सध्या उन्हाळा आहे. त्यामुळे थोड समर सॅलड कराव अस सकाळी माझ्या मनात आल त्याची हि रेसिपी. माझ्याकडे कॅमरा नाही :( त्यामुळे फक्त रेसिपी देत आहे. या सॅलडच नाव मला माहित नाही कारण सर्व साहित्य घरी होत म्हणुन प्रयोग केला. दुपारी १ मोठा बॉलभर खाल्ल वर थंड ताक प्यायल की झाला तुमच जेवण.
साहित्यः
कोबी: श्रेडेड १ वाटी
लिची: ३/४ सोलुन चिरुन
जामः २ बारिक चिरुन
टोमॅटो: २ बिया काढुन व चिरुन
कोथिंबीर : बारिक चिरलेली
काळं मिठ, मिक्स हर्ब्स (पिझ्झा बरोबर येतात ते मी वापरते) चवीनुसार
सर्व साहित्य एकत्र करावे व फ्रिजमध्ये थंड करुन वाढावे.
प्रतिक्रिया
18 May 2010 - 9:16 am | सहज
उन्हाळ्यात खरी सॅलड खायची मजा! जोडीला तंदूर चिकन ;-)
आहाहा!
18 May 2010 - 10:07 am | वेताळ
उन्हाळ्यात खरी सॅलड खायची मजा! जोडीला तंदूर चिकन
सात्विक आहारासोबत तुम्ही एकदम तामसी आहार घेणार. म्हणजे तुमचा हिंसक पणा वाढणार.अगोदरच भारताचे नाव जगात खराब आहे ते तुमच्या ह्या तामसी कृत्यामुळे आणखीनच रसातळाला जाणार.
भारतात अगोदरच लोकशाही टिकेल का नाही ह्याची चर्चा चालु असताना अश्या आहारतुन तुम्ही हुकुमशाहीचे समर्थन करता. कमाल आहे बुवा तुमची.
बाकी आपल्याला पण सॅलड बरोबर चिकन तंदुर खायला आवडेल. :D
वेताळ
18 May 2010 - 9:53 am | राधा१
सहजकाका फोटो खुप छान आहे.
18 May 2010 - 1:36 pm | निखिल देशपांडे
छे छे
बिना फोटुची पाककृती
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!