९/११ मधे मारल्या गेलेल्या तरूणाच्या स्मारकावरून वादंग

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
4 Nov 2009 - 4:23 am
गाभा: 

http://www.rep-am.com/news/local/447278.txt
http://www.wfsb.com/news/21501995/detail.html
वरील बातम्या वाचा.
थोडक्यात हकीकत अशी. केंट नामक कनेटिकट, अमेरिका येथील एक गाव. तिथला एक तरूण ९/११ च्या हल्ल्यात मारला गेला. त्या गावच्या प्रशासनाने त्या तरूणाचे स्मारक बनवायचे ठरवले. त्याकरिता त्याच्या वडिलांना विचारले की तुमच्या मुलाच्या स्मारकावर काय वाक्य लिहिलेले आवडेल?
ते म्हणाले, "असे लिहा, 'जेम्स गेडियल, जन्म ३ फेब्रु. १९७८, केंटचा रहिवासी, मुस्लिम अतिरेक्यांनी ९/११/०१ रोजी खून केला'" (अर्थातच मूळ मजकूर इंग्रजीत आहे). आता इथे माशी शिंकली.
मुस्लिम अतिरेकी असे लिहून त्या धर्माच्या लोकांच्या भावना दुखावता कामा नयेत (तशी वस्तुस्थिती असली तरी) अशी त्या शहराच्या प्रमुखांची भूमिका आहे. सरकारी खर्चाने लिहिलेला फलक अशी एका धर्माची "बदनामी" करु शकत नाही असे ते म्हणतात.
तुम्हाला हे पटते का? आपल्या इथे ११/२६ ला बळी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी असे काही केले तर आपले सरकार काय प्रतिक्रिया देईल?

मला वाटते बळी गेलेल्या मुलाच्या बापाला तसे लिहिण्याचे स्वातंत्र्य द्यावे. कारण त्या अतिरेक्यांची मुस्लिम धर्म ही प्रेरणा होती. ते मुस्लिम नाहीतच वगैरे म्हणणे हे काही खरे नाही.

तुमचे काय म्हणणे?

प्रतिक्रिया

सोनिया's picture

4 Nov 2009 - 4:32 am | सोनिया

कारण त्या अतिरेक्यांची मुस्लिम धर्म ही प्रेरणा होती. ते मुस्लिम नाहीतच वगैरे म्हणणे हे काही खरे नाही..

आणि मुस्लिम अतिरेकी चालत नसेल तर अतिरेकी मुस्लिम कस दिसेल ?

रेवती's picture

4 Nov 2009 - 5:51 am | रेवती

सरकारची भूमिका बरोबर आहे. अतिरेकी मुस्लीम होते हे जरी खरे असले तरी कोणत्याही धर्माचा उल्लेख करणे बरोबर नाही. तोच एक धागा पकडून उद्या जिथेतिथे 'त्या' धर्माबद्दल (किंवा कोणत्याही) बोलले जाऊ लागले तर दंगे होण्यास वेळ लागणार नाही. ९/११ तर होऊन गेले अजून अशांतता पसरवण्याचे कारण नाही. अतिरेक्यांचा उद्देश सफल कशाला करायचा? मुख्य म्हणजे दंगे किंवा वाद सुरू करण्याचे 'मूळ कारण' सरकार बनणार नाही.......इतक्या ठळकपणे तर नाहीच नाही. बळी गेलेल्या नातेवाईकांचा विचार केला तर फक्त त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल वाईट वाटते. घडलेल्या घटनेबद्दल त्यांना राग असला तर तेही चूक नाही.......आपल्या देशातही सरकार धर्माचा उल्लेख करणे टळेल असेच वाटते. आपल्याकडे अनेक धर्मांचे अतिरेकी नसलेले भरपूर लोक आहेत तसेच 'आपला' असा समजल्या जाणार्‍या धर्माचे वाईट प्रकारे अतिरेक करणारेही आहेत.

रेवती

मनिष's picture

4 Nov 2009 - 6:11 am | मनिष

१००% सहमत.

पुरोहित आणि नुकतीच सनातन प्रभात ही घातपाताबद्द्ल चर्चेत असूनही 'हिंदू अतिरेकी' असे म्हटले तर कसे वाटेल?

हर्षद आनंदी's picture

4 Nov 2009 - 7:00 am | हर्षद आनंदी

पैसा जास्त झाला असेल तर पर्यावरणवादी संस्थांना मदत म्हणुन द्या. ५-१० पोरांच्या शिक्षणासाठी, वयोवृध्दांच्या आपत्कालीन मदतीसाठी वापरा.

स्मारके उभारुन आणि त्यावर संदेश लिहुन काही होत नाही.

'हिंदू अतिरेकी' : अजुन तरी कोणी पैदा नाही झाला, पुढच्या १००० वर्षात होईल असे काही वाटत नाही.

'मुस्लिम अतिरेकी' : हे सत्य सार्‍या जगाने मान्य केले आहे, सर्व अतिरेकी संघटना 'मुस्लिमच' आहेत. तरी अमेरिका पाकीस्तानला लश्करी मदत म्हणुन करोडो डॉलर्स देतेच आहे... देतच राहील.

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

सुनील's picture

4 Nov 2009 - 7:05 am | सुनील

अरेच्चा! तिथलं सरकारही "लांगूलचालन" करतं वाट्टं? आम्हाला वाटलं की फक्त भारतातील काँग्रेस सरकारच "तुष्टीकरण" करतं!! ;)

असो, त्या मुलाच्या वडीलांना अशी पाटी लावयचीच असेल तर, ती त्यांनी त्याच्या खासगी दफनभूमीवर जरूर लावावी. पण सरकारी खर्चाने अशी पाटी लावणे हे चूकच!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

छोटा डॉन's picture

4 Nov 2009 - 7:34 am | छोटा डॉन

असो, त्या मुलाच्या वडीलांना अशी पाटी लावयचीच असेल तर, ती त्यांनी त्याच्या खासगी दफनभूमीवर जरूर लावावी. पण सरकारी खर्चाने अशी पाटी लावणे हे चूकच!

+१, करेक्ट !!!
सुनीलभौ शी १००% सहमत ...

खासगी खर्चाने स्वतःच्या खासगी जागेत वाट्टेल ते करावे पण सरकारी खरचाने अथवा खासगी खर्चाने का होईना पण "सार्वजनिक" ठिकाणी अशा गोष्टी व्हायला नकोत ...
------
(खासगी)छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

अनामिका's picture

4 Nov 2009 - 7:17 pm | अनामिका

असे लिहा, 'जेम्स गेडियल, जन्म ३ फेब्रु. १९७८, केंटचा रहिवासी, मुस्लिम अतिरेक्यांनी ९/११/०१ रोजी खून केला'"
अश्या प्रकारचा मजकुर लिहिला गेल्यास तो सरसकट सगळ्या मुस्लिमसमाजाला अतिरेकी असे ठरवणारा असेल .भले मग प्रत्येक मुसलमान हा अतिरेकी नाही पण प्रत्येक अतिरेकी हा मुसलमान असतो हे कटु सत्य जगासमोर आलेले असले तरिही .मुसलमानांमधेही अपवादाने चांगली माणसे आहेतच कि!.....भले मग त्यांची गणती कमी असेल्...सुक्या बरोबर ओलेही जळते या नियमाने विनाकारण चांगले व सहृदय मुसलमान देखिल यामधे भरडले जाण्याची शक्यता आहेच्.आधिच विद्वेषाने समाज पोखरला गेला आहे अजुन त्यात भर नको.
रेवती व डॉनरावांशी सहमत.......अश्या प्रकारचा मजकुर सरकारी पैशाने लिहिणे गैर आहे तेंव्हा मुलाच्या वडिलांनी आपकमाईने काही हवा तो मजकुर आपल्या दिवंगत मुलाच्या समाधीवर लिहुन घ्यावा....असे केल्याने त्यांचा राग देखिल काही प्रमाणात का होईना पण शांत नक्किच होईल..

आपल्या इथे ११/२६ ला बळी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी असे काही केले तर आपले सरकार काय प्रतिक्रिया देईल?


भारतात असल्या अनैतिक प्रथा सरकार पाळत नाही (त्यातुन देशाच्या साधनसंपत्तीवर प्रथम ज्यांचा हक्क आहे अश्या समाजाच्या नावे असे काही सरकार स्वखर्चाने लिहिल असला विचार देखिल बहुसंख्यांकानी मनात आणणे गैर आहे)फक्त मृतांच्या नातेवाईकांना काही लाखांची मदत जाहीर करणे पण ती प्रत्यक्षात न पोहोचवणे व यासाठी काय व कसे प्रयत्न करता येतील ते पहाते.....यालाच शुद्ध मराठीत मढ्याच्या टाळुवरचे लोणी खाणे असे म्हणतात.

'हिंदू अतिरेकी' : अजुन तरी कोणी पैदा नाही झाला, पुढच्या १००० वर्षात होईल असे काही वाटत नाही.

आणि असे कधी घडू देखिल नये......कारण यातुन निष्पन्न शुन्य .

"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

गणपा's picture

4 Nov 2009 - 2:21 pm | गणपा

आपल्या इथे ११/२६ ला बळी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी असे काही केले तर आपले सरकार काय प्रतिक्रिया देईल?

अहो आपल्या कडच्या पुढार्‍यांना स्वतःचे आणि हत्तींचे पुतळे उभारायला पैसा कमी पडतोय. उद्या कसाब/अफझलचा पण पुतळा उभाहीला तर नवल वाटणार नाही.

आजची पी चिदंबरम याची मुक्ताफळं ऐकली की नाही? हे असले दाढ्या (*ट्या) कुरवाळणारे आपले पुढारी..

त्या मुलाच्या वडीलांना अशी पाटी लावयचीच असेल तर, ती त्यांनी त्याच्या खासगी दफनभूमीवर जरूर लावावी. पण सरकारी खर्चाने अशी पाटी लावणे हे चूकच

बाकी सुनील आणि डॉन्याशी सहमत.

हुप्प्या's picture

5 Nov 2009 - 1:10 am | हुप्प्या

सरकारी खर्चाने पाटी लावली म्हणून त्यात मुस्लिम अतिरेकी असे लिहू नये हे काही पटत नाही. मुस्लिम अतिरेकी असे लिहिल्याने तमाम मुस्लिमांची बदनामी हेही पटत नाही.
१. ९/११ मागे मुस्लिम धर्म ही नि:संशय प्रेरणा आहे. अरबी प्रदेशात जिथे मक्का मदीना आहे तिथे काफीरांना मज्जाव असला पाहिजे हे बिन लादेनचे तत्त्वज्ञान आहे. शिवाय इस्लामची कडवी आवृत्ती म्हणजे वहाबी पंथ ह्याचे पुनरुज्जीवन वगैरे पुस्ती आहेच. हे सगळे अस्सल इस्लामच्या तत्त्वज्ञानातूनच आले आहे. तेव्हा इस्लामला योग्य ते श्रेय दिलेच पाहिजे. जर बौद्ध, कॅथोलिक, हिंदू, ब्राह्मण, सनातन असल्या कुठल्या धर्मा वा पंथाने त्यांच्या धर्मग्रंथांचा आधार घेऊन, प्रेषितांच्या वचनांचा आधार घेऊन असले हल्ले केले तर तेही लिहिले गेलेच पाहिजे.

२. सामान्य मुस्लिम माणूस असल्या अतिरेकी कारवायांविरुद्ध काय करतो? अशा घटना घडल्यावर नुसता तोंडदेखला निषेध, हे लोक मुस्लिम नाहीतच वगैरे दावा करणे. पण जेव्हा महंमदाच्या कार्टूनचा निषेध करायचा असतो तेव्हा लाखांच्या संख्येने मुस्लिम जमा होतात. मोर्चे, दगडफेक, फतवे, जाळपोळ वगैरे कार्यक्रम रीतसर साजरे होतात. अतिरेकी कारवायांविरुद्ध इतकी जहाल प्रतिक्रिया मुस्लिमांकडून तरी मी पाहिलेली नाही. अशा स्मारकामुळे कदाचित सामान्य मुस्लिम खवळून उठेल आणि हा कलंक धुवून काढायचा प्रयत्न करेल. असली सापाची अवलाद त्याच्या मशिदीत वा अन्य प्रकारे संपर्कात आली तर तो तात्काळ पोलिसात खबर देईल वा अन्य प्रकारे त्या लोकांचा योग्य तो समाचार घेईल.

३. पॉलिटिकली करेक्ट प्रकाराचा अतिरेक झाल्यामुळे हा हल्ला मुस्लिम अतिरेक्यांनी केला होता हे विसरण्याचा प्रयत्न चालू आहे. काही वाईट्ट लोकांनी हे काम केले एवढेच आठवावे ह्याकरता काही अतिरेकी पॉ. करेक्ट लोक आटापिटा करत आहेत. पण हे चूक आहे. ह्या कृत्याला उद्युक्त होण्यामागे काय प्रेरणा आहे ह्याचे सामान्य लोकांना विस्मरण होता कामा नये. नाहीतर पुढे असेच काहीतरी घडेल आणि पुन्हा येरे मागल्या.

अमेरिकेत असे काही लिहिले तर मुस्लिमांच्या कत्तली सुरु होतील वगैरे भीतीही निराधार आहे. ९/११ नंतर अमेरिकेत किती मुस्लिम अमेरिकन लोकांनी कायदा हातात घेऊन मारले ? गांधी वधा नंतर जितके ब्राह्मण मारले वा इंदिरा हत्येनंतर जितके शीख मारले त्याच्या तुलनेत किती?

दिपाली पाटिल's picture

5 Nov 2009 - 12:19 pm | दिपाली पाटिल

त्या मुलाच्या वडिलांना विचारायचा अगावूपणा सांगितला कोणी होता...गप्प नाव-गाव लिहायचं ना सरकारनेपण...

दिपाली :)

मनिष's picture

5 Nov 2009 - 2:11 pm | मनिष

बराक ओबामा चे पुर्ण नाव - 'बराक हुसेन ओबामा' आहे.

सुनील's picture

5 Nov 2009 - 2:49 pm | सुनील

तुम्हाला ओबामांचे वडील मुस्लिम आहेत, असे सांगायचे आहे का? असल्यास तसे स्पष्ट सांगा. कारण, इराण आणि सिरियामध्ये असे अनेक "हुसेन" आहेत कि जे धर्माने ख्रिश्चन आहेत. तेव्हा प्रत्येक हुसेन हा मुस्लिमच असेल असे नाही. ;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आशु जोग's picture

7 Apr 2013 - 1:51 pm | आशु जोग

वडीलांचे बरोबरच आहे असे म्हणावेसे वाटते

सरकार हे सगळ्यांसाठी असतं मग जनता कोणती का असेना...किमान लोकशाही असलेल्या देशात तरी !
त्यामुळे काय लिहायचंय ते खासगी टुंबस्टोन उभारुन लिहा, सरकार उगाच आपल्यावर कोरडे ओढुन घेणार नाही.