खांब-१

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
11 Dec 2009 - 9:36 am

"उद्या संध्याकाळी येशील का जरा"?
साखरपुडा का?
"जरा घोळ झालाय. माझ्या कक्षेबाहेरचे आहे. तुच श्रुती कडे बोल. मी 'जांबुवंत जमान्यातला'.
दे फोन तीला.
"काका, बाबांच्या आकांड्तांडवाकडे तुम्ही लक्ष देउ नका. माझी काहीही चुक नाहीये. तुम्ही उद्या या. सविस्तर बोलु. फोनवर नको"
दिपक म्हणजे अगदी पाणी सुद्धा फुंकुन पिणार्‍या पैकी. आणि श्रुती सुपर फास्ट एक्स्प्रेस. दोघांचाही नाइलाज. असे वाद कायमचे होत असत.
घरी पोचल्यावर श्रुती सोडुन सर्वांचे चेहेरे सुतकी.
गेल्याच आठवड्यात श्रुतीचे लग्न ठरले होते. फक्त साखरपुडा आणि लग्नाची तारीख ठरायची होती. श्रुतीची जनरल प्रॅक्टिस नुकतीच सुरु झाली होती. मुलगा सुद्धा अगदी सर्वार्थाने मॅचींग होता. बघण्याच्या कार्यक्रमात दोघांनाही आपल्या आवडीनिवडी ची चर्चा करायला पुरेसा वेळ दिला गेला होता. दोघांनी होकार दिल्यावर बाकीची बोलणी सुद्धा बिनघोर पार पडली होती. पण जाता जाता श्रुतीने मुलाच्या हातात एक एनवलप दिले आणि त्याला म्हणाली,"I hope you will understand this and reciprocate from your side".
दुसर्‍या दिवशी मुलाच्या बापाचा फोन आला.
"असली थेर आम्हाला जमणार नाहीत. लग्न मोडले तरी चालेल"
श्रुती ने मुलाला आपला रिपोर्ट दिला होता. अगदी एच्.आय्.वी टेस्ट सकट.

"काय गरज होती हा भोचकपणा करायची. आमची लग्ने झाली नाहीत का? मुलगा अगदी सरळ्मार्गी आहे "दिपक ने दिवे पाजळले.
श्रुती खुदकन हसली.
"आता ह्यात हसण्यासारखे काय आहे"?
'सरळमार्गी' ची एटीमॉलॉजी दिपकला समजणे शक्यच नव्हते.
"हे बघा बाबा, हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुम्ही शांत रहा"
आता हा तिढा सोडवायचा कसा? तो विचारात पडला.
हे बघ, एकंदरीत मुलाच्या घरातील 'वाता-वरण' संरक्षित दिसते आहे. वडिलांना विरोध न करु शकणारा मुलगा तुला चालेल का. नसेल तर प्रश्नच संपला. किंवा अशा घरात असल्या विषयावर समोरासमोर संपुर्ण चर्चा करण्याची बंदी असते त्यामुळे मुलगा बोलु शकत नाही हा बेनिफिट ऑफ डाउट तु त्याला देणार?तसे असेल तर बसुन बोलुया त्याच्या वडिलांकडे.
"वडिलांबरोबर तो पण असला पाहीजे. मला लग्न त्याच्याबरोबर करायचे आहे"
अग गधडे, त्याच्या हातात एनवलपचा बाँब देताना जरा बोलुन तरी द्यायचा ना. सगळेच काही तुझ्यासारखे एन्लाइटन्ड नसतात.
"काका, डबल ग्रॅज्युएट आहे तो"
ते काही सांगु नकोस. कौमार्याबद्दल चुकीच्या आणि खुळचट कल्पना असलेले कीती डॉक्टर दाखवु तुला मी.
तुला काय म्हणायचे आहे त्याची भाषा बदल. त्याना झेपेल अशा भाषेत बोल.
"तुम्ही सांगाल ती भाषा वापरते काका"

दोन तासात मंडळी आली. मुलगा अगदी देखणा.
जास्त गुळ न काढता श्रुतीने सांगितल्याप्रमाणे लगेच मुळ प्रश्नाला हात घातला.
" ब्लड रिपोर्ट ही एक आजची गरज आहे. त्यात तुझ्या चारित्र्यावर संशय वगैरे काहीही नाही. तुला आठ महिन्यापुर्वी अपघात झाला होता तेंव्हा दोन युनिट्स द्यावी लागली होती हे तुच सांगितलेस मला. मला माझ्या पेशात होणार्‍या 'ह्युमन एरर' ची जाणिव आहे. फक्त शक्याशक्यते चा पडताळा. उगाच भावी आयुष्याची धुळधाण कशाला"?
मुलाच्या बापाच्या चेहेर्‍यावर गोंधळ.
दोघेही गॅलरीत गेले.
त्याने श्रुतीला थंब्स अप ची खूण केली.
पंधरा मिनिटाने मुलगा आणि बाप दोघेही आत आले.
खांब सुटला होता.
मुलगा खुल्या दिलाने सॉरी म्हणाला.
३ आठवड्यानंतरचा मुहुर्त ठरला.

जाता जाता: बाजारातुन काहीतरी आणण्याच्या निमित्ताने श्रुती त्याच्याबरोबर खाली उतरली.
" काका खर सांगु. हा रिपोर्ट त्याने दिला नसता तर मी हे लग्न केले नसते. सरळ मार्गी लोकांचे काय सांगता येत नाही बघा. मी कशाला उगाच रिस्क घेउ. त्याच्या भुतकाळाशी माझा काही संबध नाही. असेल नसेल मला त्याचे काही ही नाही. भविष्य काळ माझ्या हातात. आ़णि अशीच भुमिका त्याने पण घ्यावी अशी अपेक्षा. काय चुक आहे का?"
ह्याचा अर्थ तु.....
" बघा हं काका आता तुम्ही सुद्धा टीपीकल १८५७ होउ नका"

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

11 Dec 2009 - 9:56 am | विजुभाऊ

एच आय व्ही + बद्दल एक अनुभव.
रोटरीक्लबची अ‍ॅन्युअल कॉन्फरन्स... स्थळ पुणे
प्रकट मुलाखत... प्रेक्षक संख्या साधारण २०००...स्टेजवर एक तरुण मुलगी सर्वांसमक्ष सांगतेय की ती एच आय व्ही + आहे म्हणून. तिने तिला आलेले अनुभव सांगितले. पर्मुख पाहुण्यानी तिच्या धारिष्ट्याचे कौतुक केले. जाताना तिने सहज म्हणून शेकहॅन्ड साठी हात पुढे केला. दोन सेकंदापूर्वी भरसभेत भरभरून कौतूक करणारी प्रमूख पाहुणे त्या मुलीच्या हातात शेकहॅन्डसाठी आपला देऊ शकले नाहीत.......
त्या मुलीच्या डोळ्यात " या असल्या अनुभावांची आता सवय झाली आहे "असे भाव होते.
पुढचे पाचसहा मिनिटे सगळी सभा एकदम स्तब्ध होती. कोणी कोणाच्या नजरेला सुद्धा नजर देउ शकत नव्हते.

सहज's picture

11 Dec 2009 - 10:01 am | सहज

लेख व विचार उत्तम !

आमचे येथे पत्रिका व ब्लड रिपोर्ट मॅनेज करुन दिला जाईल अशी दुकाने पण निघतील का?

जाताजाता: नक्की + का - ते कळायला किमान ६ महिने लागतात ना म्हणे. तर खरे तर २ रिपोर्ट , ६ महिने व जास्त अंतराचे दिले पाहीजेत ना?

नंदन's picture

11 Dec 2009 - 10:30 am | नंदन

लेख आवडला, सर.

>>> जाताजाता: नक्की + का - ते कळायला किमान ६ महिने लागतात ना म्हणे. तर खरे तर २ रिपोर्ट , ६ महिने व जास्त अंतराचे दिले पाहीजेत ना?

-- हाच प्रश्न डोक्यात आला होता. मागे या विषयावर लोकसत्तेत चर्चा झाली होती तेव्हा रिपोर्ट यायला २१ दिवस लागतात असं त्यात लिहिलं होतं (चूभूद्याघ्या) आणि बरीच चर्चा होऊन रिपोर्टही फुलप्रूफ नाहीच असा निष्कर्ष निघाला होता.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

लंबूटांग's picture

11 Dec 2009 - 6:54 pm | लंबूटांग

लागतात + अथवा - कळायला. रॅपिड टेस्ट म्हणतात त्या टेस्ट ला.

जर + result आला तर परत एकदा तिच टेस्ट करतात to avoid false +ves.

त्यातही जर का +ve आले तर मात्र mostly +ve च असतो result पण मग दुसरी टेस्ट करतात (बहुधा CDC count साठीची. चूभूद्याघ्या.)

शैलेन्द्र's picture

12 Dec 2009 - 2:16 pm | शैलेन्द्र

परत तिच टेस्ट न करता पी सी आर करावी...

देवदत्त's picture

12 Dec 2009 - 8:08 pm | देवदत्त

माझी बहीणही ह्याच क्षेत्रात आहे. ती एकदा सांगत होती, एखाद्याचा रिपोर्ट +ve आला की ते लोक लगेच म्हणतात की तुम्ही नीट तपासले आहे का? ती म्हणाली अर्थातच ते लोक नीट तपासून घेतातच. आणि +ve आला तर जास्त वेळा.

मुक्तसुनीत's picture

11 Dec 2009 - 10:03 am | मुक्तसुनीत

सर्वसामान्यतः ठरवून केलेल्या लग्नाच्या संदर्भात विवेकवादी/तार्किक भूमिका घेणार्‍या मुलीकडे/मुलाकडे "आगाऊ" किंवा "विचित्र" इत्यादि नजरेने पाहिले गेलेले मी जवळून पाहिले आहे. गेल्या दशकामधे निदान शहरी वर्गातली मानसिकता बदलली असेल अशी आशा आहे.

लेख आवडला हेसांनल.

Nile's picture

11 Dec 2009 - 8:21 pm | Nile

लेख आवडला. मुलीचे विचार पटणारे.

खालील काही प्रतिसाद वाचुन अजुनही भारतीय समाज (थोडेसे जनरलायझेशन होते आहे का? ) कीती मागासलेला आहे याची पुनःश्च जाणीव झाली. त्यामुळेच मास्तरांनी असेच प्रबोधन करणारे लेख लिहण्याची किती गरज आहे हे दिसतेच आहे. :)

अगोचर's picture

11 Dec 2009 - 10:42 am | अगोचर

छान लेख.
खांब १ चा अर्थ काय ? आणखी काही खांब येणार आहेत का ?
---
मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान

अवलिया's picture

11 Dec 2009 - 11:14 am | अवलिया

छान !

" काका खर सांगु. हा रिपोर्ट त्याने दिला नसता तर मी हे लग्न केले नसते. सरळ मार्गी लोकांचे काय सांगता येत नाही बघा. मी कशाला उगाच रिस्क घेउ. त्याच्या भुतकाळाशी माझा काही संबध नाही. असेल नसेल मला त्याचे काही ही नाही. भविष्य काळ माझ्या हातात. आ़णि अशीच भुमिका त्याने पण घ्यावी अशी अपेक्षा. काय चुक आहे का?"
ह्याचा अर्थ तु.....
" बघा हं काका आता तुम्ही सुद्धा टीपीकल १८५७ होउ नका"

"ह्याचा अर्थ तु....." हे वाक्य सुचक आहे.
यावरुन मला जे समजले आहे "तसे "जर नसते तर त्या मुलीने स्वतः अशी टेस्ट करुन घेतली असती का ? आणी असा समोरच्याकडे आग्रह धरला असता का? किंवा समोरच्याने अशी टेस्ट करुन घ्या असे म्हटल्यावर त्या मुलीची प्रतिक्रिया काय असती ? आणि अशा वेळेस लेख आणि बाकी प्रतिसाद कसे असते याचा विचार करत आहे.
कारण असेच कुणीतरी कधितरी काहीतरी वेगळे पुराव्याने सिद्ध करुन हवे आहे असे म्हटले तेव्हा काय काय कसे कसे झाले होते याचे अंधुकसे स्मरण आहे. असो.

अधिक चर्चा म्हणजे अवांतराची पायाभरणी. देवाची करणी धाग्यावर पाणी. नकोच ते.

--अवलिया

शाहरुख's picture

11 Dec 2009 - 12:15 pm | शाहरुख

यावरुन मला जे समजले आहे "तसे "जर नसते तर..

आम्हालाही हेच विचारायचे होते अ‍ॅक्च्युअली..पण मास्तरांच्या जवळच्या ओळखीतील मुलगी दिसतीय म्हणून आपलं गप्प बसलो होतो.

टुकुल's picture

11 Dec 2009 - 12:26 pm | टुकुल

अगदी सहमत..
मास्तर तुम्ही लिहिता कमी आणी कोड्यात जास्त टाकता.

  1. " बघा हं काका आता तुम्ही सुद्धा टीपीकल १८५७ होउ नका"

म्हंजे काय?

--टुकुल

विजुभाऊ's picture

11 Dec 2009 - 10:56 am | विजुभाऊ

खांब चा अर्थ बहुतेक मुलगा वडिलांच्या आज्ञेबाहेर नाही.
ज्याप्रमाणे माकड खांबाला बांधलेले असते त्याप्रमाणे मुलगा वडीला नावाच्या खंबाला बांधलेला होता.
वडीलांच्या आज्ञेबाहेर जाऊन्त्याने एच आय व्ही परीक्षणाचा निर्णय घेतला. त्या अर्थाने खांब सुटला असे लिहिले असेल

मुलाच्या बापाला रागवण्याची काही एक गरज नव्हती. मुलाचा रक्ताचा रिपोर्ट त्यानी त्यावर घ्यायला हवा.
वेताळ

श्रीयुत संतोष जोशी's picture

11 Dec 2009 - 12:52 pm | श्रीयुत संतोष जोशी

मास्तर, तुमची बोलती पण बंद केली की.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

संजा's picture

11 Dec 2009 - 12:53 pm | संजा

>>>काका खर सांगु. हा रिपोर्ट त्याने दिला नसता तर मी हे लग्न केले नसते.

लग्नानंतर 'बाहेर' जाणार्‍यांचा विदा ऊपलब्ध आहे काय ?

>>>भविष्य काळ माझ्या हातात

अशा वेळी 'भविष्य काळ' हातात कसा काय राहु शकतो ?

संजा

संजा's picture

11 Dec 2009 - 12:58 pm | संजा

>>>काका खर सांगु. हा रिपोर्ट त्याने दिला नसता तर मी हे लग्न केले नसते.

लग्नानंतर 'बाहेर' जाणार्‍यांचा विदा ऊपलब्ध आहे काय ?

>>>भविष्य काळ माझ्या हातात

अशा वेळी 'भविष्य काळ' हातात कसा काय राहु शकतो ?

संजा

संजा's picture

11 Dec 2009 - 12:58 pm | संजा

>>>काका खर सांगु. हा रिपोर्ट त्याने दिला नसता तर मी हे लग्न केले नसते.

लग्नानंतर 'बाहेर' जाणार्‍यांचा विदा ऊपलब्ध आहे काय ?

>>>भविष्य काळ माझ्या हातात

अशा वेळी 'भविष्य काळ' हातात कसा काय राहु शकतो ?

संजा

विनायक प्रभू's picture

11 Dec 2009 - 2:08 pm | विनायक प्रभू

मला माहीत असलेल्या विदा नुसार साधारण ३०%.

संजा's picture

11 Dec 2009 - 2:16 pm | संजा

मग लग्नानंतर काहितरी 'पॉझीटीव्ह' घडल तर अशा वेळी 'भविष्य काळ' हातात कसा काय राहु शकतो ?

विनायक प्रभू's picture

11 Dec 2009 - 2:18 pm | विनायक प्रभू

घडु नये ह्याची ती काळजी घेईल अशी तीला खात्री आहे.
असतात एकेकाचे समज.

संजा's picture

11 Dec 2009 - 2:21 pm | संजा

बरं

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Dec 2009 - 2:20 pm | बिपिन कार्यकर्ते

लेखाचे शीर्षक चुकून 'खंबा' असे वाचले. असो. लेख नेहमी प्रमाणे थोडक्यात महत्वाचे सांगणारा. मास्तरांची परंपरा राखणारा.

ह्याचा अर्थ तु.....

त वरून ताकभात ओळखतात मास्तर.

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

11 Dec 2009 - 2:30 pm | श्रावण मोडक

हे काहीसे "डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे" असे झाले!

संजय अभ्यंकर's picture

11 Dec 2009 - 2:43 pm | संजय अभ्यंकर

मास्तर सिरियसली लिहितायत, ह्या बाबाला विनोद सुचतायत!
मास्तरांबद्दल गैरसमज आहेत काय बिपीनभाऊ तुला?

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

टारझन's picture

11 Dec 2009 - 3:38 pm | टारझन

ह्हा ह्हा ह्हा !
अंमळ मजेशीर करमणुक पर लेख !! पोरी चा आमच्या तर्फे अभिनंदन सांगा मास्तर !

बाकी एका प्रतिसादात पुन्हा ३०% - ७०% चा विदा दिसला .. च्यायला ह्या कोदा कडून तर नाही ना मिळवत तुम्ही असले विदे ? सगळीकडेच ३०% ह्हाहाहा

डोळा पाणावला... ! असो बदलिन

टारझन

अमृतांजन's picture

11 Dec 2009 - 9:47 pm | अमृतांजन

टारु तु अभ्यंकरांकडे अजुन गेला नाही? ते डोल्ञांचे तेव्हढे बघ रे लवकर.
टारु-गुरु-ह्या सहीचे कोडे कळले नाही.

मास्तरांची कथानयिका मात्र हटकून त्या ३०% वाली असते.

विनायक प्रभू's picture

12 Dec 2009 - 12:13 pm | विनायक प्रभू

अरे टारुदत्ता कधी जाणार तुझे कोदा ऑबसेशन?
असो.
तुला एक गंमत सांगतो.
जर विदाग्रस्तानी(हा शब्द पुरग्रस्त उच्चारतात तसा उच्चारावा) विदा मागितला तर बिनदास ३०% म्हणावे.
७०% वेळा तो बरोबर असतो.
अर्थात मला माहीत असलेला विदा असे म्हणायला विसरु नये.
ह्या विदा चा कोदाशी काहीही संबंध नाही.

मृत्युन्जय's picture

11 Dec 2009 - 4:25 pm | मृत्युन्जय

प्रत्येक गोष्ट सांगन्याची एक पद्धत असते. पोरगी तिथेच चुकली. बाकी तिची अपेक्शा काही चुकिची नव्हती.

स्वाती२'s picture

11 Dec 2009 - 8:10 pm | स्वाती२

हम्म!
मला वाटत होतं एच आय व्ही टेस्ट वगैरे निदान सुशिक्षित लोकात तरी आता रुटिन झालय म्हणून.
लेख आवडला.

माझ्या परिचयातल एक कुटुम्ब याला तोन्ड देतेय.
मुलगा मुलगी दोघेहि सधन, चांगल्या घरातली.
२ वर्षात मुलगा HIV Positive असल्याच निदान झाल.
मुलगी घट्स्फोट घ्यायला सुद्धा घाबरते...
आइ-वडिल तोन्ड लपवतात...
Test केली असती तर हे सगळ टाळता आल असत अस राहुन राहुन वाटत...

चतुरंग's picture

11 Dec 2009 - 9:33 pm | चतुरंग

मुलाकडल्या आणि मुलीकडल्या लोकांचा एक खांब सुटला ते बरे झाले!

चांगलं घर चांगले संस्कार ह्या कल्पना उराशी बाळगून मुलगा/मुलगी हे निष्कलंक चारित्र्याचे असतीलच असे समज बाळगणे हे निसरड्या वाटेने जाणं असतं असं काळाबरोबर बदलणार्‍या जमान्यात लक्षात येत जातं. आपल्या समाजात, अगदी "मध्यमवर्गीय साध्या घरातून" विवाहाच्या आधी आणि नंतरही बाह्यसंबंध कित्येक वर्षांपासून अस्तित्त्वात आहेत. फक्त आधी अशी प्रकरणे गुलदस्त्यात असायची, बहुसंख्य बायकांना तर तोंड उघडायलाच चोरी असे. "पुरुष म्हटल्यावर असायचीच दोन-चार लफडी, एवढं काय त्यात, तुला नांदवतोय ना नीट? मग झालं तर!" अशी सारवासरवही अगदी आत्ताआत्तापर्यंत सुरु असलेली ऐकलेले/बघितलेले आहे!
त्याविरुद्ध आजच्या ह्या मुलीने केलेला प्रॅक्टिकल विचार पटला. तिच्या स्वतंत्र विचारांची दिशा दाखवणारा आहे.
वरती काही जणांनी शंका व्यक्त केली आहे की लग्नानंतर असे काही बाह्य संबंध होणारच नाहीत ह्याची खात्री काय? अशी गॅरंटी नसतेच. हा विश्वासाचा प्रश्न असतो आणि तो विश्वास दोघांनी एकमेकांचा कमवायचा आणि जपायचा असतो. लग्नाआधी जी मुलगी एचआयवी चेकप करुन घेते आणि मुलाला करुन घ्यायला सांगते तिचं प्रेम हे "आंधळं" असणार नाही ह्याची त्या मुलाने नक्कीच खूणगाठ बांधली असणार आणि त्यामुळेच बाहेर काही गुण उधळण्यापूर्वी तो चारदा विचार करेल हे नक्की, किंबहुना अशी विचारी पत्नी सोबत असताना तो काही वावगे करील अशी शक्यता कमी होते!

चतुरंग

अमृतांजन's picture

11 Dec 2009 - 9:52 pm | अमृतांजन

>>>वरती काही जणांनी शंका व्यक्त केली आहे की लग्नानंतर असे काही बाह्य संबंध होणारच नाहीत ह्याची खात्री काय?

हो त्याचमुळे लग्नानंतरही HIV धोका असतो आणि तो टाळण्यासाठी काय उपाय करायचे असतात ते कानीकपाळी ओरडून सांगितले जात आहेत.

टाळी एका हाताने वाजत नाही. >>"पुरुष म्हटल्यावर असायचीच दोन-चार लफडी, एवढं काय त्यात, तुला नांदवतोय ना नीट? मग झालं तर!"

अमृतांजन's picture

11 Dec 2009 - 9:56 pm | अमृतांजन

>>पण जाता जाता श्रुतीने मुलाच्या हातात एक एनवलप दिले आणि त्याला म्हणाली,"I hope you will understand this and reciprocate from your side".>>>

तिने ते पाकीट तिच्या घरच्यांना अंधारात ठेवून (जाणीव न देता, पूर्व्चर्चा न करता) दिले असा ह्याचा अर्थ होतो. असे का?

तीची अपे क्षा अशी आहे की, "किंवा अशा घरात असल्या विषयावर समोरासमोर संपुर्ण चर्चा करण्याची बंदी असते त्यामुळे मुलगा बोलु शकत नाही हा बेनिफिट ऑफ डाउट तु त्याला देणार?तसे असेल तर बसुन बोलुया त्याच्या वडिलांकडे."- तिच्या स्वतच्या घरात ह्या गोष्टी घडतांना दिसत नाहीयेत.

देवदत्त's picture

12 Dec 2009 - 7:59 pm | देवदत्त

चांगला लेख.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Dec 2009 - 11:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मास्तर लेख आवडला. दोन्हीकडचे रिपोर्ट मागवावेत हे खरं आहे.
च्यायला, इतकं आधुनिक व्हायला बराच काळ जावा लागेल.
पण गरजेचं आहे, हे अगदी मान्य...!

-दिलीप बिरुटे