काथ्या आणि कूट...
विनोदाला कोणत्याही शब्दाचं वावडं नसतं. काथ्या म्हणजे काय असा कूट प्रश्न आजच्या पिढीला पडणं साहजिकच आहे. कारण काथ्या कशापासून बनवतात, कशासाठी वापरतात? हे काही शालेय पुस्तकात लिहिलेले नाही. नायलॉन दोऱ्या वापरात असल्याने काथ्या प्रकार इतिहास कालीन चीज झाली आहे.
नारळाच्या रखरखीत धाग्यांना वळून काथ्या करतात. त्या पासून कासरा बनवतात. कासरा काय किँवा सासरा काय, दोन्हीही लगाम लावणारे म्हणून परिचित. कासरा ओढला की वासराचे बेफाम हुंदडणे थांबते आणि सासरा गरजला की सून किँवा जावई थबकतो! काथ्याचा आणखी एक 'उपेग' सासऱ्याच्या 'बा'ला माहिती होता...
काथ्याचा कूट करून चिलमीच्या तोँडात दाबायचा अन् तो बोळा शिलगावून असा काही झुरका मारायचा की त्याचे डोळे तांबरून तो अल्लाद उचलला जायचा थेट वरपर्यँत नारळाच्या शेँड्यापत्तुर पोचून त्याचा जीव कापसावानी हल्लक व्हायचा! कुठे कापूस अन् कुठे काथ्या? परंतु खरखरीत मार्गानेच ती मुलायम वाट गवसायची.
आता राहिला कूटाचा प्रश्न. कूटाचा प्रश्न गृहिणीपुढे उभा ठाकला की कालवणाचं फुळ्ळुक पाणी व्हायला वेळ लागत नाही! कूट टाकल्याशिवाय जशी भाजी मार्गी लागत नाही तसेच कूट प्रश्न सोडवल्याशिवाय स्वयंवर जिँकता यात नाही. कुटाचा प्रश्न केला काय किंवा प्रश्नाचा कूट केला काय, घरीही अन् दारीही महिलावर्गाची राजीखुशी महत्त्वाची असते.
म्हणून कितीही काथ्या कुटला तरी त्याने कुटाचा प्रश्न थोडाच सुटेल? हा आणखी एक कूटप्रश्न होईल!
वाचने
2799
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
चांगला माहिती
In reply to चांगला माहिती by चिरोटा
+१
In reply to +१ by टारझन
हल्ली
हा हा हा...
In reply to हा हा हा... by धमाल मुलगा
काथ्याचा
>> घरीही अन्
विआ
छान शब्दखेळ...
In reply to छान शब्दखेळ... by राजेश घासकडवी
काय हे