गाभा:
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5746052.cms
ह्या बातमीनुसार सचिनला ४०००० अमेरिकन डॉलर्स इतका दंड ठोठावण्यात आला आहे.तर त्याच्या इतर सहका-यांना प्रत्येकी १०००० अमेरिकन डॉलर्स
इतका दंड बसलाय.
जवळपास ६० एक लाखाचा दंड बसावा असे काय गंभीर घडलेय? स्लो ओव्हर रेट नक्की कशाकरीता अमलात आणतात?
समजा सामन्याची वेळ जर वाढली तर जाहीरातींचे उत्पन्न देखील वाढतेच की. त्यातुन मिळणा-या उत्पन्नाचे काय?
अन ज्या खेळाडुंच्या जोरावर हा खेळाचा बाजार चालु आहे त्यांनाच लुबाडणे कितपत योग्य आहे?
प्रतिक्रिया
31 Mar 2010 - 2:31 pm | सुनील
दंड कमाईच्या तुलनेत पहावा. फार वाटणार नाही!
प्रत्येक खेळाचे काही नियम असतात, जे सुरुवातीलाच जाहीर केलेले असतात. त्याप्रमाणे जे वागणार नाहीत त्यांना दंड झाला, तर तो वाजवीच आहे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
31 Mar 2010 - 11:44 pm | टिउ
नाहीतर काय! तेंडुलकरला IPL मध्ये खेळण्यासाठी जितकी रक्कम मिळाली असेल त्याच्या १-२ टक्केसुद्धा हा दंड नसावा...शिवाय नियम मोडल्यामुळेच दंड झालाय.
$४००००चा आकडा बघुन आपले डोळे पांढरे होतात...या लोकांसाठी ४०००० म्हणजे किस झाड की पत्ती!
पुणे IPL टीम ३७० मिलियन डॉलर (म्हणजे किती माहीत नाही!) इतक्या प्रचंड किमतीला विकली गेली. त्यात पुन्हा खेळाडुंचा लिलाव बाकीच आहे. इतका खर्च करुन सहारा नफा कमावणार म्हणजे बघा किती मोठं मार्केट असेल...आणि त्यात तुम्ही फक्त ४०००० डॉलर साठी धागे काढताय!
31 Mar 2010 - 10:12 pm | नितिन थत्ते
>>समजा सामन्याची वेळ जर वाढली तर जाहीरातींचे उत्पन्न देखील वाढतेच की. त्यातुन मिळणा-या उत्पन्नाचे काय?
सामन्याची वेळ वाढली तर सामना संपण्याच्या नियोजित वेळेनंतरचा टीव्हीचा वेळ ज्या प्रायोजकाला विकलेला असतो तो ओरडतो आणि तो करार मोडल्याबद्दल टीव्ही चॅनेलला कोर्टातही खेचू शकतो. त्यामुळे सामन्याची वेळ वाढणे व्यापारीदृष्ट्या परवडत नाही.
सामना ठरलेल्या वेळेतच संपावा म्हणून डकवर्थ लुईस हा आचरट वाटणारा नियम बनवला गेला. (तो संख्याशास्त्रानुसार बहुधा योग्य नियम आहे पण क्रिकेट या खेळाच्या अनिश्चिततेच्या स्पिरिटशी सुसंगत नाही).
नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)
1 Apr 2010 - 1:32 am | टिउ
ईसकाळवर ही प्रतिक्रिया बघितली (बघितलीच, वाचता आली नाही)...कुणाला अर्थ समजला तर कृपया सांगावा.
1 Apr 2010 - 2:57 am | लंबूटांग
हॅहॅहॅ चुचु वाणी वाचून वाचून आम्हाला आता अशा गोष्टी लगेच कळतात.
I am very eager to listen Mr. Sanjay Manjarekar's comments w Mr. Sachin's play during 20-20.
तो मधेच 'व' कुठून आला काय माहित म्हणून मी w लिहीला आहे ;)
1 Apr 2010 - 3:04 am | नेत्रेश
ते वाक्य वाचुन डोके गरगरायला लागले होते.
तुमचे Translation वाचुन गरगरायचे थांबले.