इंटरव्यु - इंटरव्यु

टारझन's picture
टारझन in जनातलं, मनातलं
21 Apr 2010 - 12:41 am

णमस्कार्स लोक्स ,

प्रत्येक नोकरी करणार्‍याला न चुकलेलं एक चक्र म्हणजे इंटरव्यु (कोण चोच्या मुलाखत म्हणाला रे ? ही काय टिव्ही वर दाखवायची गोष्ट आहे का ? ) असो. इंजिनियरींग मधे जसा फायनल इयरला आलो तसे इंटरव्यु चे वेध लागलेले. अ‍ॅक्चुअली तेंव्हा व्हायवा किंवा प्रॅक्टिकलच्या वेळेस घेतली जाणारी ओरल ... ह्या गोष्टींना कधी घाबरलो नसलो तरी एक प्रकारचा नर्व्हसनेस माझ्यात असे.

कँपस इंटरव्यु मधे आमच्या पराक्रमांमुळेच बर्‍याच कंपण्यांच्या क्रायटेरियातुन आम्ही बाहेर पडायचो .. तेंव्हा त्याची तर माणसिक तयारी होतीच. पण मग आम्ही फावल्या वेळात लोकांचं निरिक्षण करायचो .. आमच्या बॅचची २०-३० पोरं इंटर्व्यु ला बसायची आणि २-३ सिलेक्ट व्हायची .. न सिलेक्ट झालेल्यांची एकंच ओरड असायची .. पारशॅलिटी केली साल्यांनी .. किंवा मी बरोबर उत्तरं देऊन पण आम्हाला घेतलं नाही ... आणि त्यांचे प्रेमभंग झाल्यासारखी बडबड ऐकुन घ्यायची ... आम्ही टगे ते ऐकुन पोट दाबुन दाबुन हसायचो .. माधेच कोणी ओरडायचा .. "अरे तुझं तोंड नसेल आवडलं त्यांना .. तु तसा गुणीच हो " त्यावर बिचारा अजुन खट्टू व्हायचा. यदाकदाचित कोणत्या कंपनीने ओपन एंट्री अलाऊड केली तर जी झुंबड उडायची आमचा मुड तिथेच गायब व्हायचा. अर्थात प्रिपेरेशन चे कष्ट कोण घेणार ? म्हणुन आम्ही तशाच मख्ख चेहर्‍याने इंटरव्यु ला जायचो .. अ‍ॅप्टिट्युड कधी चुकून तुक्के मारुन क्लियर झालीच .. तर टेक्निकल राऊंड मधे मख्ख चेहर्‍याने बसुन रहायचो . इंटरव्यु घेणारा शेवटी शरणागती पत्करुन "नेक्स्ट" म्हणायचा :) आणि आम्ही पुन्हा कंपनीच्या नावाने शिव्या द्यायला मोकळे .. "अर्रे जाऊ दे रे .. बरं झालं सिलेक्ट नाही झालो ह्या कंपनीत .. साला लै फडतुस कंपनी होती ", "नाय नाय नाय .. ही कंपनी काय आपल्या लायक नाय .. " , "अर्रे आपण तर स्वतःची कंपनी काढणार बॉस .. :) " इत्यादी नेहमीचेच डायलॉग फेकले जायचे .

पास आउट झाल्यावर खर्‍या मजेला सुरुवात झाली ... "फ्रेशर" हा टॅग किती खतरणाक असतो हे कँपस प्लेसमेंट न भेटलेला सहज सांगु शकेल.. कोण्या सकाळी मित्राचा मेसेज येतो .. "आमुक आमुक कंपनी , फलाना फलाना पत्ता.. ९ वाजता " .. तसेच डोळे पुसून अंगावर भरभर पाणी मारुन अंघोळ आटपायची .. कसेबसे दात घासायचे ... आईने तोवर च्या केलेलाच असतो .. त्यातला बळेच एक घोट घेऊन पटकन कपडे चढवुन बुटं घालुन निघायचं ... उशिर झाला असेल का ? सिव्ही ची तर रद्दीच बनवलेली असते .. तिसेक सिव्ही पडिकच असायचे. बर्‍याचदा पत्ता माहित नसायचा. ह्याला त्याला विचारत कंपनी शोधत कँपस दिसला ... की दर्शन होतं ते १-१ किलोमिटर लांब लायनीचं ... च्यामारी इथे काय सिडको च्या घरांचं लॉटरी कुपण विकताहेत का जॉब देताहेत ? प्रश्न पडतो. तसं नंतर नंतर मन ही गोष्ट स्विकारुन अजुन प्रिपेयर करण्याची शक्ती पैदा करतं. जॉब शोध चालु असतांना दिसायला लागले ते परप्रांतिय ... नॉर्थ इंडियाच्या कसल्या पटना,भोपाल्,इत्यादी कसल्या फडतुस युनिव्हर्सिटी तुन आलेलं पब्लिक .. इंजिनियरींचे मार्क्स पाहिले तर ८० न ९० % .. च्यायला आमच्या पुण्याच्या युनिव्हर्सिटीचा टॉपर ७०-७५%च्या वर जात नाय राव ... इकडे सर्रास ८०-९० ? मग कंपण्याही गर्दी पाहुन चला .. ७० च्या खालचे कटाऊट व्हा .. म्हणुन बराचसा लोंढा परतवुन लावायचे :) आता उरलेले लोक कुठले असणार हे सांगायला हवं का ? तेंव्हा राज ठाकरे नव्हता पण परप्रांतियांविशयीचा द्वेष वाढु लागला होता :) कधी कधी पहिल्या तर कधी दुसर्‍या .. तर कधी तिसर्‍या-चौथ्या राऊंड ला बाहेर पडत आम्ही सगळीकडुन रिजेक्शनचा अनुभव मिळवला :) जेंव्हा कधी सिलेक्ट झालो तेंव्हा मात्र ३-३ ऑफर लेटरं हातात होती :)

आताही इंटरव्यु देतो. पण आता इतकं टेंशन नसतं ... आपल्याच स्पेसिफिक डोमेन मधला इंटरव्यु असला की काही एक्स्ट्रा प्रिपेयरही करायचं नसतं. फ्रेशर सारखी गर्दी फक्त पेशव्याच्या कंपण्यांसारखी कंपण्यांमधे असते. मग आमचं काम उरतं ते निरिक्षण करण्याचं ... ही निरिक्षणं दर वेळेस थोड्याफार फरकाने सारखीच असतात. अशा वेळेस आमचे कान आणि डोळे हे दुप्पट क्षमतेनं काम करतात.

सुरुवात होते ते एच्चारकडे सिव्ही सबमिट करण्यापासुन. जॉबला अप्लाय करताना स्किलसेट क्लियरली मेंशन केलेला असुनही काही महाभाग लक आजमावण्यासाठी आलेले असतात. ते नुसते येतंच नाहीत तर ते चक्क एच्चार वाल्या पोरीबरोबर हुज्जतही घालतात. ह्या एच्चारच्या पोरी बहुतांश फार आखिव-रेखिव आणि बोलायला अंमळ लाघवी असतात. तेंव्हा एच्चार हा ही एक कंटाळवाण्या इंटरव्यु प्रोसेस मधे मनोरंजणाचा कार्यक्रम असतो. आम्ही त्याचा पुरेपुर उपयोग करुन घेतो. एकदा एक साऊथ इंडियन इंटरव्यु ला आला होता. इंटरव्यु होते बँकिंग डोमेन मधे अनुभव असलेल्यांसाठी. हे शेड्युल्ड इंटरव्यु होते आणि फक्त इनव्हाईटेड लोकांनाच एंट्रि होती. साऊथ इंडियन भाऊ फार लांबुन आल्याचं बोलंत होते. खंडीभर सिव्ही एकत्र करुन सगळं ऑर्गनाईझ करुन बिचारी एचार सुंदरी थोडी थकुन गेली होती. तिला हा चावत होता ." सी... म्याडमं .. आयं केम फ्राम लांग डिस्टंस .. यु ह्याव टू टेक माय इंटरव्यु" , साऊथी.
एच्चार ने त्याचा एक्स्पिरियंस पाहुन आणि इन्व्हिटेशन मेल नसल्याचे पाहुन आधीच त्याला जायला सांगितलं होतं. भाऊ तरीही खिंड लढवीत होता. "टेक माय इंटर्व्यू .. यु कांट डू धिस टू मी ... आय याम वार्निंग यू .. " ब्ला ब्ला ब्ला ! अचानक भाऊचा पारा वाढला .. आम्ही सगळे त्या दिशेने पहायला लागलो .. साऊथ इंडियनला एचार सुंदरी आता खडे बोल सुनावत होती " यु प्लिज लिव्ह द प्लेस ऑर आय'ल कॉल सिक्योरिटी" आणि शेवटी खरोखर त्याला शिपाई लोक बाहेर घेऊन गेले. जाता जाता भाऊ ने तमिळ्/तेलगु (काय असेल ते) त्या भाषेत काहीतरी अपशब्द वापरले असावेत.

सिव्ही एनरोल केलेल्यांना आत घेऊन एखादा फॉर्म भरायला दिला जातो. आणि नंतर सुरु होतो तो ... वेटिंग वेटिंग वेटिंग चा वेळ. ईंटरव्यु ला बर्‍याच प्रकारचं पब्लिक असतं.
इंटरव्यु देणार्‍यांत एक वर्ग असतो तो गृपने आलेल्या पोरांचा. ही पोरं एकसाथ घोळक्याने इंटरव्यु ला येतात. लॉबी मधे जेंव्हा सगळे वाट पाहात असतात तेंव्हा हा गृप फालतु कमेंट मारणे , पेपरची विमानं करुन भिरकावने किंवा काहीतरी चाठाळ पणा करणे इत्यादी कारणाने बर्‍याच जणांच्या डोक्यात जातो :) यांच्यातल्या कमेंट्स ने खरोखर हे कंपनीत इंटर्व्यु द्यायला आलेत की घ्यायला आलेत ? असा प्रश्न पडतो. "आपण विचारणार बॉ .. कॅरम पुल टीटी आहे का ? तरंच कंपनी जॉइन करु .. नाही तर गेले उडत " असं म्हणत आत गेलेला तो .. येतांना मात्र इंटरव्यु घेणार्‍यानंच उडत लावल्यासारखा येतो. तो आल्या आल्या लगेच त्याचा गृप "ए काय विचारलं ... ए कसा झाला रे इंटरव्यु ?" वगैरे टिपिकल प्रश्नांचा भडिमार करतो. तो काय बोलतो त्याच्याकडे मात्र पुर्ण लॉबीचे कान आतुरतेने लांबले जातात. तोही उगाच काहीबाही फेकतो. ह्या गृप मधलं शक्यतो कोणी सिलेक्ट होत नाही.

दुसरा गृप असतो तो मोठा रेफरंस लागलेल्यांचा. ह्यांची कॉलर एंट्रि केल्यापासुनंच ताठ असते. भेंडी .. आपला तर आतुनंच जॅक आहे, ही गर्दी कशी येते आणि जाते ? आपण तर मजा बघणार बॉ. ह्यांच्या मते हे इंटर्व्यु आधीच हाय्यर्ड असतात. हे कधीच कोणाशी बोलत नाहीत. आपले कडेला जाऊन रेफरर ला फोन लाऊन मुद्दाम शेजार्‍यांना कळेल अशा टोन मधे सुरू होतात ...
"हं अरे .. आत आलोय बरंका , तुझं नाव लिहीलंय फॉर्म वर रेफरंस कॉलम मधे .. "
" हो हो हो .. तु सांगितलेलं सगळं प्रिपेयर केलंय बघ "
"अरे टेन्शन नाही रे ... आपला आपल्या टॅलेंट वर पुर्ण विश्वास आहे "
"यो डुड .. आय विल गिव्ह यु अ कॉल लॅटर .. थँक्स फॉर अ रेफरंस यार .. व्हाड डिड यु से कोण घेणारे इंटरव्यू ?"
हा किंवा ही फोन वर बोलत असतांना बाकी पोरींचं सगळं लक्ष यांच्याकडेच्च्च लागलेलं असतं ! मनातुन शिव्याशाप ही चालु असावेत असा एक तर्क :)

अजुन एक गृप असतो मराठी पोरींचा (किंव्हा आंटींचा) ! आहाहा ;) ह्यावर तर खंडच्या खंड पडु शकतात. दोन मराठी पोरी... चालु होतात इंग्रजी मिक्स हिंदी मधे . हा संवाद ऐकण्याचं भाग्य मिळालं इथेच इंटरव्यु ची फेरी सफल होते.
"ए यु नो .. मी आत्ता जिथे काम करते ना ? आय अ‍ॅम नॉट अ‍ॅप्रिशियेटेड रे ... "
"ओह या सेम विथ मी नो .. म्हणुन तर मी चेंज करतीये .. "
"आमच्या यांणा नाही आवडत माझी करंट कंपनी.. तिकडची लोकं जाम पॉलीटिक्स करतात "
"अगं माझ्या तर आवती भोवती नुसती गोंडा घोळतात बघ माझ्या करंट कंपनीतली लोकं .. काहीही काम असलं की मीच हवी ह्यांना " ह्या नुकत्याच लग्न झालेल्या आंटी असतात. दोन किलो च्या थैलीत ४ किलो पिठ भरल्यासारखं शरीर. नाक हे भलं मोठं .. केसांत कंगवा घातला की त्याच अँगल मधे उलटा काढला तर ठिक. उंची ५फुटाच्या आजुबाजुला. वेण्या घातलेल्या. पायाच्या टाचांना भरपुर भेगा पडलेल्या. आणि प्लास्टिकच्या आवाज करणार्‍या कॅरिबॅग मधे यांचं अनोखं फोल्डर त्यात ह्यांची डॉक्युमेंट्स. मनात विचार येतो साला .. किती फेकावं ? आवरा हिला कोणी.

" यु नो परवा मी इन्फोसिस ला गेलेले ना तेंव्हा माझ्या लास्ट विक मधे टिसीएस च्या इंटरव्यु च्या वेळेस दिसलेल्या दोन पोरी दिसल्या "
ह्यांना मोठ मोठ्या कंपण्यांची नावं घेण्याची फार हौस होती. एका इंटरव्यु च्या लॉबीत मी एकदा पुण्यातला कॉग्नि,इन्फि,टीसीएस्,विप्रो,अ‍ॅसेंचर्,अ‍ॅम्डॉक्स चं काय .. पण कधीही न ऐकलेल्या पण ह्यांच्या भाषेत खुप मोठ्या असलेल्या कंपण्या एका लाईनीत ऐकल्या होत्या . आणि ह्या २०-२२ कंपण्यांमधे ह्या मुलीने गेल्या १५-२० दिवसांत कसे काय इंटरव्यु दिले असावेत ? असं आश्चर्य वाटुन मी भोवळ यायचाच बाकी राहातो. आणि ह्या बाई कुठे तरी काँट्रॅक्ट बेसवर काम करत असतात :) तेंव्हा मात्र हसु फुटल्या शिवाय राहात नाही.
मधेच कोणाचं कॉसमॅटिक्/ब्युटी टिप्स चं डिस्कशन चालु होतं. मग चेहर्‍यासाठी, केसांसाठी, त्वचेसाठी, नखांसाठीच काय तर अजुन कोणत्या कोणत्या "पार्ट्स" साठी काय काय करावं ? ह्याचं मनमुराद डिस्कशन हे लॉबी मधे चाललेलं असतं. काही पोरी तर नोट्स घेऊन आलेल्या असतात. अगदी शेवटच्या क्षणा पर्यंत त्या वाचत असतात. मला प्रश्न पडतो ... ही नक्की इंटरव्यु ला आलीये की थेरी पेपर द्यायला ?
साधारणतः इंटरव्यु नंतर आपण सिलेक्ट होऊ की न होऊ ह्याची कल्पना आलेली असते. ह्यांनाही येते. मग हळुच रुमालाने डोळे पुसत एकेक कटते. मी म्हणतो .. करंट जॉब असतानाही रडण्याचं काय कारण ? एका इंटरव्यु मधे तर पोरीने कहरंच केला होता.मला वाटलं हीच्या इंटरव्यु घेणार्‍याने मुस्काडात वगैरे वाजवली की काय ? बाहेर आली ती एकदम रडत रडत ... ते मुसु मुसु रडनं ही नाही .. ते पाहुन गृपगॅंग मधला कोणी चिरक्या आवाजात रडण्याचा आवाज काढुन मग त्या कोपर्‍यात हशा ही पिकतो.

सगळे राऊंडस झाल्यानंतर एचार म्हणते .. "वि वील गेट बॅक टू यू ऑन मंडे विद रिझल्ट्स "
आणि इंटरव्यु संपतो. कोणी तिकडुन पिक्चरला जातो .. कोणाची गँग सिंहगडाकडे निघते. कोणी भुकेने कासाविस झालेला असतो तो आधी खायला पळतो. पोरी कधीच गृपने येत वा जात नाहीत. ज्या लॉबी मधे अशा जिवा भावाच्या मैत्रिणींसारख्या बोलत असतात त्याही तोंडाला स्कार्फ गुंडाळुन आपापल्या वाटेने शेप्रेट निघुन जातात .

आमचा इंटरव्यु होतो .. कधी कंपनीला आम्ही पटत नाही .. कधी कंपनी आम्हाला पटत नाही. आम्ही आमच्या वाटेने एकटेच घरी येतो.

एक इंटरव्यु संपतो.

नाट्यप्रतिभा

प्रतिक्रिया

स्वप्निल..'s picture

21 Apr 2010 - 12:52 am | स्वप्निल..

मस्तच रे .. !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Apr 2010 - 12:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेका अनुभव अगदी डोळ्यासमोर उभा केला. वाचायला मजा आली.

>>"ए काय विचारलं ... ए कसा झाला रे इंटरव्यु ?"

बाकी, वरील वाक्याला मरण नाही. कोणतीही मुलाखत असू दे. :)

ज्या लॉबी मधे अशा जिवा भावाच्या मैत्रिणींसारख्या बोलत असतात त्याही तोंडाला स्कार्फ गुंडाळुन आपापल्या वाटेने शेप्रेट निघुन जातात .
आमचा इंटरव्यु होतो .. कधी कंपनीला आम्ही पटत नाही .. कधी कंपनी आम्हाला पटत नाही. आम्ही आमच्या वाटेने एकटेच घरी येतो.
एक इंटरव्यु संपतो.

क्या बात है..! मुलाखतीच्या आठवणीने अंमळ हळवा झालो.
अजून येऊ दे.

-दिलीप बिरुटे

इनोबा म्हणे's picture

21 Apr 2010 - 1:00 am | इनोबा म्हणे

मस्त रे! मजा आली... :)
येऊ दे अजून.

संदीप चित्रे's picture

21 Apr 2010 - 2:00 am | संदीप चित्रे

स्साल फ्रेशरचा टॅग म्हणजे त्रासच असतो --
अनुभव नाही म्हणून नोकरी नाही आणि नोकरी नाही म्हणून अनुभव नाही -- ह्याला दुष्टचक्र हा अत्यंत योग्य शब्द आहे !!

आणि मरायला टेक्नॉलॉजीमधे काम करताना तर दर काही वर्षांनी तुम्ही कुठे ना कुठेतरी 'फ्रेशरच' ठरता !!
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

बेसनलाडू's picture

21 Apr 2010 - 2:13 am | बेसनलाडू

नोकरीसाठीच्या मुलाखतीसमयीचे चित्रमय प्रसंग चांगले उभे केले आहेत.
(अनुभवी)बेसनलाडू

अनामिक's picture

21 Apr 2010 - 2:21 am | अनामिक

मजा आली वाचून... छान लिवलंस!

-अनामिक

मीनल's picture

21 Apr 2010 - 7:43 am | मीनल

छाण लिहिलं आहे रे टा-या.
अरे, पण तू तर जंगलचा राजा. तूझा घ्यावी तर मुलाखतच !
" आज आपल्याकडे जंगलचे राजे आले आहेत. श्री. टारझन.
तुम्हाला यांची ओळख करून द्यायची मला आवश्यकता वाटत नाही.आपण सर्वजण यांना चांगलेच ओळखतो.
तर आता आपण अधिक माहिती करून घेऊ यांच्याबद्ल.सॉरी हं ! यांच्याकडून तिथल्या इतर प्राण्यांची अधिक माहिती करून घेऊ. त्यांना तिथला हाल हवाल विचारू. ते आपल्याला आखो देखा हाल सांगतील.
नमस्कार श्री. टारझन . आता आम्हाला सांगा की ....."
"कंपणीतल्या :SS कंपणकारी इंटरव्युची ऐशी की तैशी!!!

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

चतुरंग's picture

21 Apr 2010 - 3:06 am | चतुरंग

एकदम टार्‍या पेश्शल लेख!
>>टाचांना भरपूर भेगा पडलेल्या>>
हे वाक्य काळजाला जामच भिडले! ;) काय निरीक्षण आहे!! :?

(पहिल्या नोकरीच्या वेळी मला एक मायक्रोप्रोसेसर किट दिलं (त्यावेळी इंटेल ८०८५ फारच प्रसिद्ध होता) आणि रिअल टाईम क्लॉकचा प्रोग्रॅम येतो का म्हणून विचारले. त्यावेळी आम्हाला इंस्ट्रक्शन टेबलच काय पण न्यूमॉनिक्सही पाठ होते त्यामुळे मी थेट किटवर कोडिंगलाच सुरुवात केली. साधारण दहा मिनिटात मी प्रोग्रॅम चालवून दाखवला आणि त्याने ऑफर लेटरच हातात ठेवले!
त्यानंतर कित्येक वर्षांनी इंटरव्यू मधे एका थोर प्राण्यानं पहिलाच प्रश्न मला विचारला "विमान कसं उडतं हे माहीत आहे का?" एक क्षण थबकलोच, म्हटलं चुकीच्या जागी आलो का काय?
कागद पेन्सिल मागून घेतली विमानाच्या पंखाचा क्रॉससेक्शन काढताच त्याला उत्तर मिळालं होतं! पुढचे दोन प्रश्न पगाराची अपेक्षा आणि स्वतःचे वाहन आहे का असे होते, नोकरी माझी होती पण मग मला दुसरी त्याहून चांगली ऑफर आल्याने मी तिकडे गेलो.)

चतुरंग

संदीप चित्रे's picture

22 Apr 2010 - 1:39 am | संदीप चित्रे

मी 'अधांतरी' हे उत्तर देऊन आलो असतो ;)
च्यायला म्हणूनच बहुतेक तुमच्यासारखी डोकेबाज कामं (उदा. बुद्धिबळ) जमता नाय आपल्याला :)

चतुरंग's picture

22 Apr 2010 - 2:08 am | चतुरंग

कपॅसिटर मधून अल्टरनेटिंग करंट कसा पास होतो ह्या माझ्या प्रश्नाचे उत्तर एका विद्यार्थ्याने खालील चित्र काढून दिले होते! B)

मी त्याच्या कल्पकतेबद्दल त्याला पूर्ण मार्क दिले! :)

(मास्तर)चतुरंग

झकासराव's picture

22 Apr 2010 - 12:05 pm | झकासराव

=)) =)) =))

दिपक's picture

22 Apr 2010 - 12:32 pm | दिपक

=)) =)) =))

टार्‍याचा लेख एकदम झकास..

मुक्तसुनीत's picture

21 Apr 2010 - 3:24 am | मुक्तसुनीत

टारुभाऊ,
एकदम भारी लिखाण ! सगळ्यात आवडलेला भाग : उमेदवारीच्या वर्षांमधल्या टक्क्याटोणप्यांनी, अनिश्चिततेने विनोदबुद्धीवर कुठे मात केलेली दिसत नाही. उमेदवाराच्या दृष्टीने केलेली एकेक निरीक्षणे इरसाल , एकदम धमाल.

शेवटी काय , "आतले नि बाहेरचे" सर्वत्र असणार. नोकरी मिळण्याची, घर बांधण्याची , प्रिय व्यक्तीबरोबर आयुष्य घालवण्याची - (आणि कालपरत्वे आणखी प्रिय व्यक्तींना या जगात आणण्याची ! ;-) ) उमेद सर्वानाच आहे. इसी उम्मीदपर तो दुनिया कायम है !(सॉरी , दूष्ट परप्रांतीयांच्या" भाषेत बोललो जरा ! )

लगे रहो टारु.

II विकास II's picture

21 Apr 2010 - 12:00 pm | II विकास II

>>(आणि कालपरत्वे आणखी प्रिय व्यक्तींना या जगात आणण्याची ! Wink )
==)) ==))

प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

अमोल नागपूरकर's picture

21 Apr 2010 - 12:28 pm | अमोल नागपूरकर

सहमत.

चित्रा's picture

21 Apr 2010 - 4:19 am | चित्रा

टारझन स्टाईल.
बाकी, 'आंटीं'कडे एवढे लक्ष कशाला?

मिसळभोक्ता's picture

21 Apr 2010 - 8:44 am | मिसळभोक्ता

चित्रा वैनी,

एकदा टारूबाळाचा फटू बघा. दोन किलोच्या पिशवीत सहा किलो भरलेत. त्याचं चार किलो वाल्या आंटीकडे लक्श नाही गेलं तर मग कुणाकडे ?

पण सीरीयसली, टार्‍या, छान लिहिलंस.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

टारझन's picture

21 Apr 2010 - 2:28 pm | टारझन

=)) =)) ... आहो आम्ही आठ किलोच्या पिषवीत १२ किलो आहोत ... :)

बड्या बड्या आसामींच्या कमेंट्स मुळे हायसं वाटलं ... लेख लिहुन झाल्यावर पुन्हा वाचायची डेरिंग झाली नव्हती.

धाग्यावर प्रतिक्रिया देणार्‍याचे आभार , आणि फक्त प्रतिक्रियांवर प्रतिक्रिया देणार्‍यांचे हार्दिक आभार .

-(आम्ही १२ चे) टारझन

प्रभो's picture

21 Apr 2010 - 7:21 am | प्रभो

हॅहॅहॅ..लै भारी रे टार्‍या....
साला पहिल्या जॉबसाठी केलेली भटकंती आठवली.. आता दुसरा जॉब शोधतोय... :)

रेवती's picture

21 Apr 2010 - 7:25 am | रेवती

तू कधी मिटिंग घेतोस तर कधी इंटरव्ह्यू!
लेखन आवडले. लगे रहो!

रेवती

प्राजु's picture

21 Apr 2010 - 7:47 am | प्राजु

गुड ऑब्झर्वेशन!!
खूप छान लिहिलं आहेस.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

निखिल देशपांडे's picture

21 Apr 2010 - 9:49 am | निखिल देशपांडे

टारझन राव..
एकदम भारी लेख..
तुमची निरिक्षण शक्ती जबरदस्त आहे...
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

आंबोळी's picture

21 Apr 2010 - 10:20 am | आंबोळी

टार्‍या,
लै जबर्‍या लिहिलय्स.....
सध्या इंटर्व्ह्यु देत असल्याने एकदम पटलच बघ काय लिहिलय्स ते....

( ™ )आंबोळी

झकासराव's picture

21 Apr 2010 - 11:24 am | झकासराव

भारी लिवलस. :)
आम्ही वाचलो लेका.
एक तर नुसताच डिप्लोमा, त्यातन आम्ही भोंगेवाले गिरणी कामगार, त्यातुन कोल्हापुरसारख्या छोट्या शहरातुन आणि कुंपणी फक्त एकच कॅंपसला (शिवाय २००१ साली हालच होते) फारतर ६ जण सिलेक्ट व्हायचे. जे झाले ते झाले.
जे नाही झाले त्याना बराच स्ट्रगल करावा लागला.दोन तीन वर्ष त्यांचे हाल झाले.

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Apr 2010 - 11:36 am | बिपिन कार्यकर्ते

छानच लिहिलंयस रे... असंच लिहित जा नेहमी. तुझी निरिक्षणशक्ती आणि त्यामधून गंमतीदार निष्कर्ष काढायची सवय मस्तच आहे. म्हणूनच असं लिहू शकतोस.

माझ्याबद्दल बोलायचे तर 'मी परिक्षेला आलो आहे आणि पेपर समोर पडलाय आणि मी ब्लँक झालो आहे' आणि 'मी इन्टर्व्ह्युला चाललो आहे' ही दोन माझी नेहमीची अगदी ठरलेली भितीदायक स्वप्नं आहेत.

बिपिन कार्यकर्ते

II विकास II's picture

21 Apr 2010 - 11:59 am | II विकास II

परीक्षेची स्वप्ने आमची साधी होती.
जो भाग ऑप्शनला टाकला आहे, त्यावरचा जास्त प्रश्न आलेत. अशीच काही.

एकदा अबियात्रीकीत ३ सत्रात, ४ सत्रातील ASOMचा चुकुन अभ्यास करुन गेलोय असे झालेय.
असो

विशाल कुलकर्णी's picture

22 Apr 2010 - 12:20 pm | विशाल कुलकर्णी

बिकाभाऊंशी सहमत !

आमाला तं अजुनबी सपान पडतं. परिक्शेला म्हून जातो आन ते हॉल तिकट इसरलेलो असतो, कंदी लै उशीरा पोचतो.. तर कंदी बापसाचा मार खात असतू नापास का झाल म्हुन... ;-)

दुसरं सपान म्हंजी इंटर्वुला जातू आन काय शिकलो त्येच आटवत नाय ऐन येळेला. ;-)

(बाकी टारोबा तुमीबी बरं लिवताय आजकाल >:) )

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

मितभाषी's picture

21 Apr 2010 - 11:54 am | मितभाषी

>>>>>>नॉर्थ इंडियाच्या कसल्या पटना,भोपाल्,इत्यादी कसल्या फडतुस युनिव्हर्सिटी तुन आलेलं पब्लिक .. इंजिनियरींचे मार्क्स पाहिले तर ८० न ९० %<<<<<<<<<<

>>>>>>>पायाच्या टाचांना भरपुर भेगा पडलेल्या. आणि प्लास्टिकच्या आवाज करणार्‍या कॅरिबॅग मधे यांचं अनोखं फोल्डर त्यात ह्यांची डॉक्य>>>>>>>

टार्‍या निरिक्षण लै भारी.
एकदम फर्मास लेख. आवडला.

(इंटरव्यु म्हणताच थरकाप होणारा) भावश्या

पिंगू's picture

21 Apr 2010 - 1:38 pm | पिंगू

टार्‍याबुवानां मानलं निरिक्षणच्या बाबत !!!!!!!!!
एक अफलातून मिसळ interviewची...... :))

परिकथेतील राजकुमार's picture

21 Apr 2010 - 1:57 pm | परिकथेतील राजकुमार

टार्‍या नेहमीप्रमाणेच ज ह ब र्‍या लेखन रे ! काही काही वाक्य खासच.

असले अनुभव कधीच घेतले नाहीत पण वाचताना डोळ्यापुढे एकेक प्रसंग मस्त उभे राहिले.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

चिरोटा's picture

21 Apr 2010 - 2:26 pm | चिरोटा

मस्त लेख.ह्या अशा अनुभवांतून गेल्याने चित्र डोळ्यासमोरच आले.फ्रेशर असताना एकदा सी.वी.च्या मोजून ३२ कॉप्या सीप्झमध्ये अनेक कंपन्यांत टाकून आलो होतो.
भेंडी
P = NP

अस्मी's picture

21 Apr 2010 - 3:03 pm | अस्मी

मस्त लेख...निरीक्षण लई भारी

ह्या एच्चारच्या पोरी बहुतांश फार आखिव-रेखिव आणि बोलायला अंमळ लाघवी असतात. तेंव्हा एच्चार हा ही एक कंटाळवाण्या इंटरव्यु प्रोसेस मधे मनोरंजणाचा कार्यक्रम असतो.

:S 8| :S

- अस्मिता

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.

अक्षय पुर्णपात्रे's picture

22 Apr 2010 - 12:42 am | अक्षय पुर्णपात्रे

मजेदार लेख. आवडला.
(मुलींबाबत हा एकांगी विचार का करतो कोण जाणे? )

भोचक's picture

22 Apr 2010 - 7:15 pm | भोचक

'एकांगी' विचार?
अक्षय, अहो, 'अनेकांगी' आहे, की एकीच्याच अंगाबद्दल त्याने काही लिहिलं नाहीये.(ह.घ्या.) बाकी टार्‍या लेख भारी. निरिक्षण उच्च.

(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव

अक्षय पुर्णपात्रे's picture

22 Apr 2010 - 9:51 pm | अक्षय पुर्णपात्रे

खरे आहे. बर्‍याच अंगांची चर्चा केली आहे.

इंटरनेटस्नेही's picture

22 Apr 2010 - 12:54 am | इंटरनेटस्नेही

उत्तम!

भडकमकर मास्तर's picture

22 Apr 2010 - 1:12 am | भडकमकर मास्तर

टार्‍या, लेख मस्त जमलाय ...
झकास..
असंच लिहित जा रे ....

स्पंदना's picture

22 Apr 2010 - 11:59 am | स्पंदना

नेहमी सारखच झकास!! बाय द वे ... फक्त मराठी मुलिन्च्याच टाचा फुटलेल्या असतात का? नाही नीरिक्शण जबरदस्त आहे म्हणुन विचारल. जाउ दे!!!
इतक ओघवत आणि रसाळ, आणि ते ही रोजच्या गोष्टीन बद्दल !! सुन्दर.
इतक्या सार् या नी लिहिल्या वर जास्त काही लिहिण थोड अवघड!
पन आपुन तुमको कायम पढताय.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

टारझन's picture

22 Apr 2010 - 12:20 pm | टारझन

फक्त मराठी मुलिन्च्याच टाचा फुटलेल्या असतात का?

योगायोग हो :) जर रोम मधे इंटर्व्यु ला गेलो असतो तर कदाचित रोमन आंटीच्या टाचा दिसण्याची जाम शक्यता होती :)

बाकी प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद :)

- टारेश भेगाबुजवी

टारझनच्या हातात काशाची वाटी आणि कैलाश जीवन.
रोमन आंटीच्या टाचांना कैलाश जीवन लावण्याचा पोग्राम .
आहाहा! पाठीला साबण लावणार्‍यांच्या प्रदेशाचा अनुभव असलेल्यांनी हा प्रांतही हाताळून बघायला हरकत नाही.

श्रावण मोडक's picture

23 Apr 2010 - 11:38 am | श्रावण मोडक

=))

टारझन's picture

23 Apr 2010 - 10:09 pm | टारझन

रोमन आंटीच्या टाचांना कैलाश जीवन लावण्याचा पोग्राम .

केवळ विचारांनीच ,, अंगावर रोमांच उठले ... :)

बाकी रामदासांनी लेखावर एकही टिपण्णी न करता थेट कैलासजिवन लावाल्यामुळे एक होतकरु लेखक म्हणुन कोदा फिलींग आली. :)

- रोमदास

नंदन's picture

22 Apr 2010 - 12:29 pm | नंदन

लेख आणि निरीक्षणं.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

घाटावरचे भट's picture

22 Apr 2010 - 5:08 pm | घाटावरचे भट

सहमत. जियो टारूशेठ!

स्वाती दिनेश's picture

22 Apr 2010 - 5:22 pm | स्वाती दिनेश

मस्त रे टारु,
स्वाती

श्रावण मोडक's picture

22 Apr 2010 - 6:55 pm | श्रावण मोडक

मस्त लेख वगैरे वरच्या सर्व प्रतिसादांशी सहमत.
असेच लेखन चालू राहण्यासाठी काय करावे लागेल? इथं अनेकांनी असंच लिहित रहा, असं म्हटलं आहे ते या महाभागाच्या डोक्यात शिरेल तर खरं. नाही तर आहेच, मधूनच असा छान लेख लिहून मग पुन्हा एकदा टवाळक्या करायला मोकळा. टवाळक्या आणि असे लेखन यांचे व्यस्त प्रमाण बदलेल तर तो टारझन कसला!!!

टारझन's picture

22 Apr 2010 - 9:44 pm | टारझन

हा हा हा ... हे मात्र खरं आहे बरका मोडक साहेब :) तरी बरं आपण लोक आहात म्हणुन थोडा (?) कंट्रोल मधे आहे ... :)

-(गाड्याचा बैल) टारसांड

धनंजय's picture

25 Apr 2010 - 1:08 am | धनंजय

अभिवाचन केल्यास लेख श्रवणीय असावा, असे वाटते.

टारझननी ध्वनिमुद्रित करावा, अशी विनंती.

प्रमोद देव's picture

25 Apr 2010 - 10:49 am | प्रमोद देव

धनंजयांशी सहमत.

टारूशेठ, लेख वर आणण्यासाठी हा प्रतिसाद बरं का. ;)

स्वाती२'s picture

22 Apr 2010 - 11:32 pm | स्वाती२

लेख आवडला.

विंजिनेर's picture

23 Apr 2010 - 9:49 am | विंजिनेर

ह्मम्म्म... वेगळे अनुभव आहेत खरे. :)

बाकी Yahoo! आणि Google इ. च्या इंटरव्युला असं काही नसतं ब्वॉ...
एक तुम्ही असता आणि एक लॅपटॉप असतो. सुरुवातीला एक पोरगेलासा इंजिनियर येतो हाय-हॅलो करतो आणि लॅपटॉप मधे लॉगईन करून निघून जातो.

इंटरव्युच्या १० फेर्‍यांना प्रत्येकी एक असे १० प्रोग्रॅम करायचे.
ज्या फेरीत अडेल त्या फेरीनंतर घरी जायचं :) .
टिकलात तर लगेच ऑफर लेटर हातात मिळतं :)
इंटरव्यु कालावधी - १० तास फक्त :)

निस्का's picture

24 Apr 2010 - 10:41 pm | निस्का

त्याला work-sample टेस्ट असे म्हणतात. :B
नि...

Pain's picture

23 Apr 2010 - 11:53 am | Pain

अजुन एक गृप असतो मराठी पोरींचा (किंव्हा आंटींचा) ! आहाहा ह्यावर तर खंडच्या खंड पडु शकतात. दोन मराठी पोरी... चालु होतात इंग्रजी मिक्स हिंदी मधे

=)) =)) =))

रानी १३'s picture

23 Apr 2010 - 11:58 am | रानी १३

काय सही लिहिलय!!!! आरपार गेला बाण्........इंटरव्यु अणि आम्अच कधि जमला नाय्...बाकी नेहमी सारखच झकास!!

माउली's picture

23 Apr 2010 - 3:27 pm | माउली

छान आहे लेख..

धमाल मुलगा's picture

23 Apr 2010 - 4:48 pm | धमाल मुलगा

टार्‍या साल्या,
खरं तर लेखाची सुरुवात - कँपस आणि पास झाल्यानंतरची वणवण वाचली आणी सालं परत भूतकाळात गेलो. :(

पण साला तुला एक सांगु प्रामाणिक मत? कँपसमधुन नोकरी मिळवलेल्यांचा आणी धडपड करुन, छोट्या कंपन्यातुन सुरुवात करुन प्रगती करणार्‍यांच्यात फार मोठा फरक जाणवतो मला. (स्वतः बरेच इंटर्व्ह्यु जी अनुभवाची अट असते त्यापेक्षा कमी असुनही मी स्वतः पास केल्यामुळं, आणि ४-४, ६-६ वर्षं अनुभव असणार्‍यांना स्वतःचा अनुभव २-२.५ वर्षं असताना बिनधास्त कॉर्पोरेट ट्रेनिंग्जमध्ये सांभाळलेलं असल्यामुळे निदान माझं तरी वैयक्तिक मत असे आहे.)

बाकी, निरिक्षणं म्हणजे... =)) =)) =))

- (इंटरव्ह्युला वाट पाहता पाहता बरेच मित्र जमवलेला) ध.

टिउ's picture

24 Apr 2010 - 9:55 pm | टिउ

फालतु धागे पहिल्या पानावर आले आणी असले चांगले धागे मागच्या पानावर गेले होते म्हणुन प्रतिक्रिया देउन धागा वर आणलाय...
नवीन लोकांना असे लेख आल्या आल्या वाचायला मिळाले तर ते परत यायचा विचार करतील...वैयक्तीक आकसापोटी काढलेल्या धाग्यांमधे नवीन लोकांना तर नाहीच पण बर्‍याच जुन्या लोकांनासुद्धा 'काडीचाही रस' नसावा असे वाटते...

असो, ज्याची त्याची समज, जाण, 'मोटीव्ह' वै...

मी-सौरभ's picture

25 Apr 2010 - 12:03 am | मी-सौरभ

-----
सौरभ :)

जेन's picture

25 Apr 2010 - 12:39 am | जेन

खूप खूप छान लिहीलेत.......
एकदमच मनाचा बोललात.....
मलाही पहिला इंटरव्यू आठवला.....
छानच.!!!!!

टारझन's picture

25 Apr 2010 - 1:03 am | टारझन

धन्यवाद म्याडम :)

मलाही पहिला इंटरव्यू आठवला.....

हाहाहा!! तुम्ही काय बाबा , कँपस मधेच मोठ्या कंपनीत लागलेली हुशार लोकं :)

डॉ.प्रसाद दाढे's picture

25 Apr 2010 - 11:57 am | डॉ.प्रसाद दाढे

टारूशेट लेख आवडला. आपल्याला तर काय तुझी ल्ह्यायची ष्टाईलच फार आवडते.
बाकी आमच्या कार्यक्षेत्रात इंटरव्ह्यू वगैरे प्रकार फार नसतो अन त्यातून इंजिनियरिंग मधले काहीच (अचूक शब्दाचा मोह कष्टाने टाळला आहे) कळत नाही त्यामुळे बारकावे कळले नाहीत ते एक असो.

एकलव्य's picture

26 Apr 2010 - 5:27 am | एकलव्य

मस्तच रे टारझना... दिल खुष हुआ! चीअर्स - अंगठाबहाद्दर