काथ्या आणि कूट...

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in काथ्याकूट
19 Apr 2010 - 3:44 pm
गाभा: 

विनोदाला कोणत्याही शब्दाचं वावडं नसतं. काथ्या म्हणजे काय असा कूट प्रश्न आजच्या पिढीला पडणं साहजिकच आहे. कारण काथ्या कशापासून बनवतात, कशासाठी वापरतात? हे काही शालेय पुस्तकात लिहिलेले नाही. नायलॉन दोऱ्‍या वापरात असल्याने काथ्या प्रकार इतिहास कालीन चीज झाली आहे.
नारळाच्या रखरखीत धाग्यांना वळून काथ्या करतात. त्या पासून कासरा बनवतात. कासरा काय किँवा सासरा काय, दोन्हीही लगाम लावणारे म्हणून परिचित. कासरा ओढला की वासराचे बेफाम हुंदडणे थांबते आणि सासरा गरजला की सून किँवा जावई थबकतो! काथ्याचा आणखी एक 'उपेग' सासऱ्‍याच्या 'बा'ला माहिती होता...
काथ्याचा कूट करून चिलमीच्या तोँडात दाबायचा अन् तो बोळा शिलगावून असा काही झुरका मारायचा की त्याचे डोळे तांबरून तो अल्लाद उचलला जायचा थेट वरपर्यँत नारळाच्या शेँड्यापत्तुर पोचून त्याचा जीव कापसावानी हल्लक व्हायचा! कुठे कापूस अन् कुठे काथ्या? परंतु खरखरीत मार्गानेच ती मुलायम वाट गवसायची.
आता राहिला कूटाचा प्रश्न. कूटाचा प्रश्न गृहिणीपुढे उभा ठाकला की कालवणाचं फुळ्ळुक पाणी व्हायला वेळ लागत नाही! कूट टाकल्याशिवाय जशी भाजी मार्गी लागत नाही तसेच कूट प्रश्न सोडवल्याशिवाय स्वयंवर जिँकता यात नाही. कुटाचा प्रश्न केला काय किंवा प्रश्नाचा कूट केला काय, घरीही अन् दारीही महिलावर्गाची राजीखुशी महत्त्वाची असते.
म्हणून कितीही काथ्या कुटला तरी त्याने कुटाचा प्रश्न थोडाच सुटेल? हा आणखी एक कूटप्रश्न होईल!

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

19 Apr 2010 - 3:51 pm | चिरोटा

श्री. नितिन थत्ते ह्यावर अधिक सांगु शकतील. ते पूर्वी काथ्या उत्तम कुटुन द्यायचे(त्यांच्या स्वा़क्षरीत तरी!!)
भेंडी
P = NP

टारझन's picture

19 Apr 2010 - 11:15 pm | टारझन

येस्स !! फॉर्मर खराटा उत्तम काथ्या कुटुन द्यायचे :) छोटासा लेख जबराच !

- चोंगेश काथ्याकुटवी

नितिन थत्ते's picture

20 Apr 2010 - 10:47 am | नितिन थत्ते

हल्ली खराटा टाकून दिल्यामुळे काथ्या कुटायला लागत नाही. :)

नितिन थत्ते

धमाल मुलगा's picture

19 Apr 2010 - 4:02 pm | धमाल मुलगा

वा डॉक्टर वा!
लै भारी.

कासरा काय किँवा सासरा काय, दोन्हीही लगाम लावणारे म्हणून परिचित. कासरा ओढला की वासराचे बेफाम हुंदडणे थांबते आणि सासरा गरजला की सून किँवा जावई थबकतो!

=)) =)) =))
लै भारी. पण वाक्याचा उत्तरार्ध अंमळ काथ्याच्याच काळचा नाही हो वाटत?

काथ्याचा कूट करून चिलमीच्या तोँडात दाबायचा अन् तो बोळा शिलगावून असा काही झुरका मारायचा की त्याचे डोळे तांबरून तो अल्लाद उचलला जायचा थेट वरपर्यँत नारळाच्या शेँड्यापत्तुर पोचून त्याचा जीव कापसावानी हल्लक व्हायचा!

हा हा हा!!
खरंय! बऽऽम्म भोले!!!

इनोबा म्हणे's picture

19 Apr 2010 - 4:17 pm | इनोबा म्हणे

काथ्याचा कूट करून चिलमीच्या तोँडात दाबायचा अन् तो बोळा शिलगावून असा काही झुरका मारायचा की त्याचे डोळे तांबरून तो अल्लाद उचलला जायचा थेट वरपर्यँत नारळाच्या शेँड्यापत्तुर पोचून त्याचा जीव कापसावानी हल्लक व्हायचा!

हा हा हा!!
खरंय! बऽऽम्म भोले!!!

चिलमीच्या आठवणीने अंमळ हळवा झालो.

शुचि's picture

19 Apr 2010 - 7:11 pm | शुचि

>> घरीही अन् दारीही महिलावर्गाची राजीखुशी महत्त्वाची असते. >> =D>

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अ‍ॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.

तिमा's picture

19 Apr 2010 - 7:55 pm | तिमा

तुमच्या या लिखाणात मला विआ बुवांशी साम्य दिसते. ते पण अशा शाब्दिक कोट्या करण्यात प्रवीण होते.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

राजेश घासकडवी's picture

19 Apr 2010 - 11:11 pm | राजेश घासकडवी

बाकी काथ्याची किक् लागते हे माहीत नव्हतं... की तो तंबाखूवर पटकन् जळण्यासाठी टाकत? लेखातनं नीट कळलं नाही...

इनोबा म्हणे's picture

19 Apr 2010 - 11:15 pm | इनोबा म्हणे

काय हे गुर्जी? तुमी चिलीम पेटवली नाय का कधी?

की तो तंबाखूवर पटकन् जळण्यासाठी टाकत
हे कसं बरोबर बोललात.