मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विनोद

(गिरनार पर्वतावर रंजिताची - गुरूंशी भेट)

विसोबा खेचर ·
लेखनप्रकार
सदरच्या विडंबनाकरता तामिळनाडूमधील काही महिन्यांपूर्वी सिने अभिनेत्री रंजिता आणि स्वामी नित्त्यानंद यांच्यातील गाजलेल्या स्कँडलचा आधार घेण्यात आला आहे. या स्कँडलबाबत अनेक संकेतस्थळांनी आणि हिंदी-इंग्रजी व सर्व दाक्षिणात्य वाहिन्यांनी काही काळ सातत्याने प्रकाश टाकला होता. सबब, या विडंबनाकरता आणि केवळ मौजमजा म्हणून इथेही त्या स्कँडलचा आधार घेण्यात आला आहे. मिपा मालक-चालक आणि संपादकवर्गाची त्याबाबत हरकत नसावी! -- तात्या.

अभंग मुक्तछंद

यकु ·
काव्यरस
‍रचावा अभंग परि मनी मुक्तछंद चितारु क्षणरंग एकएका अफाट हे जग लोकही अफाट सुटले ते सुसाट दाहीदिशा परि एक जलाशयी जैसे येती जगपक्षी तैसे उतरती जालस्थली रोजरोज अवघे ते विश्व जाली प्रगटले नगास ते नग गेले मिळौनिया बसावे एकजागी कराव्या त्या गोष्‍टी चाखावी समष्‍टी वेद बोले स्थळाचे महात्म्य काय वर्णू मी पामर हरएक जाणे गूज जेव्हा तो सदस्य स्वये झाला जनाचे मनाचे काथ्याकुटी काठ्‍या कविंच्या कविता विडंबिती दुष्‍ट पाककृती शोभा कलेचे दालन गृहे पाकगृहे सोडून सुगरणी आल्या पायाची भिंगरी फिरविते दाही दिशा भटकत येती आश्रया भटकंतीच्या विषय अगम्य प्रतिसाद महान किती कूटगूढरम्य चर्वण चाले करीती वादावादी विषया

नाईट शिफ्ट

पाषाणभेद ·
लेखनप्रकार
आयटीमधली नोकरी म्हणजे डोक्याला ताप असतो. आयटीशिवाय असलेल्या व्यक्तिंना तर ही नोकरी म्हणजे स्वर्ग वाटतो. त्यांना असे वाटते की नुसते बसून तर काम असते. अन सोई सुविधा, तगडा पगार आदींबाबत तर फारच मोठे गैरसमज पसरले आहेत. मान्य आहे की इतर इंडस्ट्रीजपेक्षा येथे जास्त पगारपाणी असतो, पण तो काही सर्व आयटी प्रोफेशनल्सला असू शकत नाही, किंवा सर्व प्रोफेशनल्सची कंपनीदेखील जास्त पगार देणारी नसते. अन हा जास्त पगार म्हणजे फुकट असत नाही. त्या बदल्यात कंपन्या कामेदेखील करवून घेतात. सर्व ठिकाणी कामाची परिस्थिती आनंददायक असतेच असे नाही. असो. असो अशासाठी की माझी गोष्ट भलतीकडेच वाहवत चालली होती.

प्रचंड गारठा

प्रशांत उदय मनोहर ·
------ भाग १: ------ प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......! बर्फ़च घेऊन जणु बाहेर वाहतोय सुसाट वारा ! सूर्यकिरणांनी चकाकतोय दवबिंदू... की पारा? निसर्गाने उघडलाय बघ! सौंदर्याचा गाभारा.... माझ्या हातात तुझा हात उबदार जरा... तुझ्यासवे चालत चालत सरावा जन्म सारा.... प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......! तुझ्यासह घालवलेला क्षण क्षण न्यारा....! ------ भाग २: ------ प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......! झोपावे जरा, अजून कामाचा शीण नाही गेला सारा.... पहाटे पहाटे पेपरवाल्याने बेल वाजवली कराकरा.. सकाळी सकाळी "ही" का आवरतेय आज घरातला पसारा? आज रविवार!

(सुटलेल्या पोटाची कहाणी)

यकु ·
प्रेरणा: दमलेल्या बाबाची कहाणी घामेजून ताणलेला एक पट्टा कुणी काचलेला लालेलाल वळ उठे झणी रोजचेच झाले आता नवे काही नाही इन कशी करु आता मला सांगा कुणी झोपेतच हात जातो ढेरी वरी जरी निजेतच स्वप्नी भासे स्लीम झाली ढेरी सांगायचे आहे काही माझ्‍या मनातले मला सुटलेल्या पोटाची ही कहाणी तुला ना ना ना ना ना..

तो एक लाज-पुत्र

अत्रुप्त आत्मा ·
काव्यरस
थोडी पार्श्वभूमी-इथे एका कालीज(कॉलेज) कन्यकेने एका रोड-रोमिओमुळे त्रस्त होऊन काही मैतरणींना हाताशी घेऊन,त्याला धडा शिकवला आहे...(खरं म्हणजे प्रस्तुत प्र-संग आमच्या शालीन वयात ;-) ,आमच्या पल्याडच्या कालीजात आखो-देखे घडलेला होता, तो आज त्या कॉलेजला काही कामानिमित्त भेट दिल्यामुळे स्मृतिपटलावर आला...म्हणुन म्हटलं आलाय बाहेर..तर त्याला जमेल तसा मांडावा) तो एक लाज-पुत्र,मी ही-रान्टी फूलं। चारिन मी ,मी त्याला ग्राउंडची माती/धूळ॥धृ॥ कंठात बगळ्याचे हाड,केसात उवांची जाळी अंगाला सार्‍या बरबटुन शाई,घालीन चपलांची माळ।१। खाशील का पुंन्हा माती..?करशील का उचापती..?। ताई रे ताई म्हणुन स्वारी,भरशील नळावरी

(माझ्या मित्राची) अशीही एक परिक्रमा

शरद ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
(माझ्या मित्राची) अशीही एक परिक्रमा. फारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्य वेळी पुण्यात रजनीशांच्या आश्रमात अनेक पाश्चिमात्य भक्त येत असत व बरेच जण उन्हाळ्यात नदीच्या पात्रातच तंबू ठोकून रहात असत. कोरेगाव पार्क, ब्ल्यु डायमंड हॉटेल या परिसरात त्यांचा वावर बराच असे. त्या काळातील ही कथा. आमचा एक कोकणस्थ मित्र त्याच्या एका दोस्ताबरोबर संध्याकाळी , उशिरा जेवणासाठी ब्ल्यु डायमंड हॉटेलात गेला. गोरापान, गुटगुटित, निळ्या डोळ्य़ांचा हा एखादा युरोपिअन म्हणून खपण्याजोगा होता. वृत्तीने दिलदार, कलंदर, व सर्वांत मिळून मिसळून जाणारा. तेथे पिणे-जेवण वगैरे आटोपले. पिणे जरा जास्तच झाले .

काही किस्से...

सोत्रि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जालरंग प्रकाशन दरवर्षी ’शब्दगाऽऽरवा’ हा हिवाळी अंक (e-Publication) प्रकाशित करते. ह्या वर्षीच्या 'शब्दगाऽऽरवा २०११' मध्ये प्रकाशित झालेला माझा एक लेख इथे पुन: प्रकाशित करतो आहे. माणूस हा किस्सेबाज असतो. त्याला किस्से ऐकायला, सांगायला फार आवडते. अरे हो, पण ते किस्से झाल्याशिवाय कसे ऐकणार, सांगणार? मग ते किस्से करणे हेही त्याचे आवडते काम बनले. असंख्य किस्से आपल्या आजूबाजूला घडत असतात. काही किस्से आपण घडताना प्रत्यक्ष पाहतो.

काय करावे या किड्याला ?

अत्रुप्त आत्मा ·
काव्यरस
काय करावे या किड्याला साला लिहिता लिहु देत नाही डोक्यात बरेच येत असते पण डोळ्यांना पाहु देत नाही. सुचत असते पान उघडल्यावर 'हे'...'हे'...लिहायचे.. पण बसले एकदा लिहायला की..ते-तेच का रहायचे..?

कधीकाळी झालेल्या कविता

यकु ·
कधीकाळी झालेल्या कविता (1) वेळही अशी ती होती उगवती न फटफटलेली पक्षीही तुरळक जागे नुकतेच जरा फडफडले माणसे होऊन जागी चालली खाया वारा या शांत पहाट वेळी ती मला भेटते म्हटली आलीच पहा ती आली येताच तिला ओळखले मी मनात माझ्‍या गुपचूप सांगूच नको मी म्हटले ती बसली अगदी चुपचूप अशी दोघे गुपचूप बसता बोलणे खुंटले अ‍गदी पण बोलून काही ना येता ती कसली भेट म्हणावी सावरुन मी हे वदलो डोळ्यात तुला साठवण्‍या मी रात्र-पहाट ही केली पाहून घेऊ दे आता तुज सुंदर शांत सकाळी ते वस्त्र रंग गुलाबी मुखचंद्र अनावरण करता ह्रदयास हुडहूडी भरली नजरेस तिच्या त्या वरता बोलास काही ना सुचले ते मूक-मूक गल