गांधी व मल्ल्या

पर्नल नेने मराठे's picture
पर्नल नेने मराठे in जनातलं, मनातलं
21 Mar 2010 - 7:05 pm

गांधी व मल्ल्या ह्याची बरोबरी होउ शकते का? 8|

तात्या तुमच्या राज्यात हे काय चाललय? /:)

क्रोधित (चुचु)

समाजवाद

प्रतिक्रिया

II विकास II's picture

21 Mar 2010 - 7:14 pm | II विकास II

माझ्या माहीतीने तात्या आणि मल्ल्या गांधीभक्त आहेत. फक्त गांधीकडे पोचायचे मार्ग वेगवेगळे आहेत.
आणि गांधीजी आवडत नाहीत असा माणुस विरळाच !!!

अरुंधती's picture

21 Mar 2010 - 8:04 pm | अरुंधती

चुचु, मला वाटतं, इथं दोन व्यक्तिमत्त्वांमधला विरोधाभास दाखवला असावा!
बघ ना, गांधीजी आयुष्यभर कायम सत्यासाठी लढले, काटकसरीने - अभोगवृत्तीने राहिले - जगले - गरीबांसाठी झटले, स्वतःची माया गोळा करत बसले नाहीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणसाला खाली खेचणार्‍या, घरादाराला उध्वस्त करणार्‍या व्यसनांचा त्यांनी कायम कडाडून विरोध केला.
आणि आता ह्या सर्वाच्या उलट जे काही असेल ते मल्ल्या!
दोघांना बरोबर जोडलंय इथं... [( मल्ल्याने गांधीजींच्या वापरातील वस्तू लिलावात विकत घेऊन आणि नंतर त्या भारत सरकारला सुपूर्त करून आपण मोठे गांधीभक्त असण्याचा आव आणला तो पाहाता, त्याचे हे ढोंग काही लोकांना तरी फसवण्यात यशस्वी झाले असेच म्हणायचे का?

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

चिरोटा's picture

21 Mar 2010 - 9:59 pm | चिरोटा

गांधीभक्त म्हणून दाखवण्यापेक्षा मल्यांना स्वतःची आर्थिक ताकद दाखवायची होती.त्यात ते यशस्वी झाले.मल्ल्या उद्योगपती आहेत. राजकिय नेत्यांसारखे ढोंग करण्याची त्यांना गरज नसावी.
भेंडी
P = NP

अर्धवटराव's picture

24 Mar 2010 - 10:54 am | अर्धवटराव

--बघ ना, गांधीजी आयुष्यभर कायम सत्यासाठी लढले, काटकसरीने - अभोगवृत्तीने राहिले - ....

बाकी सारे पटले... पण ते अभोगवृत्ती... जरा जड जातय..
"गांधींचे साधेपण आणि सात्वीक आहार वगैरे सांभाळणे एखाद्या श्रीमंताला देखिल जड जाईल" - सरोजिनी नायडू. (संदर्भ... अम्म्म्म... बहुतेक विश्वास पाटलांचे "महानायक")

बाकी गांधी आणि माल्याचि बरोबरी वगैरे शक्यच नाहि. गांधी त्यांच्या जीवन काळातच एक विचार, एक तत्व बनून गेले होते आणि पुढले १०० वर्षे त्यांचा प्रभाव राहिल.. माल्याला त्याच्या मरणोत्तर कोण विचारतो ?? (किंगफिशरचे शौकीन सोडले तर ;) )

(भोगी + गांधीभक्त) अर्धवटराव
- रेडि टु थिंक

गांधी सांगतात दारु सोडा..........................
मल्ल्या सांगतात दारु+ सोडा..........................

Nile's picture

21 Mar 2010 - 7:33 pm | Nile

कुणी केली? कुठे केली? का केली?

शोधित(निळु)

नितिन थत्ते's picture

21 Mar 2010 - 9:50 pm | नितिन थत्ते

*ट्ट कळलं नाही.

नितिन थत्ते

टारझन's picture

21 Mar 2010 - 9:56 pm | टारझन

जळली असतील =))

- म्हागाई भत्ते

नितिन थत्ते's picture

21 Mar 2010 - 10:03 pm | नितिन थत्ते

नाय बॉ....तुम्हाला वास आला तो दुसरीकडून आला असेल.

नितिन थत्ते

विसोबा खेचर's picture

21 Mar 2010 - 10:46 pm | विसोबा खेचर

गांधी व मल्ल्या ह्याची बरोबरी होउ शकते का?
तात्या तुमच्या राज्यात हे काय चाललय?

या दोघांची मी कुठेही बरोबरी केलेली नाही.. त्यांपैकी एक स्वातंत्र्यलढ्यातले आणि एक व्यवसायिक.

इथे फक्त अल्कोहोल संदर्भात दोघांची काय म्हणणी आहेत तेवढंच दाखवलं आहे.. कुठेही तुलना नाही अथवा बरोबरी नाही..

तात्या.

इथे फक्त अल्कोहोल संदर्भात दोघांची काय म्हणणी आहेत तेवढंच दाखवलं आहे.. कुठेही तुलना नाही अथवा बरोबरी नाही..

सहमत.
मल्ल्याचा विटाळ व्हायला..
गांधीजी म्हणजे काय देव्हार्‍यातला देव आहे का ?

आशिष सुर्वे's picture

21 Mar 2010 - 10:57 pm | आशिष सुर्वे

खरंय.. अशी बरोबरी होणेच शक्य नाही..
मल्ल्यांनी कुठे कोणाला 'उदार मनाने' ५५ करोड दिलेत??

======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

विशाल कुलकर्णी's picture

24 Mar 2010 - 2:33 pm | विशाल कुलकर्णी

मल्ल्यांनी कुठे कोणाला 'उदार मनाने' ५५ करोड दिलेत??>>>>

ते सुद्धा दुसयाच्या खिशातले ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

नितिन थत्ते's picture

24 Mar 2010 - 5:52 pm | नितिन थत्ते

हे सुरू झालं म्हणजे तात्यांचा उद्देश सफल झाला.

नितिन थत्ते

डावखुरा's picture

21 Mar 2010 - 11:17 pm | डावखुरा

त्या ५५ करोड मुळे का होईना आपल्या सेनेला सदैव सतर्क राहण्यास मदत होते...... =)) =)) =))

आणि गांधीजी आवडत नाहीत असा माणुस विरळाच !!! [हे वाक्य बर्‍याच अन्शि न पट्न्यासरखे नाहीचे मुळी]

तात्या सहमत आहे साध्या सरळ वाक्यान्च आस्वाद घेण्याऐवजी उगिचच हा वादन्ग.....
"राजे!"

इंटरनेटस्नेही's picture

22 Mar 2010 - 12:18 am | इंटरनेटस्नेही

Everyrthing has its own charm!

राजेश घासकडवी's picture

22 Mar 2010 - 5:34 am | राजेश घासकडवी

मल्ल्याचा विटाळ व्हायला..
गांधीजी म्हणजे काय देव्हार्‍यातला देव आहे का ?

अगदी बरोबर. व्यक्तीपूजेचं स्तोम एकंदरीतच कमी झालं तर बरं. एखादी व्यक्ती चांगली म्हणून तिचे विचार पूजनीय, आणि त्यामुळे तिच्या एकाही शब्दाला विरोध करायचा नाही, किंवा ते पारखूनही बघायचे नाहीत हे आततायी आहे. विचारांची तुलना करणं म्हणजे व्यक्तीमत्वांची बरोबरी करणं नाही.

त्यात गांधींनीही चतुरपणे अल्कोहोलमुळे सगळेच प्रश्न सुटत नाहीत असं म्हटलंय. काही छोटे प्रश्न सुटत असावेत असं म्हणायला वाव ठेवलेला आहे...

देव करो व मानवाला फक्त छोटेच प्रश्न शिल्लक राहोत.

राजेश

सुनील's picture

22 Mar 2010 - 6:47 am | सुनील

आडवळणाने का होईना पण तात्याने दिलेला शब्द पाळला, हे मात्र खरे!! ;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

II विकास II's picture

22 Mar 2010 - 9:58 am | II विकास II

आणि तात्यांनी त्यांची एक चुकीचा फतवा पण फाट्यावर मारलाच आहे.

नावातकायआहे's picture

22 Mar 2010 - 1:52 pm | नावातकायआहे

तात्यांशी सहमत,

Alcohol does not solve problems......neither does milk.. B)

अप्पा जोगळेकर's picture

22 Mar 2010 - 2:56 pm | अप्पा जोगळेकर

अशी तुलना करणारी माणसे एक नंबरची भिकारचोट आहेत. (तात्या पण त्यांच्या पंक्तीत गेलेले पाहून खरोखर वाईट वाटलं.) मी परवा एका ***** माणसाला स्वातंत्र्यवीर सावरकर आणि ओसामा बिन लादेन यांचीदेखील तुलना करताना पाहिलं.

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे मना तूचि शोधूनी पाहे |

- कृपया शब्द जपून वापरावेत. --- संपादक

विसोबा खेचर's picture

22 Mar 2010 - 5:19 pm | विसोबा खेचर

>>(तात्या पण त्यांच्या पंक्तीत गेलेले पाहून खरोखर वाईट वाटलं.)

मी कुठेही तुलना केलेली नाही, ना कुणाच्या पंक्तित जाऊन बसलो आहे..अल्कोहोल संदर्भात दोघांचे काय विचार आहेत, केवळ या संबंधीचंच चित्र मुखपृष्ठावर लावलेलं आहे हे पुन्हा एकदा नमूद करतो..

या दोघांपैकी कुणाचे विचार योग्य, कुणाचे अयोग्य, कोण बरोबर, कोण चूक, कोण महान, कोण लहान इत्यादी कुठल्याच गोष्टींवर मी भाष्य केलेलं नाही..

आपला
(गांधिगिरीप्रेमी, मदीराप्रेमी, ललनाप्रेमी) तात्या.

टारझन's picture

22 Mar 2010 - 7:08 pm | टारझन

मी कुठेही तुलना केलेली नाही, ना कुणाच्या पंक्तित जाऊन बसलो आहे..अल्कोहोल संदर्भात दोघांचे काय विचार आहेत, केवळ या संबंधीचंच चित्र मुखपृष्ठावर लावलेलं आहे हे पुन्हा एकदा नमूद करतो..
या दोघांपैकी कुणाचे विचार योग्य, कुणाचे अयोग्य, कोण बरोबर, कोण चूक, कोण महान, कोण लहान इत्यादी कुठल्याच गोष्टींवर मी भाष्य केलेलं नाही..

खुलाश्याबद्दल धन्यावाद :)

मन के साथ बातां : च्यायला .. कुठे गेले दुनियेला फाट्यावर मारणारे तात्या , कुणालाही खुलाशे देत बसतात हल्ली :)

आपलाच ,
(खुलासा प्रेमी) टारझन

मी-सौरभ's picture

24 Mar 2010 - 6:05 pm | मी-सौरभ

-----
सौरभ :)

अप्पा जोगळेकर's picture

22 Mar 2010 - 3:20 pm | अप्पा जोगळेकर

व्यक्तीपूजेचं स्तोम एकंदरीतच कमी झालं तर बरं.

- तर मग तुम्ही ज्या पूजेबद्दल लिहित असता त्याचं स्तोम माजावं की काय ? बाकी मंडळी माजावर आली की त्या पूजेचं स्तोम माजत असेलच की. (अनुभवींनी यावर अधिक प्रकाश टाकावा.)

परिकथेतील राजकुमार's picture

22 Mar 2010 - 5:43 pm | परिकथेतील राजकुमार

तात्या, मल्ल्याबरोबर गांधीचा फोटो लावुन तुम्ही आम्हा मदिराभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.

तात्याचा निषेध !!

मल्ल्या भक्त
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

पर्नल नेने मराठे's picture

22 Mar 2010 - 7:03 pm | पर्नल नेने मराठे

~X(

चुचु

समीरसूर's picture

23 Mar 2010 - 2:02 pm | समीरसूर

मदिराभक्त सगळेच असतात पण जे पीत नाहीत त्यांना कळत नाही की ते देखील मदिराभक्त आहेत.

"नातजुर्बाकारी से वाईज की ये बातें हैं
इस रंग को क्या जाने, पुछो तो कभी पी हैं..."

--समीर

गोगोल's picture

24 Mar 2010 - 4:34 am | गोगोल

तात्या, मल्ल्या आणि गांधी बरोबर मंदिराचा न फोटो लावुन तुम्ही आम्हा मंदिराभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.

तात्याचा निषेध !!

मंदिरा भक्त

©º°¨¨°º© माझाच तोरा ©º°¨¨°º©

अरुंधती's picture

22 Mar 2010 - 8:47 pm | अरुंधती

तात्या, चुचु व सर्व मि.पा. मंडळी

येथील काथ्याकूट आणि बर्‍याचदा 'जनातलं मनातलं' हे सदर प्रचंड मनोरंजक असते ह्याचा मी सध्या प्रत्यक्ष अनुभव घेत आहे! माणूस कितीही वैतागलेला, चिडलेला असेल, निराश असेल, तरी ह्या काथ्याकुटातील अनेक निरर्थक किंवा सार्थ टीका -टिप्पण्या, टोमणे, चिमटे, बोचकारे आणि विनोदी शेरे वाचून त्याचा मूड एकदम ताळ्यावर येईल. माझ्या सारख्या 'सदासुखी' ;-) लोकांचे तर काय....मी खदाखदा हसत सुटते!!! आपल्याला आवडलं हे भारी!!!

तुम्ही फार वेळ सिरीयस राहूच शकत नाही मि.पा. वाचताना.... लई भारी!! ;-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

टारझन's picture

22 Mar 2010 - 9:45 pm | टारझन

तुम्ही फार वेळ सिरीयस राहूच शकत नाही मि.पा. वाचताना.... लई भारी!

=)) =)) =)) =)) स्वत:बद्दल केलेलं वक्यव्य असल्यास ठिक ;) पण जेनेरिक स्टेटमे़ट करत असाल तर आपण गांधारी आहात असं म्हणवं लागेल :)

इथले वातुळ बटाटे पाहिले नाहीत वाट्टं तुम्ही =)) =)) त्ये लोकं विनोदी धाग्यावर पण बौद्धिक चर्चा झाडतात, हो ते पाहुन आमचे दिलखुलास मनोरंजन होते हा भाग अलहिदा.

-- वरंचपाती

अरुंधती's picture

22 Mar 2010 - 10:32 pm | अरुंधती

स्वतःबद्दलच केलेलं वक्तव्य! ;-) इतरांबद्दल म्या पामराने काय लिहावे? आणि बौध्दिक चर्चेने तर फार बहारदार मनोरंजन होते बरे! कोण कधी कुठे छताला जाऊन चिकटेल सांगता येत नाही ! :D

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

पर्नल नेने मराठे's picture

23 Mar 2010 - 2:05 pm | पर्नल नेने मराठे

खव का बंद तुझी ग ?
चुचु

अरुंधती's picture

24 Mar 2010 - 7:18 pm | अरुंधती

चुचु अगं मला खव कशी कार्यवाहित करायची, म्हणजे खव मधल्या मेसेज ला कसे उत्तर द्यायचे किंवा इतर कोणाच्या खव मध्ये कशी प्रतिक्रिया द्यायची हे तंत्र उलगडलेले नाहीए. म्हणून मग बंद केली होती खव. आता पुन्हा कार्यान्वित केली आहे! :-)

बाप रे! केवढे जडजूड शब्द वापरलेत मी! :P

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

उपास's picture

23 Mar 2010 - 8:13 pm | उपास

तात्या, मुख पृष्ठ आणि मल पृष्ठ ह्यात फरक आहे की नाही, शिवाय दोघांनी (दारु) ह्या एकाच विषयासंदर्भात काय म्हटलय हे फोटो सहित दाखवल्याने तुम्ही तुलना केली नसलीत तरी बघणार्‍यास तुलना करायला भाग पाडलेत असं वाटलं (तुम्ही तो बघणार्‍याचा प्रश्न आहे, असं अर्थात म्हणू शकताच, पण माझ्या मते तो दाखवणार्‍याचाही प्रश्न आहेच..)

दुसरं म्हणजे, मल्ल्याच्या विधानाचा फक्त विचार केला तर ती शुद्ध फसवणूक आहे. समाजातल्या अशा धंदेवाईकांची मला लाज वाटते.. माणिकचंद गुटख्याने किंवा उद्या गांजा अफूने पण अशी 'क्षणभर दु:खे विसरण्यासाठी घेऊन पाहा..' अशी जाहिरात केली नाही म्हणजे मिळवले. दारु पिऊन दु:खे विसरा हा पळपुटेपणा आहे, तो माणूस क्षणभर विसरलेही वेदना, दु:ख पण त्याचे कुटुंब पोरं बाळं अंधारात बुडणार नाहीत ह्याची गॅरेंटी काय. जोपर्यंत एखादी जबाबदार व्यक्ती (उदा. डॉ.) वेदनाशामक देते तोपर्यंतच ठीक सामान्य माणसाच्या हातात ते पडलं की अनर्थ टळत नाही कारण नशेची भुरळ चटकन पडतेच. मला इथे, मल्ल्याच्या विधानाचं उद्दात्तीकरण वाटलं, जे माझ्या दृष्टीने पळपुटेपणा, दांभिकपणा आहे. दु:ख पचवण्यासाठी ताकद द्यायला हवी, दु:खाचे निराकरण करून अश्रू पुसायला हवेत.. दु:ख विसरण्यासाठी दारू पी (ती ही तुझे पैसे ओतून आणि कुटुंबासहित भिकेला लाग) असं सांगणं म्हणजे मेलेल्या मारण्यासारखंच आहे. चुकीच्या गोष्टींचे नाहक उदात्तीकरण होतेय असं वाटलं म्हणून न राहवून लिहील इतकच.. लोभ आहेच! :)
उपास मार आणि उपासमार

विसोबा खेचर's picture

23 Mar 2010 - 11:46 pm | विसोबा खेचर

मी आपल्या विचारांचा आदर करतो.. :)

तात्या.

Dhananjay Borgaonkar's picture

24 Mar 2010 - 12:58 pm | Dhananjay Borgaonkar

जाहीराती कोणी काही का करेना.
आपली विचारशक्ती जाग्रुत राहिल्याशी मतलब.
ज्याला दारू प्यायचीय त्याला पिउदेत.
तुम्ही का त्रागा करुन घेताय?

उपास's picture

24 Mar 2010 - 4:26 pm | उपास

>>ज्याला दारू प्यायचीय त्याला पिउदेत.
असं असेल तर जाहिरात तरी कशाला करायची. जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी च असते जाहीरात.

>>तुम्ही का त्रागा करुन घेताय?
दारु मुळे उद्धवस्त झालेली कुटुंब पाहिलेयत.. शैक/ मौज इथून सुरुवात होऊन त्याच व्यसनात रुपांतर होतं आणि अक्ख घर वेठीस धरलं जातं. हे शहरातही होतय आणि खेड्यापाड्यतही आणि समाजाच्या सगळ्याच वर्गात, हो अगदी बुद्धीजीवी वर्गात देखील. जेवढी सहज दारु उपलब्ध होईल तेवढी व्यसनाधीनता वाढणारच. समाज कुठल्या दिशेने चाल्लाय न कळे!!
उपास मार आणि उपासमार