नाट्य महोत्सव २०१०

रंगकर्मी's picture
रंगकर्मी in काथ्याकूट
1 Jul 2010 - 8:24 am
गाभा: 

रंगकर्मी .कॉम करत असलेला आणखी एक उपक्रम
महोत्सवाबद्दल
६ महिन्यापुर्वी रंगकर्मी .कॉम सुरु झाली . सर्व रंगकर्मीना एक व्यासपीठ मिळावे असा त्यामगाचा हेतु होता . व तो पुर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले . रंगकर्मीला जगभरातुन वाचक मिळाले. त्यामुळे नाटकाला खर्‍या अर्थाने ग्लोबल करण्याचा प्रयत्न झाला . या काळात प्रथितयश कलाकारांच्या मुलाखती , साप्ताहिक साधना च्या दलपतसिंग येती गावा या विशेषांकाचे सह्प्रकाशन असे अनेक उपक्रम आम्ही राबवले . या सगळ्याला चांगला प्रतिसाद मिळाला . आणि त्याचेच पुढचे पाऊल म्हणुन हा नाट्य महोत्सव...

कोल्हापुर हे कलापुर ,फार पुर्वीपासुन येथे राजाश्रय आणि लोकाश्रय या जोरावर अनेक कला जोपासल्या गेल्या .त्यातलीच एक महत्वाची कला म्हणजे नाटक !! पण आजकाल या कलापुरीतच नाटकाचा लोकाश्रय कमी होत चालला आहे . रंगभुमी थंड पडत चालली आहे . कधी काळी कोल्हापुरातुन अनेक नाटकांची निर्मिती व्हायची ,आता मात्र ही संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतपत ही नसते , हे चित्र बदलण्यासाठी रंगकर्मी प्रयत्न करत आहे . आणि यासाठीच काही चांगली नाटके ,जी सहसा कोल्हापुरातील लोकाना पहायला मिलत नाहीत . त्यांचे प्रयोग कोल्हापुरात करायचे ठरवले . ज्यायोगे काही चांगले प्रयोग लोकाना पाहता येतील व स्थानिक रंगकर्मीना ही काही नवीन करायची स्फुर्ती मिळेल . व नक्की महाराष्ट्रभर सध्या काय चालु आहे याचा मागोवा घेता येईल. याशिवाय रंगकर्मींच्या महाराष्ट्र भर पसरलेल्या बेटाना एकत्र आणण्यासही मदत होईल .....

रंगकर्मीने कोणताही व्यावसायिक हेतु न ठेवता हा उपक्रम केलेला आहे . काही चांगले घडावे ही प्रामाणिक इच्छा फक्त पाठिशी आहे . ही तर फक्त सुरवात आहे..आता आपल्या सहकार्याची गरज आहे . आपण सार्‍यानी भरभरुन या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा ही विनंती व इच्छा आहे . यानिमित्ताने नाट्य चळवळ पुन्हा वाढीला लागेल व विविध उपक्रमांद्वारे कोल्हापुर पुन्हा कलापुर होण्याकडे वाटचाल करेल असा विश्वास वाटतो ..

या संदर्भात अधिक माहितीसाठी पहा ..
http://www.rangakarmi.com/natyamahotsav
तिकिटासांठी संपर्क-
विनायक -८०८७२१६८६७
केदार - ९४२२५२११०२
अनुज-९८२३८३७६६७

रंगकर्मीच्या सर्व उपक्रमाना मिसळपाव परिवाराने मनापासुन साथ दिली , या उपक्रमाला त्यांची अशीच साथ मिळावी ही नम्र विनंती
धन्यवाद
टीम रंगकर्मी
Pamplet A4" alt="" />

प्रतिक्रिया

क्रेमर's picture

1 Jul 2010 - 8:51 am | क्रेमर

रंगकर्मीच्या सर्व उपक्रमाना मिसळपाव परिवाराने मनापासुन साथ दिली

एका दगडात तीन पक्षी मारले आहेत.

'शाम मनोहर' त्यांचे नाव 'श्याम मनोहर' असे लिहितात.

विनायक पाचलग's picture

1 Jul 2010 - 8:26 am | विनायक पाचलग

या उपक्रमासाठी सकाळ व रेडिओ मिरची हे माध्यम प्रायोजक आहेत
मिपाची परवानगी असल्यास सकाळ मध्ये येणारी परिक्षणे व बातम्या एका लेखातुन आम्ही प्रकाशित करु . ज्यायोगे जे कोल्हापुरात नाहीत त्याना नाट्य महोत्सव कसा झाला ते समजेल
धन्यवाद

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

II विकास II's picture

1 Jul 2010 - 9:13 am | II विकास II

>>मिपाची परवानगी असल्यास सकाळ मध्ये येणारी परिक्षणे व बातम्या एका लेखातुन आम्ही प्रकाशित करु . ज्यायोगे जे कोल्हापुरात नाहीत त्याना नाट्य महोत्सव कसा झाला ते समजेल

चांगल्या गोष्टींना परवानगीची काय आवश्यकता?
मिपा व्यवस्थापक नाही म्हणणार नाहीत, तुम्ही लिही निर्धास्तपणे.

मुक्तसुनीत's picture

1 Jul 2010 - 9:15 am | मुक्तसुनीत

सहमत आहे. वृत्तांताचे स्वागत आहे.

सहज's picture

1 Jul 2010 - 8:34 am | सहज

व उपक्रमाला अनेकोत्तम शुभेच्छा!

मुक्तसुनीत's picture

1 Jul 2010 - 9:11 am | मुक्तसुनीत

प्रकल्पाकरता अनेक शुभेच्छा.
नाटकांचे ब्लर्ब्ज अतिशय छोट्या फाँटमधे आलेत त्यामुळे कुतुहल असूनही वाचता येत नाहीत. हिमांशु स्मार्त यांचा लेख गेल्यावेळच्या दिवाळीत वाचला तो आवडला होता. स्मार्त कोल्हापूरचेच दिसतात.

या निमित्ताने या रंगसंमेलनात चर्चिले गेलेले मुद्दे , नाटकांचे रिपोर्ट्स या सर्व गोष्टींबद्दल ऐकायला आवडेल.

II विकास II's picture

1 Jul 2010 - 11:34 am | II विकास II

नाटकांचे ब्लर्ब्ज अतिशय छोट्या फाँटमधे आलेत त्यामुळे कुतुहल असूनही वाचता येत नाहीत.
>> वाचण्यायोग्य कर ते मित्रा.

http://www.rangakarmi.com/natyamahotsav संकेतस्थळ बघितले. शुध्दलेखनाच्या भरपुर चुका आहेत. त्यामुळे भ्रमनिरास होतो आहे. एका ठिकाणी संगीतकाराच्या नावाच चुक आहे असे वाटते आहे.
'रस्त्यावरचं गाणं' आणि 'अमृत संजीवनी' बद्दल अधिक वाचण्यास उत्सुक.

मुक्तसुनीत's picture

1 Jul 2010 - 10:32 pm | मुक्तसुनीत

http://www.rangakarmi.com/natyamahotsav संकेतस्थळ बघितले. शुध्दलेखनाच्या भरपुर चुका आहेत. ....

.....एका ठिकाणी संगीतकाराच्या नावाच चुक आहे असे वाटते आहे.

असो ! असो ! ;-)

- अशुद्धलेखनामुळे "भ्रमनिरास" न झालेला कुणी एक.

अर्धवट's picture

1 Jul 2010 - 9:38 am | अर्धवट

शुभेच्छा..

काही वर्षापुर्वी सातार्‍यात करायचो नाट्यमहोत्सव.. काही लागलं तर हाक मारा...

विसोबा खेचर's picture

1 Jul 2010 - 11:42 am | विसोबा खेचर

हार्दिक शुभेच्छा..

योगी९००'s picture

1 Jul 2010 - 11:46 am | योगी९००

प्रकल्पाकरता मनःपासून अनेक शुभेच्छा...!!!

इतके टप्पेटोणपे आणि टिका सहन करत तुझी चालू असलेली धडपड पाहून कौतूक वाटले..

खादाडमाऊ

दिपक's picture

1 Jul 2010 - 12:35 pm | दिपक

नाट्यमहोत्सवास शुभेच्छा !

विसुनाना's picture

1 Jul 2010 - 12:43 pm | विसुनाना

विनायका, तुझ्या धडपडीला सलाम आणि सदिच्छा.
एकदम प्रोफेशनल काम सुरू आहे. शाबास!

जागु's picture

1 Jul 2010 - 3:16 pm | जागु

तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा.

जागु's picture

1 Jul 2010 - 3:17 pm | जागु

तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा.

शिंगाड्या's picture

1 Jul 2010 - 3:19 pm | शिंगाड्या

हार्दिक शुभेच्छा..

विनायक पाचलग's picture

1 Jul 2010 - 9:23 pm | विनायक पाचलग

मनापासुन धन्यवाद..
@ विकास : - चुका आहेत हे १०० % मान्य ...
रात्र थोडी आणि सोंगे फार असल्याने हे घडले ,माफी असावी ..
जाता जाता ,
दुपारी मिंळालेल्या माहितीनुसार
लेखक ,पत्रकार आणि संपादक संजय आवटे यांच्या कलात्म या महत्वकाक्षी प्रक्ल्पाचे प्रकाशन या महोत्सवात होत आहे.
कलात्म हा एक ५०० पानी अंक असुन त्यात कला क्षेत्रातल्या ८० मान्यवरानी आपले विचार मांडले आहेत . यामध्ये प्रा .रा .ग जाधव ते विलासराव देशमुख असे असंख्य लोक आहेत .
या अंकाचे अतिथी संपादक हे डॉ श्रीराम लागु हे आहेत..

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

घाटावरचे भट's picture

1 Jul 2010 - 9:22 pm | घाटावरचे भट

शुभेच्छा!!

वात्रट's picture

2 Jul 2010 - 1:34 am | वात्रट

<<<या निमित्ताने या रंगसंमेलनात चर्चिले गेलेले मुद्दे , नाटकांचे रिपोर्ट्स या सर्व गोष्टींबद्दल ऐकायला आवडेल
असेच म्हणतो...