फुलपाखरू छान किती दिसते !

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in कलादालन
2 Nov 2009 - 5:56 pm

ठाण्यापासुन ७-८ किमी अंतरावर ओवळा म्हणुन गावकुसाचा भाग आहे. तेथील एक सुशिक्षित शेतकरी श्री. राजेंद्र ओवळेकर यांनी त्यांच्या वाडीवर फुलपाखरे जोपासली आहेत. कालच्या रवीवारी मटामध्ये त्यावर एक छोटासा लेख आला होता. तो वाचला आणि तिथे जावून धडकलो. दुर्दैवाने आम्ही चुकीच्या वेळी संध्याकाळी गेल्याने फारशी फुलपाखरे पाहायला नाही मिळाली पण राजेंद्रजींकडुन खुप माहिती मिळाली.

इच्छुकांसाठी ...
श्री. राजेंद्र ओवळेकर : ०९८६९२५६०५४

तिथे घेतलेली काही छायाचित्रे...

काही फुले....

फुलपाखरांचा जिवनक्रम...

बारीक अंडी / अळ्या / सुरवंट

पुर्ण वाढ झालेला सुरवंट

शेवटची स्टेज...

काही वेगळ्या रंगाची फुलपाखरे पाहायला मिळाली. नावे विचारू नका.. ;-) भलतीच क्लिष्ट होती, मी विसरलो. :-)

काही नेहमीचे मित्रही पाहायला मिळाले...

काही अनाहुत पाहूणेही होते.

शेवटी दोन मोठ्ठी फुलपाखरं (?) ..... ! छ्या.. भुंगे...! ;-)

विशाल.

छायाचित्रण

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

2 Nov 2009 - 6:31 pm | पर्नल नेने मराठे

सुरेख फुले!!!
चुचु

टारझन's picture

2 Nov 2009 - 6:42 pm | टारझन

वा !! छाण फुलपाखरे !!
पण ह्या पेक्षा सुंदर फुलपाखरे पहायची असल्यास पुणे कँपात एम.जी. रोड किंवा एफ.सी. रोड वर चक्कर टाका :)

-- (फुलपाखरू प्रेमी) टार्‍या अतिभयंकर

मदनबाण's picture

2 Nov 2009 - 9:27 pm | मदनबाण

मस्त फोटो,,, मी सुद्धा तिथे एक चक्कर मारुन यावं म्हणतो... :)

मदनबाण.....

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

नेहमी आनंदी's picture

2 Nov 2009 - 10:19 pm | नेहमी आनंदी

एक फुलपाखरु माझ्य खरडवहीत पण बघा. आणि एक खरड टाकायला विसरू नका.

मस्तानी's picture

2 Nov 2009 - 10:43 pm | मस्तानी

पुढच्या वेळी घरी (ठाण्याला) गेल्यावर या ठिकाणी नक्कीच जाऊ ... सध्याच्या राहत्या ठिकाणी एका सहलीत काढलेली ही काही फुलपाखरांची चित्रे ...

" Wings of Mackinac - Butterfly House "यांच्या सौजन्याने

प्रभो's picture

3 Nov 2009 - 11:46 am | प्रभो

मस्त बे.......

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

sneharani's picture

3 Nov 2009 - 12:00 pm | sneharani

छान आहेत..!

मॅन्ड्रेक's picture

3 Nov 2009 - 6:03 pm | मॅन्ड्रेक

छान आहेत..!

at and post : xanadu.

स्वाती२'s picture

3 Nov 2009 - 6:14 pm | स्वाती२

छान आहेत फोटो. आईला सांगायला पाहिजे या ठिकाणाबद्दल.

विशाल कुलकर्णी's picture

4 Nov 2009 - 9:33 am | विशाल कुलकर्णी

धन्यवाद.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"