वसंतागमनाचा पहिला दिवस नक्की कोणता?

चतुरंग's picture
चतुरंग in काथ्याकूट
21 Mar 2008 - 1:37 am
गाभा: 

माझ्या माहितीप्रमाणे (भूगोलाच्या पुस्तकात शिकल्यानुसार) २१ मार्च हा 'वसंतसंपात' दिन आहे. म्हणजे ह्या दिवशी सूर्य उत्तरायणातून प्रवास करताना संपात बिंदूतून जातो ह्या दिवशी १२ तासाचा दिवस आणि १२ तासाची रात्र असते. (असाच संपात योग पुन्हा 'शरदसंपात' म्हणून २१ (की २२?) सप्टेंबर रोजी असतो).
तेव्हा २१ मार्च हाच वसंतागमनाचा प्रथम दिवस हवा.
शंका घेण्याचे कारण असे की 'गूगल' संकेतस्थळावर आज (२० मार्च) 'फर्स्ट डे ऑफ स्प्रिंग' असे दाखविले आहे.
तेव्हा जाणकारांनी अधिक विवेचन करावे ह्या हेतूने ही चर्चा.

प्रतिक्रिया

नंदन's picture

21 Mar 2008 - 1:54 am | नंदन

या दुव्यावर दिलेल्या माहितीप्रमाणे संपातबिंदू २० किंवा २१ मार्चला येऊ शकतो. शाळेतल्या पुस्तकांत २१ मार्च ही तारीख दिलेली मलाही आठवते, पण गेली तीन वर्षे संपातबिंदू २० तारखेला येतो आहे, असं दिसतंय

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

धनंजय's picture

21 Mar 2008 - 2:39 am | धनंजय

"प्रिसेशन ऑफ एक्विनॉक्स"चे भारतीय ज्योतिषशास्त्रातले नाव सांगू शकतील. संपात बिंदू दर ७०-७१ वर्षांत एक दिवस मागे जातो.

पृथ्वीचे स्वतःच्या आसाभोवतीचे डोलणे घडल्याने (७०-७१ वर्षांचे अर्धे आंदोलन)एक दिवस कमी मग पुन्हा एक दिवस जास्त असा तो संपात बिंदू हेलकावत रहातो....असे काहीसे वाचल्याचे स्मरते...

चतुरंग

धनंजय's picture

21 Mar 2008 - 9:12 pm | धनंजय

पण ७०-७१ वर्षांत मागेच. मागे जात जात २५,७६५ वर्षांत संपातबिंदू पूर्वपदाला येतो. वैदिक काळात संपात बिंदू १-२ नक्षत्रे पुढे येत असे. (आजकालच्या फाल्गुन-चैत्राऐवजी पूर्वी चैत्र-वैशाखात.)
किंवा जसे खाली "ज्योतिर्वैभव"मध्ये दिले आहे तसे म्हणता येईल : पूर्वी संपातबिंदू मेष-राशीत येई, आजकाल तो मीन-राशीत येते. हा बिंदू मात्र मुळीच मागे-पुढे होत नाही - मागेमागेच जातो.

चतुरंग

सुधीर कांदळकर's picture

21 Mar 2008 - 7:11 pm | सुधीर कांदळकर

धन्यवाद.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

प्रकाश घाटपांडे's picture

21 Mar 2008 - 7:39 pm | प्रकाश घाटपांडे

precession of equinox याला परांचन हा भारतीय ज्योतिषातला प्रतिशब्द आहे. याचे श्रेय हे बाळशास्त्री जांभेकरांना जाते.
Picture 130
२१ मार्च व २३ सप्टेंबरला विषुव दिन समान दिवस समान रात्र. २१ मार्च ला (भासमान) सुर्य हा वसंत संपात बिंदुशी येतो तर २३ सप्टेंबरला तो शरद संपात बिंदुशी जातो

प्रकाश घाटपांडे

माहिती खरोखरच अत्यंत छान आहे. शतशः धन्यवाद!!
दुसर्‍या पानावर दिलेला दॄष्टांत "जात्यांतले दळण संपले म्हणजे त्याची वरची तळी किंचित् तिरपी करुन जागच्या जागी फिरवावी.." केवढा सुंदर आहे!!
अशा मनोरंजक पध्दतीने भूगोल शिकता आला तर काय बहार येईल!!

(अवांतर - 'ज्योतिर्वैभव' हे पुस्तक अजूनही बाजारात उपलब्ध आहे का? चित्रात दाखविलेली प्रत बरीच जुनी असावी असे दिसल्याने विचारले..)

चतुरंग

प्रकाश घाटपांडे's picture

21 Mar 2008 - 8:05 pm | प्रकाश घाटपांडे

सदर पुस्तक दुर्मिळ आहे. http://mr.upakram.org/node/992 या ठिकाणी संदर्भ सुची पहा.
प्रकाश घाटपांडे

गंधार's picture

22 Mar 2008 - 11:25 pm | गंधार

धन्यवाद. पुस्तकाचे पान स्कॅन करून दिल्याबद्दल विशेष आभार. त्यानिमित्याने पुन्हा एकदा खगोलशास्त्राच्या आठवणी उजळल्या.

साहेब ,
हे ज्योतिर्वैभव पुस्तक कुठे मिळेल ?

अगदी तेच पुस्तक नसले तरी मराठीतल्या माहितीसाठी आपले दोन ज्ञानकोश ( संस्कृती मंडळ वाई किंवा केतकरांचे ) पाहा.
तारा
पंचांग
संपात
या शब्दांपुढे सर्व सापडेल.

सापडेल म्हणजे आहेच. त्यातून मी बरीच पाने लिहून घेतली आहेत.