रजनीकांतचा हिट 'रोबो'. (एक दुर्धर मानसिक रोगाची उपजत).

गांधीवादी's picture
गांधीवादी in काथ्याकूट
13 Oct 2010 - 1:05 pm
गाभा: 

रजनीकांत बद्दल जास्त काय माहित नाही. त्याचे थोडेफार सिनेमे बघितलेले आहेत. १८० कोटी ओतून त्याचा (न बघितलेला) रोबो दणदणीत चाललेला आहे. त्याचा कोणताही सिनेमा येउंद्या, तो इतकाच किंबहुना ह्याही पेक्षा जोरदार चालणार ह्याची खात्री कोणीही देईल. नुकताच त्याचा दुग्ध अभिषेक बघितला नेटवर.

कोणी विचार केला आहे, का चालतात त्याचे इतके सिनेमे ? का इतका प्रसिद्ध आहे तो सामान्यांमध्ये ?
त्याची जोरदार, अशक्य कोटीतली मारामारी, त्याची सुपरमॅन पॉवर ?
तो दिसायला खूप सुंदर आहे ?
तो चांगला खूप डान्स करतो ?
तो खूप चांगला अभिनय करतो ?

छे.........

मला नाही वाटत असे... (वरील सगळे गुण कितीतरी नायकांच्या अंगी आहेत पण ते का नाहीत मग रजनीकांत इतके प्रसिद्ध ?) तर रजनिकांतच का इतका प्रसिद्ध आहे ?
त्याला एक टाचणी टोचा, बघा रक्त येते का नाही ते आणि तो सुद्धा बघा कसा कुई कुई करेल.

तो प्रसिद्ध आहे, कारण त्याची प्रतिमा एका भयानक मानसिक रोगाची उपजत आहे.
तो रोग साधासुधा नाही. तो रोग जडलेला आहे सगळ्या जनतेला. एक अतिप्राचीन रोग आहे तो.

त्या रोगाचे नाव आहे. "मी दुबळा". "I AM HELPLESS". आजकाल सर्व जनतेला ह्या रोगाने भेडसावले आहे. तर बघूया ह्या रोगाची लक्षणे.
रोगट व्यक्तीला
१) आपण दुबळे वाटायला लागतो,
२) दुसरा कोणतरी येऊन आपले सगळे दुख: एक क्षणात काहीसे जादू मंतर करून समाप्त करेल.
३) कोणती तरी super power ची मनधरणी केल्या शिवाय त्याच्या मनाला चैन पडत नाही.
४) कोणत्याही समस्येला 'हा जिवंत झाला पाहिजे', 'तो जिवंत झाला पाहिजे' असे वाटून त्या समस्येस प्रभावीपणे तोंड देण्याचे रोगट व्यक्ती नाकारते.
५) आपल्या आजूबाजूच्या सर्व वाईट प्रवृत्तींना नष्ट करण्याची एक सुप्त इच्छा केवळ सिनेमात जाऊन पूर्ण करतात.
६) आणि जो हि इच्छा पूर्ण करु शकतो त्याला डोक्यावर घेउन बेभान होतात.

अशी काही रोगट माणसे आणि त्यांचे रोग नेहमीच आजूबाजूला दिसून येतात.
त्यामुळे काही मुन्नाभाईन्ना गांधीबाबा इकडे तिकडे दिसतात तर काही 'राजे परत आले पाहिजे' असा घोषा लावत मोर्चे काढतात, तर काही कल्की लवकर यावा म्हणून त्याची पूजाअर्चा करतात. काहीजण रोज विघ्नहर्त्याची देवपूजा करून सर्वआपापली विघ्ने हटवून स्वताला सुखी ठेवण्यासाठी साकडे घालतात. कायम दुसर्यावर अवलंबून राहतात. त्यांचे मन अपंग होते.

मी म्हणतो,
नकोत मला शिवाजी / कल्की / रोबो / कि अजून कोणी जिवंत व्ह्यायला,
मीच होईल भक्कम, मीच करीन माझ्या जीवनातील सैतानाचा नाश. मीच आहे विष्णू, मीच रोबो आहे. रावणाचा नाश करणारा राम मीच, आणि मीच होईल शिवाजी. कोणी मावळे आले तर ठीक नाहीतर मीच लढा देईल एकटा. सर्व थोरामोठ्यांचा आदर्श ठेऊन त्या स्वर्गातल्या रामालासुद्धा हेवा वाटला पाहिजे असे राज्य मीच स्थापन करील. अशी शपथ का कोण घेत नाही ?

बाजी प्रभू ज्या हिमतीने खिंडीत लढला त्याच्या किती पट हिम्मत लागते आज सगळ्या भ्रष्ट नेत्याशी लढा द्यायला ? कोणाच्या तरी नावाने जयघोष करायचा आणि आपल्या रोगी मनावर तात्पुरती मलम पट्टी करून झोपी जायचे. असं किती युगे चालणार ?

निसर्गाने मला जीवन दिले आहे, त्याचीसुद्धा काहीतरी अपेक्षा असेल ना माझ्याकडून.
.....
.....
.....

--------------------------------------------------------------------------------------------------------------
वरील सर्व विचार कोणत्याही धर्माला / व्यक्तीला उद्देशून नाहीत. आढळून येत असेल तर मोठ्या मनाने माफ करा. जाऊदे जरा जास्त झालं. भूक लागलीये. जेऊन येतो, ते सन्सेक्स बघतो कुठपर्यंत आलाय ?

प्रतिक्रिया

अवलिया's picture

13 Oct 2010 - 1:21 pm | अवलिया

>>>>ते सन्सेक्स बघतो कुठपर्यंत आलाय ?

सन्सेक्स की सेन्सेक्स?

सन सेक्स म्हणजे वेगळेच काही प्रकरण असावे...

अरे हो लेखाबद्दल लिहायचेच राहिले... ठिक ठिक. मजा नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Oct 2010 - 1:19 pm | llपुण्याचे पेशवेll

लेख ठीक ठीक वाटला. आपले विचार स्तुत्य आहेत पण प्रॅक्टीकल नाहीत. जरी सगळ्यांच्यात समाजातल्या वाईटावर मात करण्याची इच्छा असली तरी सगळ्यांच्या त्याबाबतच्या व्याख्या सारख्या नाहीत. म्हणून अनेक लोक एखाद्या कार्यासाठी एक होऊन परिणाम घडवून आणतील इतकी जनशक्ती त्यासाठी एकवटत नाही. मी एकटा हे सगळं करीन हे म्हटलं आणि कितीही त्यासाठी आपटली तरी ते एकट्यानं सगळं शक्य नाही.
त्यामुळे तो मानसिक रोग नाही म्हणता येणार.

असो, अर्थात रजनीकांतच्या सिनेमाचा मी काही मोठा फॅन नाही.

गांधीवादी's picture

14 Oct 2010 - 6:05 pm | गांधीवादी

>>सगळ्यांच्यात समाजातल्या वाईटावर मात करण्याची इच्छा असली तरी सगळ्यांच्या त्याबाबतच्या व्याख्या सारख्या नाहीत.
त्या व्याख्या एकजूट करण्याचे काम राजकर्त्यांचे आहे, आपले काम जनजागृती. ते नित्यनियमाने करावे.

>>मी एकटा हे सगळं करीन हे म्हटलं आणि कितीही त्यासाठी आपटली तरी ते एकट्यानं सगळं शक्य नाही.
राजे / गांधींनी सुरुवात केली त्यावेळेस ते किती होते ? त्यांचे धडे केवळ इतिहासात वाचायलाच आवडतात का ? (कृपया वैयक्तिक घेऊ नये)

परिकथेतील राजकुमार's picture

13 Oct 2010 - 1:25 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त.
आता बॉबी डार्लिंगवर पण एक असाच अभ्यासपुर्ण लेख येउ द्या.

वेताळ's picture

13 Oct 2010 - 8:04 pm | वेताळ

तसेच बॉबी ची पाकिस्तानी मैत्रिण देखिल आजकाल बिगबॉस वर धुमाकुळ घालते आहे,तिच्यावर पण लिहावे.

पाषाणभेद's picture

13 Oct 2010 - 8:59 pm | पाषाणभेद

मानसिक रोग वैगेरे नाही पण मनात प्रत्येकाला अशी सुप्त इच्छा असतेच तिला मोकळी वाट मिळते थेटरात.
८० च्या दशकात अमिताभचे खेळ गाजण्याचे हेच कारण आहे. आताही सनी देओलचे असलेच खेळ गाजलेले आहेत. नानाचेही गाजले.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Oct 2010 - 9:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

'रोबो' थेट्रात जाऊन पहाणारे माझे बरेच मित्र व्हिज्युअल इफेक्ट्सचेही फॅन्स आहेत. त्यांना मानसिक रूग्ण नाही म्हणता येणार, पण अंमळ विक्षिप्त आहेत त्यातले बरेचसे!

रजनीकान्त च म्हणाल तर तामीळ नाडु मधला रिअल लाईफ हीरो आहे तो. खुप केलय त्याने तितल्या गरीब लोन्कासाटी, खुप सन्स्था आहेत ज्या निव्वळ रजनिकान्त मुळे सुन्दर सेवा पुरवतात.

मला रजनीकांत ह्याच्याबद्दल काहीच बोलायचे नाही, त्यांच्याबद्दल (आणि इतर देव म्हणून पुजलेल्या व्यक्तींबद्दल) आदरच आहे. मला माणसांच्या व्यक्तिपूजेच्या वृत्ती बद्दल भाष्य करायचे होते.

>>खुप सन्स्था आहेत ज्या निव्वळ रजनिकान्त मुळे सुन्दर सेवा पुरवतात.
इथेच सगळं आलं.

राजे / गांधीबाबा असताना त्यांनी चांगलीच कामे केली, राजे / गांधीबाबा नसताना त्यांच्या नावाचा फक्त (मतांसाठी) वापरच जास्त झाला.
रजनीकांत साहेब नसतील तरीसुद्धा त्यां संस्थांनी अश्याच उत्तम सेवा दिल्या तर नक्कीच स्तुतीपात्र.

परिकथेतील राजकुमार's picture

14 Oct 2010 - 6:02 pm | परिकथेतील राजकुमार

राजांची तुलना गांधीबाबा बरोबर ?

कलियुग कलियुग म्हणतात ते हेच !!

(थत्ते चाचांच्या भयाने संयमीत प्रतिक्रीया दिली आहे. चाचा ह्याची नोंद घेतीलच)

गुंड्या बावळा's picture

30 Oct 2010 - 8:42 am | गुंड्या बावळा

confused!!!!!
सर्वांचे विचार पटताहेत!!!

सदर किस्सा फेसबुकवर वाचला जसाच्यातसा डकवलाय.

Rajni Mania...Rajnikanth was bragging to Amitabh Bachan one day, "You know, I know everyone. Just na...me someone, anyone, and I know them. Tired of his boasting, Amitabh Bachan called his bluff, "OK, Rajini how about Tom Cruise?"

"Sure, yes, Tom and I are old friends, and I can prove it" Rajini said.

So Rajini and Amitabh Bachan fly out to Hollywood and knock on Tom Cruise's door,

And sure enough, Tom Cruise shouts : "Thalaiva! Great to see you! You And your friends come right in and join me for lunch!"

...Although impressed, Amitabh Bachan is still skeptical. After they leave Cruise's house, he tells Rajini that he thinks Rajini knowing Cruise was

Just lucky.

"No, no, just name anyone else" Rajini says

..."President Obama", Amitabh Bachan quickly retorts

..."Yes", Rajini says, "I know him.

And off they go. At the White House, Obama spots Rajini on the tour and motions him, saying, : "Rajini, what a surprise, I was just on my way

to a meeting, but you and your friend come on in and let's have a cup of

coffee first and catch up".

Well, Amitabh Bachan is much shaken by now, but still not totally onvinced. After they leave the White House grounds, he implores him to

name anyone else.

"The Pope," Amitabh Bachan replies

..."Sure!" says Rajini, "My folks are from Italy and I've known the Pope a long time".

Rajini and Amitabh Bachan are assembled with the masses in Vatican Square when Rajini says, "This will never work. I can't catch the Pope's eye among all these people. Tell you what, I know all the guards so let me just go upstairs and I'll come out on the balcony with the Pope."

And he disappears into the crowd headed toward the Vatican.. Sure enough, half an hour later Rajini emerges with the Pope on the balcony.

But by the time Rajini returns, he finds that Amitabh Bachan has had a

heart attack and is surrounded by paramedics.

Working his way to Amitabh Bachan's side,

Rajini asks him, "What happened?"

Amitabh Bachan looks up and says,

"I was doing fine until u and the pope came out on the balcony and the Italian man next to me said,

"Who's that on the balcony with Rajini?"
By:City of Seven Islands.........!! Mumbai !!

परिकथेतील राजकुमार's picture

1 Nov 2010 - 5:15 pm | परिकथेतील राजकुमार

अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे.