नीळा पक्षी

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
24 Sep 2010 - 12:01 am

साठीला आली होती ती. क्षणांची वाळू झरझर झपाट्यानी काळाच्या चाळणीतून गळून जात होती. आताशा रोज तिची कंबर दुखत असे, हाडं कुरकुरत, पायात गोळे येत असत
पण अजूनही नीळा मखमली पक्षी दिसायचं नाव नव्हतं. परंतु त्या पक्षाची आस, त्याचं तिच्या मनावरचं गारुड तसूभरही कमी झालं नव्हतं. लहानपणी नीळ्या मखमली पक्षाला भेटण्याचं जितकं वेड होतं त्याहीपेक्षा जास्त वेड आता तिला लागलं होतं. या पक्षाचं गुपीत नक्की केव्हा तिने ऐकलं तिलाही सांगता येणार नाही कारण ते तसं कोणी सांगीतलच नव्हतं तिला. ते तिला मनोमन आकळलं होतं. तिला जोपर्यंत आठवत होतं तोपर्यंत तिला त्याला भेटण्याच्या ध्यासानी झापटलेलं होतं हेच आठवतं होतं. लहानपणी वाटलं तरुणपणी भेटेल, तरुणपणी वाटलं आता भेटेल - मग भेटेल असं करता करता आता बरच वय झालं होतं. ती मात्र त्याच निष्ठेने वाट पहात होती.
आतापर्यंतच्या आयुष्यात तिने बरच काही पचवलं होतं. भलेबुरे अनुभव घेतले होते. खूप चांगल्या लोकांनाही ती भेटली होती. त्यातलीच एक जी प्रत्यक्ष नीळ्या मखमली पक्षाला भेटून आलेली. तिला हिनी विचारलं होतं "कसा असतो तो पक्षी दिसायला?" आणि उत्तर मिळालं होतं -
"खूप, अतिशय, अतोनात सुंदर, अद्भुत!
त्याची नीळाई पहाताना असं वाटतं शरीराला हजारो डोळे फुटावे आणि त्याचं लावण्य उपभोगावं
त्याचं मान वेळावणं, पिसांत चोच खुपसणं, परत लाडीक कटाक्ष टाकणं, अंग फुलवणं सारं मनात साठवून घेण्यास एक जन्म अपुरा पडतो.
त्याची आर्त शीळ मनात अनामिक हळव्या आठवणींच्या लाटा घेऊन येते ज्या की शब्दांत व्यक्त करता येत नाही.
फार अल्प काळ तो दर्शन देतो मात्र त्याच्या अस्तित्वाचे मोहक पडसाद कायमचे हृदयात उमटवून जातो."
मग हिनी विचारलं "कशावरून तो तोच पक्षी आहे हे ओळखायचं?"
उत्तर मिळालं " त्याच्या अस्तित्वाइतकेच, त्याच्या दर्शनाचे पडसाद त्याची ओळख आहेत. तो उडून गेल्यानंतर प्रत्येक दिवशी तुमचं हृदय त्याच्या स्मृतीकिरणांनी जणू कोमल कमळ बनून हळूहळू उमलतं. तुमच्या आत्म्याला त्याचा मंजूळ कलरव वेढून रहातो आणि आत्मा अधिक प्रकाशमान होतो. मनात येणारी अनाठायी विचारवादळं स्तब्ध होऊ लागतात. शीतल शांती मिळू लागते."
तिला नीटसं कळलं नाही नक्की काय आणि का होतं ते पण तिची उत्कंठा अधिकच वाढली. आणि जरी पाय दुखत असले, हाडे कुरकुरत असली , सांधे मी मी म्हणत असले तरी ती परत वाट पाहू लागली, त्याच तन्मयतेनी. तिला एक दिवस तो पक्षी नक्की भेटणार होता.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

24 Sep 2010 - 2:04 am | अर्धवटराव

तो नीळा पक्षी तसा आहे खरा. अगदी तिच्या मैत्रीणीने वर्णान केल्या सारखा. किंबहुना त्याहिपेक्षा सुंदर आणि अद्भुत. कित्येकांनी त्याचे वर्णन करायचा प्रयत्न केला.. पण शेवटी "नेति नेति"म्हणुन सर्व थकले आणि तो नेहमीच दशांगुळे पुरुन उरला. तो भेटेल वा नाहि भेटणार इतक्यात. तसा तो निर्मोही आहे. पण इतकं आतुरतेने कोणि वाट बघत असेल तर त्याला योग्य वेळी यावच लागतं. कारण त्यालाही मन आहे... आणि त्या मनात वाट बघणार्‍याप्रती तिच ओढ आहे जी या विरहणिच्या मनात आहे.

अर्धवटराव

पाषाणभेद's picture

24 Sep 2010 - 5:37 am | पाषाणभेद

प्रत्यक्ष त्या पक्षाला भेटणारी कोण होती? काहिसे गुढ कथानक आहे.

निवेदिता-ताई's picture

24 Sep 2010 - 7:35 am | निवेदिता-ताई

मस्त...

मितभाषी's picture

24 Sep 2010 - 10:23 am | मितभाषी

सांजशकुनाची आठवण झाली.

शुचितै बेष्ट.

स्पा's picture

24 Sep 2010 - 1:31 pm | स्पा

काही नीटसं समजल नाही.....

तिला " खंड्या" म्हणजेच "किंगफिशर" ला भेटायचं होता का????

परिकथेतील राजकुमार's picture

24 Sep 2010 - 1:35 pm | परिकथेतील राजकुमार

हिह !!

मला वाटले रामदास आठवल्यांवर काहीतरी लिहिले आहे.

स्पा's picture

25 Sep 2010 - 6:24 am | स्पा

मला वाटले रामदास आठवल्यांवर काहीतरी लिहिले आहे.

जबराट...............

अथांग नभ.. आणि त्या नभामधील निळ अस्तित्व ... हातातल्या कणन कण मातीमध्ये ही त्याचे ते रुप सापडत कधी .. कधी .. त्याचा वेध ही मनाची भक्तीमय स्तीथी असते ..
आतुरतेने पहाणार्या डोळ्यात ही कधी कधी त्याचे ते रुप तरळत असेल्च कधी तरी असे वाटते..

भेटतो ... तो नीळा पक्षी नक्की भेटतो.
कधी अथांग सागराच्या लाटांवर डोलत असतांना तर कधी उंचच उंच डोंगरावरुन बेभान होऊन कोसळतांना
कधी तप्त रेतीत आपला ठसा उमटवत कधी मानेपर्यंत खचलेल्या दलदलीत
कधी अवचित भेटतो तो कान ठणाणुन टाकणार्‍या गर्दीत तर कधी शांत निवांत एखाद्या गुहेत

भेटतो... तेव्हा अवघं जीवन सुरेल होऊन जातं आणि तृप्त होतं !!

मुक्तसुनीत's picture

24 Sep 2010 - 5:17 pm | मुक्तसुनीत

करंदीकरांच्या "काही केल्या काही केल्या निळा पक्षी जात नाही" ची आठवण आली.

हर्षद आनंदी's picture

24 Sep 2010 - 6:24 pm | हर्षद आनंदी

नेहमी प्रमाणेच हृदयाला हात घालणारे लेखन!!

हा निळा पक्षी जवळच असतो, भेटण्याची वेळ झाली तो आपसुक भेटतो. भेटण्याची ओढ मात्र आतुन आली पाहिजे. आईची आठवण आली की लहान मुल कळवळुन रडतं तशी आस लागली, की तो निळा पक्षी धावत येतो, हात पसरुन कवेत घेतो. मग सारं कसं शांत होतं.

अर्धवटराव's picture

25 Sep 2010 - 2:20 am | अर्धवटराव

तुमच्या दोनच ओळीत सारं काहि आलं

(वाट बघणारा) अर्धवटराव

पैसा's picture

24 Sep 2010 - 8:06 pm | पैसा

त्या निळ्याच्या मागे धावायचं नाही. तो आणखी दूर उडून जातो....
पण डोळे मिटून शांत बस आणि मनाचे डोळे उघड......
तुझ्या तळव्यात येऊन बसलेला सापडेल अलगद..........

विलासराव's picture

25 Sep 2010 - 1:07 am | विलासराव

त्या निळ्या पक्षाला भेटायचय.
अर्धवटराव, गणेशा, अवलिया, हर्षद आनंदी आनी पैसा यांचे प्रतिसाद मनाला भावले.