ड्रॅगनच्या देशात - १

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
19 Mar 2010 - 7:36 am

दोन मांजरं एकमेकात किंचित गुरगुरून भांडल्यासारखा आवाज डोक्यावरच्या स्पीकरमधून आला, दिवे लागलेले जाणवलं, खिडक्या उघडल्या जाऊन भस्सकन उजेड आत आला आणि मला जाग आली. पांघरुण सरकवून सीट सरळ केली. हवाईसुंदर्‍या (युनायटेड एअरलाईन्सच्या बाबतीत 'हवाईसुंदरी' ह्या शब्दाबद्दल तीव्र आक्षेप असू शकतात हे मान्य, पण एक पद्धत आहे म्हणून म्हणावे लागतेय! ;) )रांगातून हिंडत लँडिंगची तयारी करत होत्या. शिकागोहून निघालेली सलग साडेतेरा तासाची, पाय आणि पाठीचा बुकणा पाडणारी, युनायटेड एअरलाईन्सची फ्लाईट 'पू डाँग' विमानतळावर चाकं टेकती झाली आणि मी सुटकेचा निश्वास सोडला!

अनेक फाट्यांच्या चिनी अक्षरांसोबतच ठळक दिसणारी 'शांघाय वेलकम्स यू' अशी चक्क इंग्रजीमधली पाटी वाचतच मी इमिग्रेशनच्या रांगेत उभा होतो. कडक इस्त्रीच्या यूनिफॉर्ममधल्या चिनी युवतीनं सोनेरी काड्यांच्या चष्म्याआडून बघत "हेलो!" असं स्वागत केलं मी "नी हाव!" म्हणताच तिला बरं वाटलं असावं. तिनं माझ्याकडे आणि एकदा पासपोर्टातल्या फोटोवर निरखून पाहत स्टँपिंग केलं आणि माझा ड्रॅगनच्या देशात पहिला प्रवेश झाला.

सगळे सोपस्कार आटोपून माझ्या नावाची पाटी हातात असलेला ड्रायवर शोधून काढला. मंदारिन मध्ये हॉटेलचं नाव छापलेला ईमेल त्याच्या हातात ठेवला, त्यावर नजर फिरवून त्यानं समजलं अशा अर्थाचं हास्य केलं आणि मी निश्चिंत झालो. त्याच्यावर नजर ठेवतच मला त्याच्यामागे पळावं लागत होतं कारण सगळे सारखेच दिसत होते, उगाच मी 'इकडे तिकडे' कुठेतरी पहायचो आणि दुसर्‍याच बाबाच्या गाडीत जाऊन बसायचो! ;)

बाहेर पडल्यावर गार वार्‍याचा झोत सप्पकन आंगावर आला. लेदर कोट आणल्याचं मला बरं वाटलं. फेब्रुवारीत शांघायला जवळपास २-३ डिग्री सें. तपमान असतं.
गाडीत बसंतच मी पृच्छा केली "हाउ फार इज होटेल?"
"?" त्याला काही सुधरले नव्हते!
"हाउ मच टाइम टु रीच?"
"वाँ आव!" (म्हणजे वन अवर. हे चिनी उच्चार आता मला कित्येक टेलीकॉन्फरन्सवर बोलून ठाऊक झाले होते.)

एका बाकदार चढावर फस्क्लासपैकी वळण घेऊन गाडी रस्त्याला लागली. चार पदरी रस्ते, "80 KM" चे बोर्डस सगळं अगदी पाश्चात्य देशांशी स्पर्धा करायची म्हणूनच जणू उभारलेलं वाटत होतं. दूरवर कुठल्याशा पॉवर प्लँटची अजस्त्र धुराडी करड्या रंगाचा धूर काढत होती. कित्येक हजार वोल्टच्या पॉवरलाईन्सचे अफाट उंच मनोरे लांबवर जात दिसेनासे झाले होते. हे मनोरे मला नेहेमी त्या 'एंपाअर स्ट्राईक्स बॅक' मधल्या अजस्त्र रोबोंची आठवण करुन देतात!
आकाश मात्र जाम धुरकट वाटत होतं. प्रदूषण प्रचंड होतं. जपानी, अमेरिकन, यूरोपिअन, कोरिअन सगळ्या देशांच्या सगळ्या ब्रँड्सच्या गाड्या धावत होत्या.

एवढ्यात झुऽऽऽप्~असा आवाज करुन माझ्या उजवीकडून काहीतरी प्रचंड वेगात गेलं! रस्त्याच्या उजव्या बाजूला उंचावर एक ट्रॅक होता त्यावरुन गेलेली ही हायस्पीड ट्रेन!
ताशी २५०-३०० किमि असला अचाट वेग होता तिचा! चक्रधर महाशयांना इंग्लिशचा जेमतेम गंध आणि माझं मंदारिन "नी हाव!" पाशी संपणारं त्यामुळे बोलण्याचा प्रश्न नव्हता. मध्येच कधीतरी माझा डोळा लागला.
अचानक हॉर्नने दचकून जागा झालो (क्षणभर पुण्या-मुंबईत आलो की काय असं वाटून गेलं). एका भल्यामोठ्या चौकातल्या सिग्नलला गाडी थांबली होती.
बाजूला बघितले आणि अनेक दुचाकीधारी दिसल्यावर फार म्हणजे फार बरं वाटलं!
पुढल्या पाच मिनिटात गर्दीतून वाट काढत 'हॉटेल रमाडा प्लाझा'वर गाडी आली. माझं सामान हॉटेलच्या ट्रॉलीवर लादून, माझी सही घेऊन ड्रायवर निघून गेला!
खोलीवर येऊन पोर्‍यानं सामान टाकलं आणि काढता पाय घेतला.
थंडगार पाण्याच्या दोन बाटल्या तहानेनं सुकलेल्या घशाखाली लोटल्या. लॅपटॉप चालू केला. एकीकडे टबात गरम पाणी सोडून ठेवले होते.
इंटरनेट कनेक्शन मिळताच घरी बायकोला फोन करुन सांगितलं की मी सुखरुप पोचलो.
आणि लगोलग वाफाळत्या गरमा गरम पाण्याच्या टबात शिरलो!!
लांबच्या प्रवासानंतर हे असलं स्नान म्हणजे स्वर्गसुखच असतं. शांघायमधला माझा पहिला दिवस सुरु झाला होता!!
(क्रमशः)

-चतुरंग

समाजजीवनमानराहणीप्रवासप्रकटनअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Mar 2010 - 8:35 am | बिपिन कार्यकर्ते

पुढच्या दिवसांबद्दलपण पटापट लिहा...

बिपिन कार्यकर्ते

मेघना भुस्कुटे's picture

19 Mar 2010 - 3:53 pm | मेघना भुस्कुटे

असेच म्हणते. पुढचे भाग पटापट लिहा हो.
( मी आत्ताच अरुण साधूंचं 'ड्रॅगन जागा झाल्यावर' पुरं केलं आहे. त्यामुळे त्यातल्या अभ्यासपूर्ण निरीक्षणांना तुमच्या चष्म्यातून दिसणार्‍या चित्राची जोड देण्यास उत्सुक!)

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Mar 2010 - 5:02 pm | बिपिन कार्यकर्ते

... आणि अशा रितीने अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचण्याची माझी आशा पल्लवित झालेली आहे... धन्यवाद.

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

20 Mar 2010 - 2:56 am | टारझन

फ्लॉलेस लेखन ... :)
प्लिज पटकन् पटकन् टाका भाग !

राजेश घासकडवी's picture

19 Mar 2010 - 8:38 am | राजेश घासकडवी

पुढचे भाग भराभर येऊ देत.

राजेश

बेसनलाडू's picture

19 Mar 2010 - 11:28 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Mar 2010 - 6:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुढचे भाग भराभर येऊ देत.

[फोटू टाका]

-दिलीप बिरुटे

परिकथेतील राजकुमार's picture

19 Mar 2010 - 7:08 pm | परिकथेतील राजकुमार

फोटू पाहिजेतच.

(इथे प्रा. डॉ. ना टब मधले फोटु अपेक्षीत नसावेत अशी आशा करतो)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

मदनबाण's picture

19 Mar 2010 - 11:33 am | मदनबाण

पुढचा भाग लवकर लिवा की राव... :)

अवांतर :--- माझ्या चीन मधल्या एका चीनी आयटी सपोर्ट देणार्‍या मुलीचे नाव आहे... मेरी मा. :D

मदनबाण.....

स्वतःच्या बंगल्यांवर जनतेचे कोट्यावधी रुपये उधळणार्‍या आणि याच जनतेच्या डोक्यावर व्हॅटचा तडाखा देणार्‍या सरकारचा मी निषेध करतो !!!

http://bit.ly/dlmzCy

अमोल खरे's picture

20 Mar 2010 - 10:28 am | अमोल खरे

लेख तर छानच. मदनबाणाच्या मैत्रीणीचे नावही मस्त. चिनी नावे वाट्टेल ती असु शकतात. वस्कन ओरडलास की, हळु बोल की अशी पण नावे असतील कोणास ठाऊक. :)

गोगोल's picture

19 Mar 2010 - 11:10 am | गोगोल

चिन्यांच्या देशात जाऊन टीआनान मेन स्क़्वेअर असा गुगल सेअरच देऊन बघितला का?
(रंगा के साथ बातां : आता हा लेख प्रायोरिटी इनवर्जन मध्ये अडकायला नको)

नंदू's picture

19 Mar 2010 - 11:53 am | नंदू

अप्रतिम सुरुवात. पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत.

नंदू

स्वाती दिनेश's picture

19 Mar 2010 - 1:05 pm | स्वाती दिनेश

सुरुवात झकास.. पुढचेही येऊ दे पटपट..
स्वाती

गणपा's picture

19 Mar 2010 - 1:17 pm | गणपा

सुरुवात उत्तम झालीये..
येउंद्या बाकीचपण लगोलग..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Mar 2010 - 2:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि मग?

अदिती

अनिल हटेला's picture

19 Mar 2010 - 4:09 pm | अनिल हटेला

आणि मग?

:?
(खुद के साथ बाता: आता खर्‍या अर्थाने प्रवासवर्णन वाचायला मिळणार तर!!)
बैलोबा चायनीजकर !!!
© Copyrights 2008-2010. All rights reserved.

चित्रा's picture

19 Mar 2010 - 6:59 pm | चित्रा

+१, असेच म्हणते; पुढचे भाग पटापटा टाका; लेख छान, उत्सुकता ताणली गेली आहे; अशा प्रतिसादकांना पर्याय म्हणून "आणि मग?" - हा अजून एक पर्याय तयार केल्याबद्दल अदितीताईंचे आभार.

(लेख छानच).

धनंजय's picture

24 Mar 2010 - 1:31 am | धनंजय

आणि मग?

विसोबा खेचर's picture

19 Mar 2010 - 4:58 pm | विसोबा खेचर

शांघायमधला माझा पहिला दिवस सुरु झाला होता!!

मालक, म्होरं लिहा..

तात्या.

मीनल's picture

19 Mar 2010 - 6:05 pm | मीनल

कशाला? कशाला आठवन करून देताय माझ्या चीनमधल्या मस्त वास्तव्याची.
असो. पुन्हा उजळतील आठवणी !
फोटो टाका खूपसे.
खूप लिहा. ती इमारतींच्या दिव्यांची रोषणाई, तो बंड, ओरिएंटल पर्ल टॉवर, एक्वेरिअम, तिथली भोगद्यातली ट्रेन, चीनी पाहुणचार ,जेवण ,खरेदीच्या वेळची घासाघीस (असल्यास फसवणूकीचा अनुभव)
श्रीमंती पहावी ती चीन मधल्या शहरातच. प्रत्येक इमारत वेगळी दैदिप्य रोषणाई ,लखलखलेली. हन हाव( खूप छान)

चीन ह्या क्लोज्ड इकॉनॉमीने जगाला सामोर जायला टप्प्याटप्प्याने केली. त्यातिल समुद्राला तुलनेत जवळ Yangtze River वर वसलेल्या शहराला सर्वात आधी ओपन केले. म्हणजे सर्व प्रथम चीन मधे प्रवेश शांघाईत. इंटर नॅशल बिझिनेस सेंटर्स सुधा तिथे आधी सुरू करण्यात आले. त्यामानाने आताची राजधानी बिजिंग फार उशीरा ओपन केले गेले. त्यामुळेच शांघाईत त्यामानाने ब-यापैकी इंग्रजी समजते. शिवाय भारतीय रेस्टोरंटस, जिन्नस मिळण्याची दुकाने खूप आधी सुरवात झाली.
आम्ही २००२ मधे बिजिंग मधे रहात असताना पोळ्यांसाठी गव्हाची कणीक, तूर डाळ सुधा शांघाईतून मागवून घेत असू.
मजा असायच्या ! वेगळा आनुभव होता तो. न विसरण्याजोगा!
`Third World` वाटायच तेव्हा. पण ५-६ वर्ष राहिल्यानंतर नाही वाटत तस.ब-यावाईट अनुभवांनंतर ही आपलंस वाटत.

(चायनीज) मीनल.
http://myurmee.blogspot.com/

प्रभो's picture

19 Mar 2010 - 6:34 pm | प्रभो

क्रमशः चा नवा बळी रंगाशेठ....
लिहा हो लवकर.

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

शुचि's picture

19 Mar 2010 - 6:35 pm | शुचि

सुरुवात सुरेख
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

प्राजु's picture

19 Mar 2010 - 7:06 pm | प्राजु

वाचते आहे.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

संदीप चित्रे's picture

19 Mar 2010 - 8:25 pm | संदीप चित्रे

पुढच्या भागांची वाट बघतोय.
(थँक्स टू तुझा हा लेख, कधीतरी माझीही लेखणी जवळपास तेरा वर्षांपूर्वी झालेल्या माझ्या चीन भेटीच्या आठवणी उजळवायला बसली तर बघीन)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Mar 2010 - 8:55 am | बिपिन कार्यकर्ते

च्यायला काय भाव खातोस रे...!!!

बिपिन कार्यकर्ते

सुमीत भातखंडे's picture

19 Mar 2010 - 9:23 pm | सुमीत भातखंडे

लौकर येऊदेत पुढचा भाग.

वाटाड्या...'s picture

19 Mar 2010 - 9:36 pm | वाटाड्या...

मला एकदा सिंगापुरच्या एका रस्त्याचं नाव 'च्याई ची' असं वाचायला मिळालं आहे.

'chai chee' कसलं भारी... =))

- वा

सुनील's picture

20 Mar 2010 - 6:45 am | सुनील

सुरेख सुरुवात.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रकाश घाटपांडे's picture

20 Mar 2010 - 9:18 am | प्रकाश घाटपांडे

चीनी हावरट असा काही त्याचा अर्थ दडलेला असल्यास व तो चीनी माणसाला समजल्यास काय होईल.
किंवा मला काही हाव नाही असे दिलेले डिक्लेरेशन चीनी माणसाला दिलासा देते कि काय?
तुमाला बी नी हाव!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

नंदन's picture

24 Mar 2010 - 2:58 am | नंदन

सुरुवात, पुढल्या भागाची वाट पाहतो.

>>> दोन मांजरं एकमेकात किंचित गुरगुरून भांडल्यासारखा आवाज डोक्यावरच्या स्पीकरमधून
=))

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सन्जोप राव's picture

24 Mar 2010 - 5:33 am | सन्जोप राव

पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहे...
(बर्‍याच दिवसांनी बुकणा हा शब्द वाचून खूप बरे वाटले!)
सन्जोप राव
कल और आयेंगे नगमोंकी खिलती कलियां चुननेवाले
मुझसे बेहतर कहनेवाले, तुमसे बेहतर सुननेवाले
कल कोई मुझको याद करें, क्यों कोई मुझको याद करें
मसरुफ जमाना मेरे लिये, क्यूं वक्त सुहां बरबाद करे