सोनुले,
रोज रात्री प्रमाणे आजही रात्री परत तो सर्प स्वप्नात आला... भूतकाळाच्या आठवणींचे वेटोळे घालून बसला मला तो... जीवाचा आकांत करून ओरडत होतो, पण शब्द देखील फुटत नवता तोंडातून.... जाग आली तेव्हा फक्त गदद्द अंधार होता सोबतीला... रोजच्यासारखा... तेव्हा जाणीव होते प्रकर्षाने तू नसल्याची,
हवा असतो फक्त तुझा स्पर्श... मन भीतीने जेव्हा थरथरत असत तेव्हा त्या हळुवार स्पर्शाचीच गरज असते मला... आस लागलेली असते मनाला... त्या वेळी फक्त हवी असते डोक्याखाली तुझी मांडी, आणि केसातून फिरणारा तुझा हात... शब्द सुद्धा गोंगाट वाटतो, भीतीदायक वाटतो... त्या वेळी कान तरसतात फक्त तुझ्या श्वासांचा आवाज ऐकण्यासाठी,
बाहेर जेव्हा पडतो उजेडात तेव्हा खाम्तोक असतो मी दुनियेशी लढायला... हजार वादळांना सुद्धा तोंड देऊ शकतो मी निधड्या छातीने, पण जेव्हा संध्याकाळी अंधारात जाणीव होते एकटेपणाची तेव्हा खरच हवा असतो तुझा स्पर्श...
छातीवर डोकं जेव्हा ठेवतो तेव्हा ऐकू येणारी धडधड मला माझ्या अस्तित्वाची जाणीव करून देते...
आधार वाटतो ह्या गोष्टींचा... आणि जाणीव होते, कि अजूनही लाचार आहे मी तुझ्यापुढे... जसा अगोदर होतो तसाच...
सोनुले...
का गेलीस तू ???
प्रतिक्रिया
3 Nov 2010 - 12:38 am | इंटरनेटस्नेही
लवकरच एक भिकार विडंबन येत आहे!
3 Nov 2010 - 12:59 am | प्राजु
हम्म!!!
3 Nov 2010 - 1:46 pm | गणेशा
जबरदस्त भाव दर्शवणारे लिखान ...
निशब्द
4 Nov 2010 - 5:12 pm | योगेश सुदाम शिन्दे
खरच का गेलिस ग?