सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
28 Sep 2010 - 9:04 am | नगरीनिरंजन
बातमीतल्या थोड्याशा उल्लेखावरुन कटकट करण्याची कारणे अशी असतील असे वाटते:
१. पैशाची देवाणघेवाण म्हणजे नवर्याने त्याच्या आई-वडीलांना आणि कदाचित भावंडांनाही आर्थिक मदत करणे.
२. कौटुंबिक कारण म्हणजे सासरकडच्यांशी (विशेषतः सासूशी) न पटणे, वेगळं राहत नसल्यास वेगळं राहण्याची तीव्र इच्छा असणे.
ही कारणे सर्वसामान्य आहेत हे मान्य करायला हरकत नसावी. बहुतेक सगळ्या घरांमध्ये या गोष्टींवरून छोट्या-मोठ्या कुरबुरी होतच असाव्यात. तरीही स्त्रियांच्या बदललेल्या परिस्थितीमुळे आणि त्यांना आलेल्या नव्या जाणिवांमुळे या कुरबुरींची तीव्रता बरीच वाढलेली दिसत आहे. सासूचा त्रास होतो हा प्रत्येक स्त्रीचा दावा असतोच पण यापूर्वी आपला संसार आणि कुटुंब टिकवण्यासाठी स्त्रिया मुकाट सहन करत असायच्या. आजकाल मात्र थोडंही मनाविरुद्ध खपवून घेतलं जात नाही आणि सासू-सुनेच्या भांडणात नवर्यांचा जीव मेटाकुटीला आलेला दिसतो.
बहुतेक वेळा नवर्याच्या आई-वडीलांबरोबर एकत्र राहायचं नाही हे लग्ना आधीच कबूल करुन घेतलं जातं आणि त्यात काही चूकही नाही, पण मग त्या नंतरही नवर्याच्या आई-वडीलांचं साधं घरी येणं जाणं खुपु लागतं, ती स्वतःच्या संसारातली लुडबूड वाटू लागते.
नवर्याच्या आईवडीलांचे आणि बायकोच्या आईवडीलांचे हक्क आणि त्यांच्याप्रती दोघांचे कर्तव्य हा विषय थोडावेळ बाजूला ठेवला तरी जे परंपरेने चालत आलं आहे ते (म्हणजे स्त्रीने नवर्याच्या घरी जाऊन राहणे वगैरे) बदलावं असं बहुतेकाना वाटतं आणि बहुतेक शहरी भागात वेगळा संसारच थाटला जातो. म्हणजेच लग्न व कुटुंबसंस्थेतला त्रासदायक भाग अगोदरच नष्ट होत आहे, तरीही सासू-सून वाद नष्ट झालेले नाहीत. उलट लग्नानंतर नवर्याच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीचा संबंध येऊ नये, जबाबदारी तर दूरची गोष्ट आहे, असंच स्त्रियाना वाटतं की काय अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे.
त्यातूनच नवर्याच्या डोक्यामागे कटकट चालू केली जाते आणि ती कधीकधी मानसिक (क्वचित शारिरीक) छळापर्यंतही जाऊन पोचते. खंबीर मनाचे पुरुष सहन करत राहतात आणि दुर्बळ मात्र असा मार्ग पत्करतात.
जर लग्न व कुटुंबसंस्थेच्या परंपरांना फाटाच द्यायचा प्रयत्न केला आणि त्या एकाच बाजूला झुकवायचा प्रयत्न केला तर या संस्थाच मोडून पडण्याचा धोका उघड आहे (एनीवे या दोन्ही संस्था फार माजल्या आहेत असं गुर्जींनी जाहीर केलंच आहे)
मी जे लिहीले ते सरसकट सर्व स्त्रियाना लागू होत नाही हे मला माहिती आहे आणि माझा तसा प्रयत्नही नाही. पण अशा घटनांच्या आणि घटस्फोटांच्या वाढत्या प्रमाणाकडे पाहता यात थोडं तरी तथ्य आहे हे नक्की. स्त्रियांवर होणार्या अत्याचारांच्या मानाने ही समस्या कमी आहे हे खरं आहे पण ती वाढेपर्यंत स्वस्थ बसून राहण्यात कोणाचंच हित नाही.
28 Sep 2010 - 10:57 am | राजेश घासकडवी
खरं तर मी काही लिहीणार नव्हतो, पण माझं नाव घेऊन माझी मतं मांडल्यावर मग बोलायलाच हवं. शेवटी पुरषांनीसुद्धा आवाज उठवला पाहिजेच, नाही का? किती काळ सहन करायचं? सांगूनच टाकायचं.
असो. 'लग्नसंस्था फार माजली आहे (साली)' (कंस माझा -मूळ विधानही माझंच, त्यामुळे फारसा फरक पडत नाही ) असं म्हटलं तेव्हा ते विधान 'एकंदरीतच प्रस्थापित फार माजतात (साले)' या सर्वसाधारण विधानाचं विशेषीकरण (पर्टिक्युलरायझेशन) होतं. पॉवर करप्ट्स अॅंड अॅब्सोल्यूट पॉवर करप्ट्स अॅब्सोल्यूटली वगैरे वगैरे... कुटुंबसंस्थेच्या माजण्याविषयी फारसं काही बोलल्याचं आठवत नाही, पण तीही माजलेली असणं सहज शक्य आहे. मुळात एखाद्या व्यक्तीने काय करावं हे ती व्यक्ती सोडून इतर बरेच लोक ठरवायला लागले की प्रॉब्लेम निर्माण होणारच. त्यात जर अशा ठरवण्याचं संस्थानिकरण (इन्स्टिट्युशनलायझेशन) झालं की ती संस्थानं अथवा त्या संस्था माजायला वेळ लागत नाही.
पण याचा अर्थ त्या संस्था मोडून तोडून फेकून दिल्या पाहिजेत असा नाही. फक्त अधून मधून त्यांना दुर्लक्षाची एक सणसणीत शिवी हासडली तर बऱ्याच गोष्टी सुकर होतील या मताचा मी आहे. कुत्र्याला तीन फुटी दोरी बांधली तर त्याचं आयुष्य फारच बांधल्यासारखं वाटेल. पण तीच दोरी जर पन्नास फुटी झाली तर ते बांधलेपणाचं फीलिंग कमी होईल. आणि बरं कुठेतरी अनोळखी प्रदेशात हरवण्याचीही भीती नाही. स्वतःला बांधून घेताना सगळ्यांनीच या दोऱ्या किती लांबीच्या आहेत हे तपासून पाहिलं आणि त्याच त्रिज्येच्या वर्तुळात राहायला शिकलं तर काय बरं होईल? म्हणजे बंधनाआधी तपासणी करण्याची सोय, सवय व शिक्षण हवं.
विषय काय आणि मी बोलतोय काय? हर हर! पुरुषमुक्तीसारख्या गंभीर विषयावर मी सर्वसामान्य व्यक्तीच्या मुक्तीविषयी बोलतोय. कुठे फेडू मी हे पाप.
28 Sep 2010 - 11:14 am | नगरीनिरंजन
>>पण याचा अर्थ त्या संस्था मोडून तोडून फेकून दिल्या पाहिजेत असा नाही. फक्त अधून मधून त्यांना दुर्लक्षाची एक सणसणीत शिवी हासडली तर बऱ्याच गोष्टी सुकर होतील या मताचा मी आहे.
मी सहमत आहे. त्या संस्था तोडल्या पाहिजेत असं तुमचं मत आहे असं मला म्हणायचं नव्हतं. पण त्या संस्था माजल्या आहेत हे नक्कीच. त्यातही केवळ समाजरीत म्हणून त्रास सहन करुन लग्न करणे, कुटुंब तयार करणे वगैरे गोष्टी कराव्या लागल्या तर लोक शिव्या हासडून दुर्लक्ष करायला लागतील यात शंका नाही असंच मलाही वाटतं. किंबहुना माझ्या पाहण्यातल्या काही मुलांना अवास्तव अपेक्षांमुळे (त्यांच्या आणि त्यांनी पाहिलेल्या मुलींच्याही) आणि घरच्या जबाबदार्या अंगावर असल्यामुळे लग्न जमण्यातच अडचणी आलेल्या दिसतात. त्यामुळे नाईलाजाने त्याना लग्नसंस्थेला शिव्या द्याव्याच लागत आहेत.
आजपर्यंत जे वाचलंय आणि ऐकलंय त्यावरुन स्त्रियाना मुलाबाळांची आणि संसाराची पुरुषांपेक्षा जास्त हौस असते असा माझा समज आहे. ती हौस पूर्ण करण्यासाठी पूर्वीच्या स्त्रिया बर्याच गोष्टी सहन करायच्या आता मात्र तसं दिसत नाही म्हणून या संस्था मोडकळीला येणं स्वाभाविक आहे.
>>स्वतःला बांधून घेताना सगळ्यांनीच या दोऱ्या किती लांबीच्या आहेत हे तपासून पाहिलं आणि त्याच त्रिज्येच्या वर्तुळात राहायला शिकलं तर काय बरं होईल? म्हणजे बंधनाआधी तपासणी करण्याची सोय, सवय व शिक्षण हवं.
हे ही अतिशय योग्य. हे शिक्षण काही पुस्तकातून किंवा शाळेत मिळत नाही. लोक आपोआप आलेल्या अनुभवांतून आणि परिस्थितीतून शिकतीलच.
थोडक्यात काय, हे सगळे प्रकार म्हणजे आपल्या 'प्रिय' 'भारतीय कौटुंबिक संस्कृती'च्या बदलाची नांदीच आहे.
28 Sep 2010 - 12:52 pm | Nile
ही जर फक्त बांधायची दोरीच आहे हे कळल्यावर दोरी तरी कशाला हवी? हरवलो तर बेहत्तर पण माहित असुन जखडुन घेण्यापेक्षा पारतंत्र्य काय वेगळे?
28 Sep 2010 - 5:52 pm | स्वैर परी
आतिशय योग्य असे लिहिले आहेत आपण!
29 Sep 2010 - 9:26 am | युयुत्सु
गुरुजींचे हे वाक्य अतिशय आवडले.
28 Sep 2010 - 10:02 am | खडूस
आताच सकाळला बातमी वाचली आणि लगेच युयुत्सुरावांचा विचार मनात आला.
आणि त्यांनी नेहमीप्रमाणे अजिबात निराश केले नाही :)
जरा popcorn घेऊन यायला वेळ लागला तो युयुत्सुरावांचा लेख हजरच ;)
असो झाडावर चढावे आता
28 Sep 2010 - 10:09 am | पैसा
जागा राखीव ठेवल्ये
28 Sep 2010 - 5:18 pm | अनिल २७
खिडकीतून रुमाल टाकला होता काय शीटवर?
28 Sep 2010 - 5:22 pm | गांधीवादी
नाय IRCTC मधून बूकिन्ग मारले.
28 Sep 2010 - 5:25 pm | पैसा
तुम्ही दोघे मात्र खिडकीतून आत घुसताय!
28 Sep 2010 - 5:33 pm | अनिल २७
आमची माघार.. ही शीट तुमचीच, ओके..
28 Sep 2010 - 5:34 pm | गांधीवादी
आमचे आत घुसायचे दिवस गेले,
आहाहा काय दिवस होते ते, काय मज्जा यायची आत घुसायला.
गर्दीतून लोकल मध्ये.
28 Sep 2010 - 10:11 am | सविता
आर्रर्रर्रर्रर्रर्रर्र...
सकाळी पेपर मध्ये ही बातमी वाचली, तेव्हा पहिला विचार मनात हाच आला की "मिपावर युयुत्सूंचा अजून एक धागा येणार्"
मग मी ठरवलं...नाही...आपणच सकाळी सकाळी त्यांच्या आधी धागा काढू..."युयुत्सू या बातमीवर धागा काढतील का?"...पण पाहाते ते काय.... हे धागा काढून केव्हाच मोकळे.....
स्त्री पुरूषावर अत्याचार करणार| युयुत्सु त्यावर धागा काढणार|
लोक टक्केवारीवर वाद घालणार| गंमत येणार निश्चित|||
28 Sep 2010 - 10:13 am | पैसा
अग, सकाळी तुला कुठला वेळ मिळणार होता?
28 Sep 2010 - 10:19 am | सविता
हापिसात आल्यावर पहिले मिपा उघडले जाते.... निदान पहिली दहा मिनिटे तरी....घरी जाताना परत एकदा....
म्हटलं साडेनवाच्या आधी धागा काढू... कसलं काय... माझा ५० पतिसाद मिळू शकणारा धागा टाकण्याआधीच चोरला गेला!!!
28 Sep 2010 - 10:26 am | शिल्पा ब
चोरीला गेला? अहो तुम्हीच चोरी करणार होता...या विषयावर फक्त आणि फक्त युयुत्सु यांचाच हक्क आहे...उगाच तुम्ही असा भोचकपणा करून धागा काढला असता तर त्यांना परत स्त्रीने पुरुषाच्या विषयावर डल्ला मारला असा धागा काढावा लागला असता.
28 Sep 2010 - 10:59 am | स्पंदना
कीव येते मला या युयुस्तुंची.
इतके टोकाचे स्त्री द्वेष्टे असुनही एका मायच्याच पोटी निदान नऊ महिने तरी वाढाव लागल यांना.
वर आणि स्त्री ला माता मानणार्या भारतात यांचा जन्म!
हाय रे देवा!!
देव कृपा करो अन यांना बहिण, वहिनी अश्या स्त्रीयांबरोबरच्या नात्यातुन यांची सुटका होवो.
बाकि चालुद्या युयुस्तु!!
28 Sep 2010 - 1:48 pm | सविता
युयुस्तुं नाही हो... युयुत्सु!!!
28 Sep 2010 - 9:25 pm | मृत्युन्जय
देव कृपा करो अन यांना बहिण, वहिनी अश्या स्त्रीयांबरोबरच्या नात्यातुन यांची सुटका होवो
बोलताना जरा तारतम्य बाळगुन बोलावे असे नाही का वाटले तुम्हाला?
धाग्याचा विषय आणि तुमची प्रतिक्रिया यांमध्ये "बहिण" या नात्याचा उल्लेखच का व्हावा? मला तर वहिनी या नात्याचा उल्लेखही नाही पटला. आणि सुटका होवो हा शब्दप्रयोग तर महान होता.
त्याहुनही महत्वाचा मुद्दा म्हणजे सातत्याने स्त्रियांवर होणार्या अत्याचारांवर लिहिणार्या कुठल्याही लेखकाला तुम्ही असा प्रतिसाद देणार नाही. मग युयुत्सुवरच का राग? आणि तो सुद्धा असा?
28 Sep 2010 - 11:17 am | परिकथेतील राजकुमार
साला हे असे जाचामुळे आत्महत्या केलेले नवरे आपल्या आणि लोकांच्या पण बायकोच्या स्वप्नात का जात नाहीत पितॄपक्षाचा मुहुर्त साधुन ?
28 Sep 2010 - 11:35 am | कवितानागेश
मुळात २९ वर्षांच्या घोड्यानी १९ वर्षाच्या मुलीशी कशाला लग्न करायचे?
'जनरेशन गॅप' पडते हो!
भांडण होणार नाहीतर काय?
10 Jul 2019 - 10:02 pm | जॉनविक्क
जनरेशन गॅपमुळे किती पालकांनी आत्महत्या केल्यात ? मग ?
28 Sep 2010 - 12:00 pm | नावातकायआहे
>>मुळात एखाद्या व्यक्तीने काय करावं हे ती व्यक्ती सोडून इतर बरेच लोक ठरवायला लागले की प्रॉब्लेम निर्माण होणारच
स्वानुभवामुळे मनापासून पटले.
:-)
28 Sep 2010 - 12:46 pm | मनीषा
बातमीच्या केवळ बाह्यस्वरुपावरुन निष्कर्ष काढणे चुकीचे वाटते ...
कावळा (पितृ पक्षातला नाही, नेहमीचाच) बसायला आणि फांदी मोडायला एक गाठ पडली म्हणून कावळ्याच्या वजनाने फांदी मोडली असे समजायचे कारण नाही ...
फक्त ३ महिन्या पूर्वी लग्न झाले, आणि मुलीचे वय १९ वर्षे ..
तिने असा काय छळ केला असेल कि नवर्याने आत्महत्या केली ? त्या आधी त्याची आर्थिक, सामाजिक, मानसिक आणि कौटुंबिक स्थिती काय होती ? हे पण तपासायला हवे ..
केवळ मरताना त्याने चिठ्ठीत तिचे नाव लिहिले म्हणून ती दोषी ठरत नाही..
एखाद्या व्यक्तीवर कोणीतरी आरोप केला, हा ती व्यक्ती दोषी असण्याचा पुरावा होउ शकत नाही .. काही वेळा वैयक्तिक आकसामुळे सुध्धा आरोप केले जातात .
( अर्थात नवर्याला छ्ळणार्या बायका नसतातच असे नाही .. कदाचित माझा नवरा सुद्धा असच म्हणत असेल )
28 Sep 2010 - 12:55 pm | गांधीवादी
बायकोने आता न्यायालय अर्ज दाखल करावा,
(५ - १० वर्षांनी) तिथे हरल्यास उच्च न्यायालय अर्ज दाखल करावा, (१० - १५ वर्षांनी) तिथे हरल्यास सर्वोच्च न्यायालयात अर्ज करावा, तिथे(२०-२५ वर्षांनी) फाशी झाल्यास.राष्ट्रपतींकडे दयेसाठी अर्ज करावा,
आता तिचे वय १९ आहे, तिचे वय ८९ होईस्पर्यंत तिचा एक केस सुद्धा वाकडा होणार नाही. फुल्ल ग्यारंटी आहे. भारताच्या महान कायद्याची, त्यामुळे चिंता नाही.
28 Sep 2010 - 12:58 pm | गांधीवादी
स्वारी, स्वारी,
ती मुलगी/बाई गरीब आहे , त्यात परत ती हिंदू असल्याने तिला वरील सुविधा उपलब्ध नाही.
गुन्हा सिद्ध झाल्यास आयुष्यभर तुरुंगात खितपत पडावे, हाच एक पर्याय तिला आहे.
28 Sep 2010 - 1:47 pm | सविता
सहमत.....
28 Sep 2010 - 9:32 pm | मृत्युन्जय
फक्त ३ महिन्यानंतर बायकोने आत्महत्या केली असती तर तुम्ही अश्या प्रकारचा प्रश्न विचारला असतात का?
29 Sep 2010 - 10:36 am | मनीषा
बहुतेक नाहीच ...
28 Sep 2010 - 3:42 pm | मन१
ह्यातला "पुरुष" हा शब्द काढला आणि हेडिंग समजा असं केलं :-
"छळ आणि आत्महत्या : ताजी बातमी"
तर सर्व प्रथम कुठलं चित्र डोळ्यासमोर येतं? ढोबळमानानं कुठल्या केसेस जास्त आहेत? victim कोण होताहेत?
"नवविवाहित xxxxxxxxची आत्महत्या : ताजी बातमी"
असं शीर्षक असलं तर आपल्यापैकी बहुतांश जण xxxxxxxx च्या जागी कुठला शब्द टाकतील?
सातत्यानी कोणता शब्द दिस्तो?
आपलाच henpecked
मनोबा.
28 Sep 2010 - 5:17 pm | गांधीवादी
**** तून अतिरेकी हमाला : ताजी बातमी
ह्यातला "****" हा शब्द काढला आणि हेडिंग समजा असं केलं :-
"अतिरेकी हमाला : ताजी बातमी"
तर सर्व प्रथम कुठलं चित्र डोळ्यासमोर येतं? ढोबळमानानं कुठल्या केसेस जास्त आहेत? victim कोण होताहेत?
"**** तून अतिरेकी हमाला : ताजी बातमी"
असं शीर्षक असलं तर आपल्यापैकी बहुतांश जण xxxxxxxx च्या जागी कुठला शब्द टाकतील?
सातत्यानी कोणता शब्द दिस्तो?
आपलाच हेन्पेकेद
अगदी खरे बोललात मनोबा भाऊ, जे सर्वप्रथम मनात येते तेच खरे,
28 Sep 2010 - 4:36 pm | प्रसन्न केसकर
ही चिंताजनक बाब नक्कीच असावी, मग तो कुणाकडुन का होईना!
आत्महत्या करणे भेकडपणाचेच लक्षण पण पत्नी अथवा पत्नीशी संबंधित लोकांच्या छ्ळाला कंटाळुन आत्महत्या करणे हा नविन ट्रेंड येत असावा अशी शंका नक्कीच येते. गेल्या काही महिन्यात फक्त पुणे शहरातच अश्या किमान बारा ते पंधरा घटना घडल्याचे मला माहिती आहे. यातील बव्हंशी घटनांमधे आत्महत्येचे नक्की कारण समजणे, त्यानंतरची कायदेशीर कारवाई सुरु होणे यासाठी मधे अनेक दिवस जावे लागलेले होते. महिलांच्या मृत्युंच्याबाबत असे होत नाही कारण याबाबत कायदे अधिक स्पष्ट आहेत.
महिला संरक्षणाच्या कायद्यांचा अनेक प्रकरणात गैरवापर होतो हे खरेच आहे. परंतु तसा तो अन्य अनेक कायद्यांचाही होतो. शेवटी बळी तो कानपीळी हेच खरे.
28 Sep 2010 - 4:54 pm | प्रकाश घाटपांडे
सहमत आहे. वेगवेगळ्या बाजू सामाजिक नोंदींद्वारे पुढे आल्यावर त्यात सुधारणा / बदल होणे ही आवश्यक असते.
28 Sep 2010 - 5:09 pm | प्रसन्न केसकर
महिला वगैरे वर्गांच्या संरक्षणाकरता जे कायदे बनतात त्यांच्या गैरवापराबाबत फक्त उदासीनता नसते तर बहुतेकदा अश्या प्रकारांना समर्थनही मिळते. दलित संरक्षण कायद्याचा जर गैरवापर झाला (होतो हे ही खरेच!) तर कदाचीत ज्याच्यावर आरोप होतो त्याची बाजु समजावुन घेतली तरी जाते. महिला संरक्षण कायद्याबाबत तशी परिस्थिती नसते. या कायद्यांच्या दुरुपयोगाबद्दल बोलणे पॉलिटिकली इन्करेक्ट ठरत असल्याने अश्या प्रकरणात पीडीताला न्याय मिळण्याची शक्यता तशी कमीच असते. अन सामाजिक परिस्थितीचा देखील याबाबत मोठा रेटा असतो.
४९८ अ कलमाचा गैरवापर हाच बहुतेकदा समोर येणारा मुद्दा असतो. ३७६ (बलात्कार), ३५४ (विनयभंग) अश्या कलमांचाही गैरवापर होत आहे अन अश्या प्रकरणात तर पीडीतांची परिस्थिती अजुनच बिकट होते. हे कायदे गरजेचे आहेत याबाबत शंका नाहीच पण त्यांच्या गैरवापराबाबत समाज अन समाजाला दिशा देणारे लोक मुग गिळुन गप्प बसतात हे अजुनच धोकादायक आहे.
अर्थातच माझा या कायद्यांना विरोध नाही परंतु त्यांचा गैरवापर वाढत जाऊ नये यासाठी वैधानिक, न्यायिक व सामाजिक यंत्रणा तयार होणे आत्यंतिक गरजेचे आहे. तशी ती होईल असे चित्र आत्ता तरी दिसत नाही. उलटपक्षी कायद्याच्या संपुर्ण बाजुने व कायद्याच्या संपुर्ण विरोधात असे तट पडत आहेत.
28 Sep 2010 - 5:05 pm | नितिन थत्ते
इन्डियन पीनल कोड मध्ये ४९८ अ हे कलम घातले गेले त्या सुमारास स्त्रीमुक्ती चळवळीतील एका कार्यकर्तीचे (बहुधा Flavia Agnes) पुस्तक वाचनात आले होते.
त्या कार्यकर्तीने अशाप्रकारे कायदे करण्यास विरोध दर्शवला होता. अशा कायद्यांमुळे मूळ प्रश्न सुटायला फारच थोडी मदत होते पण पोलिसांना लोकांना हॅरॅस करायला अजून एक अस्त्र मिळते असे काहीसे तिचे आर्ग्युमेंट होते.
परंतु वरील बातमीत त्या कायद्याविषयी काहीच नाही.
29 Sep 2010 - 9:33 am | कवितानागेश
ज्या स्त्रीमध्ये छळण्याचे पोटेन्शियल असते, ती कुणालाच सोडत नाही!
आई, वडील, भावंडे, नवरा, मुले, मैत्रिणी,...कुणीच वाचू शकत नाही, अशा कडकलक्ष्म्यांच्या तडाख्यातून!
आपल्या सगळ्यांच्याच बघण्यात असे एकतरी पात्र असेलच.
तिथे बायको नवर्याला छळते, असा अर्थ घेणे योग्य नाही.
पण एखादा पुरुष बाकीच्या नात्यांमध्ये मृदू असतो, पण नवरा म्हाणून 'कठीण' असतो, असे बरेचदा आढळते,......
कदाचित त्यामूळेच स्त्रियांसाठी कायद्याची गरज निर्माण झाली असावी.
पण असा गरीब बिच्चार्या पुरुषांचा छळ होतो, त्यावेळेस, त्या दुष्ट कुठल्या स्त्रीची इतर वागणूक तपासली जाते का याबद्दल मलासुद्धा शंकाच आहे.
ईथे कुणी पोलिसात/ फॅमिली कोर्टात आहे का?
ते सांगू शकतील..
29 Sep 2010 - 10:41 am | मनीषा
ज्या व्यक्तीमधे (पुरुष/ स्त्री) छळण्याचे पोटेन्शियल असते, ती कुणालाच सोडत नाही!
आई, वडील, भावंडे, नवरा, मुले, मैत्रिणी,...कुणीच वाचू शकत नाही, अशा कडकलक्ष्म्यां आणि दुर्वासांच्या तडाख्यातून!
आपल्या सगळ्यांच्याच बघण्यात असे एकतरी पात्र असेलच.
हो आहेत खरी अशी काही पात्रे माझ्या बघण्यात .....
29 Sep 2010 - 4:22 pm | प्रसन्न केसकर
पोलिस, न्यायालयांचे काम वीस वर्षे पाहिलेय अन कायद्यांची अंमलबजावणीदेखील पाहिलीये.
ज्या स्त्रीमध्ये छळण्याचे पोटेन्शियल असते, ती कुणालाच सोडत नाही!
आई, वडील, भावंडे, नवरा, मुले, मैत्रिणी,...कुणीच वाचू शकत नाही, अशा कडकलक्ष्म्यांच्या तडाख्यातून!
आपल्या सगळ्यांच्याच बघण्यात असे एकतरी पात्र असेलच.
तिथे बायको नवर्याला छळते, असा अर्थ घेणे योग्य नाही.
अगदी खरे आहे हे म्हणणे. पण तसा अर्थ घेतला जातो अनेकदा अन असा अर्थ काढताना बर्याचदा स्त्रीला झुकते माप मिळते हे ही तेव्हढेच खरे.
पण एखादा पुरुष बाकीच्या नात्यांमध्ये मृदू असतो, पण नवरा म्हाणून 'कठीण' असतो, असे बरेचदा आढळते,......
कदाचित त्यामूळेच स्त्रियांसाठी कायद्याची गरज निर्माण झाली असावी.
कायद्याची गरज प्रचलित सामाजिक परिस्थितीमुळे उत्पन्न होते, एखाद्या उदाहरणाने नाही. स्त्रियांसाठीच्या कायद्यांची गरज अशीच होती आणि अजुनही आहे. परंतु दुर्दैवाने त्या कायद्यांचा गैरवापर होतो हे देखील सत्य आहे. याचा अर्थ असा नाही की स्त्रियांवरील अत्याचार थांबलेले आहेत. परंतु खर्या अत्याचारांच्या प्रकरणांमधे अनेकदा पीडीता कायद्याची मदत घेण्याएव्हढी देखील सक्षम नसते. याउलट अश्या कायद्यांचा व बदललेल्या सामाजिकतेचा फायदा घेण्यासाठी कांगावा केल्याची अनेक उदाहरणे मी स्वतः पाहिलेली आहेत. यापैकी बहुतेक प्रकरणांमधे आरोपीच खरे पीडीत होते आणि कथीत पीडीतेचे, तपास यंत्रणेचे अत्याचार सहन करुन ते गप्पही बसत होते. परंतु गेल्या काही महिन्यांत पुरुष आत्महत्येच्या घटना घडल्या त्यांचे गांभीर्य कोणत्याही कारणाने कमी होते नाही.
गरीब बिच्चार्या पुरुषांचा छळ होतो, त्यावेळेस, त्या दुष्ट कुठल्या स्त्रीची इतर वागणूक तपासली जाते का याबद्दल मलासुद्धा शंकाच आहे.
बहुतेकदा अश्या प्रकारे कुठल्याच प्रकरणात तपास होत नाही. माझ्या माहितीतील अनेक प्रकरणांमधे स्त्रीयांनी पुरुषांविरुद्ध छळाची तक्रार केली होती. तक्रारीला सबळता यावी यासाठी अनेक प्रकारचे आरोप केले होते. तपास सुरु असताना त्या स्त्रीनेदेखील नवर्याचा छळ केल्याचे दिसत होते. (सर्वात अधिक प्रमाण डिनायल ऑफ काँजुगल राईटसचे होते). वस्तुता अश्या प्रकरणांमधे समोपदेशन अथवा त्यातुन प्रश्न सुटणार नसेल तर सेपरेशन/ डिव्होर्स अश्या प्रकारची कारवाई अपेक्षित होती. परंतु अश्या प्रकरणांमधे बर्याचदा संबंधित पुरुषाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होतो आणि त्याची बाजु कधीच समोर येत नाही.
29 Sep 2010 - 9:41 am | गांधीवादी
कायदे कायदे कायदे, हे सगळे सर्वसामान्यांसाठीच असतात. वरच्या लोकांना असतात त्यातील पळवाटा. आणि काही माननीय व्यक्तीना (आर्थर जेलमध्ये.), काही चित्रपट निर्मात्यांना आणि ते चित्रपट बघणार्यांना असते कायद्याचे भक्कम संरक्षण.
29 Sep 2010 - 11:24 am | विजुभाऊ
वरील बातमीतून नवरा आनि बायको या दोन शब्दांऐवजी केवळ व्यक्ती हे शब्द वापरले तर बातमीची व्हॅल्यूच संपते
29 Sep 2010 - 12:08 pm | गांधीवादी
बायको ऐवजी सरकार आणि नवरा ऐवजी शेतकरी हे शब्द वापरले तर एकदम जुनाट, नेहमी ऐकू येणारी, दुर्लक्षित, काय तेच तेच रोज अशी कटकटी, बातमी वाटते.
10 Jul 2019 - 2:34 pm | हस्तर
var aanat aahe dhaaga
11 Jul 2019 - 2:06 pm | Rajesh188
भारताचा कायदा असा असावा जो जातीच्या नावावर,धर्माच्या नावावर ,लिंग chya नावावर भेदभाव करणार नाही .
समतोल असेल कोणालाच झुकते माप नको ..
एक देश एक शिक्षा
मग स्त्री असू नाही तर पुरुष
दलीत असू नाही तर सवर्ण.
हिंदू असू नाही तर मुस्लिम
तेव्हाच देशातील गुनेहगरी कमी होईल
भेदभाव करणारे कायदे गंभीर गुन्हे घडण्यास कारणीभूत असतात .
हे सत्य आहे
11 Jul 2019 - 2:19 pm | Rajesh188
गुन्हे करण्याची प्रवृत्ती काही स्त्री पुरुषात उपजतच असते मग ते लहानपणा पासूनच गुन्हे करत असतात.
सर्व प्रकारचे .
अशा स्त्री पुरुषानं मूळ समजा पासून वेगळे करणे गरजेचं आहे ..सामान्य लोक गुन्हा करत नाहीत केला तर भित भित करतात आणि हेच सामान्य लोकांना आरोपी बनवले जाते .
त्यात जातीचे कायदे,आणि स्त्रीवादी कायदेच वापरले जातात .
खरे गूनेहगरी प्रवृत्तीच्या लोकांना कोणताच कायदा रोखू शकत नाही पण जेवढे कायदे कडक तेवढे जास्त गंभीर गुन्हे ही मंडळी करतात