गाभा:
सध्या बर्यापैकी टोलवाटोलवी चालली असल्याकारणाने आम्हाला उगाचच एक प्रश्न पडला.. तुम्हाला कसे भांडायला चुकले चर्चा करायला आवडते/ जमते...आडवळनाने, खवचटपणे का समोरासमोर आणि स्पष्ट ? ......हे फक्त भांडण्यासंदर्भात आहे...युद्धाबाबतीत नाही...त्यामुळे इथे गनिमी कावा वगैरे भानगड नको....शिवाजीराजांना मध्ये आणू नये हि विनंती (तरी कोणी उल्लेख केल्यास आम्ही जबाबदार नाही.).....स्वतःचा जबाबदारीवर प्रतिसाद द्यावा..प्रतिसादात होणार्या चर्चेला आम्ही जबाबदार नाही असे आम्ही स्पष्टपणे नमूद करतो...
****************************************************************************
http://shilpasview.blogspot.com/
प्रतिक्रिया
14 May 2010 - 8:48 am | नितिन थत्ते
धाग्याचा उद्देश कळला नाही.
शिल्पा ब यांना हे स्वतःच अभ्यास करून =)) जाणून घ्यावे लागेल.
आपली माहिती कोणी अशी उघड साम्गणार आहे का? ;)
नितिन थत्ते
14 May 2010 - 8:51 am | शिल्पा ब
फक्त डोक्याला त्रास न करून घेता उत्तर द्यावे...निखळ मनोरंज हाच हेतू ....म्हणजे आमचा हेतू हाच.. :D
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
14 May 2010 - 9:51 am | टारझन
कोण @॓)चा भांडतोय रे?(आम्हाला सोडुन)
मी तस साधकबाधक चर्चेला महत्व देतो , "चर्चा कशी करावी??" ह्या साठी मी सकाळी "मुख्यक्रम" आणि "महाचर्चा.मृच्छा" ह्या दोन कोचिंग साईट्स वर इ-लर्णिंग करतो.
चर्चा ही झालीच पाहिजे ... नाही तर संस्थळे कशी चालणार ?
In fact , Its not necessary to do चर्चा which happened on मिसळपाव only , but I'd suggest , even if anything happen in personal on gtalk or may be yahoo, you must come on मिसळपाव, and do an impotent चर्चा with all the संपादक्स (not enuf , catch whoever U can) And explore your चर्चाWorld !! Isn't it cool ? indeed it is ... its the "coolest" thing happen on mipa ... I'm loving it !
~ चर्चुंदा
हमको लगा हमने बहोत अंग्रेजी पढी .. हाय अल्ला ... ऐसा सिर्फ हमको लगा !! तोबा तोबा !!
14 May 2010 - 5:10 pm | शिल्पा ब
सध्या तुमचं काय चाललाय काहीच कळेना.... O:)
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
14 May 2010 - 10:17 am | jaypal
आणि दुस-याच बघायच वाकुन ;)
टा-या विंग्लीश लै भारी. आता तुमी बी "फाडा-फाड" कोचिंग क्लासेस् काढा राव =))
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
14 May 2010 - 3:10 pm | मनीषा
ते चर्चेच्या विषयावर अवलंबून असतं, --- चर्चा होणार आहे कि भांडण .
14 May 2010 - 4:51 pm | शिल्पा ब
हे बरिक खर हो... :P
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
14 May 2010 - 3:25 pm | बिपिन कार्यकर्ते
कशीही... मजा आली पाहिजे मात्र.
बिपिन कार्यकर्ते
14 May 2010 - 4:05 pm | परिकथेतील राजकुमार
आम्ही फक्त टेबलावर चर्चा करतो. इतरत्र केलेली / झालेली चर्चा हि वांझोटी असते असे आमचे आखातातले काका म्हणतात.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
सध्या मुक्काम परिस्तान, संध्याकाळी हिंदुस्तान आई- वडिलांकडे.
आमचे राज्य
14 May 2010 - 5:52 pm | टारझन
>> सध्या मुक्काम परिस्तान
हाहाहा .. चुकुन 'स्त' वाचलं .. लगेच पर्याला भेटु म्हणुन एक विचार मनाला चाटुन गेला इतकंच =)
©º°¨¨°º© टारा ©º°¨¨°º©
सध्या मुक्काम प्रियास्तान, संध्याकाळी देशपांडेस्तान, तिच्याचकडे
14 May 2010 - 5:28 pm | राघव
मूळ मनोभूमिका सारखी असेल तर चर्चा होते नाहीतर वाद होतो.
त्यात जर समजून घेऊन शिकण्याची ईच्छा असेल तर सुवर्णमध्य साधल्या जाऊन संवाद होतो. नाही तर विवाद ठरलेलाच!! :D
राघव
14 May 2010 - 5:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
एकदम बराबर ... बाकी काय सोन्याचं काय म्हणत होतास रे??
अदिती
14 May 2010 - 5:42 pm | राघव
स्वगतः राघवा, हा प्रश्न म्हणजे वादळाची नांदी म्हणावी काय? ;)
प्रकटः काय नाय वो.. आमी म्हनलं लोकं चरचेला ईसय नसतानाबी चरचा करतायत हितं, तर म्हनलं जरा भाव-टाव करून निस्तरास्नी सांगून पाहावं. :D
राघव
14 May 2010 - 5:29 pm | शुचि
नेहेमीच "इमोशनल" होऊन :(
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
14 May 2010 - 5:43 pm | इन्द्र्राज पवार
मला चर्चा करायला खूप आवडते.... मात्र ती बौध्दिक स्वरुपाची असेल तरच... कोणत्यीही परिस्थितीत वैयक्तिक पातळीवर ती कधीही येणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली तरच त्या चर्चेची खुमारी वाढते. अर्थात मी थोडा "पडेल" स्वभावाचा असल्याने नेमके "कोणत्या" क्षणाला आपण आता थांबले पाहिजे हे मी ओळखतो त्यामुळे असेल कदाचित निदान मला तरी अद्यापी कोणत्याही कटू प्रसंगाला सामोरे जावे लागलेले नाही..... (केवळ महाजालावरच नव्हे तर,..... प्रत्यक्ष जीवनातदेखील...!)
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
14 May 2010 - 6:36 pm | तिमा
मला चर्चा करताना एका दगडांत अनेक पक्षी मारायला आवडतील. पण जमत नाही. 'साहेबांची' ट्यूशन लावायला पायजे.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
14 May 2010 - 6:52 pm | चिन्मना
आमचे लेखनकौशल्य तसे थोडे कमी आहे. म्हणून जालावर आम्ही फारसे अॅक्टिव नसतो. मात्र समोरासमोर फक्त तावातावाने चर्चा करण्यात विश्वास ठेवतो. :T
कालच २ दिल्लीश्वरांशी मुंबईत मराठी बोलण्यावरून शाब्दिक गुद्दागुद्दी करून आलो. सालं म्हणत होतं की भय्या मुंबईत नव्हे, इंडियात राहतो. त्यामुळे कुठल्याही भाषेत बोलू शकतो. त्याला जाम झापडला - तेही त्याच्याच मातृभाषेतून. १० मिनिटात त्याने नांगी टाकली.
अर्थात त्यानंतर पुढच्या काही वेळातच आम्ही दुसर्या कुठल्यातरी विषयावर हसण्या-खिदळण्यात मग्न झालो. कुठेही कटुता राहिली नाही.
14 May 2010 - 7:08 pm | विकास
कालच २ दिल्लीश्वरांशी मुंबईत मराठी बोलण्यावरून शाब्दिक गुद्दागुद्दी करून आलो... कुठेही कटुता राहिली नाही.
बाँबेचे अधिकृत मुंबई होण्याआधी काही वर्षे: माझ्या ऑफिसमधील एका दाक्षिणात्य मित्राबरोबर बाँबे का नाही, मुंबई का म्हणायचे यावर "चर्चा" झाली ;) त्याचे म्हणणे होते की मुंबई हा शब्द कुणालाच माहीत नाही... बराच वाद झाला, आमचा (मराठी बोलणारा दाक्षिणात्य) मॅनेजर शेवटी दोघांना म्हणाला आता पुरे...
त्याच दिवशी दुपारच्या वेळेस माझ्या टेबलावर मला मेल मधून आलेला एक लुफ्तांसाचा जागतिक नकाशा मिळाला, त्यात इंग्रजीत बाँबेच्या ऐवजी मुंबई आणि कंसात बाँबे (अथवा उलट, नक्की आठवत नाही) लिहीले होते. ते बघताच मी ताबडतोब ते मी माझ्या मित्राला दाखवायला गेलो. तो जोरात हसला. आणि आमच्या मॅनेजरला म्हणाला, सांगितलं नव्हत येईल लगेच म्हणून? अर्थात त्याने तो नकाशा आधी पाहून मलाच माझ्याबाजूचा पुरावा ठेवला आणि खुल्यादिलाने मुद्दा मान्यही केला होता. नंतर तो नकाशा मी बरेच वर्षे जपून ठेवला होता.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
14 May 2010 - 10:14 pm | शिल्पा ब
मला समोरासमोर तावातावाने बोलायला कधीकधीच जमते...बरोबर कोणी माझ्या बाजूने असेल तरच...कारण खुपदा सगळं संपल्यावर काहीतरी सुचतं आणि मग बोलता येत नाही...म्हणून जालावर वगैरे ठीक आहे...थोडा विचार करून नंतर लिहिता येते...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
15 May 2010 - 1:04 am | वात्रट
आणि मुख्य म्हण्जे विषयाला धरून...
कूणी विषय सोडुन बोलयला लागला कि आट्ट्या हाल्तो मग..