बलिदान---- भाग २---जयनीत दिक्षित

जयनीत's picture
जयनीत in जनातलं, मनातलं
13 Aug 2010 - 8:22 pm

रायभान-बरोबर मामा,आता मी पुर्ण विचार करुनच आलोय आता जे काही व्हायच ते होइल्,पण मी भर्ती होणार म्हणजे होणारच.आइ च काय तीला वाइट वाटणारच पण त्याला मी काय करु शकतो?
माणिकराव्-हो रे ,समजतो मी,अगदी लहान होतो मी तेव्हा पासुन तुझ्या आइ नी अगदी सख्ख्या बहिणी पेक्षा जास्त माया॑ लावलिय्,त्याच कर्जच आहे म्हण ना एक प्रकारच,सान्ग तीला,तिच्या पोराच करायला त्याचा मामा समर्थ आहे म्हणुन्,अगदी बिनघोर रहा म्हणाव तिला.
आता हेच बघ तू आल्या मुळे मला पण एक प्रकारचा आधारच झाला की नाही?तू घरचा माणुस!असा कोणी असला की किती निश्चिन्त वाटत कस सान्गु?बघ नेटा॑न काम कर मामाच नाव काढ आइच नाव काढ,ह्या हप्त्यात आपले गडी तुम्हा लोकाना तलवारी चे हात भाला घोडेस्वारी सगळ शिकवतील चान्गल शिकुन घे सगळ्यानी म्हटल पाहिजे भाचा एकदम जोरदार आहे म्हणुन.
बघ मग मी तुला एक एक गोश्ट सोपवतोच हळुहळु.चान्गल्या मुहुर्तावर आलास तू, आता ह्या वेळेस स्वराज्या॑ करता लढायला जायचय,कन्टाळलो विजापूर दरबाराच्या राजकारणाला,आता एकच ठरवलय,आता ख-या मराठ्याच जीवन जगायच,जगायच ते आपल्या लोकान साठी अन मरायच ते आपल्या लोकान्साठी,खुप झाली परक्यान्ची गुलामी,ठीक आहे ये तू आता.
(रायभान मुजरा करतो अन जातो.)

नाट्य