उघड "बार" देवा आता , उघड "बार" देवा

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जे न देखे रवी...
26 Mar 2008 - 11:54 am

देहाची तिजोरी.....मूळ गीताचे विडंबन्.....उदय सप्रे-ठाणे

दे हाती तू थोडी
शक्ती नाही देवां
उघड "बार" देवा आता
उघड "बार" देवा

पिते रोज डोळे मिटुनी
जात बेवड्यांची
तनी थरथराटापायी
भिती सांडण्याची
"सरावल्या" हातांनाही
कंप का सुटांवा?
उघड "बार" देवा आता
उघड "बार" देवा

आर्त जणू गुत्त्यांवरची
बोंब ही "टपोरी"
"आपुलीच" प्रत्येक वाटे
पाजणारी पोरी
"सुष्ट" सज्जनांच्या ओठी
का पडे हा मेवां?
उघड "बार" देवा आता
उघड "बार" देवा

उजेडात बायको बघते
अंधारात बाप
कसे जावे यांच्या पोटी
एका पेग चे माप?
अश्या "डोलकर्‍यांचा" कोणी
तोल सावरावा?
उघड "बार" देवा आता
उघड "बार" देवा

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

26 Mar 2008 - 11:58 am | बेसनलाडू

चपखल शब्दयोजना आणि मिपावरील लोकप्रिय विषय.

(वाचक)बेसनलाडू

प्रशांतकवळे's picture

26 Mar 2008 - 5:47 pm | प्रशांतकवळे

क्या बात है!

कदाचित दिल्लीवाले मिसळ्पाव वाचत असावेत. म्हणुन त्यांनी http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2899850.cms हा निर्णय घेतला असावा.

प्रशांत.

उदय सप्रे's picture

27 Mar 2008 - 9:48 am | उदय सप्रे

मनःपूर्वक लिहिलेल्या प्रतिक्रियांबध्दल आभार !
प्रशांत भाऊ, http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2899850.cms हा निर्णय घेतला असावा. म्हणजे काय्?काही कळाले नाही.

प्राजु,
कर्म धर्म संयोगानी आमच्या सौभाग्यवतींचे नाव पण प्राजक्ता आहे आणि तिला पण माझ्यासारखेच कुठल्याही व्यसनाविषयी भयंकर तिटकारा आहे, त्यामुळे मी तुमच्या भावना समजू शकतो.पण एखादी कलाकृती ही तटस्थपणे
एन्जॉय करता आली पाहिजे-त्याविषयी लिहिता पण आले पाहिजे.माझे हे विडंबन पण त्याच पठडीतील आहे असे मला अतिशय प्रामाणिक्पणे वाटते, तरी पण यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व ! राहता राहिला प्रश्न या अभंगाचा - तर तुम्हाला सांगतो, "गीत रामायणातील 'गा बाळांनो गा रामायण' या भैरवीतील 'थोडे थोडे गात प्रतिदिनी' च्या ऐवजी 'थोळे थोळे' असे येईपर्यंत "गीत रामायण" म्हणून पै अन पै गोळा करत "वीर सावरकर" नावाचा अद्वितीय चित्रपट निर्माण करणार्‍या "बाबूजें" बध्दल माझ्या मनात "श्रध्दा आणि भक्ती" खेरीज काहिही नाही! - जो भंग पावत नाही तोच "अभंग", मग माझ्यासरखा एक यःकश्चित माणूस इतक्या सुंदर अभंगाचा अपमान करु शकतच नाही - ही "दारुड्या" लोकांवरची मल्लिनाथी आहे !-हा निव्वळ एक योगायोग आहे, मी मनात येईल त्या विषयावर लिहित असतो, त्यातलाच हा एक विषय्.उदाहरणार्थ आज मी एक "शिवरायांसी "८" वावे" असा एक लेख प्रसिध्द करणार आहे तो एकदम शास्त्रिय बैठकिचा आहे तो पण तुम्ही वाचालच.

चतुरंग भाऊ,
तुमचे म्हणणे एकदम रास्त आहे आणि "मीटर" वर तुम्ही सुचवलेले एकदम योग्य असेच आहे - पण "दारु" सारख्या विषयावरील गाणे हे "रांगडेच" वाटले पाहिजे म्हणून तुम्ही लिहिलेले शब्द आधी तिथे चपखल बसत असूनही मी ते शब्द काढून सध्ध्याचे शब्द टाकले आहेत, म्हणून पही - मीटर वर "फिट" नसतील शब्द, पण गाण्याचे रांगडेपण जपतात्-मला जरूर कळवा यावर तुम्हाल ते कसे वाटले ते !

मि.पा. वरील लोक खूप चोखंदळ आहेत हे बघून खूपच आनंद झाला.

उदय गंगाधर सप्रे-ठाणे

प्रशांतकवळे's picture

27 Mar 2008 - 10:53 am | प्रशांतकवळे

उदय भाऊ,

आजकाल मिपा वर दारु हा विषय जास्त येतोय..

म्हणुन तो दुवा दिला. दिल्ली सरकार आता दारु दुकानांचे जास्त परवाने देणार आहे.

प्रशांत

चतुरंग's picture

26 Mar 2008 - 7:06 pm | चतुरंग

चपखल शब्दयोजना!

चालीत म्हणून बघितले काही ठिकाणी थोडे मीटर हुकल्यासारखे जाणवते तिथे दुरुस्ती करतोय, पटते का बघ?

आर्त जणू गुत्त्यांवरची
बोंब ही "टपोरी"
एकएक "आपुली" वाटे
पाजणारी पोरी
"सुष्ट" सज्जनांच्या ओठी
पडे कसा मेवां?

उजेडात बाइल बघते
अंधारात बाप
कसे जावे यांच्या पोटी
पेगाचे हे माप?
अश्या "डोलकर्‍यांचा" कोणी
तोल सावरावा?

चतुरंग

प्राजु's picture

27 Mar 2008 - 12:37 am | प्राजु

विडंबन चांगले आहे.

आवांतर : मिपावर दारूशिवाय विडंबने होत नाहीत का? खरे तर इथे लिहिणारे अतिशय प्रतिभावान आहेत. मग दारू प्रत्येक विडंबनात यायला हवी हा अट्टाहास का? आणि देहाची तिजोरी या सुंदर अभंगाचे विडंबन.. दारू या विषयावर आहे हे वाचून थोडे वाईट वाटले. भीक नको पण कुत्रा आवर प्रमाणे विडंबने नको पण दारू आवर असे म्हणावेसे वाटू लागले आहे.

- (व्यथित)प्राजु

अघळ पघळ's picture

27 Mar 2008 - 2:47 am | अघळ पघळ

प्राजुताई कितीही चिड चिड करताय आजकाल! बरं नाहिये का? तुम्ही आपलं पुर्वीसारख्या त्या चारोळ्या पाडा बघू :)
आम्हाला त्या खुप्प्प आवडतात....

- अघळ पघळ

सृष्टीलावण्या's picture

27 Mar 2008 - 10:37 am | सृष्टीलावण्या

लवकरच आपल्या लाडक्या मिसळपावचे नामकरण मद्यमिसळपाव करावे लागेल. मी पण व्यथित.

अजून एक. विडंबनासाठी गाणी किंवा कविता निवडताना जरा तरी तारतम्य बाळगायला काहीच हरकत नाही. आज "उघड दार देवा" हे हजारोंच्या श्रद्धेचा विषय आहे. सिगारेट खुशाल ओढा पण ती निरांजनावरच शिलगावून हा अट्टाहास का आणि कशासाठी?

>
>
मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला ।
सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

बेसनलाडू's picture

27 Mar 2008 - 11:07 am | बेसनलाडू

आठवली; पटली तर पहा, नाहीतर सोडून द्या लावण्याताई -
नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे
(स्मरणशील)बेसनलाडू

उदय सप्रे's picture

27 Mar 2008 - 1:00 pm | उदय सप्रे

एखादा विषय डोक्यात येताना ठरवून येत नाही, तो जसा येतो तसे लेखक / कवी लिहितात, कविता/लेख्/विडंबन लिहिणे म्हणजे एखाद्या विषयावर ठरवून टीका करण्यासरखे ठरवून नाहि न करता येत ताई?
मी प्रतिक्रियांमधे लिहिलय ते पण सविस्तर वाचा ही विनंती !
राहता राहिला विषय "दारु" चा , तर कुठले विडंबन हे त्यावर "उपहासात्मक" लिहिले आहे हे वाचकांच्या लक्षात येतेच्.....मी स्वतः आजपर्यंत "दारु" दूरच, अजून "बियर" नाहि (हातात पण) घेतलेली ! सिगारेट्,विडी,काडी,जुगार वगैरे तर नावच नको.....

त्यामुळे मूळ गाण्याला किठे तडा जातो वगैरे विचार मनातून काढून टाका, मूळ गाण्यापेक्षाही लक्ष पटीने "बाबूजी" हे माझ्याही श्रध्देचे कधीही न डळमळणारे स्थान आहे !

विडंबन पुन्हा एकदा वाचा - हा दारुड्या लोकांचा उपहास आहे - आयुष्य एन्जॉय करण्यासाठी "घोट" घेणे आणि दारुसाठी आपल्याच माणसांच्या नरडीचा घोट घेणे यातील अंतर फारच कमी लोकांना कळते , आणि हे विडंबन अट्टल "दारुड्या" लोकांसाठी आहे , शेवटचे कडवे याची साक्ष देईलच.....

तरी पण, जाता जाता, अधिक उणे लिहिले असल्यास क्षमस्व !

उदय सप्रे

सृष्टीलावण्या's picture

27 Mar 2008 - 11:33 pm | सृष्टीलावण्या

एखादा विषय डोक्यात येताना ठरवून येत नाही, तो जसा येतो तसे लेखक / कवी लिहितात, कविता/लेख्/विडंबन लिहिणे म्हणजे एखाद्या विषयावर ठरवून टीका करण्यासरखे ठरवून नाहि न करता येत ताई?

मान्य आहे की विडंबन ठरवून करता येत नाही पण मग ते इथे छापलेच पाहिजे असे काही बंधन आहे का? खाजगीत लिहा आणि खाजगीतच त्याचा आस्वाद घ्या ना..

मी शाळेत असताना "पाऊले चालती संडासाची वाट" हे विडंबन तूफान प्रसिद्ध होते. आम्ही ते आवडीने गात सुद्धा असू. (अजूनही आठवले की हसू येते) पण मोठे झाल्यावर लक्षात आले की हे एका भक्तीगीताचे विडंबन आहे ज्या भक्तीगीताशी अनेक भाबड्या श्रद्धा जुळलेल्या आहेत. मग आम्ही ते जाहीर म्हणणे बंद केले.

आपण मोठे कधी व्हाल?

>
>
नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा वाहिन तुला..

इनोबा म्हणे's picture

28 Mar 2008 - 12:48 am | इनोबा म्हणे

मी शाळेत असताना "पाऊले चालती संडासाची वाट" हे विडंबन तूफान प्रसिद्ध होते. आम्ही ते आवडीने गात सुद्धा असू.
पंढरीनाथा ऐकतोयस काय रे?

पण मोठे झाल्यावर लक्षात आले की हे एका भक्तीगीताचे विडंबन आहे ज्या भक्तीगीताशी अनेक भाबड्या श्रद्धा जुळलेल्या आहेत. मग आम्ही ते जाहीर म्हणणे बंद केले.
तरीही (अजूनही आठवले की हसू येते) ? :)

नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा वाहिन तुला..
हे चालतं का?

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

उदय सप्रे's picture

28 Mar 2008 - 8:35 am | उदय सप्रे

तुमच्या लिखाणावरून तुम्हाला मोठे व्हायला अजून बराच काळ जायचाय असे दिसते , तसेच खाली लिहिलेल्या ओळींवरून तरी वाटत नाही की काही "सभ्य्"पणा तुमच्याकडे असेल, इथे कुणी काय लिहावं आणि ते कुठे प्रसिध्द करावं हे सांगण्याएवढी स्वतःची योग्यता आहे का हे आधी तपासून पहा ! आणि लिमान आता तरी कुणालाही काहीही लिहिणे बंद करा.

प्राजु's picture

27 Mar 2008 - 8:07 am | प्राजु

तुम्ही आपलं पुर्वीसारख्या त्या चारोळ्या पाडा बघू :)
आम्हाला त्या खुप्प्प आवडतात....

अरे वा! कळतात वाटतं तुम्हांला चारोळ्या.... प्रगती आहे.. :)))

- (सर्वव्यापी)प्राजु

सुधीर कांदळकर's picture

27 Mar 2008 - 9:22 pm | सुधीर कांदळकर

डोलकरी शब्द खासच.

आता इतर विषयावर्च लिहून सिद्धच करा आपली प्रतिभा.

शुभेच्छा.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

उदय सप्रे's picture

28 Mar 2008 - 9:32 am | उदय सप्रे

श्री.सुधीर कांदळकर,
"सप्रे"म नमस्कार , इतर विषयांवर पण लिहिले आहे , अजुन एक विडंबन मि.पा.वर आहेच , कालच एक लेख "शिवरायांचे "८" वा वे रूप" मि.पा.वर दिलाय , या आधी "३ लेख आणि एक कविता" अश्या ४ लिन्क्स पण दिल्या आहेत मि.पा. वर , आपण जरूर वाचा आणि आपला अभिप्राय जरूर कळवा !
उदय "सप्रे"

हे गीत एका कृष्णधवल चित्रपटात दूरदर्शनवर बघितल्याचे आठवते. प्रसिद्ध आहे, पण मला नाव आठवत नाही.

कथा अशी काही : तीन चोर एका घरात पाहुणे म्हणून येतात. त्यांना तिजोरी फोडून चोरायची असते. (पण घरमालक खरा खूप गरीब आहे, हे त्यांना माहीत नसते.)

चित्रपटातला प्रसंग असा की देवघरात घरातली सोज्ज्वळ मुलगी हे गाणे म्हणत असते, आणि ते तीन चोर तिजोरी फोडायचा प्रयत्न करत असतात. (त्यांचा प्रयत्न असफल होतो - गाण्यात "उघड दार देवा" शब्द असतात, आणि हे चोर तिजोरीचे दार उघडायचा प्रयत्न करत असतात, अशी दृश्ये आलटून-पालटून येतात.)

त्यामुळे मुळातच एका प्रकारचे विडंबन/नर्मविनोद आहे. ते पूर्ण गाणे दृक्श्राव्य माध्यमात द्व्यर्थी आहे. त्याची आठवण होऊन येथेही व्यथित होऊ नये.

सर्किट's picture

28 Mar 2008 - 10:31 pm | सर्किट (not verified)

तावातावाने चर्चा करणार्‍या लोकांतली सगळी हवाच काढलीत की हो !!

- सर्किट

प्रियाली's picture

28 Mar 2008 - 10:38 pm | प्रियाली

असे या चित्रपटाचे नाव आहे बहुधा...यातील गावा म्हणजे आपले जन्मगाव, मातृभूमी इ. नसून तुरुंग आहे.

बाकी, येथील एक एक प्रतिसाद पाहता एखाद्या शहाण्याला* "आम्ही जातो अमुच्या गावा" असे म्हणून रजा घेण्याची वेळ आली तर नवल वाटणार नाही.

* माझी गणती शहाण्यांत होत असती तर हा प्रतिसाद न येता.