पाकिस्तान-दहशतवाद आणि अमन की आशा

चिरोटा's picture
चिरोटा in काथ्याकूट
19 May 2010 - 6:57 pm
गाभा: 

काही महिन्यांपूर्वी टाइम्स ग्रूप आणि पाकिस्तानी 'जंग ग्रूप' तर्फे दोन्ही देशांतले संबंध सुधारावेत म्हणून 'अमन की आशा' हा संयुक्त प्रकल्प चालु झाला.दोन्ही देशांत व्यापार उदीम वाढीस लागावा व सांस्कृतिक संबंध अधिक दृढ व्हावेत हा हेतु.दोन्ही ग्रूप्स तर्फे काही कार्यक्रमही राबवण्यात आले.
२६/११ नंतर संबंध किती सुधारले हा वादाचा मुद्दा आहे.पण दोन्ही देशांच्या प्रतिनिधींकडून्/काही उद्योजकांकडून मात्र अजुनही संबंध वाढवावेत अशी मागणी होते तेव्हा आश्चर्य वाटते.काल दिल्लीत झालेल्या सोहळ्याला प्रणव मुखर्जी(व काही पाकिस्तानी मंत्री) सकट अनेक उद्योजक उपस्थित होते.
(http://www.thenews.com.pk/daily_detail.asp?id=24004 )
आजच्या टाइम्स मधल्या बातमीतली त्यांची काही वाक्ये पहा-

regional cooperation is a win-win and positive-sum situation that is beneficial to the entire region There is no reason why SAARC nations cannot replicate such a model

प्रणव मुखर्जी
हेच मुखर्जी परराष्ट्र मंत्री असताना पाकिस्तानला दहशतवाद थांबवा म्हणत ईशारे देण्याचे काम करत होते.!आता असे काय घडले की त्यांचे मतपरिवर्तन झाले?

Rohan Murty, Infosys Technologies’ founder-chairman N R Narayana Murthys’ son has a dream That the Pakistani friend he made while studying engineering at Cornell University in the US and he be free to explore and experience each other’ countries which they are unable to do at present.

नारायण मूर्ती
वा!!.एकमेकांची मातृभूमी बघता येत नाही म्हणून हे दोघे अमेरिकेत दु:खी आहेत!! खरोखर रोहन मूर्ती पाकिस्तानच्या स्वात खोर्‍यात भटकंती करतील?

India will develop state-of-the-art facilities in Attari, near Amritsar, by May 2011 to help exporters ship goods to Pakistan. Responding to issues related to infrastructural bottlenecks raised by exporters at the business session on the synergies of bilateralism, a commerce ministry official, P K Choudhary, said that government will set up modern integrated facilities at the India-Pakistan border in Attari

आणि समजा नजिकच्या का़ळात पाकने काही दहशतवादी परत घुसवले तर ह्या मॉडर्न फॅसिलिटीचे काय करणार?

“If Eu rope can overcome the diffi culties of history, war and genocide to achieve develop ment and economic prosper ity, surely we can as well.

नारायण मूर्ती
दोन देशांमध्ये मुख्य वादाचा मुद्दा काश्मीर हाच आहे्. हा मूळ प्रश्न सोडवल्याशिवाय वर जी काही उद्योजक्/राजकारणी स्वप्ने रंगवत आहेत त्याला काही अर्थ उरतो का?
आपले मत काय? खरोखरच आर्थिक सहकार्याने,सांस्कृतिक देवाण-घेवाणीने काश्मीर प्रश्न सुटेल?

प्रतिक्रिया

Dhananjay Borgaonkar's picture

19 May 2010 - 7:43 pm | Dhananjay Borgaonkar

आजिबात प्रश्ण वगैरे काही सुटणार नाहीत.
पाकिस्तान हे अतिरेक्यांसाठी नंदनवन आहे. जो पर्यंत पाकिस्तानात अतिरेकी आहेत तो पर्यंत अमन चमन काही नाही.
बेन्झीर भुट्टो असत्या तर थोडी फार आशा होती.

हे सगळे पुचाट प्रकार आहेत अमन की आशा वगैरे..यानी काहीही साध्य होणे नाही.

कुत्र्याचं शेपुट आहे पाकिस्तान...

भडकमकर मास्तर's picture

20 May 2010 - 12:15 am | भडकमकर मास्तर

बेन्झीर भुट्टो असत्या तर थोडी फार आशा होती.
का बुवा?
प्रश्नाचे उत्तर समजून घ्यायला आवडेल

_____________________________
श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?

विकास's picture

19 May 2010 - 8:30 pm | विकास

दोन देशांमध्ये मुख्य वादाचा मुद्दा काश्मीर हाच आहे्.

एव्हढाच मुद्दा आहे? "हसके लिया पाकीस्तान, लढके लेंगे हिंदूस्थान" ही घोषणा कधी ऐकली नाही का?

याचा अर्थ इतर प्रयत्न होऊ नयेत वगैरे नाही. पण जमिनीवर पाय ठेवून इतकेच म्हणावेसे वाटते.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

Manoj Katwe's picture

20 May 2010 - 5:09 am | Manoj Katwe

लढके लेंगे हिंदूस्थान
म्हणजे काय ह्यांना भारत जिंकायचा आहे कि काय ?
आणि भारताला जिंकून पुढे काय करणार पाकडे ?
स्वताला तरी जरा सावरा मग दुसरीकडे लक्ष द्या म्हणावं त्या पाकड्यांना.

शिल्पा ब's picture

19 May 2010 - 9:47 pm | शिल्पा ब

पाकिस्तानात सतत मिलिटरी राज्य आणि हुकुमशाहीच आहे...अमेरिकेच्या प्रसादाने दहशतवाद वाढत आहे...काश्मीर प्रश्नाविषयी बोलू तेवढे कमीच...मुंबईवरील हल्ला हा ताजे उदाहरण...सतत काश्मिरजवळ काहीतरी कुरापती काढणं चालूच असतं...या परिस्थितीत कसले आलेय अमन आणि शांती ? या दोन देशात एकोपा काही शक्य नाही...आपण कितीही म्हणत असलो कि सर्वसामान्यांच्या मनात असे काही नाही तरी भारतावर हल्ला होतोच आहे हे सत्य आहे...उगाच दिवास्वप्ने बघण्यात काय हशील? भारताने सैन्य तत्पर ठेवावे...मगच काय ती बोलाचाली करावी...नाहीतर उगाच हिंदी पाकी भाई भाई म्हणून चीनची पुनरावृत्ती व्हायची....

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

मदनबाण's picture

20 May 2010 - 4:08 am | मदनबाण

पाकडे म्हणजे कुत्र्याचं शेपुट आहे...कधीही न-सरळ होणारे !!!
जे लोक महिन्याला हजारोंनी आतंकवादी तयार करतात, त्यांच्याकडुन अमन की आशा ठेवणे म्हणजे महामुर्खपणाच आहे...
हिंदी पाकी भाई भाई म्हणून चीनची पुनरावृत्ती व्हायची....
ह्म्म्म्,,,भरत वर्मा यांनी चीन बद्धल बरचं भाष्य करुन ठेवलं आहे...
http://alturl.com/dfg7
http://rupeenews.com/2009/11/12/analysis-of-bharat-vermas-how-india-is-l...
http://www.ndtv.com/news/india/china_could_attack_india_by_2012_defence_...
चीन कडुन घुसेखोरी होतेय हे आपल्याला दिसलेच असेल...
चीनी ड्रॅगन अती महत्वाकांक्षी आहे,हिंदुस्थानाला आज सर्वात मोठा धोका चीन कडुनच आहे...
नक्षलवाद्यांनी जी स्फोटके वापरली ती चीनी बनावटीची आहेत,हे विसरुन चालणार नाही !!!
http://www.dnaindia.com/india/report_security-forces-recover-chinese-arm...
विचार करुन पहा...एका बाजुने चीनने लचका तोडला आणि दुसर्‍या बाजुने पाकड्यांनी चावा घेतला तर आपली परिस्थीती कशी होईल ???

मदनबाण.....

“control oil and you control nations; control food and you control the people”.
Henry Kissinger

हा हा हा वाचून करमणूक झाली .. मला नाही वाटत रोहन अस काही करेल. असाच काहीतरी बडबडला असेल.

चिरोटा's picture

19 May 2010 - 10:46 pm | चिरोटा

जे लोक महिन्याला हजारोंनी आतंकवादी तयार करतात, त्यांच्या कडुन अमन की आशा ठेवणे म्हणजे महामुर्खपणाच आहे...

सहमत आहे. सत्ताधारी सोडा पण उद्योजक्,व्यापारी,नॅसकॉम सारख्या संस्था व्यापार वाढवायच्या गोष्टी का करत आहेत हा प्रश्न पडतो्. ह्या सोहळ्यात काही भारतिय उद्योजकांनीच विसा नियम शिथिल करा वगैरे म्हंट्ले आहे..ह्या लोकांना पाकिस्तानची सध्याची स्थिती ,इतिहास माहित नाही हे अशक्य आहे.फक्त नफा ह्या पलिकडे आपल्या लोकांना काहीच दिसत नाही असे म्हणावेसे वाटते.
P = NP

Pain's picture

20 May 2010 - 12:21 am | Pain

=))

जे.पी.मॉर्गन's picture

21 May 2010 - 12:18 pm | जे.पी.मॉर्गन

ह्येच.. घंटा अमन की आशा !

जे पी

भारद्वाज's picture

20 May 2010 - 12:56 am | भारद्वाज

'अमन की आशा' ????? अरे हट्........ सगळी बोलबचनगिरी आहे साली.

* दिल्ली-लाहोर बस ....पाठीत 'कारगील'रुपी खंजीर !!!
अनुभवातून शिका रोहनराव मुर्ती...केवळ बोलका बाहुला बनू नका.
-
अमन की आशा=बोलबचन की भाषा

Manoj Katwe's picture

20 May 2010 - 5:12 am | Manoj Katwe

पाकिस्तान-दहशतवाद आणि अमन की आशा
बोलबचनगिरी आहे साली.
काय काय ना एकेक timpass मिळतो ह्या लोकांना.

त्यांनी हे अमान चमन त्या स्वात खोर्यात जाऊन अतीरेक्यानपुढे वाचून दाखवावे.
हे अमान चमन चालू केलेल्या किती लोकांच्या **** मध्ये *** आहे.

प्राजु's picture

20 May 2010 - 8:01 am | प्राजु

शिळ्या कढीला ऊत!!! :|
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

चिंतातुर जंतू's picture

20 May 2010 - 1:54 pm | चिंतातुर जंतू

वा!!.एकमेकांची मातृभूमी बघता येत नाही म्हणून हे दोघे अमेरिकेत दु:खी आहेत!! खरोखर रोहन मूर्ती पाकिस्तानच्या स्वात खोर्‍यात भटकंती करतील?

स्वात खोर्‍याखेरीज पाकिस्तानात इतरही अनेक स्थळं आहेत. मोहेंजोदारो, ह्डप्पा, तक्षशीला यांसारख्या ठिकाणी जायला मला आवडेल. लाहोरमधली शालिमार बाग किंवा बादशाही मशिदीसारख्या मुघल शैलीतल्या इमारती पाहायला आवडतील. कधीतरी भविष्यात या गोष्टी पाहता याव्यात यासाठी नुसती शांततेची इच्छा व्यक्त करण्यात काय चूक आहे? कदाचित आपल्या हयातीत ते दिवास्वप्नच ठरेल, पण म्हणून स्वप्नं पाहूच नयेत का? आणि भारतीय संस्कृतीचा आद्य आविष्कार जर उभ्या हयातीत कधीच पाहायला मिळणार नसेल, तर त्याचं दु:ख होणंही स्वाभाविक नाही का?

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

तिमा's picture

20 May 2010 - 8:28 pm | तिमा

स्वप्नं जरुर पहा, पण त्यासाठी पाकिस्तान आपल्या ताब्यात आला पाहिजे.(हे पण एक स्वप्नच!!!)
प्रत्यक्षांत सरकारच्या पुळचट धोरणामुळे अर्धा पंजाब व काश्मीर पाकिस्तानच्या घशांत जाईल आणि संपूर्ण उत्तर-पूर्व प्रदेश चीन घेऊन टाकेल. उरलेल्या प्रदेशांत माओवादी राज्य करतील.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

विकास's picture

21 May 2010 - 12:58 am | विकास

एकूण (स्वप्नाळू) प्रतिसादाशी सहमत पण,

भारतीय संस्कृतीचा आद्य आविष्कार जर उभ्या हयातीत कधीच पाहायला मिळणार नसेल,

याचा अर्थ समजला नाही...

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

चिंतातुर जंतू's picture

21 May 2010 - 12:08 pm | चिंतातुर जंतू

भारतीय संस्कृतीचा आद्य आविष्कार
याचा अर्थ समजला नाही...

भारताच्या इतिहासात सिंधू खोर्‍यातली संस्कृती ही प्रगल्भ संस्कृतीचा पहिला आविष्कार मानली जाते. हडप्पा आणि मोहेंजोदारो ही त्याची प्रमुख केंद्रं होती.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

dog
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

परिकथेतील राजकुमार's picture

21 May 2010 - 1:14 pm | परिकथेतील राजकुमार

कुत्रा भारतीय आहे का पाकिस्तानी ? त्याचे पालन पोषण सर्वधर्मसमभावी कुटुंबात झाले आहे का जात्यांध ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य