हे मराठी ? ? ? ?
बाळगुंडे आज सत्तेतली
घोष करती “ मराठी मराठी ”
पाद्यपूजा नित्य दिल्लीश्वरीची
अन सांगती “ आम्ही मराठी “
भेदिले तख्त दिल्लीचे ज्यांनी
धन्य धन्य “ ते मराठी ”
सांभाळति जोडे आज दिलीश्वराचे
हाय रे दुर्दैव “ हे, मराठी ” ! ! !
उभी लाचार दिल्लीदरबारी
द्रौपादीसम असहाय “ मराठी ”
सत्तासूत हे तरीही कोकलति
“ आम्ही मराठी, आम्ही मराठी ”
“ खा- खाऊनी “ फुगली तुंबडी
मिथ्या घोष “ मराठी मराठी ”
शिवबाच्या या पावन भूमी,
आज उपाशी “ माणूस मराठी ”
त्यागुनी अलंकार अहंपणाचे
होवोत एक सकल “ मराठी ”
नांदेल तेव्हांच माझ्या घरां
अभिमाने “ माय माझी मराठी ”
निरंजन वहाळेकर
प्रतिक्रिया
4 May 2010 - 1:07 pm | विशाल कुलकर्णी
हे कसले मराठे? हे तर सराटे मराठीच्या पायात येता जाता रुतणारे ! :-(
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
4 May 2010 - 1:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>हे कसले मराठे? हे तर सराटे मराठीच्या पायात येता जाता रुतणारे !
अगदी अगदी...!
काव्य जबरा हं....!
-दिलीप बिरुटे
4 May 2010 - 1:29 pm | शानबा५१२
अभिमाने “ माय माझी मराठी ”
-मराठी आज पण अभिमानाने जगतेय
आपण मराठीच ह्या न त्या कारणाने स्वःताला कमी लेखतो
अन्याय होतोय अन्याय होतोय बोंबला फक्त !!त्यावर तोडगा नका शोधु
*************************************************
देवाने सर्व गोष्टींची एक वेळ ठरवलेय हेच सर्वात मोठ सत्य आहे!
ते आज मला "ओर्कुत" व "फचेबूक" वर जे सापडल्/भेटल्/मिळाल त्यावरुन पुन्हा एकदा कळल.
4 May 2010 - 2:49 pm | स्पंदना
नाहि आहे!
कुठला अन्याय म्हणता तुम्हि?
करुन घेतला तर अन्याय. उठुन तीथल्या तिथ एक फिरवुन दीली की
दुसर्याची पाळी येते अन्याय अन्याय म्हणुन ओरडायची
का गप गुमान माग सरता? का दुसर्या कुणी पुढाकार घ्यायची वाट बघता?
आणी काय झाल दील्ली ला?
आता काय नुसता महाराश्ट्र एक देश म्हणुन हवाय?
सावरा जरा पन्त!!
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
6 May 2010 - 10:16 am | निरन्जन वहालेकर
प्रतिक्रियांसाठी शतशः आभार ! ! !
" दिल्लीला काय झाले"? दिल्लीला सगळे पडद्याआड होते हे शेम्बड पोर ही सांगू शकेल
“ एका मराठी भाषिक राज्याच्या “ ( असे लिहून महाराष्ट्र देश होण्याला पान्ठिबा नाही याची
कृपया नोंद घ्यावी.) प्रधानाला त्याच्याच राज्यांत मराठी साहित्य सम्म्मेलनाला जाण्यासाठी दिल्लिश्वराची परवानगी घ्यावी लागते व शेवटी ती न मिळता लपत-छपत हजेरी लावावी लागते.
मराठी राज्यकर्त्यांच्या लाचारीचे, असहाय्यतेचे हे एकाच उदाहरण पुरेसे आहे
“ तिथल्या तिथे एक फिरवून द्यायला ” राज्य कर्त्यांपाशी चिंतामण रावांसारखे धैर्य व अस्मिता हवी.
सस्नेह
निरंजन