मुंबई
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी प्रकरणावरुन विधानसभेत झालेल्या राड्याबद्दल मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी सभागृहाचा सन्मान राखून या प्रकरणी नवनिर्वाचित विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. निलंबित करण्यात आलेले आमदार पहिल्याच दिवशी सभागृहात आले होते, त्यामुळे त्यांना सभागृहाच्या नियमांबद्दल माहिती नव्हती, असे सांगतानाच त्यांची पहिलीच वेळ असल्याने त्यांच्या निलंबनाची शिक्षा कमी करावी अशी मागणी नांदगावकर यांनी केली आहे.
तीन दिवसांपूर्वी विधानसभेत आमदार अबू आझमी यांनी हिंदीतून शपथ घेतल्यावरून मनसे आमदारांनी चिडून त्यांना धक्काबुक्की केली होती. यामुळे सभागृहाने मनसेच्या राम कदम, शिशिर शिंदे, वसंत गीते आणि रमेश वांजळे या आमदारांना चार वर्षासाठी निलंबनाची शिक्षा दिली होती. या घटनेनंतर मनसेने सभागृहाच्या सन्मानाच्या दृष्टीने दोन पाऊल मागे घेत सभागृहात झाल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.
याबाबत सभागृह आगामी 8 डिसेंबरपासून सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनात विचार करण्याची शक्यता आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी बाळा नांदगावकर यांच्या दिलगिरीबद्दल कुठलीही प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यास आघाडीसह शिवसेना व भाजपच्या आमदारांनी विरोध केल्याने निलंबनाची शिक्षा कमी होण्याची शक्यता फारच कमी असल्याचे दिसत आहे.
स्त्रोतः बेबदुनिया.कॉम
प्रतिक्रिया
11 Nov 2009 - 8:13 pm | पाषाणभेद
मनसेच्या आमदार मित्रांनो, माफी मागायचे काही कारण नाही. झाला प्रकार अबू मुळेच झाला. आता थोडे नमते घ्या. नंतर चांगला ईंगा दाखवा सगळ्या लोकांना ज्यांनी तुम्हाला निलंबीत केले त्यांना.
मराठीची कास सोडू नका.
अवांतरः हा आय डी भोचकरावांचा आहे का? की आम्ही त्या हिंदी धार्जीण्या वेबदूनियेवर जावे म्हणून तेथील लिंका पेस्ट करायला वेबदुनीया वाल्यांनी ठरवून हा आयडी तयार केला आहे? जे काही द्यायचे ते लिंक न देता देत चला. कमीतकमी त्या हिंदी धार्जीण्या वेबदुनीयेची लिंक तरी देत जावू नका.
जय मनसे प्रवृत्ती !
--------------------
सडेतोड पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
12 Nov 2009 - 12:23 pm | भोचक
हा खुलासा मड्डम यांनीच केल्यास बरे.
कुणी कुणाची लिंक पेस्ट करावी यावर आम्ही काय बोलणार? राहिला प्रश्न कुणी कोणत्या विचारांचे समर्थक असण्याचा, हा प्रत्येकाचा अधिकार आहे. सामना- हिंदूत्ववादी-प्रसंगी मराठीवादी. लोकसत्ता-शरद पवार विरोधक-सोनियावादी. मटा- जे चालते त्याची तळी उचलणे. सकाळ- पवार विरोध न होईल असे. कॉंग्रेसचे मत तेच- लोकमत वगैरे. हे सगळे खपवून घेतोच ना. ज्याला जे पटेल तो ते वाचेल. तुम्ही उगा का त्रागा करताय? बाकी मला ज्या लिंक्स द्यायच्या त्या मी माझ्या नावानेच देतो. त्यासाठी मला नव्या आयडीचे सोंग घेण्याची आवश्यकता वाटत नाही.
अवांतर- हल्ली राज ठाकरेंच्या विरोधात लिहिणे किंवा त्यापेक्षा वेगळे विचार मांडणे म्हणजे मराठीविरोधक ठरविण्याची प्रथा रूढ झालीय म्हणायची.
शक्य झाल्यास हे वाचा.
(भोचक)
रविवार पेठ आणि कुठेही भेट !
हा आहे आमचा स्वभाव
11 Nov 2009 - 8:22 pm | तिमा
माफीच मागायची होती तर आदल्या दिवशी बाहेर येऊन एवढ्या फुशारक्या कशाला मारल्या ? पिच खणायचे आणि 'देशभक्त' अशी स्वतःची पाठ थोपटून घ्यायची! कायदा हातात घ्यायचा आणि आमचे बलिदान(?) व्यर्थ जाणार नाही म्हणून गर्जना करायच्या! आणि शेवटी अंगाशी येताय असं वाटलं की माफी मागायची!
काय समजतात स्वतःला ?
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
11 Nov 2009 - 8:36 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री माणूसघाणे यांच्याशी सहमत आहे. तात्या ज्यांच्यावर थुंकायलाही तयार नव्हते त्या नपुंसकांसमोर माफी मागण्याचा लोचटपणा आवडला नाही.
11 Nov 2009 - 9:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>> नपुंसकांसमोर माफी मागण्याचा लोचटपणा आवडला नाही.
अहो,पूर्णपात्रे....आमदार राम कदम काय म्हणाले ते इथे पाहा. सभागृहाचा अवमान झाला, काळा दिवस होता, वगैरे असा वैचारिक नारा लावणा-या बुद्धीवंतांच्या शेंड्यांना सभागृहाची दिलगिरी व्यक्त केल्याने आराम मिळेल ना ! पाच वर्ष मनसेचे आमदार नुसते मारामार्याच करतील की काय असा आव दोन दिवसापासून लोकशाहीच्या चौथा खांब म्हणवना-या वृत्तमाध्यमांसह वृत्तपत्रातून वाचायला मिळत होता. आता तेच माफी मागितली...माफी मागितली म्हणून ब्रेकींग न्यूज दाखवतील. अर्थात लोकशाही म्हटल्यावर हेही चालायचचं, त्यांचा जर आपणास तो 'लोचटपणा' वाटत असेल तर आपण फार मनाला लावून घेऊ नये असे वाटते.
-दिलीप बिरुटे
11 Nov 2009 - 9:11 pm | अक्षय पुर्णपात्रे
प्राध्यापकसाहेब, तुमचे मत पटतेय बरं का. लोकशाहीत चालायचेच. आता पुढच्या पाच वर्षात काय होते ते पाहत रहायचे.
12 Nov 2009 - 12:15 pm | समंजस
अक्षयसाहेब, माफी ही सभागृहा ची मागीतली आहे. त्यात काय चुकलं?
मनसे चा राग सभागृहावर नव्हता. तो होता अबु आझमी वर. त्यामुळेच त्याची माफी मागायला मनसे नी नकार दिला आहे. काय चुकलं?
शेवटी सभागृह हे आमदारापेक्षा मोठे आहे. नाही का?
आणि सभागृहात नाही जायचं तर मग निवडूणका लढण्याची काय गरज?
तात्या ज्यांच्यावर थुंकायलाही तयार नव्हते त्या नपुंसकांसमोर माफी
मागण्याचा लोचटपणा आवडला नाही.
हे जरी बरोबर असलं तरी, सभागृह हे काय फक्त त्याचंच आहे का?? मनसेच्या आमदारांचं नाही?? कदाचीत नाइलाज असेल मनसेच्या आमदारांचा त्या सभागृहात जाण्याचा. शेवटी जनतेची कामं करायला सभागृहात जावं लागणारं.
(अर्जूनाला शब्द देउनही, न राहवून कृष्णाला भिष्मा वर चक्र घेउन जावंच लागलं होतं. शिवाजीराजेंना सुद्धा काही वेळेस तह करावाच लागला होता.)
आशा करतो, वरच्या उदाहरणावरून तुम्हाला माझ्या म्हणण्याचा मतितार्थ कळला असेलच.
11 Nov 2009 - 8:43 pm | झकासराव
हॅ हॅ हॅ.
माफी कुठे मागितली आहे. फक्त दिलगिरी व्यक्त केली आहे. ती देखील सभागृहाची.
ह्याला राजकीय खेळी असहि म्हणतात. जेणेकरुन त्यांच्यावरच चार वर्षाच निलंबन कमी होण्यासाठी मदत होते. (काय सांगाव पडद्यामागुन ज्यानी अबुला पडलेली कानफाटीत प्रत्यक्षात पाहण्यास आवडली पण पक्षाच्या चौकटीत राहुन त्याच समर्थन करण शक्य नाही अशा एखाद्या मुरलेल्या राजकारण्याने दिलेला मंत्रदेखील असेल हा)
बाकी अबु आझमी साठी नाही माफी नाही दिलगिरी.
11 Nov 2009 - 8:56 pm | प्रकाश घाटपांडे
झकासराव अगदी बरुबर बोल्ले राव!
दरोडेखोरांच्या समुहाला टोळी म्हणतात
वारकर्यांच्या समुहाला दिंडी म्हणतात
शब्दांचे खेळ झाल.
दिलगिरी केव्हा म्हणायच? माफी केव्हा म्हणायच? शरणागती केव्हा म्हणायच? हे सगळ सापेक्ष आहे. अगदी लहान मुलाला सुद्धा सॉरी शब्द उच्चारायला इगो आड येतो. पण आईवडिलांच्या दबावाला बळी पडुन गुर्मीतल्या आवाजात सॉरी अस एकदाच म्हणुन टाकतो.
असो अबु आजमीचा माज उतरणार की तो सुड उगवायची संधी शोधणार?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
11 Nov 2009 - 8:54 pm | अविनाशकुलकर्णी
या बाबत महाराजांचा आदर्श ठेवावा..त्यंनि औरंग्याला सलाम नाहि केला ..वर तह हि केला..व नाकावर टिच्चुन राज्याभिषेक हि करुन घेतला
11 Nov 2009 - 8:54 pm | सुधीर काळे
मनसेतर्फे चांगला डाव खेळला गेला आहे. राजकारणात असं बेरकी असावंच लागतं!
पुढच्या वेळी बाहेर ठोकून काढा त्या ’अंबूताई’ला.
सुधीर
------------------------
ही लिंक वाचा: http://tinyurl.com/yf7l59q
11 Nov 2009 - 11:58 pm | आशिष सुर्वे
ह्याला 'गनिमी कावा' म्हणावे का??
-
कोकणी फणस
12 Nov 2009 - 10:06 am | विशाल कुलकर्णी
हल्ला करण्यापुर्वी वाघदेखील चार पावले मागे सरकतो.....
पण तो त्याचा भ्याडपणा किंवा बोटचेपेपणा नसतो. तर युद्धनितीचा एक डावपेच असतो. प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असतं. म्हणूनच विदेशी पंतप्रधान नको म्हणुन काँग्रेस सोडणारा जाणता राजा (?) सुखाने त्यांच्याबरोबरच नांदतो. म्हणुनच काँग्रेस आणि भाजपा दोघांच्या नावाने खडे फोडणारे सो कॉलड कम्युनिस्ट सत्तेसाठी त्याच काँग्रेसशी पुन्हा पुन्हा हात मिळवणी करतात.
तेव्हा हे चालायचच, होणारच होतं. हे असं नसतं झालं तर मात्र वाटलं असतं की राजला राजकारण कळलंच नाही. :-)
पण तो योग्य मार्गावर आहे. :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
12 Nov 2009 - 10:09 am | llपुण्याचे पेशवेll
+१
कृष्णनितीचा वापर करावा.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
12 Nov 2009 - 12:10 pm | अवलिया
राजकारण नीट समजणा-या विचारवंतांच्या रोचक प्रतिक्रिया जाणण्यास उत्सुक.
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.