श्रिखंड

गणपा's picture
गणपा in पाककृती
30 Jan 2010 - 8:20 pm

श्रिखंड न आवडणारा मराठी माणुस विरळाच.
आमच्या परम मित्र श्री. सहजरावांनी आम्हाला ही खालील श्रिखंडाची कृती दिली.
या पुर्वी मी श्रिखंड कधी घरी बनवल नव्हत. नाही म्हणायल खुप लहन (यत्ता ४थी) असताना आईने बनवल होत.
त्यामुळे सहजरावांनी दिलेली कृती कधी एकदा करुन पहातो अस झाल होत.

त्यामुळे या पाककृतीचे खरे श्रेय आपल्या सहजरावांना. आम्ही फक्त निमित्तमात्र इथे टाकायला.


चांगले ताजे घट्ट दही घावे.


एका पंच्यात/ पतळ कपड्यात बांधून रात्र भर टांगून ठेवावे.


१ किलो दह्याचा सधारण अर्धा किलो (फार तर ५०, १०० ग्रॅम जास्त ) चक्का होतो.


जेवढा चक्का तेवढीच साखर घ्यावी व ते एकत्र करुन परत रात्रभर फ्रीजमधे ठेवावे

मग बाहेर काढून छान घोटावे.
किंचीत दुधात केशराच्या दोन चार काड्या घालून रंग बनवावा. तो या मिश्रणात घालून श्रीखंडाला केशरी/ ऑफ व्हाईट रंग आणवा.
(मझ्या कडे केशर नसल्या ने ही पायरी मी गाळली आहे)


मग आवडी नुसार चारोळ्या, बदाम , पिस्ते ,वेलदोडे कुटून पूड टाकुन सजवा.

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

30 Jan 2010 - 8:33 pm | मदनबाण

गण्या सॉलिट्ट रे रे रे :)

(आम्रखंड प्रेमी)
मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

उग्रसेन's picture

30 Jan 2010 - 8:36 pm | उग्रसेन

गण्या सॉलिट्ट रे रे रे
श्री सहजरावांना नमस्कार सांगा

बाबुराव :)

शुचि's picture

30 Jan 2010 - 8:38 pm | शुचि

चट्टामट्टा करावसा वाटतोय :)
लहानपणी चक्कायन्त्र वापरत असू.

***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो

बंडू बावळट's picture

30 Jan 2010 - 11:20 pm | बंडू बावळट

केशर कुठाय??

गणपा's picture

31 Jan 2010 - 2:21 am | गणपा

दुकानात.
( )

प्रभो's picture

30 Jan 2010 - 11:50 pm | प्रभो

ह्म्म्म्म....पुरी कुठाय???

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

अविनाशकुलकर्णी's picture

31 Jan 2010 - 9:56 am | अविनाशकुलकर्णी

मस्त..मी एके ठिकाणी श्रिखंडात चविसाठी खायचा कापुर घालावा असे वाचले होते..

इंटरनेटस्नेही's picture

27 May 2011 - 2:36 am | इंटरनेटस्नेही

सुंदर. सहजसोपी आणि अप्रतिम पाकृ.

गोगोल's picture

27 May 2011 - 4:01 am | गोगोल

पाणी जेव्हढा चक्का तितकीच साखर हे ऐकून पळून गेल.

पाषाणभेद's picture

27 May 2011 - 7:30 am | पाषाणभेद

काय हो श्रीखंड बनवायला इतके दिवस का लागले हो?

विसोबा खेचर's picture

27 May 2011 - 9:07 am | विसोबा खेचर

गणप्या, तुझी मनापासून क्षमा मागतो, परंतु इतरांनी केलेल्या श्रीखंडाच्या पा कृ ला मी कधीच प्रतिसाद देत नाही. याचं कारण एकच आणि ते म्हणजे या जगात माझ्या आईइतकं सुरेख श्रीखंड कुणीच बनवू शकत नाही असा माझा समज, विश्वास, दृढविश्वास, कयास, श्रद्धा, अंधश्रद्धा आहे! :)

तुलाही याची खात्री पटण्याकरता तुला एकदा माझ्या घरी नक्की बोलावीन..

तात्या.

मदनबाण's picture

27 May 2011 - 9:31 am | मदनबाण

आहाहा !!! :)

(आम्रखंड प्रेमी)