मराठी ब्लॉगर्सचा रविवारी पुण्यात स्नेहमेळावा
सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 14, 2010 AT 08:54 PM (IST)
Tags: blog, marathi, bloggers
मराठीत नियमित लिहिणाऱया ब्लॉगर्सचा अनौपचारिक स्नेहमेळावा येत्या रविवारी (ता. १७ जानेवारी) पुण्यात होणार आहे. संध्याकाळी चार वाजता सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानात हा मेळावा होईल.
एकमेकांचा परिचय करून घेणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे. मराठी ब्लॉगर्सनी एकत्रितपणे काही कार्यक्रम घेण्यासंदर्भातील रुपरेषाही मेळाव्यात ठरविता येणार आहे. आपापल्या ब्लॉग्ज् ची माहिती आणि इतर बाबींवरही मेळाव्यात चर्चा होईल.
मेळावाला उपस्थितीसाठी संपर्क -
सुरेश पेठे, ९८५०४८८६४० (sureshpethe@gmail.com)
अनिकेत समुद्र, ९६०४६०२४४८ (aniket.com@gmail.com)
पंकज झरेकर, ९९२१८४५१५१ (pankajzarekar@gmail.com)
मेळाव्याला येण्यासाठीचा नकाशा:
http://sites.google.com/site/aniketcom/map.JPG
प्रतिक्रिया
15 Jan 2010 - 11:36 am | नीधप
मी जाणारे!
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
15 Jan 2010 - 7:12 pm | भटकंती अनलिमिटेड
सर्वांचे मेळाव्यात स्वागत आहे. वेळात वेळ काढून अगत्य येण्याचे करावे. बऱ्याच लोकांना ब्लॉगलेखन, मराठी टाइपिंग, ब्लॉग डिझाइन वगैरे संबंधी काही शंका असतात. त्या संदर्भात काही चर्चा होण्याची अपेक्षा आहे. सविस्तर कार्यक्रम उद्या निश्चित दुपारपर्यंत होईल.
-पंकज झरेकर
www.pankajz.com
15 Jan 2010 - 8:11 pm | मॅन्ड्रेक
नमस्कार
प्रवेश सर्वासाठी आहे का?
at and post : Xanadu.
16 Jan 2010 - 12:11 am | भटकंती अनलिमिटेड
होय सर्वांसाठी प्रवेश आहे.
-Pankaj भटकंती Unlimited
www.pankajz.com
16 Jan 2010 - 2:38 am | टुकुल
यावेळेला येणे जमनार नाही, पण पुढच्या वेळेला नक्की .
मेळाव्याल्या शुभेच्छा !! व्रुतांत टाका नंतर कोणीतरी.
--टुकुल
16 Jan 2010 - 11:08 am | अमोल केळकर
मेळाव्यास हार्दीक शुभेच्छा !!
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
17 Jan 2010 - 7:00 pm | मॅन्ड्रेक
धन्यवाद.
at and post : Xanadu.
17 Jan 2010 - 7:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
किती ब्लॉगर्स आले, सुरुवातील कोण आलं इथपासून ते शेवटी कोण गेलं इथपर्यंत. अगदी तपशिलवार वर्णन आणि फोटू येऊ द्या....!
-दिलीप बिरुटे
17 Jan 2010 - 8:41 pm | II विकास II
मिसळपाव मधले
मी, घाटपांडे काका, नीरजा पटवर्धन, आपला आभिजित हे आले होते.
जबरदस्त चर्चा झाल्या.
थोडेसा वृत्तांत
http://my.opera.com/prabhas/blog/show.dml/6591831
17 Jan 2010 - 8:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>जबरदस्त चर्चा झाल्या.
तपशिलवार लिहा राव...!
>>मी, घाटपांडे काका, नीरजा पटवर्धन, आपला आभिजित हे आले होते.
आणि मिपाचे विनायक रानडेसाहेबही होते.
स्वगतः च्यायला, नुसतेच जमले होते वाटतं ? ओळखी बिळखी करुन घेतल्या की नाही कोणास ठाऊक.
की आपल्याच तोर्यात होते सर्व ? [ह.घ्या]
-दिलीप बिरुटे
[माहितगार]
17 Jan 2010 - 9:02 pm | II विकास II
>>आणि मिपाचे विनायक रानडेसाहेबही होते.
माफ करा.
घाई गडबडीत मी विसरलोच.
>>तपशिलवार लिहा राव...!
त्यात मराठी भाषेत शुध्दलेखनाचे महत्व, इंग्रजीला प्रतिशब्द, मराठी साहित्यिकांकडुन मराठी भाषेकडे होणारे दुर्लक्ष, लोकमान्य टिळक, सावरकर यांनी दिलेले प्रतिशब्द इत्यादी विषयांचा ही समावेश होता.
17 Jan 2010 - 9:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>मराठी भाषेत शुध्दलेखनाचे महत्व,
शाब्बास ! कोण-कोण होते रे या चर्चेत. जरा नावं द्या तर.
खरडी करतो त्यांना कौतुकाच्या..! :)
>>इंग्रजीला प्रतिशब्द,
अच्छा...!
>>मराठी साहित्यिकांकडुन मराठी भाषेकडे होणारे दुर्लक्ष
हम्म ! सामान्यांच्या जवाबदारीवरही चर्चा झाली असेल असे ग्रहित धरतो.
>>लोकमान्य टिळक, सावरकर यांनी दिलेले प्रतिशब्द इत्यादी विषयांचा ही समावेश होता.
हम्म......! ऊपक्रमवरील सदस्य होते की काय या चर्चेत... ? :)
असो, वृत्तांताबद्दल धन्यु....!
-दिलीप बिरुटे
17 Jan 2010 - 8:43 pm | II विकास II
ह्याच प्रकारे मिसळपाव स्नेहसंम्मेलन आयोजित करायला हवे. जाम धमाल येइल.
17 Jan 2010 - 8:49 pm | कुंदन
अन करा संगित कट्टा आयोजित.
17 Jan 2010 - 8:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गाणे,गप्पा, दोन घोट,[ऐच्छिक] चखना, जेवणासाठी साधं आणि नॉनव्हेज असा कायतरी बेत ठेवा राव...!
औरंगाबादला जमेल का ? संयोजनाची जवाबदारी उचलतो
[खर्चाची जवाबदारी कोणी तरी उचलावी ही न्रम विनंती]
-दिलीप बिरुटे
[स्पष्ट ]
17 Jan 2010 - 8:59 pm | II विकास II
>>[खर्चाची जवाबदारी कोणी तरी उचलावी ही न्रम विनंती]
प्रत्येकाने आपापला खर्च करावा.
>>गाणे,गप्पा, दोन घोट,[ऐच्छिक] चखना, जेवणासाठी साधं आणि नॉनव्हेज असा कायतरी बेत ठेवा राव...!
गाणे म्हणजे फक्त मिपावरील की इतर ही गायक बोलवणार आहात?
किती दिवसांचा बेत आखणार आहात?
17 Jan 2010 - 9:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपावरीलच गायक. [संगीत देणारे कलाकार बोलवायचे असतील तर ते आणता येतील, पण खर्च वाढेल]
>>किती दिवसांचा बेत आखणार आहात?
ऑ...? अरे बाबा ! दुपारपर्यंत पोहचायचं आणि मुक्कामी ज्याच्या त्याच्या घरी.
[मुक्कामाचं म्हटलं की, कार्यक्रम लांबतो]
-दिलीप बिरुटे
17 Jan 2010 - 9:17 pm | II विकास II
दिवसा औरंगाबाद दर्शन अधिक स्नेहसम्मेलन असा कार्यक्रम केलात तर अधिक चांगले. नाहीतर वेळही चांगल्या पदधतीने वापरला जाईल.
रात्रीच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शन तुम्ही करालच, ज्यांना आचमने करायची आहेत त्यांची पण सोय नको का?
17 Jan 2010 - 9:06 pm | चतुरंग
मालकांनी दमड्या खर्चून खव आणि व्यनिची सोय करुन दिलेली आहे! कृपया त्यांचा वापर करावा!
(नाहीतर पुन्हा संपादकांचे लक्ष नाही म्हणायला मोकळे! ;) )
चतुरंग
17 Jan 2010 - 9:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>मालकांनी दमड्या खर्चून खव आणि व्यनिची सोय करुन दिलेली आहे! कृपया त्यांचा वापर करावा!
ओक्के सर....! :)
-दिलीप बिरुटे
[आज्ञाधारक]
17 Jan 2010 - 9:19 pm | II विकास II
ह्या विषयी धागा टाकला पाहीजे, म्हणजे तुम्हालाही बोलता येइल.
17 Jan 2010 - 9:35 pm | टारझन
आणि त्यात एक संपादकही जुगलबंदीला असल्याने आम्हाला शरम वाटली.
असो ..
आज आमची सिडनी - पिंपरी फ्लाईट अंमळ वेळेवर आली. पण जायचा कंटाळा आला होता.
म्हंटलं कसल्यातरी रटाळ विषयांवर (पक्षी : शुद्धलेखन प्रतिशब्द वगैरे) चर्चा होणार , कोणती तरी रटाळ लोकं दिसणार (पक्षी : हॅहॅहॅ) बरं झालं गेलो नाही :)
- || अंमळ वेडझवा ||
4 Feb 2010 - 2:02 pm | II विकास II
पुढाकार घ्यायला काही हरकत नाही.
त्या कट्ट्याचा अनुभव वाईट आहे.
लोकांनी पैसे बुडवले. सध्या तरी ते दुसर्या संकेतस्थळावर लिहीत असतात.
मला मागयची लाज वाटायला लागली. पण पैसे देण्याचे नाव नाही.
त्यामुळे आधी पैसे भेटत नाहीत तो पर्यंत मी तरी कट्टा नाही.
असो.
18 Jan 2010 - 10:24 pm | हरकाम्या
मी जनातले मनातले मध्ये आवाहन केले होते की १७ जानेवारीला
बालगंधर्वमागील कफेटेरियात तिळगुळ देण्यासाठी पुण्यातील
"मिपाकरांना " येण्याचे आवाहन केले होते व संपर्कासाठी माझा मोबाईल नंबर दिला होता पण एकाही मिपाकराने मला प्रतिसाद दिला नाही. स्नेहसंमेलन कसे काय भरवणार ?
17 Jan 2010 - 10:50 pm | नीलकांत
आजच्या कट्ट्याला जायला जमलं नाही.
मात्र कट्टा कसा झाला ते ऐकायला आवडेल.
-- नीलकांत
18 Jan 2010 - 12:59 am | भटकंती अनलिमिटेड
मेळावा सुरेखच झाला. जवळपास ६० ब्लॉगलेखक जमले होते. ६० नावे इथे लिहिणे अपेक्षित आहे का? ते ही करु. फार सुंदर साधक-बाधक चर्चा झाली. आणि विशेष म्हणजे ब्लॉग सोडून अवांतर चर्चा काही झाली नाही. लवकरच या मेळाव्याचे फलित दिसून येईल.
प्रभासने एक लिंक दिली आहेच. अन्य वृत्तांत इथे मिळतील.
http://72.78.249.124/esakal/20100118/5399838546169243873.htm
http://www.pankajz.com/2010/01/marathi-bloggers-meet-at-pune.html
http://manatale.wordpress.com/2010/01/17/मराठी-ब्लॉगर्स-स्नेहमेळावा
-पंकज झरेकर
www.pankajz.com
18 Jan 2010 - 9:00 am | नीधप
छान झाला मेळावा...
वर लिहिलेल्या अनेक उदात्त उद्देशांची देवाणघेवाण झाली. त्यामुळे अनेकांच्याबद्दल चांगली माहीती कळली.
एक सुरूवात झाली या दृष्टीने या मेळाव्याला महत्व. आता पुढे हे सगळं कसं वळण घेतंय यावर यातून काही घडेल की नुसतीच गाठभेट हे ठरेल.
माझ्यासारख्या केवळ स्वान्त सुखाय(स्पष्टपणे म्हणायचं तर कळ आली म्हणून..) लिहिणार्याला सगळे उद्देश पटले तरी झेपतीलच असे नाही.
या वर्षीचे संमेलनाध्यक्ष द. भि. कुलकर्णी यांना ब्लॉगर्सच्या वतीने एक निवेदन देण्याचे ठरलेय. तो मुद्दा मात्र खूप महत्वाचा आहे.
याच पद्धतीने ब्लॉग किंवा ऑनलाइन लिखाणासंदर्भात इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइटस बाबत स्वतःचे वेगळे नियम/ कायदे असणं गरजेचं आहे हे समजत होतंच पण या ब्लॉगर्स मेळाव्यातून पुढे जाऊन ते नियम बनण्यासाठी ही एकजूट उपयोगी पडेल का/ पडावी असे वाटते. आपण आपल्याकडून या कायद्यांमधे आवश्यक ते बदल/ भर करण्यासाठी रेटा लावू शकतो का? कुणी वकील ब्लॉगर असेल तर त्याची मदत होऊ शकते. हे काल घरी आल्यानंतर सुचलेलं
नितिन, योगेश आणि प्रसन्न या मेडिया त्रयीशी छान गप्पा झाल्या माझ्या. त्यात अधूनमधून विचारांची देवाणघेवाण पण केली आम्ही. काही गोष्टी ठरवल्या. त्या घडल्या कीच त्यावर बोलण्यात अर्थ आहे.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
18 Jan 2010 - 2:28 pm | नीधप
मी लिहिलेला वृत्तांत..
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/2010/01/blog-post.html
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
18 Jan 2010 - 6:45 pm | प्रकाश घाटपांडे
आम्ही मेळाव्यात आमच्या फलज्योतिष चिकित्सा मंडळ या ब्लॊगवरील विचार जरुर चोरावेत. ते चोरण्यासाठीच ठेवले आहेत असे प्रतिपादन केले आहे. कुणी ते चोरले तर आमच्याकडे चोरण्यासारखे काहीतरी आहे या विचारांनी आम्ही सुखावुन जाउ.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.