सदाबहार

टारझन's picture
टारझन in जनातलं, मनातलं
20 Mar 2010 - 6:23 pm

णमस्कार्स लोक्स ,

ऑफिसात कामांच्या व्याप , शेडुल्ड टास्कस इनकंप्लिट राहिल्याचं टेण्शन , बरीच कामं पुर्वी कधीच कोणी केलेली नसतात , आपलं ट्रायल अँड एरर वर चाललेलं गुर्‍हाळ.. हे नाही ते.. ते नाही तर अजुन काही..... बॉसचा वरुन स्टेटसचा मेल , दुसरीकडुन क्लायंटची बोंब .. घरी यावं ते ह्याच टेंशन मधे ..बॅग फेकुन द्यावी... कपडे अक्षरशः ओरबाडुन फाडुन काढावेत. एक लाथ मारुन बाथरुमचा दरवाजा तोडुन आत जावं आणि शंडगार शॉवरचा फवारा अंगावर घ्यावा... तरीही ही चक्र थांबत नाहीत. शिवाय रिस्पाँसिबिलीटीज चे भोगही वाढुन ठेवलेलेच असतात .... शॉवरही चिडचिडतंच घ्यावा... डिओ आडवा तिडवा मारावा , पावशेर पावडर भस्म लावल्यासारखी फासुन घ्यावी ........ आणि आपली लॅपटॉपची पेटी उघडावी ...

कळत नकळत बोट जातं ते सदाबहार.एम३यु फाईल कडे ... गाणी जास्त नसतात १५-१६च .. पण मुड चेंज करायला अगदीच रामबाण. गाणी किती येतात आणि जातात ... इव्हन एखाद्या गाण्याचेही पन्नास रिमिक्सेस येऊन जातात .. पण ऐकतो ते कोणी ? आठवा ... उगाच अपिलींग वाटावं म्हणुन "कांटा लगा.... हाय लगा " म्हणत शेफाली जरिवाला ने केलेला "नाडी दाखवण्याचा" प्रयोग ? असो.

तसा मी वेगळ्या वेगळ्या वेळेला वेगळं वेगळं म्युझिक ऐकतो ही. जसं बाईक चालवतांना बर्‍याच जणांना कर्णकर्कश्य आणि डोकेदुखी वाटणारी हार्ड अँड मेटॅलिक गाणी ,
ब्रायन अ‍ॅडम्स चं समर ऑफ ६९ तर कुठे ठेऊ कुठे नको ठेऊ असं होतं .. ते संपत नाही तोवर स्टिंगचं "डेझर्ट रोज" सुरू होतं ..
इंग्रजी गाण्यांमधे आमचा सर्वांत आवडता बँड म्हणजे बॅकस्ट्रीट बॉईज ! "शो मी द मिनींग " हे गाणं तिसरा पोपट झाल्यावर आमच्या रुम वर दिवस रात्र वाजत असायचं , अप्रतिम .. तशीच "अ‍ॅज लॉंग अ‍ॅज यु लव्ह मी " ,"क्विट प्लेईंग गेम्स " ही काही अजुन गुणगुणन्यास भाग पाडणारी गाणी. फाईव्ह क्विन्स चं "वी विल रॉक यु" एक उत्साह वाढवणारं गाणं .. तर "किप ऑन मुव्हींग " कर्णमधुर .. पफ डॅडीचा " आय'म मिसिंग यु " किंवा आपल्या एमेनिम बाबचा "सो द रियल स्लिम शेडी प्लिज स्टँड अप .. " असो किंवा अजुन कोणता रॅपर .. नेहमीच मजेदार असतो. शॉगी, मँबो,नेली,५०पैसे,एमिनेम आणि आमच्या आवडत्या स्त्रीया जेनिफर लोपेझ्,ब्रिटनी,केली, शानिया ह्यांचे विडिओ युक्त म्युझिक ऐकणे म्हणजे एक सुवर्णसंगम !! गेली दुनिया दोन घटका उडत म्हणुन आम्ही इंग्रजी संगिताचा लुत्फ घेतो. पण ही गाणी आम्ही आमच्या होम थेटरात स्लॅब हालवण्यापर्यंतच्या आवाजात ऐकताना आमच्या इंग्रजी म्युझिक द्वेष्ट्या आई-बाबांचा रोष पचवावा लागतो ... चार शिव्या ही खाव्या लागतात.

"मुड" असेल आणि एकटा असेल तेंव्हा आम्ही चावट व्हिडिओ वाल्या गाण्यांचाही भरपुर लुत्फ घेतो. नर्ड चं "लॅपडँस असो वा शॅगी चं "इट वॉजंट मी" सलमा हयक चा "बेली डान्स" किंवा शकिराचं मादक कंबर हलवणं असो .. कधी कधी ब्रिटनी सुद्धा घायाळ करते , जेनिफर म्याडमचा अपिलींग डान्स .. हाय अल्ला :) "आय्ल टेक यु टु द कँडी शॉप .. आय्ल लेट यु लीक दं लॉलीपॉप" मधी ५०सेंट भावाने एवढा खर्च करुन ललना नाचवल्या .. कसे आभार मानावे ? नेली भाऊ पण "डायलेमा" मधुन सुरेख सफर घडवतो :)

पण ही गाणी कितीही आवडली तरी सदाबहार नाहीत , कारण ते ऐकण्या साठी एका मुडची गरज असते.

सकाळी सकाळी एखादी आरती किंवा जगजीत सायबाचं "हे राम... हे राम" (इथे मला जगजीत खुप खास वाटतो ) , "इतनी शक्ती हमे देना दाता " सकाळी लावलं की आई-बाबा पण "व्वा .. आपला टारु किती सद्गुणी मुलगा आहे .. उगाच कोणी त्याला हिण आणि हिणकस म्हणुन हिणवतो .. " असं म्हणत त्या दात्याकडे आमच्या नावाने चार मागने मागतात. "केशवा माधवा " च्या नामाचा गोडवा सकाळी अतिशय गोड वाटतो .. " "अल्ला तेरो नाम .... इश्वर तेरो नाम .... " असं चित्त प्रसन्न करणारं गाणं ऐकताना कधीच मी आस्तिक की नास्तिक ? असले फालतु प्रश्न येत नाहीत. "सुखकर्ता दुखहर्ता" ची आरती अंघोळ करतांना ऐकायला आली की त्या दिवशी अगदी दिवाळी विना सात्विक अभ्यंग स्नान होऊन जाते ! "रघुपती राघव .. राजाराम" ऐकताना रामायण कधीच आठवले नाही पण आनंद मात्र अनलिमीटेड भेटला. "हनुमान चालिसा" ,"शनि मंत्र" ,"मृत्युंजय मंत्र ", "साई आरती " ह्या एकापाठोपाट एका गाण्यांचा आनंद लुटावा तो केवळ सकाळीच ... बाकी वेळेस ही गाणी अगदी शुन्य प्रभाव करतात .. म्हणुन हे संगितही सुंदर असलं तरी आमच्या "सदाबहार" क्याट्यागरी मधे येत नाही.

सद्ध्याची बॉलीवुड गाणी ? छे हो ? कधी आणि किती येतात ? आणि कधी जातात ह्यावा ही पत्ता लागत नाही .. फडतुस कंडम माल साला .. उगाच ढिंगच्याक ढिंगच्याक वाजवलं , डिजे इफेक्ट टाकुन व्हॉइस इफेक्ट दिला न हाडकुळ्या पोरी नाचवल्या म्हणजे काय म्युझिक असतं का साला ? शंभरातलं एखादं गाणं लक्षात राहातं ... नाही म्हणायला हिमेस भाईंनी काही लगातार म्युझिक दिले .. पण ते तेंव्हा गाजली .. आज कोण त्यांची ती गाणी आवर्जुन वाजवतो ? हो मान्य आहे सगळाच काही कचरा नसतो.. पण बहुतांश तर कचराच असतो ना ? त्यात तो भिकारडा आणि भुरटा म्युझिक चोर अन्नु मलीक .. अ‍ॅहॅहॅ .. काय एकेक आवदसा दाखवतो .. कंडम साला ..
पण काही गाणी एकदम टची असतात बरं .. पेज३ मधलं "कितने अजिब रिश्ते है यहां पे..." काय सुरेख गाणं ? यात राग कोणता ? सुर कसा लावलाय ? ह्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नसतं .. हे गाणं भिडतं हृदयाला. अजब प्रेमकी गजब कहानी हा कितीही भिकारी चित्रपट असला तरी "तेरा होने लगा हुं .. " आणि " तु जाने ना" ही गाणी गोड गोड आहेत :) अगदी रिंगटोन ठेवण्याच्या लायकीचं ! पण नाही ... कॅनॉट बी सदाबहार :)

नाही म्हणायला नव्वदाच्या दशकातल्या गाणीही अंमळ सुरेख आहेत. "साजन" मधली गाणी एक से एक आहेत .. तर हम आप के है कौन ? ,बाँबे, राजा हिंदुस्तानी, दिल , कयामतसे कयामत तक ... जो जिता वोही सिकंदर मधल्या "पेहला नशा ... पेहला खुमार .. नया प्यार है .. नया इंतजार " या गाण्याला आपण कसं विसरु ? इट्स द बेस्ट रोमँटिक ट्रॅक एव्हर !

आमच्या सदाबहार गाण्यांमधे अगदीच मोजक्या गाण्यांचा समावेश होतो. जी गाणी आम्ही सकाळ संध्याकाळ , रात्री , दुपारी , एकटे असतांना , दोस्तांमधे , वाहन चालवतांना कधीही ... अगदी कधीही आणि कितीहीवेळा आयुक्षभर ऐकु शकतो. एखादं हिंस्त्र श्वापद अचानक काहीतरी जादु होऊन शांत व्हावं तसं ही गाणी ऐकलं की माझं उद्विग्न मन शांत होतं ! आनंदातही ही गाणी आनंद देतात आणि दु:खी असलो तरी ही गाणी दु:ख तणाव विसरायला लावतात ... जादु आहे नाही ? ह्या गाण्यांचं अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे सगळीच्या सगळी जुणी हिंदी गाणी आहेत. :)
आमची सदाबहार गाणी , सॉर्टेड बिल्कुल नाहीत .. सगळीच एकसे एक .. कोणती तसुभरही कमी नाही की जास्त नाही.
१. बेदर्दी बालमा तुझको.. मेरा मन याद करता है ... बरसता है जो आंखो से .. वो सावन याद करता है .....
२. दो लफ्जो की है ये दिल की कहानी ... या है मोहोब्बत .. या है जवानी ...
३. रिमझिम गिरे सावन .... सुलग सुलग जाये मन ... भिगे आज इस मौसम मे .. लगी कैसी ये अगन ..
४. मै शायर बदनाम .. ओ .. मै चला .. मै चला .. महफिल से नाकाम .. ओ .. मै चला .. मै चला ...
५. मेरा जिवन कोरा कागज ... कोरा ही रह गया
६. मेरा कुछ सामान ... तुम्हारे पास पडा है ....
७. मेरी भिगी भिगी सी ... पलको पे रह गये .. जैसे मेरे सपने बिखर के .. जले मन तेरा भी ... किसी के मिलन को ...
८. अगर तुम ना होते ...
९. जीस गली मे तेरा घर ना हो बालमा .. उस गली से हमें तो गुजरना नही ....
१०. सुरमई अखियों मे.. नन्हा मुन्हा इक सपना दे जायें ...
११. चिठ्ठी आयी है आयी है चिठ्ठी आयी है ....
१२. फुलोंके रंग से ... दिल की कलम से ....
१३. दिल का भंवर करे पुकार
१४. मेरा नाम जोकरची सगळी च्या सगळी ..
१५. प्यार हमें किस मोड पे ले आया ... के दिल करे हांये .. हांये .. कोई ये बतायें हायें .. क्या होगा ..

ही गाणी कोणी लिहीली ? कोणी गायली ? कोणत्या काळात आली ? कोण संगित निर्देशक वगैरे माहिती करुन घेण्याच्या फंदात मी कधी पडलोच नाही .. पण ती गाणी बणवण्यात ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे त्यांचा मी आजन्म ऋणी आहे :) गाणी सॅड आणि स्लो आहेत की फास्ट आहेत वगैरे गोष्टींचाही मला काही फरक पडत नाही ... ही गाणी ऐकावी तर ओरिजिनलंच .. कुठल्या येडपटानं त्या गाण्यांचा रिमिक्स ट्राय करुन इस्कोट केल्यावर मी त्याला चार शिव्या घालतो. ती गाणी ऐकतंच नाही.
पण ही गाणी माझ्यासाठी सदाबहार आहेत हे नक्की.. :)

(समाप्त)

संगीतप्रकटन

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Mar 2010 - 6:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वरुन तिस-या क्रमांकाचा आणि खालून दहाव्या क्रमांकाचा फोटो लै भारी. :)

-दिलीप बिरुटे

टारझन's picture

20 Mar 2010 - 8:45 pm | टारझन

किराणा घराण्याची आहे गाडी. एका लिटर दुधामधे पंधरा किलोमीटर जाते. शेतीभातीला चांगलीये. गुराढोरांना आणि प्राडाँना वाहुन न्यायला बरी आहे :)

प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद साहेब :)

- प्रा.डॉ.झन

समंजस's picture

20 Mar 2010 - 7:09 pm | समंजस

व्वा!!! मस्त!!!
वरीलपैकी काही गाणी नक्कीच सदाबहार आहेत (माझ्या) :)

नावातकायआहे's picture

20 Mar 2010 - 7:57 pm | नावातकायआहे

>>वरुन तिस-या क्रमांकाचा आणि खालून दहाव्या क्रमांकाचा फोटो लै भारी
सहमत

पा.क्रु. जमली आहे. पुढच्या विकांताला करुन पाहतो :D

झणझण

अनिल हटेला's picture

20 Mar 2010 - 8:15 pm | अनिल हटेला

सदाबहार गाण्यांची यादी फारच त्रोटक आहे...:)
कधी निवांत फक्त किशोरदा + पंचमदा ना गूगला मालक....
अनमोल खजीना सापडेन ...असो....

(सदाबहार);)
बैलोबा चायनीजकर !!!
© Copyrights 2008-2010. All rights reserved.

रेवती's picture

20 Mar 2010 - 8:21 pm | रेवती

अरे वा!! टार्‍या आज एकदम हटके 'मूड' आहे कि!
चांगले झाले आहे लेखन!

रेवती

सनविवि's picture

20 Mar 2010 - 9:53 pm | सनविवि

मस्त लेख टारझनसाहेब!

'दो लब्जों की है' हे गाणं निव्वळ अप्रतिम आहे. गाण्याचा अर्थ लगेच पटणारा, सुंदर गायन, झीनत अमानचं स्वर्गीय सौंदर्य आणि ते व्हेनिस....वाह!!

"केशवा माधवा " च्या नामाचा गोडवा सकाळी अतिशय गोड वाटतो .. " "अल्ला तेरो नाम .... इश्वर तेरो नाम .... " असं चित्त प्रसन्न करणारं गाणं ऐकताना कधीच मी आस्तिक की नास्तिक ? असले फालतु प्रश्न येत नाहीत. "सुखकर्ता दुखहर्ता" ची आरती अंघोळ करतांना ऐकायला आली की त्या दिवशी अगदी दिवाळी विना सात्विक अभ्यंग स्नान होऊन जाते ! "रघुपती राघव .. राजाराम" ऐकताना रामायण कधीच आठवले नाही पण आनंद मात्र अनलिमीटेड भेटला. "हनुमान चालिसा" ,"शनि मंत्र" ,"मृत्युंजय मंत्र ", "साई आरती " ह्या एकापाठोपाट एका गाण्यांचा आनंद लुटावा तो केवळ सकाळीच ... बाकी वेळेस ही गाणी अगदी शुन्य प्रभाव करतात

अगदी माझ्या मनातलं बोललास. रेहमानचं पण 'ख्वाजा मेरे ख्वाजा' किंवा दिल्ली-६ मधलं 'मौला मेरे मौला' ऐकताना मला खूप सुंदर आणि शांत वाटतं.

शेखर's picture

20 Mar 2010 - 11:33 pm | शेखर

टार्‍या, तु जेंव्हा ओरिजीनल लिहतोस तेंव्हा खुपच चांगल लिहीतोस..

मस्तच जमलाय लेख...

प्रभो's picture

21 Mar 2010 - 12:02 am | प्रभो

हॅहॅहॅ....

लेख फस्क्लास जमलाय हो टारू भाऊ. आजकाल तुम्हीही स्वांतसुखाय(पक्षी: सुपार्‍या न घेता) लिहिता असे ऐकण्यात आलयं आमच्या.

*चांगली मराठी गाणी ऐकणार्‍या पण लोकांना त्यबद्दल न सांगणार्‍या टार्‍याचा निषेध निषेध निषेध!!!!!

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

अश्विनीका's picture

21 Mar 2010 - 1:02 am | अश्विनीका

मस्त लिहीलयं . आवडला लेख.

१, ३, ५, १२ माझी पण खूप आवडती. सदाबहार लिस्ट मधली :)
- अश्विनी

उल्हास's picture

22 Mar 2010 - 10:52 am | उल्हास

प्रत्येकाची सदबहार गीते असतात

रिमझिम गिरे सावन
थोडा है थोडेकी जरुरत है
मेरा मन तेरा प्यासा
न जाने क्यू ये होता है जिन्दगिके साथ
ईन आन्खोकी मस्तिके

एका तळ्यात होती बद्के
या चिमण्यांनो परत फिरा रे
लव लव करी पात

मेघवेडा's picture

22 Mar 2010 - 3:29 am | मेघवेडा

मनापासून लिहिलेला लेख आवडेश! मराठी गाण्यांबद्दलही लिही की भौ!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

चित्रा's picture

22 Mar 2010 - 4:51 am | चित्रा

लेख आवडला. वर दिलेली सदाबहारपैकी गाणी तशी बरीचशी आवडतात, पण नं २, ३ अधिक.

अजून काही कधीही आवडती म्हणजे -
न जाने क्यूं होता है ये जिंदगी के साथ ..
आणि
सूरज की गर्मी से जलते हुए तन को ..
आणि
आंधीमधली बरीचशी
असो. यादी बरीच मोठी होईल.

लेख मस्त.

विकास's picture

22 Mar 2010 - 5:30 am | विकास

लेख एकदम मस्तच आहे!

यादी बरीच मोठी होईल.

असेच म्हणतो! तरी देखील कधीही ऐकायला आवडणार्‍या तुमच्या सर्वच गाण्यांव्यतिरीक्त (तसेच वर चित्राने सांगितलेल्या आंधी मधील गाण्याव्यतिरीक्त) अजून थोडी:

तुम बीन जाऊ कहॉं, के दुनियामे आके ... (झी टीव्ही वरील मालीकेचे नाही!) हे रफी अथवा किशोर कुणाचेही आवडते. दोघांच्या स्टाईल्स वेगळ्या आहेत आणि गाण्यातील अर्थही...

प्यार दिवाना होता है...

शोखियोमे घोला जाये...

आवारा/बरसात ची गाणी

दस्तक मधील मदन मोहनचे माई रे

मराठीतील लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर ची गाणी, तसेच लताने गायलेले तुकारामाचे अभंग आणि किशोरी आमोणकरांनी गायलेले अभंग असलेले "रंगी रंगिला श्रीरंग" ची सर्वच गाणी (तसेच तिने गायलेला "ज्ञानोबा-माउली-तुकाराम" हा "गजर" .

एमी ग्रॅंटची काही गाणी , इगलचे हॉटेल कॅलिफोर्नीया आदी अशीच कधिही ऐकायला आवडतात... (जरी मी कधितरीच ऐकत असलो तरी :-) )

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

शुचि's picture

22 Mar 2010 - 7:25 am | शुचि

लेख आवडला.
२ लफ्जोन्की है मस्त!!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Mar 2010 - 10:20 am | बिपिन कार्यकर्ते

छान!!!

बिपिन कार्यकर्ते

इंटरनेटस्नेही's picture

22 Mar 2010 - 1:54 pm | इंटरनेटस्नेही

छान!

भिडू's picture

22 Mar 2010 - 2:15 pm | भिडू

+१