वा, वा. पण हा प्रकार कठीण असतो. आणि एकदा सुरू केला की पूर्ण कविता संपेपर्यंत चालू ठेवावा लागतो. मला सुरुवातीची ओळ वाचून पूर्ण गीतच प्रमाणीत असेल असे वाटले.
"तालबद्ध देत बोल, काव्यपूर्ण लेखनास,
लगे रहो अशोकराव, गोड बोलता तुम्ही."
असे कौतूक.
(खुद्द मी तालबद्ध काव्य करत नाही, पण इथे तुमच्या मात्रा मोजतो आहे! त्याचे असे आहे - मी फाटक्या विटक्या विजारी "फॅशनेबल" म्हणून घालतो, पण समोरच्या नटलेल्या सवाष्णीच्या नऊवारी निर्यांचा बोंगा झाला ते माझ्या नतद्रष्ट नजरेला दिसते. नऊवारी नेसणारीला, लोकांची नजर तिच्याकडे जाईल म्हणून, जास्त काळजी घ्यावी लागते, हा अन्याय आहे. पण असा अन्याय होतो जगात कधीकधी!)
समानी आणि प्रमाणी
आवडले
वा वा
आभार.