पुस्तकविश्व

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
3 Aug 2010 - 7:28 pm

"अरे ते ना सी फडक्यांचं पुस्तक.. काय बरं नाव त्याचं!! छ्या आता नेमकं लक्षात येत नाहि आहे"

"हो रे परवा मला पण युगांतच्या लेखिका पटकन आठवेना. इतकं छान पुस्तक पण काहि केल्या नाव आठवेना"

"अरे नेमाड्यांची हि दोन पुस्तकं मी वाचली मस्तच लिहितात. बाकी त्यांनी कोणती पुस्तकं लिहिली आहेत त्याची यादी मिळते का रे कुठे"

"हे पुस्तक मस्त दिसतंय पण महाग आहे. घ्यावं की नाहि कोणी परिचय/परिक्षण लिहिलं असतं तर किती बरं झालं असतं"

"काय सांगतोस तुला नाहि आवडलं ते पुस्तक. मला तर फार आवडलं.. तु सांग काय नाहि आवडलं?"

अश्या प्रकारचे प्रश्न/चर्चा तुम्ही करता की नाहि? आणि बर्‍याचदा प्रश्न हे प्रश्नच रहातात. चर्चा दोघांतच आटोपते. मात्र माझ्यासारख्या "भेळेचा कागद"ही वाचणार्‍याला सतत नवी पुस्तके, कवितासंग्रह, कादंबर्‍या यांची ओळख हवी असते. एखादे पुस्तक कसे आहे? मला कसे वाटले? इतरांना कसे वाटले यावर चर्चा करायला खूप आवडते.

मात्र हल्लीच्या धावपळीत अशी चर्चा कमी होत चालली होती आणि नेमते तेव्हाच "पुस्तकविश्व" माझ्यासमोर उघडले.

इथे तुम्ही एखाद्या लेखकाची पुस्तकं, पुस्तकाचे लेखक, त्यांचे प्रकाशक, किंमत आदि गोष्टी चुटकीसरशी शोधु शकता. इतकंच काय तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाचा परिचय करून देऊ शकता. किंवा एखाद्या न आवडलेल्या पुस्तकाबद्दलही लिहु शकता. तुमचा आवडता लेखक, भाषांतरे इथे देऊ शकता. आणि बरंच काहि

पुस्तक आवडणार्‍या प्रत्येकाला आवडेल अश्या पुस्तकवाचनाला केंद्रस्थानी ठेऊन बनविलेले हे मराठीतील एकमेव संस्थळ असावे. मला हे स्थळ खूप आवडले तुम्हालाही त्याची ओळख करून द्यावी म्हणून हा प्रपंच. मग घेताय ना सदस्यत्त्व अणि सांगताय ना तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाबद्दल. पुस्तकविश्ववर भेटूच!!

मिपवर बरेच नवे सदस्यांना अनुमती मिळाली आहे त्यांना व त्या निमित्ताने ज्यांना माहित नव्हती त्या जुन्या सभासदांना ह्या संस्थळाची माहिती व्हावी हा उद्देश आहे. मिपाच्या धोरणात हे लिखाण बसेलसे वाटते

वाङ्मयमाहिती

प्रतिक्रिया

स्वाती दिनेश's picture

3 Aug 2010 - 7:38 pm | स्वाती दिनेश

पुस्तकविश्वाची ओळख छान!!
स्वाती

सुंदर ओळख ऋषिकेशा :)

आज थोडा वेळ मिळाला तेवढ्यात पुस्तकविश्व वर पर्व हे पुस्तक जोडले आहे व ओळखा पाहू हा वेचा ह्या सदरात १ लेखनही केले आहे.

सुंदर संकेतस्थळ आहे. आवडले.
कोणती पुस्तके आपल्या संग्रहात आहेत. कोणती पुस्तके आपण वाचलेली आहेत याची आपल्या स्वतःच्या खात्यावर एकत्रित माहिती मिळण्याची अशी सोय उपलब्ध करुन देणारे बहुदा मराठीतील हे पहिलेच संकेतस्थळ असावे.

मस्तच आहे पुस्तकविश्व :)

ऋषिकेश's picture

3 Aug 2010 - 8:16 pm | ऋषिकेश

हो! तोच वेचा कशातला असेल याचा अंदाज करत होतो.. :)
सागरचे कोडे इथे मिळेल.. कोणाला माहित असल्यास पुस्तकविश्ववर उत्तराची वाट पाहत आहे

सूर्यपुत्र's picture

3 Aug 2010 - 10:36 pm | सूर्यपुत्र

तुमच्या शोधातून कसलेच निष्पण्ण झाले नाही.
तुम्हाला किमान तीन अक्षरे असलेला शब्द लिहीने गरजेचे आहे.

अशा किरकोळ चुकाही आहेत.....

निखिल देशपांडे's picture

3 Aug 2010 - 10:44 pm | निखिल देशपांडे

आपल्या सुचना आपण इथे सुद्धा देउ शकता

आमोद शिंदे's picture

3 Aug 2010 - 11:14 pm | आमोद शिंदे

जे आवडेल असे वाटेल ते पुस्तक हातात घेउन कंटाळ न येईपर्यंत वाचणे आणि कंटाळा आला की ठेवून देणे हे धोरण मी बाळगतो.

ऋषिकेश's picture

3 Aug 2010 - 11:24 pm | ऋषिकेश

मग तुम्हाला कंटाळा न येता पूर्ण वाचलेल्या पुस्तकांबद्द्ल वाचायला आवडेल. तिथे त्या पुस्तकांबद्दल नक्की लिहा.. तिथे सगळ्या नव्या पुस्तकाबद्दल माहितीच्या शोधातच असतात :)

आनंदयात्री's picture

4 Aug 2010 - 12:41 am | आनंदयात्री

धन्यवाद ऋषिकेश.
तुझा आभारी आहे :)

आता पुन्हा विचारतेय.
"मिपावरची पुस्तकविश्वाची फीड केव्हा परत येणार आहे?"

ऋषिकेश's picture

4 Aug 2010 - 9:53 am | ऋषिकेश

सर्व प्रतिक्रीया दिलेल्यांचे आभार!