इंटरनेट ट्रेडींग

अन्या दातार's picture
अन्या दातार in काथ्याकूट
11 Apr 2008 - 3:57 pm
गाभा: 

सध्या इंटरनेट वर अशा अनेक साईट्स आहेत ज्यांच्यावर अनेक वस्तु विक्रीस ठेवलेल्या असतात. (उदा. रेडिफ, ईबे वगैरे). यासंबंधी मला पडलेले काही प्रश्न खाली लिहिले आहेत. त्यांची उत्तरे मला येथे मिळतील अशी आशा वाटते.

१] जर क्रेडीट कार्ड नसेल तर वस्तु विकत घेता येतात का? डेबीट कार्ड चालते का?
२] वस्तुच्या गॅरंटीबद्दल काय खात्री?
३] वस्तु घरी पोहोचेपर्यंत जर काही इजा झाली तर जबाबदार कोण? कंपनी रिप्लेसमेंट देते का?

प्रतिक्रिया

क्रेडीट कार्डाव्यतिरिक्त थेट बँकेच्या खात्यातून पैसे देता येतात

रेडिफ आणि ई-बे चा माझा अनुभव चांगला आहे
पण ई-बे वरच्या उपलब्ध वस्तू नीट माहिती घेऊन विकत घ्याव्यात. त्यांच्या दर्जाबाबत खात्री करुन मगच विकत घ्यावे.
ई-बे वर दर्जेदार उत्पादने नसतात हा माझा अनुभव आहे.

बाकी सेवा प्रदान करण्यात दोन्ही चांगल्या आहेत.

एखादी तक्रार तुम्ही केलीत की ई-बे वा रेडिफ वाले थेट सेलरला पकडतात आणि ३०दिवसांच्या आत पैसे परत मिळवून देतात.
शक्यतो तशी वेळ येत नाही कारण त्याने सेलरचे रेप्युटेशन खराब होते. त्यामुळे सेलरच आपल्याशी संपर्क साधून आपली अडचण सोडवतो... एखादी वस्तू डिफेक्टीव्ह निघाली तर सेलर ती परत पाठवतो...

युरोप अमेरिकेत जशी चांगली व दर्जेदार उत्पादने मिळतात तशी भारतात अजून मिळत नाहीत असे खेदाने म्हणावे लागते.
म्हणजे तुम्ही व्ही-सीडी , पुस्तके घेतलीत तर त्यात दर्जाचा प्रश्नच येत नाही. जे ओरिजिनल आहे तेच मिळते.
पण गृहोपयोगी वस्तू घेतल्या जसे हेअरड्रायर, मोबाईल फोन्स, घड्याळे... इ... तर त्यांचा दर्जा चांगला नसतो.
नीट पाहून घेतली तर नक्की चांगल्या वस्तू मिळतात. पण जास्त चौकस बुद्धी दाखवावी लागते हे मात्र खरे.

(सध्या तरी फक्त शेअर ट्रेडींगप्रेमी) सागर

अन्या दातार's picture

13 Apr 2008 - 5:38 pm | अन्या दातार

हे सेलर स्थानिक असतात की बाहेरच्या मोठ्या शहरातील(उदा. पुणे, मुंबई) असतात?

बाकी सागर व निलकांत यांनी माझ्या अनेक शंकांचे निरसन केले आहे.

नीलकांत's picture

11 Apr 2008 - 11:13 pm | नीलकांत

रेडीफवर सीऑडी नावाचा पर्याय आहे. म्हणजे वस्तु घरी पोहोचल्यावर त्या व्यक्तीला पैसे द्यायचे. ITZ कार्डसुध्दा एक छान पर्याय आहे.

बाकी शंकाना सागरने छान उत्तर दिले आहे.

नीलकांत

नीलकांत's picture

13 Apr 2008 - 6:39 pm | नीलकांत

सेलर (विक्रेता) कुणीही असू शकतं. तो मुंबई पुण्याचाच असावा असं काही आवश्यक नाही. फार तर त्याचं नाव गुगलून माहिती काढा. मिळालं तर उत्तम.
तुम्ही सुध्दा तुमचं एखादं उत्पादन त्या संकेतस्थळाहून विकू शकता.

नीलकांत