काहि वर्षांपूर्वी आपण सगळ्यांनीच बुधिया या (तेव्हा) चार वर्षाच्या मुलाच्या धावण्यासंबंधीत बातम्यांनी भरलेले रकाने वाचले. ज्या वयात रेकॉर्ड म्हणजेच काय हे कळत नाहि त्यावयात त्याला एका रेकॉर्डसाठी त्याला ६५ कि.मी धाववलं गेलं होतं. त्यावेळी त्या मुलाला प्रसिद्धी बरोबरच सहानूभूती मिळाली होती. त्याच्या प्रशिक्षकांना बहुदा दंड/शिक्षा झाल्याचेही आठवते. आज बालदिनाच्या निमित्ताने त्या बुधियाची पुन्हा आठवण झाली.
अशी अचानक आठवण होण्यामागे म्हटलं तर काहिच कारण नाहि आणि म्हटलं तर बरीच आहेत. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या भोवती मला सतत दिसणारे बुधिया. एक नाहि तर अनेक बुधिया. बुधिया कुठे दिसत नाहि? मॉल्समधे काचा पुसताना, हॉटेलात टेबल पुसताना, गॅरेजवाल्याकडे टायर धरून उभा असलेला, घरोघरी फूलपूडी वाटणारा.. तुम्ही जिथे बघाल तिथे आपल्या इच्छेने किंवा परिस्थितीने आपले बालपण सोडून इतरांच्या तालावर पळणारा बुधिया आजही दिसतो
पण निदान ह्या बुधियांना काहि लोक, मालक, पालक यांचबरोबर प्रमाणात परिस्थिती पळवत असते पण सध्या चांगल्या सिस्थितीत असणार्या घरांमधूनही दिसणार्या बुधियांचे काय?
आमच्या ओळखीतील एक पालक आपल्या मुलीला "डान्स क्लास" बुडबिल्याबद्दल धरून फटकावणार इतक्यात नटराजासारखा मी त्यांच्याकडे पोचलो. पुढे गप्पांच्या ओघात तिच्याच आईने मी कशी छाऽऽन नाचायचे पण लग्न झालं आणि सगळंच बंद झालं अशी माहिती दिली. आणि म्हणूनच ही आई मुलीला इच्छा असो नसो डान्स शिकवणारच असा स्वतःशी पण करून बसली आहे. स्वतःच्या इच्छे विरूद्ध आईच्या इच्छेखातर / जबरदस्तीने डान्समागे पळणारी ती चिमुरडी बुधियाच नाहि का?
असा विचार मनात आला आणि मग तर मला बहुतांश मुलांचा बुधिया झालेला दिसू लागला. सिग्नलवर, रेल्वे स्टेशनवर पोटाची खळगी भरत पळणारा बुधिया.. आई बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकापाठोपाठ एक कळणार्या/न कळणार्या परिक्षा देत रॅट रेस मधे जिवाच्या आकांताने पळणारा बुधिया.... केवळ आपल्या प्रशिक्षकांच्या इज्जतीखातर खाड्या पोहत पार करणारा बुधिया... दर मे महिन्यात दिवाळी सुट्टीत मामाच्या गावाला जाण्याची इच्छा असूनही एका नवीन कँपला जबरदस्ती जाणारे बुधिया... एक ना दोन सारीकडे मला बुधिया आणि फक्त बुधियाच दिसू लागले.
बरं हे प्रकरण बुधियावरच थांबलं असतं तरी मी हा लेख लिहायला घेतलाही नसता. त्यात आज अमिताभचा नवा "पा" हा चित्रपट येतोय आणि त्यात अमिताभने अकाली वृद्धत्त्व येणार्या मुलाची भुमिका केली आहे वगैरे वगैरे लिहिलेले वाचले आणि मनात आले खरंतर हल्ली प्रत्येक पालक मुलांना मोठे करायच्या इतका मागे आहे की काहि वर्षांनी सगळीच मुले अशी वागतील का? मुलांचा बुधिया झालाच आहे आता तर टॅलेंट शोज वगैरेंनी त्यांचा "पा" करायचा ठरवला आहे की काय कोण जाणे.
जोपर्यंत पालक मुलांना त्यांना जे हवे आहे त्यात उत्तम कसे बनता येईल अशी मार्गदर्शकाची भुमिका घेत नाहित तो पर्यंत ह्या बुधिया आणि पा च्या गराड्यात हरवलेल्या मुलांचा बालदिन हा एकाच दिवशी साजरा होणार
तेव्हा ह्या बालदिनानिमित्त सर्व मुलांना आपले बालपण जपण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. !!!
जाता जाता: बालदिनानिमित्त गुगलचा छान उपक्रम डूडल फॉर गुगल
प्रतिक्रिया
14 Nov 2009 - 5:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
समयोचित सुंदर लेख ऋषिकेश. बालकांचं बाल्य जपण्यासाठी पालक वेळेत मोठे व्हावेत म्हणून त्यांनाही शुभेच्छा!
अदिती
14 Nov 2009 - 5:34 pm | छोटा डॉन
उत्तम समयोचित लेख असेच म्हणतो.
लेख आवडला.
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
14 Nov 2009 - 5:45 pm | सहज
उत्तम समयोचित लेख असेच म्हणतो.
लेख आवडला.
बालदिनाच्या शुभेच्छा!
14 Nov 2009 - 6:50 pm | अवलिया
लेख आवडला.
बालदिनाच्या शुभेच्छा!
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
14 Nov 2009 - 7:34 pm | निखिल देशपांडे
लेख आवडला
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
14 Nov 2009 - 9:22 pm | प्रभो
लेख आवडला
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
14 Nov 2009 - 10:31 pm | बिपिन कार्यकर्ते
ऋष्या, अगदी समयोचित.
बिपिन कार्यकर्ते
14 Nov 2009 - 8:48 pm | स्वाती२
सहमत!
लेख आवडला.
15 Nov 2009 - 1:00 am | नंदन
-- असेच म्हणतो.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
16 Nov 2009 - 9:28 am | संदीप चित्रे
एकदम सहमत.
14 Nov 2009 - 4:52 pm | घाटावरचे भट
छान प्रकटन. सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
14 Nov 2009 - 5:00 pm | गणपा
छान लेख.
सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
14 Nov 2009 - 5:13 pm | सुनील
छान, समयोचित लेख.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
14 Nov 2009 - 6:43 pm | भोचक
खरंय. मुलांच बालपण जपायलाच हवं.
(भोचक)
रविवार पेठ आणि कुठेही भेट !
हा आहे आमचा स्वभाव
14 Nov 2009 - 7:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुलांचं बालपण जपायला हवं खरं ! पण जपणार कोण ?
शाळा संपल्यावर, कधी शाळा बुडवत चहा वाटणारा हा विशाल.

आई-वडिलांना हॉटेल कामात मदत करतो. आज स्टाफरूममधे आल्यावर त्याचा बालदिनाच्या निमित्ताने फोटो घेतला, त्याने अशी पोज दिली.
मॉल्समधे काचा पुसताना, हॉटेलात टेबल पुसताना, गॅरेजवाल्याकडे टायर धरून उभा असलेला, घरोघरी फूलपूडी वाटणारा.. तुम्ही जिथे बघाल तिथे आपल्या इच्छेने किंवा परिस्थितीने आपले बालपण सोडून इतरांच्या तालावर पळणारा बुधिया आजही दिसतो
खरं आहे....!
-दिलीप बिरुटे
14 Nov 2009 - 7:20 pm | मदनबाण
छान लेख...
मदनबाण.....
The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.
14 Nov 2009 - 8:10 pm | लवंगी
मुलांच बालपण आपणच जपुया.. सर्वाच नाही जपता येणार पण निदान आपापल्या घरापासुन सुरवात करु..
14 Nov 2009 - 8:38 pm | स्वाती२
लाख मोलाच बोललात!
15 Nov 2009 - 1:18 am | विसोबा खेचर
सुंदर..!
15 Nov 2009 - 5:02 am | चित्रा
समयोचित.
ज्यांचे बालपण खुडले गेले आहे, अशांना सर्वांना मदत करता आली नाही तरी आपल्याशी संबंध आल्यास चांगले वागवू अशी इच्छा बाळगूया..
15 Nov 2009 - 7:52 am | चतुरंग
संधींची वानवा असलेले असंख्य बुधिया आणि घरोघरी वेगवेगळ्या क्लासेसमधून पालकांची इच्छापूर्ती करत भरडले जाणारे बुधिया हे सगळे उद्याच्या भारताचे नागरिक. त्यांच्या घडण्यापेक्षा 'बिघडण्याचीच' आपण सगळे व्यवस्था करतो आहोत का? असा प्रश्न पडतो.
(परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकत नसलेल्या एखाद्या ओळखीच्या बुधियाची उदा. कामवालीचा मुलगा/मुलगी, शैक्षणिक वर्षाची फी वगैरे भरुन आपण मदत करु शकतो का? एक विचार.)
चतुरंग
15 Nov 2009 - 9:31 am | यशोधरा
सुरेख लेख. विदारक सत्य.
15 Nov 2009 - 12:02 pm | ऋषिकेश
सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल आभार.
चतुरंगराव म्हणतात त्याप्रमाणे अनेक शाळांमधे गरजू विद्यार्थ्यांसाठी फी भरण्याचा ऑप्शन असतो. आमच्या शाळेत (विद्यामंदीर, दहिसर) "उमलू द्या त्यांनाही.." नावाची योजना आहे. ज्यात इच्छा असेल तर एका विद्यार्थ्याचा सगळा खर्च (फी, वह्या,पुस्तके, गणवेश व स्कूलबस) तुम्ही करू शकता.
माझ्या माहितीनूसार मुंबई-ठाणे-पुणे या भागात बर्याच शाळांमधे यासदृश सुविधा आहेत. अन्यत्र माहित नाहि. पण अश्या सुविधा शहरांबरोबरच गावांमधेही उपलब्ध असणे गरजेचे आहे असे वाटते. कुणाच्या माहितीत गावांमधील मुलांच्या शालेय/अशालेय शिक्षणासाठी अशी योजना असेल तर कृपया कळवावी
ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
15 Nov 2009 - 1:15 pm | मिसळभोक्ता
ऋष्या,
तुला किती मुले/मुली आहेत ?
मुलांचे मूलपण पालकांनी जपावे, असे आवाहन तू केलेस तेव्हाच मला कळले, की हे केवळ पोकळ आवाहन आहे.
इतरांच्या मुलांचे मूलपण जपावे, वगैरे, हे सांगायला मी स्वतः पालक असणे हे महत्त्वाचे नाही.
माझ्या मुलांचा सांभाळ, त्यांना कसे वागवावे वगैरे सांगणारा तू कोण रे ?
बुधिया धावला, टिव्हीवर आला, तुझ्यासारखेच इतर अनेक "बालकाचे बालपण जपावे" वगैरे मीडियावर म्हणाले. प्रत्येकाचे बरोबर आहे. लोकशाही आहे भाऊ !
पण तू ज्यावेळी "काहीतरी करू नये" म्हणतोस, त्यावेळी, "तू कोण आम्हाला सांगणारा ?" हा प्रश्न येणारच ! तेव्हा तू कोण, हे सांगच आता. मुलांना सांभाळण्याचा, त्यांना वाढवण्याचा तुला काय अनुभव आहे ? समजा स्वतःची मुले नसलीत, तरी, इतरांच्या मुलांचा तू कसा सांभाळ केलास ते तरी सांग !
नाही तर, किमान कबूल कर की "मी फक्त विचारवंत आहे". म्हणजे स्वतः त्या क्षेत्रातला अनुभव नाही, पण उपदेश मात्र करतो.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
15 Nov 2009 - 2:25 pm | ऋषिकेश
स्वतः त्या क्षेत्रातला (म्हणजे स्वतःला मुले नसल्याने त्यांना वाढविण्याचा) अनुभव नाही, पण उपदेशाचा रतीब मात्र ओततो.
ज्यांना पटतो त्यांनी घ्यावा बाकीच्यांनी त्या रतीबाचे विरजण घालावे.. कसे?
ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
15 Nov 2009 - 2:55 pm | मिसळभोक्ता
बाकीच्यांनी त्या रतीबाचे विरजण घालावे.. कसे?
हांगाश्शी !
कसे बोललास !
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
15 Nov 2009 - 6:27 pm | प्रियाली
नाही तर, किमान कबूल कर की "मी फक्त विचारवंत आहे". म्हणजे स्वतः त्या क्षेत्रातला अनुभव नाही, पण उपदेश मात्र करतो.
मिभो, तुमचा ऋष्या पालक नसला तरी बुधिया तर असू शकतो ना. :-) तेव्हा तुमच्या घरातील बुधिये उठून असे लेख लिहिण्यापूर्वीच जागे व्हा. ;)