प्रोपर्टी मार्केट, शेअर मार्केट आता वर जाईल का?

उम्मि's picture
उम्मि in काथ्याकूट
28 Dec 2009 - 1:50 pm
गाभा: 

प्रेम....सर्व मिपाकरांना उम्मिचे प्रेम...

गेले काही महीने जागेच्या(घराच्या) शोधात असल्यामुळे मला १ बाब समजली:

३-४ महिन्यापुर्वी घरांचे भाव जे होते त्यात व आजच्या भावात ३-४ लाखाची लक्षणीय वाढ झाली आहे!!! (री-सेल)
यामागचे कारण काय असावे???
जाणकारांनी प्रकाश टाकावा....

प्रोपर्टी मार्केट व शेअर मार्केट यांचा काय संबध आहे?
आता ही दोन्ही मार्केट्स वर्-वर जातील की......??

आपला ,
उम्मि...
सरकारी नोकर
(दहीसर-मुम्बई)

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

28 Dec 2009 - 2:07 pm | चिरोटा

प्रोपर्टी मार्केट व शेअर मार्केट यांचा काय संबध आहे?

दोन्ही ठिकाणी राजकारणी,नोकरशहांचा बराच काळा पैसा गुंतला आहे.

आता ही दोन्ही मार्केट्स वर्-वर जातील की......??

५०% शक्यता वाटते. गेले काही महिने मिडियाला हाताशी धरुन 'परिस्थिती सुधारली,आता भाव खाली येणार नाहीत' असा प्रचार चालु आहे.सामान्य ग्राहकाने घाबरून गुंतवणूक करावी अशी त्यांची अपेक्षा आहे.

..त्यात व आजच्या भावात ३-४ लाखाची लक्षणीय वाढ झाली आहे

गुंतवणूक करण्यासाठी जे फ्लॅट घेतात ते काहीही भाव सांगु शकतात्.कारण फ्लॅट विकला गेला नाही तरी त्यांना फार फरक पडत नाही.
भेंडी
P = NP

उम्मि's picture

28 Dec 2009 - 5:55 pm | उम्मि

गुंतवणूक करण्यासाठी जे फ्लॅट घेतात ते काहीही भाव सांगु शकतात्.कारण फ्लॅट विकला गेला नाही तरी त्यांना फार फरक पडत नाही.
----पटलं हा, धन्यवाद!!!

ऊम्मि...

अशोक पतिल's picture

28 Dec 2009 - 8:25 pm | अशोक पतिल

माझा अभिप्राय असा आहे की आता या फिल्ड मधे सचुरेशन झाले आहे . भाव काहि जास्त वर जानार नाहित, दोन वर्‍षापुर्वि अमेरीकेत व या वर्शि दुबइ मधे जो फुगा फुट्ला त्याचा अनुभव आहेच.

निखिलचं शाईपेन's picture

29 Dec 2009 - 10:13 am | निखिलचं शाईपेन

मागणी आणि पुरवठयाचे गणित आहे.
भारतात घरे घेणा-या लोकांचे प्रमाण (टक्क्यात आणि निव्वळसुद्धा) बाहेरील देशांपेक्षा जास्त आहे. मध्ये मंदीमुळे लग्ने, खरेदी ईत्यादी सर्वच खर्च थांबले होते पण आता, लग्न होतायत .. खरेद्या (मुख्यत्वे करून घरे, कारण भारतात लग्न करणे जसे कंपल्सरी आहे (लिव ईन वगैरे प्रक्टिकल गोष्टी अजून यायच्यात), तसेच (किंवा त्यामुळे) मग घर घेणेही आलेच. मागणी वाढतच जाणार (लोक जास्त आहेत, लग्ने जास्त होणार, घरे घेतली जाणार) म्हणुन मग घरांचे भाव वाढतच जाणार आहेत. अमेरीकेतही मंदीनंतर (मंदी चालु असताना / संपता संपता इंन्वेस्ट्मेंट म्हणुन घेतलेली) घरांचे भाव वाढलेच होते.
सांगणे हे कि ईथे काहिही नव्या सुविधा नसताना (घर, ग्रुहसंकूल, किंवा एकुणच शहरात) घरांचे भाव वाढतायत .. आणि वाढणारेत कारण घर घेणे कंपल्सरी आहे आणि खूप लोकं घरं घेतायत आणि घेणारेत.