श्रिखंड
श्रिखंड न आवडणारा मराठी माणुस विरळाच.
आमच्या परम मित्र श्री. सहजरावांनी आम्हाला ही खालील श्रिखंडाची कृती दिली.
या पुर्वी मी श्रिखंड कधी घरी बनवल नव्हत. नाही म्हणायल खुप लहन (यत्ता ४थी) असताना आईने बनवल होत.
त्यामुळे सहजरावांनी दिलेली कृती कधी एकदा करुन पहातो अस झाल होत.
त्यामुळे या पाककृतीचे खरे श्रेय आपल्या सहजरावांना. आम्ही फक्त निमित्तमात्र इथे टाकायला.
चांगले ताजे घट्ट दही घावे.
एका पंच्यात/ पतळ कपड्यात बांधून रात्र भर टांगून ठेवावे.
१ किलो दह्याचा सधारण अर्धा किलो (फार तर ५०, १०० ग्रॅम जास्त ) चक्का होतो.
जेवढा चक्का तेवढीच साखर घ्यावी व ते एकत्र करुन परत रात्रभर फ्रीजमधे ठेवावे
मग बाहेर काढून छान घोटावे.
किंचीत दुधात केशराच्या दोन चार काड्या घालून रंग बनवावा. तो या मिश्रणात घालून श्रीखंडाला केशरी/ ऑफ व्हाईट रंग आणवा.
(मझ्या कडे केशर नसल्या ने ही पायरी मी गाळली आहे)
मग आवडी नुसार चारोळ्या, बदाम , पिस्ते ,वेलदोडे कुटून पूड टाकुन सजवा.
वाचने
8611
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
गण्या
In reply to गण्या by मदनबाण
आस्सच बोलतो
चट्टामट्टा
केशर
In reply to केशर by बंडू बावळट
दुकानात. (
ह्म्म्म्म..
मस्त..मी
सुंदर. सहजसोपी आणि अप्रतिम
तोंडाला सुटलेले
काय हो श्रीखंड बनवायला इतके
गणप्या, तुझी मनापासून क्षमा
आहाहा !!! (आम्रखंड प्रेमी)