भारतरत्नाची जयंती

विकि's picture
विकि in काथ्याकूट
14 Apr 2008 - 3:04 pm
गाभा: 


आज १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती .त्या निमित्त त्यांना भावपुर्ण आदरांजली
जयंतीनिमित्त सर्वांना हार्दीक शुभेच्छा !

आपला
कॉ.विकि

अनावश्यक गोष्टी संपादित केलेल्या आहेत.
:संपादक

प्रतिक्रिया

स्वाती राजेश's picture

14 Apr 2008 - 4:32 pm | स्वाती राजेश

माझीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भावपुर्ण आदरांजली.

अवांतरः मागच्याच आठवड्यात मी डॉ.नरेंद्र जाधव यांचे आमचा बाप आन आम्ही हे पुस्तक वाचले. त्यावेळी डॉ.आंबेडकर यांची आठवण त्या पुस्तकामुळे झाली होती.

प्रशांतकवळे's picture

14 Apr 2008 - 4:38 pm | प्रशांतकवळे

महामानवाला आमचा सलाम!

प्रशांत

नीलकांत's picture

14 Apr 2008 - 4:42 pm | नीलकांत

babasaheba

भारताच्या इतिहासाला नवं वळण लावणार्‍या, अनेक अर्थानं समाजाला भरीव योगदान देणार्‍या या महामानवास विनम्र अभिवादन !

उध्दरली कोटी कोटी कुळे,
भीमा तुझ्या जन्मामुळे !
- वामनदादा कर्डक.

------------------------------------------------

बाबासाहेबांच्या समतेच्या आणि आकाशा एवढ्या अफाट कर्तुत्वाला माझं वंदन.

नीलकांत

आजानुकर्ण's picture

14 Apr 2008 - 5:13 pm | आजानुकर्ण

बाबासाहेबांच्या समतेच्या आणि आकाशा एवढ्या अफाट कर्तृत्वाला माझं वंदन.

(वंदनकर्ता) आजानुकर्ण

प्रमोद देव's picture

14 Apr 2008 - 5:33 pm | प्रमोद देव

बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

व्यंकट's picture

14 Apr 2008 - 6:23 pm | व्यंकट

स्मृतीस अभिवादन.

व्यंकट

विसोबा खेचर's picture

14 Apr 2008 - 7:06 pm | विसोबा खेचर

महामानवाला माझेही लाख सलाम!

खूप मोठा माणूस! परंतु खुद्द त्यांच्या अनुयायांनाच त्यांचं मोठेपण कळलं नाही, हे दुर्दैव!

तात्या.

शिका, संघटित व्हा, आणि तुमच्या बरोबर सगळ्यांना घेऊन पुढे चला हा संदेश आचरणात आणणार्‍या;
जातिभेदाची भयाण दरी उल्लंघून जाण्याचा भीमपराक्रम करणार्‍या;
भारतासारख्या खंडप्राय देशाला एक अभिनव अशी राज्यघटना प्रदान करण्यात फार मोठा सहभाग असलेल्या;
देशातच नव्हे तर परदेशातही आपल्या कर्तृत्वाने यशाची गुढी उभारणार्‍या - ज्या कोलंबिया विद्यापीठात त्यांनी डॉक्टरेट मिळवली तेथील लेहमन वाचनालयात त्यांच्या सन्मानार्थ ब्राँझ अर्धपुतळा उभारण्यात आलाय!
आयुष्यभर ज्ञानसाधना करुन ज्ञान हाच खर्‍या मुक्तीचा राजमार्ग आहे हे सिध्द करणार्‍या महामानवाला प्रणाम!

चतुरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Apr 2019 - 1:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सगळ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सदिच्छा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार - सदानंद मोरे
https://bit.ly/2Ii5lkN

दलितांना पुन्हा पॉलिटिकल करण्यातूनच होईल क्रांती - अंकुश कदम
https://bit.ly/2E0rnVZ

साईबाबांची कीर्ती दाहीदिशा होईल, असं डॉ. आंबेडकर का म्हणाले?
https://bit.ly/2DaK3kW

धम्मदीक्षा घेताना बाबासाहेबांनी केलेलं ऐतिहासिक भाषण
https://bit.ly/2Uk1u8h

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या पंचविशीत प्रत्येकाने वाचावा असा लेख
https://bit.ly/2Hb0S3Q

संविधान म्हणजे काय रे भाऊ! - राजा शिरगुप्पे
https://bit.ly/2CKb8dV

सेलफोनचे संविधान आणि सीमकार्डातली लोकशाही - जयदेव डोळे
https://bit.ly/2DBdMnR

-दिलीप बिरुटे