घेतली उडी अशी वेडी (वीर तात्याराव सावरकरांचा पोवाडा)

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जे न देखे रवी...
15 Nov 2009 - 2:53 pm

स्वातंत्र्यसिंह गर्जला
गोरा हाकला
फार माजला
रेटा त्याच्या देशाला ब्रिटीशाला......हो जीरह जी जी जी...जीजीजी
........
जनसागर ये उधाणाला
वीरामागे जमला
विनायकी रमला
एकाच सावरकरी हाकेला......हो जीरह जी जी जी...जीजीजी
........
शंका कोणीना काढी
सोडली घोडी
घेई आघाडी
दावली सावरकरी धडाडी......हो जीरह जी जी जी...जीजीजी
........
सायबाची करी नासाडी
घातल्या धाडी
आवळली नाडी
वीर तो इंग्रजास नाडी......हो जीरह जी जी जी...जीजीजी
........
तोडगा साहेब काढी
बनवले बंदी
शृंखला बाधी
बोटीने अंदमाना धाडी......हो जीरह जी जी जी...जीजीजी
........
कचकडी भासली कडी
संकल्प सोडी
योजना वेडी
कुपाचे तळही तो फोडी......हो जीरह जी जी जी...जीजीजी
........
सत्वर जाण्या पैलथडी
तोडूनी बेडी
लांघली खाडी
घेतली उडी अशी वेडी......हो जीरह जी जी जी...जीजीजी
........
वीराचे असीम योगदान
स्वातंत्र्य आणी खेचून
विरोधात झाली भुणभुण
परी नाव सदा राहील अमर हो जी जी जी...जीजीजी
........

वीररसइतिहाससमाज

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

15 Nov 2009 - 2:57 pm | विसोबा खेचर

सत्वर जाण्या पैलथडी
तोडूनी बेडी
लांघली खाडी
घेतली उडी अशी वेडी......हो जीरह जी जी जी...जीजीजी

सुंदर पोवाडा...!

अनेक धन्यवाद.. :)

तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Nov 2009 - 3:29 pm | बिपिन कार्यकर्ते

पोवाडा आवडला. अजून रचना वाचायला आवडतील.

बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश's picture

15 Nov 2009 - 4:43 pm | ऋषिकेश

छानच पोवाडा..
कोणी तरि गाऊन रेकॉर्ड टाका पाहू...

ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

Nile's picture

16 Nov 2009 - 5:27 am | Nile

असेच म्हणतो, लवकर टाका गाउन :)

मदनबाण's picture

15 Nov 2009 - 4:48 pm | मदनबाण

व्वा... :)
वीराचे असीम योगदान
स्वातंत्र्य आणी खेचून
विरोधात झाली भुणभुण
परी नाव सदा राहील अमर हो जी जी जी...जीजीजी

सुरेख...

(सावरकर भक्त)
मदनबाण.....
http://www.savarkar.org

अवलिया's picture

15 Nov 2009 - 5:18 pm | अवलिया

सुंदर पोवाडा !

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

स्वाती२'s picture

15 Nov 2009 - 5:57 pm | स्वाती२

व्वा! सुरेख पोवाडा.

सुनील's picture

15 Nov 2009 - 6:53 pm | सुनील

छान पोवाडा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रभो's picture

15 Nov 2009 - 10:01 pm | प्रभो

सुंदर

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

नंदू's picture

16 Nov 2009 - 4:43 am | नंदू

पोवाडा आवडला. ऐकायला आणखी मजा येईल.
ताबडतोब तात्यारावांवरचं काव्य मिपावर चढविल्या बद्दल धन्यवाद.

नंदू

हर्षद आनंदी's picture

16 Nov 2009 - 6:59 am | हर्षद आनंदी

स्वातंत्र्यवीरांना मानाचा मुजरा !!


सत्वर जाण्या पैलथडी
तोडूनी बेडी
लांघली खाडी
घेतली उडी अशी वेडी......हो जीरह जी जी जी...जीजीजी

अप्रतीम...

कोणी एक काळा सुखवस्तु बॅरीस्टर, परदेशात केवळ गोर्‍याने धक्के मारुन फलाटावर फेकल्यावर पेटुन ऊठतो, तर खेड्यात जन्मलेला कोणी एक वयाच्या ८ व्या वर्षी पेटुन ऊठलेला धगधगता अंगार सत्त्ताधार्‍यांच्या देशात देशभक्तीचा वणवा पेटवतो, बंदीवान होतो, त्या बंदीतुन मुक्त होण्यासाठी "अंगावर अंसख्य जखमा घेऊन खार्‍या पाण्यात उडी घेतो आणि काही मैल पोहत जातो" तुम्हीच सांगा 'महात्मा' कोण असु शकतो?

वास्तविक 'अनादी मी, अनंत मी' अश्या ह्या महामानवाला शब्दांचे मापदंड लावणे शक्य नाही, तो तर कधीच महात्म्याचे महात्म्य लांघुन करोडो योजने उंच गेला आहे, ती उंची जेव्हा दृष्टीपथात येते तेव्हा असे लाखो महात्मे काळाच्या अंधारात गायब झालेले असतात.

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

लवंगी's picture

16 Nov 2009 - 7:15 am | लवंगी

हल्ली कोण पोवाडे वगैरे करत? त्यात सावरकरांवर .. त्यामुळे जास्तच आवडला...

मिसळभोक्ता's picture

16 Nov 2009 - 1:08 pm | मिसळभोक्ता

श्री. मनोहर,

सावरकरांविषयीचा हा पोवाडा आपल्या गांधींविषयीच्या कवितेस अँटोडोट म्हणून अगदी परफेक्ट अहे.

आता पुढचा पोवाडा नाथुराम गोडसेंवर लिहावा ही विनंती.

आदरणीय नाथुरामाची ही साठावी पुण्यतिथी. कृपया आपल्या शब्दांनी गोडसेला अलंकृत करावे ही विनंती.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

हर्षद आनंदी's picture

16 Nov 2009 - 1:12 pm | हर्षद आनंदी

याचा विचार झाल्यास अंमळ शांतता लाभेल, जरुर विचार करा
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

अरुण मनोहर's picture

16 Nov 2009 - 2:16 pm | अरुण मनोहर

तुमचे नथुरामसंबंधी तीनही धागे प्रवेश प्रतिबंधीत कां आहेत हे कळेल कां?

हर्षद आनंदी's picture

16 Nov 2009 - 3:19 pm | हर्षद आनंदी

संपादकांची मर्जी आणि काय?

कारणे देण्याची हिम्मत एकाच्यातही नाही.. सभ्य आणि सुसंस्कृत भाषेत लिहिलेले त्यांना चालत नाही, तात्यांचा पाठिंबा असुनही त्यांनी असे करावे म्हणजे कमाल झाली.

तात्यांच्या विनंतीला मान देऊन परत ६ व्यांदा लेख नाही टाकला.
तुमची प्रतिक्रिया तुम्ही खरडीतुन देऊ शकता. माझ्या खरडवहीला भेट द्या.

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

धमाल मुलगा's picture

16 Nov 2009 - 1:32 pm | धमाल मुलगा

अरुणराव,
मस्त पोवाडा.....
तात्यारावांवर पोवाडा लिहिलात त्याबद्दल धन्यवाद !

वीराचे असीम योगदान
स्वातंत्र्य आणी खेचून
विरोधात झाली भुणभुण
परी नाव सदा राहील अमर हो जी जी जी...जीजीजी

व्वा व्वा!

धन्यवाद पुन्हा एकदा.

दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

पक्या's picture

16 Nov 2009 - 3:12 pm | पक्या

सुंदर पोवाडा. आवडला.
खूप धन्यवाद.

जय महाराष्ट्र , जय मराठी !

krishnakumarpradhan's picture

16 Nov 2009 - 3:59 pm | krishnakumarpradhan

स्वातंत्र्यवीर सावर्कर महाराष्ट्रातले होते म्हणून कदाचित त्यांचे महत्व कमी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येतू. अंदमान च्या यातना भोगून आल्यावर सुद्धा त्यांनी काही महत्वांची कामे केली जसे पतित पावन मंदिर बांधून जातेभेद कमी करण्याचा प्रयत्न करणे. ।यावर मी लिहिलेले काव्य नंतर पाठवीनक्रुष्णकुमार

विशाल कुलकर्णी's picture

17 Nov 2009 - 9:40 am | विशाल कुलकर्णी

स्वातंत्र्यवीरांना त्रिवार मानाचा मुजरा !!

देवबाप्पा कुटं हायसा? तुमचं चाल अस्त्र फेका ना आता! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"