम्बलातच ) होते
हातावर फोड आले होते बोटांची कातडी लोंबत होती त्यांनी लगेच एक मलम लावले आणि एक टोचलेपण ! आईला डॉक्टरांनी २-४ वेदनाशामक टयुबे,दिल्या लावायला, गोळ्या आणि काय काय .....
सगळी औषधे बरोबर घेऊन आम्ही घरी निघालो ,या अवस्थेत सुधा आई मला रागावली कशी नाही हा विचार चालूच होता डोक्यात..
एव्हाना हा प्रकार पप्पूने अण्णांना सांगून झाला होता अण्णा स्कूटर काढून निघायच्या तयारीत असतानाचा आम्ही पोहोचलो मला पाहून त्यांनी लगेच मला उचलून घेतले (अजून एक सुखद धक्का ! ) हात पहिला ,मला मायेने विचारले आग होती आहे का ?
आईला विचारले ,डॉक्टर काय म्हणाले ? आई नि अण्णाकडे एक तिरका कटाक्ष टाकला (याचा अर्थ तुम्ही चला आत, मग सांगते) नंतर बराच वेळ त्यांची कुरबुर चालू होती फटटाके त्यांनीच घेऊन दिले होते ना म्हणून,
रात्री हाताची आग होते म्हणून आई अण्णा किती वेळ वारा घालत बसले होते
माझा हात बरा होईपर्यंत काय ऐष झाली म्हणून सांगू , आवडती फळे काय ,चोकलेट काय क्रीमची बिस्किटे काय ,सांगायचा उशीर ,माझे लाड पाहून आमच्या पप्पूला,छोटुला इर्ष्या वाटत होती .मी पण द्यायचे ना त्यांना थोडं-थोडं हाताला वारा घालायचा बदल्यात ,
शेजारी पाजारी त्यांच्या मुलांना भीती दाखवायचे बघा फटक्यामुळे पियुचा
हात कसा भाजला आहे त्यामुळे ती सगळी कार्टून पण आमच्या घरी खेळायला यायची फटाक्यांचा नाद सोडून !
आजी आम्हाला सर्वाना गोष्टी सांगायची माझ्याजवळ बसून ,फार मजा वाटायची, आम्ही कॅरम
खेळायचो कधी गाण्याच्या भेंड्या ,
घरात बसून बोर व्हायचे कधी कधी म्हणून
एक बैठी खेळ शोधला त्या सुट्टीत ,मोठे घमेले घेऊन त्यात बसून हाताने गरगर फिरवायचे चक्कर येईपर्यंत! आईला कळेपर्यंत घामेल्याच्या बुडाला मोठे छिद्र पडले होते ,खूप धिंगाणा करायचो भरपूर फराळ केला टोळधाडच म्हणा !
सॉलिड धमाल केली त्या दिवाळीत ते हि मार ना खाता .....
लहानपाणीची दिवाळी आणि ते ढासू
दिवस सदैव आठवणारे ,,,,,,,
या गोष्टीला बरीच वर्षे झाली आता आम्ही फटाक्यां साठी
हट्ट करत नाही.
मोठे झालो ,कमावते झालो,
पण अजून तस्सेच आहोत अगदी हट्टी!
(स्वतः घेण्यात मजा नाही तो मान अण्णाचाच,)
काही म्हणा ,पण अन्नाकडून आईकडून हक्काने लाडाने दिवाळीची खरेदीकरण्याची
लहान बनून हट्ट पुरवून घेण्याची जी मजा आहे ना ती काही औरच !
"आण्णा नवीन FLAT स्क्रीन TV घ्यायचा का आपण? ए तू गप रे , नाही नको अण्णा, त्यापेक्षा मला स्क्रीन TOUCH MOBILE हवा आहे ,तो घेऊ या
का ? दिवाळीला आपण ? मधेच आमची आई अहो .......ते काही नाही यंदा मला microvave पाहिजे म्हणजे पाहिजे नक्की हा ,नक्की ,नक्की ...............
बिचारे आमचे अण्णा ........
प्रतिक्रिया
22 Nov 2010 - 1:50 pm | चांगभलं
पियुषा...............
झकास लेख.......
असंच लिहित राहा.....
22 Nov 2010 - 1:55 pm | छोटा डॉन
एकदम कडक लेख !
तुमची निरागस शैली मजेशीर आहे :)
मजा आली, छान लेख आहे, असेच अजुन येऊद्यात :)
- छोटा डॉन
23 Nov 2010 - 8:52 am | आनंदयात्री
लेख निरातिशय निरागस आणि सुंदर.
22 Nov 2010 - 2:09 pm | स्पा
अतिशय निरागस लेख.....
मस्त मस्त मस्त................. :)
22 Nov 2010 - 4:16 pm | स्वानन्द
मस्स्तच! एखाद्या दिवाळी अंकात चालून जाईल :)
>>अण्णा..........sssssss आयटोम बॉम्ब ....
हा हा... अगदी अस्संच... लहान्पणी आम्हाला पण या 'आय्टोम बाँब' चं काय कौतुक. म्हणजे जेव्हा आम्ही सगळे जण पान्पट्ट्या, लवंगी किंवा फार तर फार लक्ष्मी उडवायच्या डेरींग चे झालो होतो तेव्हा कुणी तो आयटोम बाँब आणला की आम्हाला वाटायचं काय सोल्लिड डेरींग वाला आहे हा!
>>एकदा बाटलीत लावलेले रॉकेट बाटली पडल्यामुळे समोरच्या बंगल्यात घुसून त्यांची गादी जाळली होती
हे बाकी फार भयंकर!... होत्याचं नव्हतं करून टाकतात हे उडणारे फटाके.
22 Nov 2010 - 4:59 pm | परिकथेतील राजकुमार
एकदम आतषबाजी लेखन.
विशेषतः 'आयटोम बॉम्ब' हा शब्द आवडला. तो 'आयटम' बॉम्ब असा लिहिला असता तर अजुन आवडला असता ;)
23 Nov 2010 - 3:28 pm | मेघवेडा
तो 'आयटम' बॉम्ब असा लिहिला असता तर अजुन आवडला असता
असेच.
एकदम ढासू लेख! सह्हीच!
23 Nov 2010 - 4:01 pm | पियुशा
अरे आता म्हणतो आम्ही आयटम बोंम्ब लहानपणी आम्ही त्याला आइटोम बोंम्ब च म्हणायचो म्हनुनच तसे लिहिले
22 Nov 2010 - 7:32 pm | गणेशा
अतिशय सुंदर ओघवते वर्णन .. आवडले एकदम ..
जुन्या आठवणींच्या या झरोक्यामधुन कधी बाहेर पडुच नये असे मला नेहमी वाटते ..
पण हा निसर्ग कायम पुढेच न्हेत असतो ..... आणि आवडणार्या आठवणी पण बैचेन करुन जातात खुप ...
22 Nov 2010 - 9:23 pm | गवि
athvanincha aaytom bomb phutala.
Sundar..
22 Nov 2010 - 9:33 pm | स्वैर परी
पियुशा ताइ, खुप च सुन्दर लिहिले आहे आपण! जुन्या आठवणी जाग्या करुन दिल्यात बरं का! त्याबद्दल धन्यवाद!
22 Nov 2010 - 11:38 pm | अविनाशकुलकर्णी
एकदम बालपणात गेल्या सारखे वाटले..
खुप ओघवती शैली आहे..मजा आली वाचताना..
लिहित रहा..
23 Nov 2010 - 8:21 am | स्पंदना
इतक निरागस लिखाण पण आई वडीलांच भाव विश्व इतक खोलवर उमटल आहे त्यात की भल्या भल्यांना नाही जमणार.
सुन्दर ग पियु!
23 Nov 2010 - 3:48 pm | सहज
बिचारे अण्णा!!!
:-)
23 Nov 2010 - 4:06 pm | sneharani
मस्त लिहल आहेस!
मजा आली वाचताना!
23 Nov 2010 - 4:21 pm | चिंतातुर जंतू
लहानपणच्या स्मरणरंजनासाठी वापरलेली भाषा आवडली. मुद्दाम वापरली असेल अशी आशा आहे ;-)
25 Nov 2010 - 3:00 am | इंटरनेटस्नेही
अतिशय निरागस आणि सुंदर लेख. माझ्या पण बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.
25 Nov 2010 - 4:19 pm | पंख
काय छान लिहिता राव तुम्ही! ग्रेट... अत्यंत ओघावतं वर्णन., अगदी माझच बालपण लिहिलय कि काय असच वाटत होतं..
हा पंख आजपासून तुमचा पंखा ! (फॅन हो..)