जाता सातार्‍याला . . . . .

योगेश२४'s picture
योगेश२४ in कलादालन
4 Jun 2010 - 9:59 am

मराठेशाहिच्या राजधानीच ठिकाण असलेले सातारा हे शहर जिल्ह्याचे ठिकाण असुन किल्ले अजिंक्यताराच्या पायथ्याशी वसलेले आहे. हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे तर आहेच पण भटकंतीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. अशा या शहरापासुन फक्त काहि कि.मी. अंतरावर असलेल्या काही ठिकाणांची हि भटकंती.

अजिंक्यतारा किल्ला

सज्जनगड
सातार्‍यापासुन १०-१२ किमी अंतरावर असुन नियमित बससेवा उपलब्ध.

कास तलाव
सातार्‍यापासुन २५-२७ किमी अंतरावर. स्वत:चे वाहन असल्यास उत्तम

कासचे पठार कास तलावाच्या साधारण ३ किमी. आधी
कासची फुले झक्कास

परळी धरण
सातार्‍यापासुन २५ किमी अंतरावर.

ठोसेघर धबधबा
सातार्‍यापासुन १०-१५ किमी अंतरावर.

चाळकेवाडी पवनचक्की प्रकल्प
ठोसेघर धबधब्यापासुन साधारण ३ किमी अंतरावर (पुढे)

यवतेश्वर मंदिर

सातारा

सातारा शहर

सातारी कंदी पेढे

प्रवासछायाचित्रण

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

4 Jun 2010 - 10:02 am | बेसनलाडू

फारच आवडली.
(मनोपर्यटक)बेसनलाडू

टारझन's picture

4 Jun 2010 - 9:15 pm | टारझन

लै भारी ... .तसंही महाबळेश्वरचा रोड म्हणजे "आवडत्या स्त्रीला मागे बाईकवर मागे बसवुन दिवसभर लुत्फ लुटण्या लायक आहे " बाईक बरवडत नसेल तर डॉ.दाढेंची "मधे गियर दांडु नसलेली" फियाट सुद्धा भारी आहे , असा जनसमज आहे :)

- (फिरता पर्यटक) बाईकलाडु

शिल्पा ब's picture

4 Jun 2010 - 10:08 am | शिल्पा ब

वाह...घाटातून जाणारी लाल यष्टी बघून जुन्या आठवणी जाग्या झाल्या...सगळे फोटो मस्त आहेत...मला नंदींचा फोटो आवडला...
अवांतर: इथे पाठवणार नसाल तर उगाच तोंडाला पाणी सुटेल असे फोटो टाकू नयेत .

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पाषाणभेद's picture

4 Jun 2010 - 11:38 am | पाषाणभेद

अगदी असेच म्हणतो. एस्टी बद्दल उगाचच असे वाटत राहते मला.
बाकी यवतेश्वराच्या एका नंदीची मान मुद्दाम वळवलेली दिसते. कलाकाराची कारागीरी की चुकी? अन महादेवाच्या देवळासमोर नेहमी एकच नंदी असतो येथे दोन दोन? कसे आले हे? की वेगवेगळ्या काळातले आहेत ते?
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

शुचि's picture

7 Jun 2010 - 6:06 am | शुचि

२ नंदींचं अजून एक देऊळ सापडलं - http://www.flickr.com/photos/vegeyum/4425828353/

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

योगेश२४'s picture

7 Jun 2010 - 9:56 am | योगेश२४

सातारा जिल्ह्यातीलच माण तालुक्यात असलेल्या शिखर शिंगणापुर येथील शिवमंदिरासमोर दोन पितळेचे भले मोठे नंदी आहेत. या मंदिरात एकुण सात नंदी असुन त्यापैकी पाच देवळाच्या पायथ्याला आणि दोन शिवलिंगासमोर आहेत. या सात नंदींची काहीतरी पौराणिक कथा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे हे कुलदैवत आहे.

मंदिराच्या आत फोटो काढण्यास मनाई असल्याने हा मंदिराचा फोटो.

पांथस्थ's picture

4 Jun 2010 - 10:10 am | पांथस्थ

फोटू लय भारी आले आहेत. सातार्‍यावर आमचा फार जीव.

कधी काळी सातार्‍याला प्रोजेक्ट केले असल्यामुळे बर्‍याच फेर्‍या झाल्या आहेत.

पवई नाक्याला एक "मराठा लंच होम" (नेमके नाव आठवत नाहि) आहे तिथे भाकरी आणि मटण्/चिकन फार खल्लास मिळायचे.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

धमाल मुलगा's picture

4 Jun 2010 - 6:03 pm | धमाल मुलगा

काय द्येवा..
आणि पवई नाक्यावरचीच पुरीभाजी? विसरलात? :)

पांथस्थ's picture

4 Jun 2010 - 11:42 pm | पांथस्थ

धमुश्वरा त्यावेळी अस्मादिक शुद्ध मांसाहारी असल्याने शाकाहार वर्ज्य होता :)

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

योगेश२४'s picture

4 Jun 2010 - 10:40 am | योगेश२४

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!

इथे पाठवणार नसाल तर उगाच तोंडाला पाणी सुटेल असे फोटो टाकू नयेत . :) :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Jun 2010 - 10:50 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

झक्कास फोटो!

अदिती

jaypal's picture

4 Jun 2010 - 10:56 am | jaypal

छायाचित्र =D> =D> =D>
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

फ्रॅक्चर बंड्या's picture

4 Jun 2010 - 10:57 am | फ्रॅक्चर बंड्या

फार छान फोटो ...
binarybandya™

अमोल केळकर's picture

4 Jun 2010 - 11:21 am | अमोल केळकर

मस्त फोटो.

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

भाग्यश्री's picture

4 Jun 2010 - 11:28 am | भाग्यश्री

मस्त रे योगेश..
कास लेक ही जगातील सर्वात सुंदर जागा आहे! आणि पावसाळ्यात तर, या आकाशगंगेतील सुंदर जागा आहे ती! :) :)

मड्डम's picture

4 Jun 2010 - 11:30 am | मड्डम

अस्‍सल सातारी मातीचे दर्शन घडवल्‍याबद्दल धन्‍यवाद!

मराठी आणि मायभूमीचा अभिमान असलेला मायभूमी

सहज's picture

4 Jun 2010 - 11:43 am | सहज

मस्त फोटो, आठवणी जागवल्यात व शेवट देखील मस्त केलाय.

इतक सगळ सुंदर मस्त अश्या त्या सातार्‍यातले (निदान माहीत आहे त्या) घरटी एक दोन परदेशी, परगावी :-)

भारद्वाज's picture

4 Jun 2010 - 12:12 pm | भारद्वाज

लय लय लय म्हन्जे लय आवडलं बगा
जय हिंद जय सातारा

मदनबाण's picture

4 Jun 2010 - 1:09 pm | मदनबाण

सुंदर फोटु... :)
बाकी ऑइलपेंट ने रंगवलेले नंदी पाहुन लयं वाईट वाटलं,साला हे रंग फासणारे १ नंबरी गाढवीचे वाटतात मला...चांगल्या वास्तुची पार माती करुन टाकतात्.खरे खोटे माहित नाही पण असे रंग लावल्याने मूर्तीचा /मंदिराचा मूळ पाषाण खराब होतो (पोखरला जातो) असे ऐकले आहे.

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

आळश्यांचा राजा's picture

4 Jun 2010 - 11:04 pm | आळश्यांचा राजा

साला हे रंग फासणारे १ नंबरी गाढवीचे वाटतात मला...

बरोबर. किल्ल्यांच्या दरवाजांना आणि जुन्या दगडी देवळांना रंग फासणारे यांचे मावस भाऊ असावेत.

बाकी फोटो क्लास!

आळश्यांचा राजा

मेघवेडा's picture

4 Jun 2010 - 1:46 pm | मेघवेडा

निव्वळ अप्रतिम फोटोज! घाटाचा लांबून घेतलेला फोटो तर अहाहा! क्या बात है!! :)

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Jun 2010 - 1:58 pm | बिपिन कार्यकर्ते

अप्रतिम ^ n

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

4 Jun 2010 - 9:18 pm | टारझन

+१ ^ m

- कापिन कात्रीसार्खे

पुष्करिणी's picture

4 Jun 2010 - 1:59 pm | पुष्करिणी

छान फोटो
( एकेकाळी अजिंक्यतार्‍याच्या पायथ्याशी राहिलेली )पुष्करिणी

गणपा's picture

4 Jun 2010 - 2:37 pm | गणपा

वाह मस्त फोटो काढले आहेत.
खालुन चौथा आणि तिसरा तर चौथा.

कंदी पेढ्यांबद्द्ल तर काय बोलावे.
त्यांवर आमचा भारी जीव :)

मस्त कलंदर's picture

4 Jun 2010 - 2:53 pm | मस्त कलंदर

मस्तच आले आहेत फोटो..

(कंदी पेढे प्रेमी)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

4 Jun 2010 - 4:56 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मस्त आहेत फोटो.

श्रीराजे's picture

4 Jun 2010 - 5:11 pm | श्रीराजे

फोटो एकदम झकास आले आहेत...

योगेश२४'s picture

4 Jun 2010 - 5:14 pm | योगेश२४

प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार!!!!

धमाल मुलगा's picture

4 Jun 2010 - 6:36 pm | धमाल मुलगा

एकदम नाऽऽदखुळा आलेत हो फोटो :)
यवतेश्वराची काय झक्क्कास पुजा बांधली आहे राव! मस्तच. निस्ता फोटो बघुनच गार्गार वाटलं. गाभार्‍यात बसल्यावर तर काय सुख!

आणि कशाकशाबद्दल काय बोलु? एकेक फोटो निखळ सौदर्याचा नमुना दाखवतोय.

एकच शंका: पहिल्या फोटोत तो तुतारीवाला कुठल्या शाण्यानं उभा केलाय राव? तो श्ट्रीटल्यांप त्या तुतारीवाल्याच्या झग्यात चाललाय.. =))

प्रभो's picture

4 Jun 2010 - 7:02 pm | प्रभो

लै भारी!!

अनामिक's picture

4 Jun 2010 - 7:10 pm | अनामिक

लै म्हणजे लै भारी...

-अनामिक

अनिल हटेला's picture

4 Jun 2010 - 9:55 pm | अनिल हटेला

क्या बात है!!

कंदी पेढ्याचा फोटो अगदी जीवघेणा...:)

बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D

चित्रा's picture

4 Jun 2010 - 10:12 pm | चित्रा

सुरेख सफर. मी एकदाच गेले आहे आणि तेही फक्त पेठांमध्ये.
शहराच्या आसपासचा परिसर फारच सुंदर आहे.

प्राजु's picture

4 Jun 2010 - 10:54 pm | प्राजु

अप्रतिम छायाचित्रे!!!
मस्तच.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

स्वाती२'s picture

4 Jun 2010 - 11:49 pm | स्वाती२

धन्यवाद!

हुप्प्या's picture

5 Jun 2010 - 9:16 pm | हुप्प्या

एक सुंदर शहर आणि परिसर.
पण अशा काही बातम्या वाचल्या की वाईट वाटते.
http://www.esakal.com/esakal/20100604/5683152097628811282.htm

बा़की दगडी नंदीना रंग फासण्याचा मूर्खपणा कुणी केल्या आहेत त्याला माझ्या वतीने लाखोली. रंग लावल्यानंतर ते नंदी भयाण दिसत आहेत.
एखाद्या कृष्णधवल सिनेमाला रंग लावल्यावर कधी कधी असा अवतार बनतो. मला वाटते की मूळ कलावंताने माध्यमाचे भान ठेवून ती कलाकृती निर्माण केली असते तीच चांगली. नंतर निव्वळ रंग लेपून काही ती चांगली होत नाही.

इन्द्र्राज पवार's picture

5 Jun 2010 - 11:34 pm | इन्द्र्राज पवार

असा सुंदर निसर्ग पाहिल्यानंतर वाटते की, "सुजलाम सुफलाम देशा" असे जे आपण प्रार्थनेत म्हणतो ते सातार्‍याच्या परिसराला पाहुनच ! या शहरीकरणाच्या हव्यासापोटी खुद्द मुख्य शहरे (मग ते सातारा असो, वा शेजारची सांगली असो, वा आमचे कोल्हापूर असो...) दिवसेदिवस कॉंक्रिटची भयानक जंगले बनत चालली आहेत. मागे एकदा कराड शहरात जावे लागले....बाप रे... हे गाव सातारा जिल्ह्यातील एक तालुका, पण गर्दी, गर्दी..माणसांची तसेच वाहनांची यात कराडने सातार्‍याला मागे टाकले आहे. त्यामुळेच वरील सुंदर, डोळ्यांना सुखद गारवा देणारे फोटो पाहिल्यावर असे वाटू लागले की, शहर सोडून ठोसेघराच्या आसपास राहायला जावे. (मी ठोसेघर धबधब्याला मित्रांसमवेत तीनचार वेळा... एकदा भर पावसात... गेलो आहे... फार सुंदर परिसर आहे हा !)

एका देखण्या अनुभवाबद्दल लेखकाचे मनःपूर्वक आभार.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

शुचि's picture

5 Jun 2010 - 11:43 pm | शुचि

छायाचित्रं फार अप्रतिम आली आहेत. ते नंदी मला फोक-आर्ट (लोककला) चा उत्तम नमुना वाटतात.
यवतेश्वराची पिंड पाहून धन्य झाले.
धरण, हिरवळ, फुलं , निसर्ग क्या बात है.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

नेहमी आनंदी's picture

6 Jun 2010 - 10:13 pm | नेहमी आनंदी

ऑगस्ट मधे जाता येईल का सातार्‍याला?

योगेश२४'s picture

7 Jun 2010 - 9:57 am | योगेश२४

प्रतिक्रियेबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!!

लॉरी टांगटूंगकर's picture

10 Jun 2010 - 11:16 am | लॉरी टांगटूंगकर

भारी काढ्लेत फोत्तो. अत परत पाउस सुरु होउन.हिर्वे वातावरन होइल.ज्याना जमेल त्यानि जरुर या अनि बघा, ठोसेघर आणि सज्जन गड चा रोड च इत्क सुन्दर आहे कि काय बोलावे!!!

भडकमकर मास्तर's picture

10 Jun 2010 - 3:30 pm | भडकमकर मास्तर

येकदम झक्काअस फोटो...
ठोसेघराचे फोटो ब्येस्ट...
अवांतर : तुमचे फोटो कोणी ढापेल अशी भीती नाही वाटली वाट्टं तुम्हाला? फोटोवर नाव गाव नाही, योगेश २४ असं लिहिलेलं नाही, चुकल्याचुकल्यासारखं वाटलं ना आम्हाला

रम्या's picture

10 Jun 2010 - 4:44 pm | रम्या

नंदी म्हणजे खरोखरच ढवळ्या-पवळ्या दिसताहेत. :)

आम्ही येथे पडीक असतो!

परिकथेतील राजकुमार's picture

10 Jun 2010 - 5:09 pm | परिकथेतील राजकुमार

सर्वच फोटु ज ह ब र्‍या !!

सातारा शहराचा फोटु विशेष आवडला. त्या फोटुतली डावीकडुन १९ वी म्हणजे वरुन १४ वी आणी उजवीकडुन २७ वी दिसणारी बिल्डींग म्हणजे माझे घर.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

मेघवेडा's picture

10 Jun 2010 - 5:21 pm | मेघवेडा

अरेच्चा.. हो का? किती वर्षं राहतोयंस तिथं? नाही म्हणजे आपण सख्खे नाही तरी निदान चुलत वगैरे शेजारी झालो की! कारण डावीकडून २० वी म्हणजे उजवीकडून २६ वी दिसणारी बिल्डींग म्हणजे माझं घर. दे टाळ्ळी!

एक अंगकाठी म्हणजे नुसतीच काठी असलेला आणि बोळक्यात एकच दात लुकलुकणारा माझ्या शेजारच्या बिल्डींगमधला म्हातारा परवा काहीतरी 'सव्यसाचि', 'तुकडा तुकडा चंद्र' असलं काहीतरी बडबडत होता.. तोच काय हा 'परिकथेतील राजकुमार'? ;)
लोल! ह नाही घेतलेस तरी बिघडत नाही! :D

परिकथेतील राजकुमार's picture

10 Jun 2010 - 5:22 pm | परिकथेतील राजकुमार

तो समोर आरसा घेऊन बसला होता तो ??

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

मेघवेडा's picture

10 Jun 2010 - 5:23 pm | मेघवेडा

कुणाच्या समोर?
धन्यवाद.

स्वाती दिनेश's picture

10 Jun 2010 - 5:19 pm | स्वाती दिनेश

फोटो क्लास आहेत,
स्वाती

आंबोळी's picture

10 Jun 2010 - 5:44 pm | आंबोळी

सर्व फोटो सुंदर आलेत....
पण तुम्ही फोटोत पाणीखूण का नाही टाकलीत? फोटो ढापले जाण्याची तुम्हाला भिती वाटत नाही का?

जुन्या दगडी वास्तू रंगवणार्‍यांच्या बैलाला......

आंबोळी

अरुंधती's picture

10 Jun 2010 - 7:00 pm | अरुंधती

सु रे ख!
:-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

अभिज्ञ's picture

10 Jun 2010 - 11:22 pm | अभिज्ञ

अरे खरच हा इतका सुंदर धागा पहायचा राहून गेला होता.
एक से एक फोटोज.

(सातारी) अभिज्ञ

योगेश२४'s picture

11 Jun 2010 - 9:35 am | योगेश२४

सुंदर सुंदर प्रतिक्रियेबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार.
वॉटरमार्क शक्यतो टाळतो, त्यामुळे मूळ फोटोचे सौंदर्य कमी होते असे मला वाटते.
पण यापुढे मूळे फोटोला धक्का न देता वॉटरमार्क टाकणारच. (दुसर्‍याने काढलेले फोटो स्वतःच्या नावाने बरेचजण खपवतात :) नुकताच या अनुभवातुन गेल्याने हा निर्णय :( )