भेट आभाळांची..!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
24 Apr 2010 - 2:26 pm

राम राम मंडळी,

आज सचिनचा वाढदिवस.. सर्वप्रथम त्याला सार्‍या मिपा परिवारातर्फे वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! त्याची डोळे दिपवून टाकणारी उत्तमोत्तम फटकेबाजी आम्हाला यापुढेही बघायला मिळावी हीच शुभकामना..

इथे मी काही सचिनच्या खेळाबद्दल भाष्य करणार नाही. त्याकरता मॉर्गनसारखे दिग्गज समर्थ आहेत.. मी सांगणार आहे एक आठवण.. खुद्द सचिननेच कुठल्याश्या दिवाळी अंकात सांगितलेली. तो कुठलासा मुलाखतवजा लेख होता एवढं नक्की आठवतंय. पण कुठला दिवाळी अंक हे आता आठवत नाही.. परंतु १९९५/९६चा सुमार असेल.. कारण अण्णा तेव्हा हवाईगंधर्व म्हणून कार्यरत होते!

ती आठवण अशी होती, की सचिन एकदा काही खाजगी कामाकरता मुंबैहून कलकत्त्याला विमानाने निघाला होता. हा साधारण दीड तासाचा प्रवास. मंडळी स्थिरस्थावर झाली होती.. विमान नभात होतं. सचिनला बसल्याबसल्या डुलकी लागली..काही वेळाने झोपेतच आपल्या जवळ कुणी उभं आहे अशी त्याला जाणीव झाली आणि त्याने डोळे उघडले..पाहतो तर जवळच एक सद्गृहस्थ उभे होते.. त्यांची व सचिनची नजरानजर झाली आणि ते सद्गृहस्थ दोन्ही हात जोडून सचिनला म्हणाले,

"नमस्कार. माझं नांव भीमसेन जोशी. आपला खेळ मला फार आवडतो, मी आपला चाहता आहे. आज अशी विमानात अचानक आपली भेट झाली याचा मला आनंद वाटतो!"

त्या आठवणीत सचिन पुढे असं लिहितो की 'मी बसल्याजागी उडालोच अक्षरशः! एवढा मोठा माणूस आणि इतका साधा आणि नम्र! मी पटकन उठून उभा राहिलो. त्यांनी माझे दोन्ही हात हातात घेतले व स्मितहास्य करून ते आपल्या जागेवर निघून गेले!'

मंडळी, 'गुणीजन जाने गुणकी बात' असं म्हणतात ते खरंच.. वास्तविक जेव्हा ही भेट झाली तेव्हा सचिनच्या ऐन भरारीचा तो काळ होता, सचिन घडत होता.. पण त्याला अभिवादन केलं ते एका सिद्ध पुरुषाने, एका योग्याने, एका स्वरभास्कराने! तेही आपल्या मानमरातबाचा, वयाचा, नावाचा कसलाही मोठेपणा न बाळगता! एक भारतरत्न, तर एक होऊ घातलेलं भारतरत्न! :)

मंडळी, ही भेट खरंच दुर्मिळ.. ही भेट अनमोल.. ही भेट दोन आभाळांची, आभाळातच झालेली!

-- तात्या अभ्यंकर.

संगीतवाङ्मयक्रीडाप्रतिभा

प्रतिक्रिया

भोचक's picture

24 Apr 2010 - 2:31 pm | भोचक

क्या बात है. ही मुलाखत वाचल्याचं आठवतंय. पण योग्य वेळी आठवण जागवलीत तात्या. खरोखरच दोन आभाळ उंचीच्या माणसांची भेट.

(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Apr 2010 - 2:34 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत.....

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

24 Apr 2010 - 3:11 pm | टारझन

पर्‍या शी सहमत :)

- लेखन भेटआभाळी

मदनबाण's picture

24 Apr 2010 - 2:58 pm | मदनबाण

छान आठवण सांगितलीत तात्या... :)
सचिनला भारतरत्न देताना देणार्‍याला किती आनंद होईल याचा विचार करतोय... :)

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

तिमा's picture

25 Apr 2010 - 11:01 am | तिमा

हो, पण सचिनला भारतरत्न देणाराही आभाळाएवढा असावा ही अपेक्षा! कुठल्यातरी भ्रष्टाचाराने लडबडलेल्या हातांनी नको.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

पक्या's picture

24 Apr 2010 - 3:00 pm | पक्या

खरोखरच दोन आभाळ उंचीच्या माणसांची भेट. -
- हेच म्हणतो.
सुंदर आठवण.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

अमोल केळकर's picture

24 Apr 2010 - 4:30 pm | अमोल केळकर

ही भेट खरंच दुर्मिळ.. ही भेट अनमोल.. ही भेट दोन आभाळांची, आभाळातच झालेली! - वा क्या बात है !!!
मस्त आठवण

अमोल केळकर

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

ऋषिकेश's picture

24 Apr 2010 - 4:39 pm | ऋषिकेश

तुम्ही ह्या भेटीचं वर्णन मागे एकदा प्रतिक्रीयेतही केलं होतं.. आज सचिनच्या जन्मदिवसाच्या दिवशी छान औचित्यपूर्ण आठवण काढलीत.

यात मला आवडलं ते भीमसेन जोशींचं स्वतःची ओळख करून देणं. असं काहि वाचले की काहि मंडळी जेव्हा विविध ठिकाणी स्वतःच्या थोडक्या प्रसिद्धीचा दर्प मिरवतात तेव्हा खरंच कीव येते.

ह्या सुंदर आठवणीबद्दल आभार

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

चित्रा's picture

24 Apr 2010 - 5:20 pm | चित्रा

ही भेट दोन आभाळांची, आभाळातच झालेली!

आठवण आवडली.

जे.पी.मॉर्गन's picture

24 Apr 2010 - 5:31 pm | जे.पी.मॉर्गन

केवळ अप्रतीम आठवण तात्या...... नमन्ति फलिनो वृक्षा:, नमन्ति गुणिनो जना:| हेच खरं.

जे पी

सन्जोप राव's picture

24 Apr 2010 - 5:37 pm | सन्जोप राव

या निमित्तानं आईनस्टाईन आणि ब्रॅडमन यांच्या मोठेपणाच्या, साधेपणाच्या गोष्टी आठवल्या.
सन्जोप राव
इसे रोकिये महिंदरबाबू, क्या आप अपने तमाशे के लिये एक आदमी की जान ले लेंगे?
शेरसिंग, राजू आदमी नही, जोकर है. ये जियेगा भी यही, मरेगा भी यही. मरेगा भी यही, जियेगा भी यही.

मिसळभोक्ता's picture

26 Apr 2010 - 10:44 pm | मिसळभोक्ता

"नमस्कार, मी तात्या अभ्यंकर. मला आपली 'वर्तुळ' कथा खूप आवडली."

हे आठवले. हे देखील बहुधा "आभाळात"च घडले असावे.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

विसोबा खेचर's picture

26 Apr 2010 - 11:17 pm | विसोबा खेचर

हो, मनोगताचं आभाळ होतं ते! :)

तात्या.

जयवी's picture

24 Apr 2010 - 5:46 pm | जयवी

क्या बात है !!
बहुतेक अशाच छोट्या छोट्या गोष्टी मोठी माणसं घडवत असतील !

चतुरंग's picture

24 Apr 2010 - 5:58 pm | चतुरंग

मागे एकदा वाचली होती पण पुन्हा योग्य वेळी उल्लेख केल्याने तितकाच आनंद झाला! धन्यवाद तात्या! :)

चतुरंग

sur_nair's picture

24 Apr 2010 - 6:47 pm | sur_nair

शब्दच नाहीत. भर मध्यांच्या तळपत्या सूर्याला आणखी एक उगवता सूर्य भेटला असाच आभास होतो. असेच किस्से सांगत जा.

डावखुरा's picture

24 Apr 2010 - 10:56 pm | डावखुरा

तात्या सचिनच्या वाढदिवसाला अगदि धारवाडी पेढाच खाउ घातलात.....

:*

(योग्य वेळी योग्य गोष्टीचा वापर आवड्ला.)"राजे!"

अवांतर : तात्या सही बद्लायची आहे मार्गदर्शन मिळण्यास विनंती आहे..

आनंदयात्री's picture

24 Apr 2010 - 11:10 pm | आनंदयात्री

छान आठवण. मांडणी तात्या स्टाईल, आवडली.

रेवती's picture

24 Apr 2010 - 11:22 pm | रेवती

छान आठवण!

रेवती

शुचि's picture

25 Apr 2010 - 3:48 am | शुचि

काय योगायोग तरी. आम्ही विमानात बसतो तेव्हा कोणी असामान्य व्यक्ती दिसत नाहीत. अरे हो पहीलं म्हणजे "बिझनेस क्लास" मधे जायला पाहीजे. असो .... आठवण फारच सुंदर आणि दोघंही असामान्य कर्तुत्वाची , अतिशय गुणवान मराठी माणसं : )
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

इंटरनेटस्नेही's picture

25 Apr 2010 - 4:53 am | इंटरनेटस्नेही

अतिशय सुंदर लेखन... मनापसुन आवडले.!

--

इंटरनेटप्रेमी.

राजेश घासकडवी's picture

25 Apr 2010 - 6:10 am | राजेश घासकडवी

असंच म्हणतो. हृद्य आठवण.

संदीप चित्रे's picture

25 Apr 2010 - 8:39 am | संदीप चित्रे

ह्या भेटीबद्दल आज पहिल्यांदाच वाचलं.
धन्स रे तात्या .

नंदन's picture

25 Apr 2010 - 4:51 pm | नंदन

छान आठवण!

जालावर भटकताना आज नेमका हा व्हिडिओ सापडला -
http://www.youtube.com/watch?v=dQ-gk5lwVo0

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसोबा खेचर's picture

25 Apr 2010 - 5:24 pm | विसोबा खेचर

नंद्याशेठ,

छान व्हिडियो रे.. आशाताई काय ब्वॉ नेहमीच फार्मात असतात..:)

त्या खास सच्याकरता गायल्या हे त्याचं भाग्य!

तात्या.

ht.com/_CuWvXTEA884/S9F1gbNMC0I/AAAAAAAAD8o/72Jl74gzSkI/Wiki.jpg" alt="" />

रेवती's picture

26 Apr 2010 - 6:39 am | रेवती

धन्यवाद हो नंदनभौ!
छान व्हिडिओ आहे. हा सचिन नावाचा प्राणी किती साधा वाटतो....मैदानावर किंवा पार्टीत, कुठेही असो!
तसाच तो विश्वनाथन आनंद्.....अगदी आपल्याच आसपास राहणारे लोक असतात तसा साधा आहे.

रेवती

श्रीराजे's picture

25 Apr 2010 - 5:27 pm | श्रीराजे

छान आठवण सांगितलीत तात्या...! :)

निखिल देशपांडे's picture

26 Apr 2010 - 11:38 am | निखिल देशपांडे

छान आठवण

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

फ्रॅक्चर बंड्या's picture

26 Apr 2010 - 1:17 pm | फ्रॅक्चर बंड्या

भेट दोन आभाळांची, आभाळातच झालेली!

मस्तच ...

binarybandya™

Pain's picture

26 Apr 2010 - 1:23 pm | Pain

काय योगायोग तरी. आम्ही विमानात बसतो तेव्हा कोणी असामान्य व्यक्ती दिसत नाहीत. अरे हो पहीलं म्हणजे "बिझनेस क्लास" मधे जायला पाहीजे.

:)) खरच

आंबोळी's picture

28 Apr 2010 - 9:55 am | आंबोळी

>>काय योगायोग तरी. आम्ही विमानात बसतो तेव्हा कोणी असामान्य व्यक्ती दिसत नाहीत.
सहमत.
नम्हणायला एकदा विशाखापट्टणम वरून मुंबैला येताना हैद्राबादला असामान्य नसला तरी शत्रुघ्न सिन्हा आमच्या विमानात आला होता.
मोठा गॉगल , सुटावर लाल भडक मफलर अश्या वेशात तो विमानात दाखल झाल्यावर मला पहिल्यांदा तो शत्रुघ्न चा डुप्लिकेटच वाटला.
त्याला बघुन विमानात एकदम गडबड सुरू झाली. मला एकदम "खामोश....." म्हणून ओरडाव अस वाटत होत.

--आंबोळी

स्वाती दिनेश's picture

26 Apr 2010 - 4:12 pm | स्वाती दिनेश

भेट दोन आभाळांची, आभाळातच झालेली!
हे खासच..
आठवण मांडण्यातला समयोचितपणा आवडला.
स्वाती

विशाल कुलकर्णी's picture

27 Apr 2010 - 11:59 am | विशाल कुलकर्णी

खुप छान आणि औचित्यपुर्ण लेख. धन्यवाद तात्या ! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

स्वाती२'s picture

27 Apr 2010 - 10:29 pm | स्वाती२

धन्यवाद तात्या.