रंगकर्मी .कॉम करत असलेला आणखी एक उपक्रम
महोत्सवाबद्दल
६ महिन्यापुर्वी रंगकर्मी .कॉम सुरु झाली . सर्व रंगकर्मीना एक व्यासपीठ मिळावे असा त्यामगाचा हेतु होता . व तो पुर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले . रंगकर्मीला जगभरातुन वाचक मिळाले. त्यामुळे नाटकाला खर्या अर्थाने ग्लोबल करण्याचा प्रयत्न झाला . या काळात प्रथितयश कलाकारांच्या मुलाखती , साप्ताहिक साधना च्या दलपतसिंग येती गावा या विशेषांकाचे सह्प्रकाशन असे अनेक उपक्रम आम्ही राबवले . या सगळ्याला चांगला प्रतिसाद मिळाला . आणि त्याचेच पुढचे पाऊल म्हणुन हा नाट्य महोत्सव...
कोल्हापुर हे कलापुर ,फार पुर्वीपासुन येथे राजाश्रय आणि लोकाश्रय या जोरावर अनेक कला जोपासल्या गेल्या .त्यातलीच एक महत्वाची कला म्हणजे नाटक !! पण आजकाल या कलापुरीतच नाटकाचा लोकाश्रय कमी होत चालला आहे . रंगभुमी थंड पडत चालली आहे . कधी काळी कोल्हापुरातुन अनेक नाटकांची निर्मिती व्हायची ,आता मात्र ही संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतपत ही नसते , हे चित्र बदलण्यासाठी रंगकर्मी प्रयत्न करत आहे . आणि यासाठीच काही चांगली नाटके ,जी सहसा कोल्हापुरातील लोकाना पहायला मिलत नाहीत . त्यांचे प्रयोग कोल्हापुरात करायचे ठरवले . ज्यायोगे काही चांगले प्रयोग लोकाना पाहता येतील व स्थानिक रंगकर्मीना ही काही नवीन करायची स्फुर्ती मिळेल . व नक्की महाराष्ट्रभर सध्या काय चालु आहे याचा मागोवा घेता येईल. याशिवाय रंगकर्मींच्या महाराष्ट्र भर पसरलेल्या बेटाना एकत्र आणण्यासही मदत होईल .....
रंगकर्मीने कोणताही व्यावसायिक हेतु न ठेवता हा उपक्रम केलेला आहे . काही चांगले घडावे ही प्रामाणिक इच्छा फक्त पाठिशी आहे . ही तर फक्त सुरवात आहे..आता आपल्या सहकार्याची गरज आहे . आपण सार्यानी भरभरुन या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा ही विनंती व इच्छा आहे . यानिमित्ताने नाट्य चळवळ पुन्हा वाढीला लागेल व विविध उपक्रमांद्वारे कोल्हापुर पुन्हा कलापुर होण्याकडे वाटचाल करेल असा विश्वास वाटतो ..
या संदर्भात अधिक माहितीसाठी पहा ..
http://www.rangakarmi.com/natyamahotsav
तिकिटासांठी संपर्क-
विनायक -८०८७२१६८६७
केदार - ९४२२५२११०२
अनुज-९८२३८३७६६७
रंगकर्मीच्या सर्व उपक्रमाना मिसळपाव परिवाराने मनापासुन साथ दिली , या उपक्रमाला त्यांची अशीच साथ मिळावी ही नम्र विनंती
धन्यवाद
टीम रंगकर्मी

" alt="" />
" alt="" />
वाचने
3686
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
एका दगडात...
या
>>मिपाची
In reply to या by विनायक पाचलग
+१
In reply to >>मिपाची by II विकास II
अभिनंदन
शुभेच्छा
नाटकांचे
In reply to शुभेच्छा by मुक्तसुनीत
असो !
In reply to नाटकांचे by II विकास II
शुभेच्छा..
हार्दिक
बा विनायका..
वा वा छान
शाबास
तुमच्या
तुमच्या
हार्दिक शुभेच्छा..
मनापासुन
शुभेच्छा!!
उपक्रमाला शुभेच्छा!