गाभा:
एक गाणे हवे आहे.
श्री. बाळ बर्वे यांनी संगीतबद्ध केलेले आणि श्री. सुरेश वाडकर यांनी गायलेले 'वदनी श्री विघ्नविनायक गावा, हृदयी वागावा' हे नितांतसुंदर गाणे एमपी-३ किंवा अन्य सॉफ्ट स्वरुपात कोणाकडे असल्यास कृपया मला anna.chimboree@gmail.com वर पाठवावे. सदर गाण्याचे शब्द शाहीर रामजोशी यांचे आहेत. गणपतीला केलेली ही शाहिरी वंदना हा मराठी संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे असे मला वाटते.
तात्या किंवा अन्य संगीतप्रेमी मिपाकर याबाबतीत नक्की मदत करतील असा विश्वास वाटतो.
प्रतिक्रिया
21 Nov 2009 - 1:37 pm | विंजिनेर
हो ना अहो मग पैसे देऊन विकत घ्या की :D चकटफू कशाला?
21 Nov 2009 - 1:46 pm | आण्णा चिंबोरी
जोगेश्वरी मंदिराजवळील अमृत व कर्वे रस्त्यावरील अलुरकरमध्ये हे गाणे ज्या अल्बममध्ये आहे त्या 'गाथा कवनीचा मोरया' या अल्बमची चौकशी केली होती. मात्र सीडी स्वरुपात तो अल्बम मिळाला नाही. माझ्याकडे टेपरेकॉर्डर नाही त्यामुळे क्यासेट घेऊन फायदा झाला नसता.
21 Nov 2009 - 1:51 pm | आण्णा चिंबोरी
याचसोबत तुकारामांचे नमिला गणपती हे गाणेही याच अल्बममध्ये आहे. हे गाणेही मिळाल्यास मी आजन्म उपकृत राहीन.
--आण्णा गटणे
21 Nov 2009 - 2:03 pm | Nile
एक उपाय सांगतो! कशाला पायरसी करताय? कॅसेट घ्या आणि मग त्याचं एमपी३ करुन घ्या!
-सखाराम चिंबोरी! ;)
21 Nov 2009 - 2:14 pm | jaypal
आण्ण चिंबोरी नाईल चा सल्ला मान्य करा. आणि आम्हालाही द्या.
____________________________________________________
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
21 Nov 2009 - 2:09 pm | देवदत्त
वर उल्लेखिलेली दोन्ही गाणी तुम्हाला एच एम व्ही किंवा आताच्या सारेगम ह्यांच्या हमारासीडी.कॉम ह्या संकेतस्थळावर मिळतील. एका सीडी मध्ये तुम्हाला त्यांच्याकडे असलेली तुमच्या आवडीची गाणी टाकून मिळतील.